Author: अतुला प्रणव मेहेंदळे

Avatar photo

अतुला प्रणव मेहेंदळे या ठाणे स्थित प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहेत. त्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात आहेत. शिवाय, त्या LLB शिकलेल्या आहेत. मराठी लेखनही गेली काही वर्ष करत आहेत. वाचन, जुनी गाणी ऐकणे, फिरणे असे इतर छंदही जोपासले आहेत. त्यांना लिखाणाची आवड आहे. त्यांच्या बऱ्याच कथांचं अभिवाचन वेगवेगळ्या ठिकाणी, Social media, You Tube इत्यादींवर केलं जातं. तसेच, दिवाळी अंक, वर्तमानपत्रात विविध कथा छापून येतात. त्यांना राज्यस्तरीय कथा स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे. काही ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही बोलावले जाते. जे त्यांचा अनुभव अजूनच संपन्न करून जाते. आतापर्यंत 60हून अधिक कथा लिहून आणि प्रसिद्ध करून झाल्या आहेत. व्यावसायिक कथालेखन न करता समाजाला आवडेल, रुचेल आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, या हेतूने लघुकथा लिहिल्या आहेत. वय कमी असूनही लिखाणाचा सुरू झालेला हा प्रवास असाच पुढेही सुरू राहो.

आज नमिताचं कशात लक्षच लागत नव्हतं. शिवाय, हातही अगदी यंत्रवत चालत होते. करणार काय? तीन-चार दिवसांपासून तिला सर्दी, खोकला होता आणि दुपारी तर चक्क थोडा तापही आला म्हटल्यावर नमिताबाई एकदम घाबरल्या की! सार्थक, तिचा नवरा, वर्क फ्रॉम होममुळे घरातच होता. त्याने पण दोन-तीन दिवसांचं सगळं तालमाल बघून तिला सांगितलं, “नमू, मला काय वाटतं आपण एकदा टेस्ट करूनच घेऊयात. निगेटिव्ह आली तर चांगलंच आहे, पण पॉझिटिव्ह आली तर, वेळेवारी औषधं चालू होतील नं. काय वाटतंय तुला?” नमिता विचार न करता लगेचच म्हणाली, “मी पण हेच म्हणणार होते. उगीच रिस्क कशाला? आपल्याकडे रोहन पण आहे 10 वर्षांचा आणि काय असेल ते होऊन…

Read More

सुहासिनीबाई आज अगदी आनंदात होत्या. त्यांच्या लेकीचा मनस्वीचा आज ‘आदर्श शिक्षिका’ म्हणून शासनातर्फे सन्मान होणार होता. “हे बघायला आज हे हवे होते. ह्यांना खूप आनंद झाला असता, आपल्या लेकीला पुरस्कार मिळतोय बघून… दरवेळी आपल्याला हवं तसं थोडीच घडतं. पण कधीकधी आपल्या मनासारखं नाही घडत तेच योग्य असतं आणि भल्याचं असतं असंच आजच्या दिवसावरून म्हटलं पाहिजे. नाहीतर मनस्वीचा हा सन्मान अशक्यच होता.” असा विचार सुहासिनीबाईंचा सुरू होता. त्या झोपाळ्यावर बसून चहा घेत होत्या. तेवढ्यात मनस्वी आलीच… “अग आई, मी निघते पुढे. शाळेत एक-दोन कामं आहेत. ती झाली की, आपण सगळेच ह्यांच्याबरोबर निघूयात? नाहीतर मानसच्या गाडीतून जाऊयात. आज त्याने सुट्टीच टाकली आहे…

Read More

“श्रावणी अगं झालीस का तयार? चल बाई, येतीलच आता मुलाकडचे इतक्यात.” श्रावणीची आई वसुधाताई हाका मारून दमल्या होत्या… आणि खरं सांगायचं तर, त्या कंटाळल्याही होत्या. श्रावणीच्या लग्नासाठी खूपच जोडे झिजवावे लागत होते त्यांना. श्रावणी जगताप आता जवळजवळ 32 वर्षांची झाली आहे. तिला प्रेमविवाह करायचा नाहीये आणि ठरवून केलेल्या लग्नासाठी पण तिच्या दोनच अटी आहेत. मुलगा तिच्या स्वभावाला साजेसा असावा आणि दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तिच्या आईला सांभाळणारा असावा. या अटीमुळे तिचं लग्न काही जुळता जुळत नाहीये. यावेळी मात्र वसुधाताईंनी दोन दिवस आधी तिला जवळ बसवून सांगितलं, “अगं श्रानू अशी अट घालशील तर, कायमच माझ्यासोबत रहायला लागेल बिनालग्नाचं! अगं, लोकं मला…

Read More

“अरे ओंकार, काहीच होऊ शकत नाही का रे आपल्या जाण्याबद्दल? आपण परत विचार करूयात नं? इथे पण तुला पुढे चांगल्या संधी चालून येतीलच की… आणि आता आठवीला श्रेयसची शाळा बदलायची म्हणजे खूप त्रास होईल आपल्याला. नाहीतर आपण असं करूयात का? असेही तुझं तिकडे स्थिरस्थावर होईपर्यंत थोडे दिवस आम्ही आहोतच इथे… नंतर पण आम्ही दोघे इथेच रहातो बाबांसोबत. त्याची शाळा संपली तीन वर्षांनी की, मग बघू तिकडे यायचं.” अपर्णा ओंकारला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती आणि त्यासाठी कधीही तोंड वर करून न बोलणारी ती, एकदम एका दमात सगळं बोलून गेली. तसा तिच्या बोलण्याचा त्याच्यावर ढीम्म फरक पडणार नव्हता, हे तिलाही माहीत…

Read More

“अनया, अगं आज आपल्याला जायचं आहे ना अप्पूकडे. तू थांब जरा मी येते तुझ्याकडे आणि मग तुला तयार करून मी पण तयार होते. मग जाऊ आपण. तुला एवढं पोट घेऊन कुठे सगळं आवरता येणार आहे. त्यात पीयूष पण उद्या घरी नाही. दिल्लीला गेला आहे ना आज सकाळीच… आणि तुझी आई पण इथे नाहीये. मी बरोब्बर 3 वाजता येते, मग आपण जाऊ,” मैथिली असं बोलून फोन ठेवते. मैथिली म्हणत होती ते काही तितकंसं खोटं नव्हतं. आताशा अनयाची हालचाल थोडीफार मंदावली होती. तिला सातवा महिना लागला होता. पोटाचा घेर चांगलाच वाढला होता. आतून बाळ भरपूर लाथापाणी खेळत होतं. खरंतर, अनया गेल्या काही…

Read More

“आई, अहो येताय ना खाली. सगळे आलेत. आपल्या मनूच्या लग्नाच्या साड्या खरेदीचा कार्यक्रम आहे. बस्ता घेऊन बोलावलं आहे, आपल्या नेहमीच्या पद्धतीने… आणि सोनाराला पण दोन तासांनी बोलावलं आहे. ती खरेदी पण करून घेऊ. नेहमीप्रमाणे सगळं कसं तुमच्या शिस्तीत होऊदे…” सुमेधा आपल्या सासूबाईंना म्हणजेच श्रीमती शकुंतला विष्णूपंत तोरणे यांना सांगत होती. “सुमेधा, काय गं तू अशी? तुम्ही बायकांनी ना नुसती नोकरी केलीत. तू काय आणि तुझी ती सून कियारा काय… ती पण तशीच! आता तर काय ती परदेशात स्थायिक झाली आहे. त्यामुळे काही बोलायलाच नको. तिकडे काय करते कोण जाणे? तुम्ही नोकऱ्या सोडून बाकीचं काही एक केलं नाहीत. सगळं माझ्यावर टाकलं…

Read More

“नमू, अगं चल नाश्ता करून घे. तुला आवडतात ते डिंकाचे दोन लाडू आणि अळीवाची खीर केली आहे. ती पटापट संपव बघू. मला जेवण पण बनवायचं आहे आणि मग मला थोडं बाहेर जायचं आहे. बारशाची सगळी तयारी आणायची आहे. हॉल घेतला असला तरी देण्याघेण्याचं बघायला हवं बाई. आमच्या बहिणाबाईंच्या सासरच्या मंडळींनी नाव काढलं पाहिजे, छान केलं बारस माहेरच्यांनी म्हणून…” असं नमिताची बहीण मिथिला हसत हसत म्हणाली. पण नामिताचा अजिबात नूर नव्हता खायचा. ती हॉलमध्ये खेळणाऱ्या बाळाकडे एकटक बघून रडत होती. नुसतंच त्याला खेळवल्यासारखं दाखवत होती, पण आज ती मनातून खूप दुःखी होती. बारसे झाल्यावर लगेचच आठवडाभरात तिला तिच्या घरी परत जायचं…

Read More

“अरे वरुण, आई कुठेच दिसत नाहीये! कुठे गेली सकाळी सकाळी? खोलीत नाहीये… आणि इकडे पण दिसत नाहीये…” महेंद्र विचारत होता. तेवढ्यात वरुण पण चिडक्या स्वरात म्हणतो, “ओ डॅड, मला वाटलं तुम्हाला तरी माहिती असेल. म्हणून तुम्ही खोलीतून बाहेर यायची वाट बघत होतो. जाऊदे. तुम्ही नाश्ता घ्या करून. मी आत्ताच गरम करून खाऊन घेतला.” यावर महेंद्र डोळे वटारून विचारतो, “बापरे! तू केलास नाश्ता? नको मग मला.” तेवढ्यात अंगणातली फुलं गोळा करून कमलाबाई आल्या. त्याही त्यांच्या तार स्वरात म्हणाल्या, “अरे नाही रे, त्याने नाही, मी बनवला आहे नाश्ता. आपल्याकडे पुरुष माणसं कुठे जातात स्वयंपाकघरात. तो तरी कसा जाईल. मला रात्री उशिरापर्यंत झोपच…

Read More

अस्मिताची आज खूप धावपळ होत होती. सध्या तिला नोकरी आणि हॉस्पिटल अशी तारेवरची कसरत करावी लागत होती. सोबत सासूबाई होत्या, पण वयानुसार त्यांच्या पण बारीक सारीक कुरबुरी चालूच होत्या. “अगं अस्मिता, तू जा बघू आंघोळीला. मी टाकते ती भाजी फोडणीला. अगं घाबरू नकोस नाही करत झणझणीत… अमोलला नाही सांगितली आहे ना डॉक्टरांनी… तू नको काळजी करू, जा तू…” अस्मिता लगेचच आंघोळीला पळाली आणि नंतर अमोलसाठी डबा घेऊन हॉस्पिटलला गेलीसुद्धा! थोड्या वेळाने सारंग त्याच्या क्लासला गेल्यावर सरोज वहिनी अस्मिताने बनवलेल्या चहाचा कप घेऊन गॅलरीमध्ये लावलेल्या झोपाळ्यावर येऊन बसल्या. सरोज वहिनी म्हणजे श्रीमती सरोज अरुण ताकभाते. त्यांना एकुलता एक मुलगा अमोल, सून…

Read More

सारिका आणि साहिल सोहोनी यांच्या लग्नाला आता जवळ जवळ 20 वर्ष झाली. सौरभ, त्यांचा मुलगासुद्धा आता पुढच्या महिन्यात 18 वर्षांचा होईल. सासू-सासरे जाऊन आता 5- 6 वर्षं होत आली. काळाच्या पडद्याने त्याचं काम चोख केलंय. तिघेही आता त्या धक्क्यातून बाहेर आलेत. लग्नानंतर काही महिने सोडले तर, साहिल आणि सारिका यांना एकांत असा मिळालाच नव्हता. आधी आईबाबा आणि मग सौरभचे लाड आणि शिक्षण यात दोघेही व्यग्र होऊन गेले. पण आज सारिकाच्या मनात एकच विचार राहून राहून येत होता… “सगळीकडे प्रेमाचा विषय चालू आहेत. प्रेमाचा महिना म्हणून उदो उदो चालू आहे. पण मला मात्र साहिलने इतक्या वर्षांत एकदाही काही सरप्राइज म्हणून आणलं…

Read More