Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: प्रणाली मंगेश महाशब्दे
संचालिका सोहन वाचन कट्टा, लेखिका, निवेदिका, Counsellor, Signature Analyst, Music Therapist, Flower Remedies Therapist, NLP practitioner, 25 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. Online-offline स्वरूपात अनेक ठिकाणी मुले, पालक, शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्या आहेत. मोबाइल – 9730020494
“आई, यंदा गौरी थोड्या साध्या पद्धतीने करूया का?” मधुराचा प्रश्न ऐकून आजीने हातातले तांदूळ खाली ठेवले. “का गं?” “वेळ कमी आहे. नोकरी, घर, मुलांचं सगळं… आणि एवढा मोठा थाट करण्याची गरज तरी काय?” आजी काही बोलली नाही. फक्त हसून म्हणाली, “गौरी साध्या केल्या तरी चालतील गं… पण घरातली माणसं मनाने दूर जाऊ नयेत.” बाजूला उभी असलेली सई हे ऐकत होती. सईला या सगळ्या परंपरांचा फारसा अर्थ वाटत नव्हता. तिने आईला विचारलं, “आई, खरंच सांग… गौरी आल्या म्हणून काय बदलतं? दोन दिवस पूजा, नैवेद्य, पाहुणे आणि मग सगळं पूर्वीसारखंच!” मधुरा काही बोलणार, तेवढ्यात आजी म्हणाली, “बदलतो तो मनाचा कोपरा.” सई हसली……
आई मुलांसाठी फक्त त्याग करत नाही; ती मुलांच्या स्वप्नांना स्वतःच्या स्वप्नांपेक्षा मोठं मानते. पिठोरी अमावस्येला माता आपल्या लेकरांच्या सुखासाठी प्रार्थना करतात. प्रत्येक आईच्या मनात एक स्वप्न असते… “माझं लेकरू मोठं होऊ दे, पण त्याचबरोबर चांगलं माणूसही होऊ दे.” म्हणून मुलांनीही आईच्या कष्टांची जाणीव ठेवावी. आईला मोठी भेट देण्याची गरज नाही. कधी तिच्या हातात हात घ्या. कधी तिच्यासोबत बसा. कधी तिच्या कष्टांसाठी “धन्यवाद आई” म्हणा. कारण — “आईने आपल्या आयुष्यासाठी जे दिलं आहे, त्याची परतफेड पैशांनी नाही; तर आपल्या चांगल्या कृतींनी करता येते.” आणि म्हणूनच — “आईची स्वप्नं पूर्ण करणं, हीच मुलाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गुरुदक्षिणा आहे. हे सांगणारी ही गोष्ट……
एका गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप कष्टाळू होता; पण आयुष्यात सतत अडचणी येत असल्यामुळे तो निराश झाला होता. व्यवसायात नुकसान, मित्रांशी गैरसमज आणि घरातील जबाबदाऱ्या… यामुळे त्याला वाटू लागले की, “देव माझ्या आयुष्यात आहे तरी कुठे?” एके दिवशी तो गावाबाहेरील मंदिरात गेला. मंदिरात श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती होती. माधव कृष्णासमोर बसला आणि म्हणाला, “कृष्णा, मी तुझी पूजा करतो, तुझे नाव घेतो; पण माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का आहेत? तू माझ्यासोबत असशील, तर माझे दुःख का दूर होत नाही?” तेवढ्यात मंदिरात एक वृद्ध साधू आले. त्यांनी माधवचे बोलणे ऐकले आणि शांतपणे म्हणाले, “बाळा, तुला श्रीकृष्ण आपल्या आयुष्यात का…
एका गावात दोन भाऊ राहत होते — अमोल आणि अनिल. दोघेही लहानपणापासून खूप प्रेमाने वाढले होते. आई-वडिलांनी त्यांना नेहमी एकच शिकवण दिली होती — “पैसा कितीही कमवा, पण माणसं गमावू नका. आपण किती पैसा कमावला हे नाही, तर आपण किती माणसं मनापासून जोडली, हे महत्त्वाचं असतं.” काळ पुढे गेला. दोघांची लग्नं झाली. अमोल शहरात नोकरीला गेला, तर अनिल गावातच राहिला. सुरुवातीला दोघांचा रोज फोन व्हायचा… “काय रे, जेवलास?” “हो. तू जेवलास का?” “आईची औषधं आणलीस?” “हो, काळजी करू नकोस.” अशा छोट्या-छोट्या संवादातून त्यांचं नातं घट्ट होतं. पण हळूहळू अमोलच्या नोकरीचा व्याप वाढला. मीटिंग, काम, प्रवास… फोन कमी झाले. अनिललाही वाटू…
I Love You! तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर, झालं असं की, काल आम्ही सगळे एकत्र बसलो असताना सोनूने म्हणजे माझ्या लेकीने एक व्हिडीओ दाखवला. त्यामध्ये एका किटी पार्टीमध्ये काही गेम्स चालू होते. छान मजेत सगळ्याजणी होत्या. थोड्या वेळाने एक नवीन खेळ खेळायचा ठरला. खेळ होता “आपल्या नवऱ्याला फोन करून ‘I Love You’ म्हणायचे आणि त्याचा काय प्रतिसाद येतो ते बघणे…” तसं पाहिलं गेलं तर, या सगळ्याजणी सामान्य घरातल्या. त्यामुळे सगळ्याजणीच थोड्या भांबावल्या… कारण हे असं सगळ्यांसमोर म्हणणं आणि त्यावर नवऱ्याची प्रतिक्रिया पण बघणं… सगळंच कसं विचित्र. मग काय एकेकीने नवऱ्याला फोन केला. पण हे नवऱ्याला सुद्धा अनपेक्षितच होते, ते…
एकदा एका सुंदर राज्यात “मननगर” नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात आरव नावाचा एक मुलगा राहात होता. आरव हुशार होता, मेहनती होता; पण हल्ली तो सतत उदास असायचा. एके दिवशी तो आपल्या आजोबांना म्हणाला, “आजोबा, माझ्याकडे सगळं आहे, तरी मला आनंदी का वाटत नाही?” आजोबा हसले आणि म्हणाले, “असे जर आहे तर तुला तुझ्या शरीरात राहणाऱ्या चार खास मित्रांची ओळख करून घ्यायची आहे का?” आरवने उत्सुकतेने विचारले, “माझ्या शरीरात मित्र?” “हो! त्यांची नावे आहेत — डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि एंडॉर्फिन.” हेही वाचा – हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा… तेवढ्यात आरवच्या कल्पनेत एक अद्भुत राज्य उभे राहिले. पहिला मित्र –…
घरात तीन पिढ्या आनंदाने नांदत आहेत. छोटे-मोठे खटके तर सगळीकडेच उडत असतात, त्याला हे अपवाद कसे असतील? तर, असे हे एकत्र कुटुंब आजी-आजोबा त्यांची दोन मुलं, त्यांची पुन्हा दोन दोन मुलं असे 10 जण एका छताखाली गुण्यागोविंदाने रहातात. (काय स्वप्नातील गोष्ट वाटते ना? पण खरंच असे कुटुंब आहे) 10 जणांचे 10 स्वभाव म्हणजे 10 वेगवेगळे मणी, पण तरी सगळे एका धाग्यात बांधले गेले आहेत. कोणाला कधी कोणाची गोष्ट पटते तर, कधी पटत नाही. पण सगळ्यांनीच रात्री जेवण एकत्र करायचे असे ठरविले आहे. त्यामुळे दिवसभराच्या सगळ्या कुरबुरी झोपण्यापूर्वीच संपवायच्या! ज्यामुळे शांत झोप लागते, असे त्यांचे म्हणणे. आता मुलांमुळे थोडे वेळेचे गणित…
चातुर्मास सुरू झाला आणि आजीची गडबड सुरू झाली. सणांसाठीचे नियोजन तिला वेगळे करावे लागत नव्हते. ते तर तिच्यासाठी सरावाचे होते. तिच्या बरोबरीने तिची सून सगळे करत होती. आजीच्या हाताखाली छान तयार झाली होती ती सुद्धा. आतातर दोन वर्षांपूर्वी नातवाचे लग्न झाल्यामुळे नातसून प्रिया पण होती. मागचे वर्ष तर सगळे पहिले सण या नावाखाली साजरे झाले. आताची परिस्थिती मात्र वेगळी होती. आजी आणि सासू यांची गडबड बघून प्रियाला समजतच नव्हते की, काय करावे? वेळ नाही, सुटी नाही ही कारणं कशी सांगावी तेच समजत नव्हते! त्यातच, मुळात का वेळ वाया घालवतात या दोघी? असेपण वाटत होते. आजीला प्रियाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ लक्षात आला.…
बऱ्याच दिवसांनी सुमन आणि दीपाची बाजारात भेट झाली. तसं बघितले तर, दोघीजणी लहानपणापासून मैत्रिणी. दोघींची लग्न झाली एकाच गावात. पण रोज भेटणाऱ्या मैत्रिणी नंतर धावपळीत कधीतरी भेटू लागल्या. तसं तर, दोघींची एकत्र कुटुंबात लग्न झालेली, पण सुमनच्या घरी थोडे अध्यात्मिक वातावरण होते; तसे दीपाकडे नव्हते. दोघींच्या घरी सासू-सासरे आहेत. दोघींचे यजमान पण चांगल्या ठिकाणी नोकरीला… तसेच या दोघीजणी पण चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. दोघींची मुलं पण चांगल्या शाळेत शिकत आहेत. एकूण काय तर सगळं कसं छान चाललंय… आज बाजारात भेटल्यावर दोघींना खूप आनंद झाला आणि जवळच असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायचा, असे ठरले… त्यानिमित्ताने गप्पा होतील ना! दोघींच्या गप्पा सुरू…
आठ-दहा दिवसांपासून लेकाची आणि सुनेची होणारी चिडचिड बघत होते. दोघेही चांगल्या कंपनीत कामाला होते. चांगल्या पोस्टमुळे चांगला पगार, पण त्याबरोबरच येणारा कामाचा ताण, यामुळे त्यांची चिडचिड ही नेहमीचीच झाली होती. प्रोजेक्ट्स, डेडलाइन्स, टीमवर्क आणि इतर अनेक गोष्टी, या दोघांमुळे आम्हाला पण रोजच्याच झाल्या होत्या. पण तरी यावेळेस मात्र ते जरा जास्तच जाणवत होते… आज सकाळी तर त्या चिडचिडीचा कडेलोट झाला, असे म्हणायला हरकत नाही. ‘आता जॉबच सोडणार’ यावर बोलणे सुरू होते दोघांचे. झाले! आता हा काय पर्याय आहे का? तरी पण दोघांचे ऐकून घेतले. सुनेच्या कामाच्या ठिकाणी नवी टीम आलेली असल्यामुळे त्या टीमला शिकवता-शिकवता वेळ जातो… आणि परिणामी कामं बाजूला…

