Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वारसा

    August 10, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    August 10, 2026

    माणुसकीची फुले

    August 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » वारसा
    ललित

    वारसा

    अतुला प्रणव मेहेंदळेBy अतुला प्रणव मेहेंदळेAugust 10, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अतुला प्रणव मेहेंदळे, अतुला मेहेंदळे, लेखिका अतुला प्रणव मेहेंदळे, मुलीचे महत्त्व, मुलीची माया, शकुंतलाबाई मनस्वी स्नेहबंध, सासू शकुंतलाबाई सून सुमेधा, शकुंतलाबाई नात मनस्वी, शकुंतलाबाई नातू अभिजीत, शकुंतलाबाई नातसून कियारा, शकुंतला तोरणे कुटुंब
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “आई, अहो येताय ना खाली. सगळे आलेत. आपल्या मनूच्या लग्नाच्या साड्या खरेदीचा कार्यक्रम आहे. बस्ता घेऊन बोलावलं आहे, आपल्या नेहमीच्या पद्धतीने… आणि सोनाराला पण दोन तासांनी बोलावलं आहे. ती खरेदी पण करून घेऊ. नेहमीप्रमाणे सगळं कसं तुमच्या शिस्तीत होऊदे…” सुमेधा आपल्या सासूबाईंना म्हणजेच श्रीमती शकुंतला विष्णूपंत तोरणे यांना सांगत होती.

    “सुमेधा, काय गं तू अशी? तुम्ही बायकांनी ना नुसती नोकरी केलीत. तू काय आणि तुझी ती सून कियारा काय… ती पण तशीच! आता तर काय ती परदेशात स्थायिक झाली आहे. त्यामुळे काही बोलायलाच नको. तिकडे काय करते कोण जाणे? तुम्ही नोकऱ्या सोडून बाकीचं काही एक केलं नाहीत. सगळं माझ्यावर टाकलं कायम… एवढी दोन मुलं तुला, पण अभिजित आणि मनस्वी दोघांची बरीच जबाबदारी मीच उचलली. मी आपली खमकी म्हणून झाला हो तुझा संसार,” असं म्हणतच शकुंतलाबाई चौसोपी वाड्याच्या पायऱ्या उतरत्या झाल्या आणि सुमेधाने या सगळ्याला हसतच होकार भरला.

    शकुंतला तोरणे यांचे सांगलीमध्ये भारीच प्रस्थ. विष्णूपंत म्हणजे सांगलीतले नामवंत वकील. पिढ्यान् पिढ्यांचा वकिलीचा व्यवसाय आणि त्यातून मिळालेला मान-मरातब… तशा शकुंतलाबाई खूप काही शिकलेल्या नव्हत्या, पण अनुभवातून सिद्ध होत गेल्या होत्या आणि आता परत एकदा आजेसासूबाई होणार होत्या… तेही वयाच्या फक्त 83व्या वर्षी! नातजावई येणार होता आता. ‘फक्त 83’ अशासाठी की, त्या कधीही कुठल्याही कामाला वाघिणीसारख्या कायम पदर खोचून उभ्या! अगदी विष्णूपंत गेल्यानंतरही त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. आणि घराला सावरलं. मनस्वी झाली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला खरा, पण मोठा नातू अभिजीत झाल्यावर त्यांच्या डोळ्यात जे आनंदाने अश्रूच तरळले होते, तितका अत्यानंद त्यांना झाला नाही. दोघांनाही खूप माया लावली त्यांनी. पण अभिजीतचे लाड जास्तच केले! ते ही अगदी उघडउघड…

    हेही वाचा – दृष्टिकोन…

    सुमेधाच्या पाठीशी पण आधारवड बनून उभ्या होत्या कायमच. तिला मुलगी न मानता कायमच सूनेचाच मान देत असल्या तरी जाच, त्रास कधीच कसलाच नाही. शकुंतलाबाईंना मुलींचं तसं पाहिलं तर थोडं वावडंच. त्यांना एकुलता एक मुलगा श्रीधर. एकंदर घराण्यातच मुलांचं गुणोत्तर जास्त मुलींपेक्षा! अगदी खूप कहर नसला तरी, उन्नीस-बीस व्हायचंच त्यांच्याकडून.. हे घरात सगळ्यांनाच माहिती होतं. पण तरीही मनस्वी त्यांच्यावर खूप प्रेम करायची. अभिजीत म्हणजे त्यांना म्हातारपणाची काठी वाटायचा. त्याच्या लग्नात खूप हौस करून घेतली. नातसून कियारा तशी बरी होती, पण अप्पलपोटी होती, हे थोड्या दिवसांच्या सहवासात त्यांच्या लक्षात आल्यावाचून राहिलं नाही. तिच्याच तर सततच्या भुणभूण करण्याने शकुंतलाबाईंचा विरोध असतानाही मागच्या वर्षी अभिजीत अमेरिकेला गेला होता. कारण काय तर, त्याला म्हणे पिढीजात वकिलीचा व्यवसाय करायचा नव्हता.

    शकुंतलाबाईंना अजूनही आठवत होता तो दिवस. त्याने जाऊ नये म्हणून त्या समजवायला गेल्या, “अरे अभी, तू चांगला वकील झाला आहेस आणि इथे आपला चांगला घरंदाज वंशपरंपरागत चाललेला व्यवसाय आहे. आता तो तू नाही बघणार तर, कोण बघणार? श्रीधरच्या हाताखाली छान तयार हो आणि मग तुलाच तर बघायचं आहे सगळं. मनू काय शेवटी मुलगीच. लग्न झालं की, जाईल निघून… तुझ्या बापाने तुझ्या जोरावर तर मुंबईत व्यवसाय वाढवला आणि तुला म्हणे बिझनेस करायचा आहे, तोही त्या परदेशात जाऊन! नको रे जाऊस..”

    त्यांचं बोलणं झिडकारत अभिजीत म्हणाला, “कशाला? बाबांची लाडकी तर मनू आहे आणि ती करतेय की, वकिलीची प्रॅक्टिस! ती नेईल वारसा पुढे. तसंही मला इथे सांगलीत आणि मुंबईत राहण्यात काहीच स्वारस्य नाहीये आणि तूच तर नेहमी म्हणतेस तुला जे हवं ते कर. मला जाऊदे गं… उगीच दोन आसवं वगैरे गाळून मला थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न करू नकोस. मी नाही थांबणार आता तुमच्या या भावनिक बंधनांनी…” त्यावेळी शकुंतलाबाईंचे डोळे उघडले. आपलेच नको तेवढे लाड आहेत हे. याला आपल्याबद्दल जराही वाटत नाही. त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला!

    तसं अजून एक कारण पण नुकतंच घडलं होतं. दोन महिन्यांपूर्वी श्रीधर आणि सुमेधा दोन दिवस देवदर्शन करायला आणि पत्रिका ठेवायला कोकणात गेले, तेव्हा अचानकच दुपारी शकुंतलाबाईंना छातीत दुखायला लागलं. घरकामाला असलेल्या अक्कूने घाबरून लगेचच मनूला फोन लावला. मनस्वी हातात असलेली सगळी कामं त्वरित बाजूला टाकून घरी आली आणि स्वतः गाडी चालवत आपल्या आजीला हॉस्पिटलला घेऊन गेली. तिची वकिलीमुळे बरीच ओळख निर्माण झाली होती आणि तोरणे नाव सोबतीला होतंच. तिने दोन दिवस सुट्टी घेऊन आजीची सगळी काळजी घेतली.

    “गॅसचा जबरदस्त त्रास झाला आहे. काळजी करण्यासारखं काही झालेलं नाही.” असं डॉक्टरांनी सांगितल्यावर आईबाबांना त्रास नको म्हणून तिने आजीची सगळी काळजी स्वतःच घेतली. त्यासाठी फर्ममध्ये पण तिने येणार नाहीये, असं सांगून टाकलं आणि अगदीच अशक्य कामं फोनवर करायचा प्रयत्न केला. शकुंतलाबाई या तिच्या ममतेने अपार आनंदित झाल्या. या पोरीचा तसा पहिल्यापासूनच आपल्यावर खूप जीव. आपणच डोळे मिटून बसलो होतो. याची त्यांना जाणीव झाली. आत्ताही त्या हे सगळं आठवून क्षणभर खंतावल्या.

    “आजी, अगं ये ना. मला सांग कुठली साडी नेसू मी लग्नात. प्रशांतच्याच घरच्यांनी आपली आपली खरेदी करायची सांगितली, ते बरं झालं. माझ्या आजीचा चॉईस सगळ्यात बेस्ट आहे हे कुठे त्यांना माहितेय…” असं म्हणतच मनू आजीच्या गळ्यात पडली आणि शकुंतलाबाई भानावर आल्या. “हो! आली मोठी शहाणी. किती लोणी लावशील गं आजीला! ढमाली कुठली… बघुदे चल,” असं म्हणून त्या अगदी सहज एकेक साडी खरेदी करत होत्या. सगळ्यात अगदी हिरीरीने वयाचा विचार न करता भाग घेत होत्या. सगळं कसं आलबेल चालू होतं…

    बघता बघता दोनच दिवसांवर लग्न येऊन ठेपलं. घराचं अगदी गोकुळ झालं होतं. सगळी मंडळी आली होती, अगदी अभिजीतसुद्धा आला होता बायकोसोबत आपल्या बहिणीच्या लग्नाला. दुपारची जेवणं आटोपल्यावर पुरुषमंडळी वामकुक्षी घेत जरा पडले होते, तेव्हाच शकुंतलाबाईंनी आपल्या नातीला, सुनेला आणि नातसुनेला बोलावून घेतलं. सगळ्या ‘कशाला बोलावलं असेल’ या धाकधुकीतच खोलीत आल्या. पाहतात तो काय सगळे दागिने पलंगावर मांडून ठेवले होते. त्यातले कित्येक दागिने तर, कधीही कुणालाही घालायला सोडाच, अगदी बघायलासुद्धा मिळाले नव्हते! सगळ्या एकमेकींकडे बघत होत्या…

    नातसूनेने आनंदाने एक दागिना हातात घेऊन आजेसासूला विचारलं, “आजी एवढे दागिने! वा! कित्ती सुंदर आहेत हे. हा हार तर अगदीच मस्त आहे.” त्यावर सुमेधा थोड्या रागातच म्हणाली, “अगं काय हे कियारा? धीर धरा सूनबाई. कित्ती तो उतावळेपणा.” हे ऐकून न ऐकल्यासारखं करत थोडं हसतच शकुंतलाबाई म्हणाल्या, “अगो सुमेधा, जाऊदे गं तिचं! खरंतर, दागिने म्हणजे स्त्रीच्या मर्मबंधातली ठेव असते. सासर माहेरची आठवण एकत्र करून बांधलेली गुंफण असते. प्रत्येक स्त्री ही तिचे दागिने मरणोत्तर आपल्या वारसांना देत असते. कारण एकच, आपली आठवण रहावी. आपले आशीर्वाद त्यांना मिळावेत आणि आपल्यासारखीच पै-पै साठवत संसार फुलवत रहायची आवड निर्माण व्हावी. तसं पाहिलं तर, कुठल्याही स्त्रीला दागिन्यांचा सोस खूप. आपण आहोत तोपर्यंत ते जपून ठेवायचे आणि आपल्यानंतर योग्य हातात सुपूर्द करायचे. आज हे सगळे योग्य हात माझ्याकडे आहेत आणि म्हणूनच मी माझ्या हयातीत हे सर्व वाटून टाकणार आहे.”

    हे ऐकताच अभिजीतच्या बायकोला खूप आनंद झाला. “दागिने हे घरच्या सुनांना जास्त दिले जातात. शिवाय, आजींचा ओढा पहिल्यापासूनच अभिजीतकडे जास्त आहे. म्हणजे, आपल्याला मनूपेक्षा जास्त मिळणार.” असे खयाली पुलाव तिच्या मनात रुजवात करणार तोच शकुंतलाबाई पुढे झाल्या. त्यांनी नात, सून आणि नातसून यांना दागिन्यांची वाटणी करून दिली आणि मग ठेवणीतला पितळीचा डबा मनूच्या हातात ठेवत म्हणाल्या, “मनू हे खास तुला!” त्यांनी असं म्हणताच मनू अचंबित झाली. “आजी हे काय गं? अगं मला आधीच तू इतकं प्रेम आणि इतकं सगळं दिलं आहेस. मला खरंतर आता काहीच नकोय. तरी मी तू मगाशी वाटून दिलेले दागिने घेतले की! त्यात मी खूप खूश आहे. अजून हे काय आता? मला आता काही नको. फक्त एक कर मला तुझं प्रेम मी लग्न करून गेल्यानंतर पण हवं आहे. ते कधीच कमी होऊ देऊ नकोस. अभिजीत दादा इतकंच प्रेम माझ्यावर करत रहा म्हणजे झालं.” असं म्हणून मनूने शकुंतलाबाईंना मिठीच मारली. दोघीही घट्ट मिठी मारून डोळ्यातल्या आसवांना वाट मोकळी करून देत होत्या. समिधाने पण लेकीची पाठवणी होणार म्हणून डोळ्याला पदर लावला.

    हेही वाचा – वेळ

    आता मात्र शकुंतलाबाई पुढे बोलायला लागल्या… “मने, ये. बस इकडे. अगं लहानपणी ना तुला माझ्याकडूनच बेदाणे आणि काजू खायचे असायचे. बाकी कुणाकडे जायची नाहीस आणि मी तुझ्यासाठी मुद्दाम डब्यात वेगळे भरून ठेवत होते. तसेच आहे हे. अगं, ही माझ्याकडून तुला लग्नासाठी दिलेली जादाची प्रेमाची भेटच आहे. उद्या मी नसले तरी, या दागिन्यांच्या रूपात मी कायम तुझ्यासोबतच असेन. म्हणून तर परवा सोनाराला मी परत पाठवून दिलं. इतके दागिने आहेत अजून कशाला हवेत? आणि तुला सांगू का, हा डबा तर माझ्या विशेष प्रेमाचा आहे. यात माझ्या आईचे सगळे आणि सासूबाईंनी पहिल्या सणांना मला दिलेले, असे जुने आणि भरीव दागिने आहेत. मी हे खरंतर माझ्या स्वभावानुसार नातसूनेला देणार होते. असो. मला त्याबाबतीत काही बोलायचं नाहीये. पण आता माझे डोळे उघडले आहेत. वारसा काय फक्त मुलंच नाहीत तर लेकी सुद्धा चालवतात. मला मुलगी नाही, पण तू माझी लेक झालीस. तू माझ्या आजारपणात मला हे दाखवून दिलं की, लेकीच दोन्ही कुटुंब बांधून ठेवतात. आपण उगीच मुलं मुलं करत बसतो. ते तर आपला स्वार्थ संपला की निघून जातात. पण मुली मायेने एकच नव्हे तर, दोन्ही घरं बांधून ठेवतात. मनू माझ्या आईची आणि सासूबाईंची म्हणजेच तुझ्या पणजीची ही परंपरा आज मी तुला देतेय… आणि हाच वारसा तूही पुढे चालव. मला खात्री आहे तूच या दागिन्यांची खरी लक्ष्मी आहेस. खूप मोठी हो बाळा. या म्हाताऱ्या आजीला विसरू नकोस, असं मी अजिबात म्हणणार नाही; कारण तू तसं करणार नाहीस याची मला खात्री आहे.” असं म्हणून शकुंतलाबाईंनी मनूला कुशीत घेतलं आणि सगळ्यांनीच डोळ्यातल्या आसवांना वाट मोकळी करून दिली.

    नातसून मात्र गप्पपणे सगळं ऐकत होती. आज शकुंतलाबाईंना खूप हायसं वाटत होतं. त्यांच्या मागच्या पिढीचा दागिन्यांचा वारसा त्यांनी अगदी सुयोग्य हातात सुपूर्द केला होता.

    Avatar photo
    अतुला प्रणव मेहेंदळे

    अतुला प्रणव मेहेंदळे, वय 38. राहणार ठाणे येथे. प्रॅक्टिसिंग सी. एस. आणि एल. एल. बी.चं शिक्षण घेतलं आहे. गेली 14 वर्षं कंपनी सेक्रेटरी म्हणून स्वतःची प्रॅक्टिस करत आहे. पुस्तक वाचन, जुनी गाणी ऐकणे, फिरण्याचा छंद आहे. तसं आधीही लिहावं असं खूप वाटायचं, पण खरी सुरुवात कोरोना काळात स्वामींच्या आशीर्वादाने म्हणा किंवा प्रसादाने म्हणा स्वामींच्या प्रकट दिनी त्यांच्यावरच्याच लेखाने झाली. मी लिहिलेल्या बऱ्याच कथांच्या अभिवाचनासह दिवाळी अंक, छोट्या छोट्या वर्तमानपत्रात विविध कथा छापून येत राहिल्या. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला. वय आणि अनुभव छोटा असला तरी आता बऱ्याच कथा लिहून आणि प्रसिद्ध करून झाल्या. व्यावसायिक दृष्टिकोनातून कधीच लिखाण केलं नाही. लोकांना आवडतील, रुचतील, कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा लघुकथा लिहिण्याचा प्रयत्न करते. शेवटी मायबाप रसिक, आईवडील, सर्व वडीलधारे नातलग आणि देवाच्या कृपाशीर्वादाने असं लिखाण आजन्म घडो, ही दत्तगुरूचरणी प्रार्थना.

    Related Posts

    माणुसकीची फुले

    August 10, 2026 ललित

    प्रेमाचे झाड

    August 9, 2026 ललित

    एसए ग्रुप… व्यसनाच्या विळख्यात प्रणिता

    August 8, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माणुसकीची फुले

    By सतीश बर्वेAugust 10, 2026

    “दिदी मुझे माफ कर दो. आजतक मैंने आप के साथ जो बरताव किया, उसके लिए…

    प्रेमाचे झाड

    August 9, 2026

    एसए ग्रुप… व्यसनाच्या विळख्यात प्रणिता

    August 8, 2026

    हलकल्लोळ

    August 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वारसा

    August 10, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    August 10, 2026

    माणुसकीची फुले

    August 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला

    August 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    August 10, 2026

    Movie : One Life… प्रत्येक आयुष्य महत्त्वपूर्ण

    August 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 390
    • अवांतर 202
    • आरोग्य 137
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 528
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 840
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वारसा

    August 10, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    August 10, 2026

    माणुसकीची फुले

    August 10, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.