Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026

    शिवचा हात दरवाजात सापडला अन्…

    May 24, 2026

    अगतिक मातृत्व

    May 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शिवचा हात दरवाजात सापडला अन्…
    ललित

    शिवचा हात दरवाजात सापडला अन्…

    शोभा भडकेBy शोभा भडकेMay 24, 2026No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकथा, शिव आराधना, राम आराधना, राम सिया, शिव सिया, राम सिया विवाह, शिव आराधना विवाह, शिव आरू विवाह, अरविंदरावांची नाराजी, राम सियाचे एकत्र येणे, आरूची अवघड स्थिती, शिव आरू प्रेमकहाणी, शिवचा महाल
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 27

    राम दारात उभा राहून सियाकडे एकटक पाहात होता. त्याने पाहिलं की, तिला केसात लावलेले गजरे काढायला जमत नाही, तेव्हा तो पुढे आला आणि त्याने केसांवरील तिच्या हातावर आपला हात ठेवला. त्याच्या हाताचा स्पर्श होताच, तिने झटकन मान वर करून आरशात पाहिलं तर तो तिच्या केसातले गजरे काढत होता… तिने आपला हात खाली घेतला आणि आरशातून एकटक त्याच्याकडे पाहू लागली… डोळे भरुन आले तिचे…

    त्याने एक एक करत सारे गजरे काढले आणि टेबलवर ठेवले आणि तिचे केस मोकळे केले… मग त्याने मान वर करून आरशातून तिच्याकडे पाहिले तर, ती भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडेच पाहताना दिसली… नजरानजर झाली… आज दोघांच्या नजराच बोलत होत्या… आतापर्यंतचं दुःख, त्रास, विरह… सगळ सगळं तिच्या डोळ्यांतून जणू वाहून जात होतं…

    तिने क्षणाचाही विलंब न करता उठून, मागे फिरून त्याला मिठी मारली. त्यानेही आपले हात तिच्याभोवती गुंफून, तिला स्वतःच्या हृदयाशी कवटाळून घेतलं. जसजसा तिचा हुंदका वाढत होता, तसतसे त्याचे हात तिच्याभोवती घट्ट होत होते… त्याच्या कृतीतून हेच जाणवत होतं की, यापुढे तो तिला स्वतःपासून दूर कधीच करणार नव्हता… दोघं एकमेकांची मिठी अनुभवत होते… बोलत कोणीच नव्हतं… इतक्या वर्षांचा विरह आज मिटला होता… तिच्याही भावनांचा वेग आता मंदावला होता. रडणं थांबल होतं. तरीही ती त्याच्यापासून दूर झालेली नव्हती… त्यालाही तिला दूर करण्याची इच्छा नव्हती…

    दारात उभा राहून पवन त्यांच्याकडे पाहून डोळे पुसत होता…

    “आता तर सगळं ठीक झालं ना! मग तरीही का रडत आहेत दि आणि जिजू?… आणि तुम्ही पण…” शेजारून आवाज आला आणि पवनने बाजूला पाहिलं… पूर्वी टेन्शनमध्ये समोर त्या दोघांकडे आणि मग पवनकडे पाहात होती. क्षणभर तिचा प्रश्न ऐकून त्याला आरूचाच भास झाला… तीही सध्या इथे असती तर, असाच बालिश प्रश्न केला असता!

    तिच्या आठवणीने त्याला हसू आलं… पण हृदयात हलकीशी वेदनाही जाणवली… पण त्याने त्याकडे लक्ष दिलं नाही.

    “ओ बोला ना… जाऊद्या मीच जाऊन विचारते…” पवन काहीच बोलत नाही, हे पाहून पूर्वीने पुढे जात त्या दोघांना आवाज देणार होती, तोच पवनने पटकन हाताला धरून तिला मागे ओढलं आणि तिच्या तोंडावर हात ठेऊन तिला बाहेर घेऊन आला.

    हेही वाचा – लीला आजीचं बोलणं ऐकून आरू आणि शिव दोघेही चिडले

    बाहेर आल्याबरोबर त्याने तिला बाजूच्या भिंतीला टेकून उभे केले… तिच्या तोंडावरचा हात तसाच ठेवून तो हळू आवाजात म्हणाला, “अक्कल आहे का तुला काही? त्यांना डिस्टर्ब करून कबाब में हाड्डी बनायला चालली होतीस…!”

    “हूं…  हूं…” त्याचा हात तिच्या तोंडावर असल्याने तिला बोलता येत नव्हतं.

    “हूं… हूं… काय करतेयस तोंडाने बोल ना, कळेल असं!” तो म्हणाला.

    तो असं म्हणताच, तिने असे काही डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं… आणि त्याच्या हाताकडे इशारा केला. तेव्हा त्याचं लक्ष आपल्या हाताकडे गेलं… त्याने झटक्यात हात बाजूला काढून घेतला… “सॉरी… ते… मी…” तो तिला सॉरी म्हणतं होता, पण अजूनही बाजूला झाला नव्हता… अजूनही त्याच्या लक्षात नव्हतं आलं की, तो तिच्या खूप जवळ उभा आहे!

    पण तिला त्याचं इतक्याजवळ असणं सहन झालं नाही… तिने दोन्ही हातांनी त्याला जोरात मागे लोटलं आणि धावतच तिथून निघून गेली… त्याच्या आता सगळंच लक्षात आल होतं.

    “ओ शीट… शीट…  हे काय केलं?” तो स्वत:शीच पुटपुटला.

    “पण तू काही जाणूनबुजून केलेलं नाहीस… बावळटासारखं मधे जाऊन ती त्यांचे ते क्षण स्पॉइल करणार होती…, तो स्वत:चीच समजूत काढत होता… “पण तरीही, तू असं नव्हतं करायला हवं…” तो रेस्टलेस होऊन केसांतून हात फिरवत म्हणाला.

    “काय नव्हतं करायला पाहिजे?” रामचा आवाज आला आणि दचकून त्याने मागे वळून पाहिले.

    “आरं एव्हढं दचकायला काय झालं?” – राम.

    “कुठं काय काहीच नाही… ते सोड… खूश असशील ना आज? फायनली तुझं प्रेम तुला मिळालं… तेही आरूमुळे…” पवन त्याला मिठी मारत म्हणाला.

    “हं… पण आरूची काळजी वाटतेय,” राम त्याच्यापासून दूर होत म्हणाला.

    “डोन्ट वरी दादा… आरू स्वतःची काळजी घेईल… आणि ती इतकीही अल्लड नाहीये… घेईल ती स्वतःला सांभाळून…” पवन त्याला समजावत म्हणाला.

    “हं… चल बघू गावी जायचं, काय ठरतं ते… भाऊ काय म्हणताय ते!” राम

    ते दोघं हॉलमध्ये सगळे बसले होते तिथे आले. पवनची नजर पूर्वीकडे गेली… ती हातात पाण्याचा ग्लास आणि चहा घेऊन किचनमधून येताना दिसली… तिनेही त्याच्याकडे पाहिलं, पण लगेच नजर फिरवली… आणि सियाच्या रूमकडे गेली.

    “राम, पवन या मी तुम्हालाच बोलवणार होते… चहा घ्या,” आत्याने दोघांना चहा दिला.

    “बरं भाऊ, काय करायचं? उद्या निघायचं का गावी?” रामने विचारलं.

    “उद्या सकाळच्यालाच निघू… आसं चार दिस इथं थांबणं बरं नाही दिसत. नव्या नवरीनं घराचा उंबरा लवकर ओलांडायला पाहिजे आन् गावदेवांचे दर्शन पण हाळदीच्या अंगांनी व्हाया पाहिजे,” कलावती चहा पीत म्हणाल्या.

    “कलीचं बराबर हाय. उद्याच सकाळी सकाळी निघू…” भाऊ अर्थात सखाराम यांनीही त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला. मग रामने देखील जास्त आढेवेढे न घेता मान्य केल.

    0000

    इकडे आरू आणि भावना सरपोतदारांचं ते घर बघत होत्या, ज्या घरची आरू सून झाली होती… ती अतिव उत्साहात फिरून ते घर बघत होती…

    “अयो… किती मोठं घर आहे हे ताई? दमले बाई मी तर फिरून फिरुन… आपल्या गावातली चार-पाच घरं तर आरामात बसतील ना या घरात!” आरू एका ठिकाणी त्या चकचकीत दिसणाऱ्या फरशी वर मांडी घालून बसत नावलाने म्हणाली.

    “आरू, काहीही असतं हां तुझं! चार-पाच घर म्हणे… आणि बसलीस काय अशी फतकल मांडून? उठ आणि चल आता रूममध्ये,” भावना तिला हाताला धरून उठवत म्हणाली.

    “थांब ना ताई बसू दे की थोडं! बघ की, कसली निर्मळ जागा आहे. अजिबात धूळ-घाण नाही… नाहीतर आपल्या घरी… सगळा सेनकुडच पसरलेला असतोय!”

    आरूने आपल्याबरोबर भावनाला पण ओढून खाली बसवलं.

    “हं… हे मात्र खरंय आरू, हे घर खूप मोठं आणि खूपच भारी आहे… आरू तुला जमेल ना या घरात निभावून घ्यायला?” भावना आता तिच्याकडे पाहून काळजीत म्हणाली… आणि तिचं बोलणं ऐकून आरूच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

    “आरू लगेच तोंड पाडू नको गं… होईल सगळं ठीक… आणि भाऊजी मस्त आहेत गं, घेतील तुला सांभाळून,” आरूचा पडलेला चेहरा पाहून भावना तिला समजावत म्हणाली.

    “हं” आरू जास्त काही बोलली नाही त्यावर… माहीत नाही, ती शिवबद्दल नेमका काय विचार करत होती! त्या दोघींना आडोशाला उभा राहून पाहणारा शिव देखील, तिच्या चेहऱ्यावरचे थंड भाव पाहून हाच विचार करत होता.

    “शिव खूपच मासूम आणि निरागस आहे रे ती! कसं सांभाळून घेणार तिला तू… अजून एक गोष्ट लक्षात येतेय का तुझ्या, तिला होणारा त्रास ती कोणाला दिसू देत नाहीये. आतल्या आत दाबून ठेवलं आहे, तिने सगळं… कदाचित हा तिचा स्वभावच असावा की, आपल्या दुःखाची झळ कोणाला होऊ द्यायची नाही आणि आनंद साऱ्या जगाला ओरडून सांगायचा!” आकाश क्षणात बदलणाऱ्या तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून म्हणाला.

    कारण, शिवचा विषय निघाल्यावर जे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले होते, त्यांना तिने जास्त वेळ टिकू दिले नाहीत आणि हसतच त्या दोघी सुधा यांच्याकडे निघून गेल्या… ते दोघे त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात राहिले.

    “अरे आलात तुम्ही… बघितलंत घर? मग कसं वाटलं आपल घर?” सुधा यांनी आरूकडे पाहात हसतच प्रेमाने विचारलं.

    “घर? घर नाही महाल आहे हा! एवढं मोठं घर आहे आणि सासूबाई…” आरू उत्साहाने बोलत होती. तोच सुधा यांनी तिला मधेच थांबवलं.

    ” सासूबाई नाही… मी तुला आधीच सांगितलं होत ना, मला सगळे मॉम म्हणतात… तर, तूही तेच म्हण.”

    “मी नाही म्हणणार मॉम! कसं वाटतं ते? त्यापेक्षा ना मी तुम्हाला आईच म्हणते! चालेल ना?” ती मॉम या शब्दावर विचित्र तोंड करून म्हणाली.

    “बरं… चालेल,” त्या हसून म्हणाल्या.

    “आणि आता तुम्हीं दोघी पण चेंज करून या जेवणासाठी… तोपर्यंत मी बाकीच्यांना बोलावते.”

    आरूला मघाशीच त्यांनी रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन चेंज करायला सांगितलं होतं, पण ती ते न करताच घर बघत बसली होती. एवढं मोठं घर पाहून भारावून गेली होती ती! असं घर तिने टीव्हीमध्ये बघितलं होतं आणि आता प्रत्यक्षात पाहिलं… तेही तिचं सासरचं घर, जिथे ती आता कायमचीच राहणार होती.

    “आरू तू जा फ्रेश हो आधी, मग मी चेंज करेन, तोवर मी बाहेर आहे,” भावनाने तिला बॅगेतून एक साधीशी हलकी साडी काढून देत सांगितलं.

    “बाहेर का? ताई, तू इथेच थांब की! मी पाचच मिनिटांत आले आवरून… मला जास्त वेळ नाही लागत,” आरू तिला म्हणाली.

    “अगं नाही, मला एक फोन करायचाय म्हणून म्हणाले मी,” भावना.

    “बरं… ताई दादाला पण फोन कर ना… किती वेळ झाला तरी दादाचा फोन पण नाही आला… ” आरू उदास होत म्हणाली.

    “हो, करते…” भावना बाहेर जात म्हणाली आणि आरू चेंज करण्यासाठी बाथरूममध्ये गेली.

    त्या दोघींसाठी गेस्ट रूम दिली होती.

    “बापरे, किती मोठं बाथरूम आहे हे! आमची एक खोली असेल एवढी… पैशांची कमी नाही दिसत या लोकांना… आरू कसं होणार तुझं?” आरू स्वतःशीच बडबड करत होती.

    तोच दारावर टकटकचा आवाज आला…

    “ताई, तू आली पण का?  बरं ऐक ना, तू आतमध्ये येतेस…” असं म्हणत तिने दरवाजा उघडला, पण समोर भावनाऐवजी शिवला पाहून तिचे पुढचे शब्द तोंडातच राहिले!

    आणि तिने धाडकन दरवाजा लावून घेतला.

    “आहsss” पण अचानक दार लावल्यामुळे शिवच्या जोरात मार बसला… तो हात दरवाजाच्या कडेला ठेऊन उभा होता… तो वेदनेने कळवळला. त्याचा आवाज ऐकून आरूने दार पुन्हा पटकन उघडला…

    “क… काय झालं? आई गं, किती लागलं हे? तुम्हाला इथं यायला कोणी सांगितलं होतं? अयो, रक्त येतंय…” त्याचा हात हातात घेऊन त्यावर फुंकर मरत ती शिवलाच ओरडली. थोडंसच लागलं होतं आणि रक्तही थोडंसच आलं होतं, पण ती घाबरून गेली होती.

    तिच्यामुळेच त्याला लागलं, म्हणून वाईट वाटलं तिला. या गडबडीत ती हे देखील विसरुन गेली की, तिच्या अंगावर साडी नाही, फक्त ब्लाऊज आणि पेटीकोटवर ती होती!

    त्यामुळेच त्याला समोर पाहून तिने गडबडीत जोरात दार लावलं होतं आणि त्याचा आवाज ऐकून पटकन दार उघडून ती बाहेर आली होती. त्याने दुखरा हात आपल्या दुसऱ्या हाताने पकडला होता. तिचं लक्ष त्याच्या हातावरच्या जखमेवर होतं आणि त्याचं… त्याचं लक्षच कुठे होतं! भान विसरुन गेला होता, तिला या अवतारात पाहून!!

    हेही वाचा – शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    केस मोकळे सोडलेले होते… चेहरा धुऊन सगळा मेकअप तिने साफ केला होता… दागिने मात्र तिने कोणतेच काढले नव्हते. गळ्याला चिकटून सोन्याचा हार होता. त्याखाली त्याच्या नावाचं कळ्या मण्यांमधलं मंगळसूत्र… अजून एक लांब दागिना होता कोणता तरी… आईने दिलेला… कानात झुमके… हातात हिरवा चुडा आणि हाताची हालचाल झाल्याने त्याची होणारी सुमधूर किणकिण… तिच मूर्तिमंत नैसर्गिक सौंदर्य त्याला भान विसरायला भाग पाडत होतं…

    आणि तिचा तो नाजूक आवाज… गोड आवाज… ज्याने अगदी पहिल्या भेटीपासून त्याला वेड लावलं होतं! तो एकटक तिच्याकडे पाहात होता. त्याच्याकडून काहीच रिस्पॉन्स येत नाही, हे लक्षात आल्यावर तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो तिलाच निहाळत होता… त्याच्या नजरेने अवघडून गेली ती! तिच्या लक्षात आलं आपल्या अंगावर साडी नाही… तिचे डोळेच मोठे झाले आणि त्याचा हात हातातून सुटला.

    घाबरून तिला सुचायचंच बंद झालं. मागे फिरून बाथरूममध्ये जावं की त्याच्या जखमेला पाहावं… की, पटकन साडी नेसावी की… काय करावं काहीच सुचत नव्हतं… भीतीने तिचं अंग थरथरू लागलं आता. त्याची ती रोखलेली नजर तिच्या हृदयाची  धडधड वाढवत होती… एक अशी भावना जी हवीहवीशी, पण न समजणारी… पोटात आलेला गोळा… हे सगळं तिच्या समजण्यापलीकडे होतं. ही कसली भीती आहे, न समजल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं… आणि असं नेहमीच होत असे. तो तिच्या आसपास असला की, तिला असंच विचित्र, पण हवेहवेसे वाटणारं असं काही तरी होत होतं आणि तिचा गोंधळ उडत होता…

    तिच्या डोळ्यातलं पाणी गालावर ओघळून आलं आणि तिच्या मुसमुसण्याचा आवाज शिवच्या कानावर आला… तेव्हा तो भानावर आला. तो तिला अशा परिस्थितीत नेहमीच आणत होता…

    क्रमशः
    Avatar photo
    शोभा भडके

    मूळ गाव कांबी, जिल्हा बीड. मूळ राहण्याचे ठिकाण बीड. मी लेखनाला सुरुवात करायच्या आधी फक्त एक वाचक होते. म्हणून प्रतिलिपी ॲपवर कथा वाचनच करत होते. तेव्हा ध्यानीमनीही नव्हतं मी एखादी स्टोरी लिहू शकेन. पण वाचन करत करता मनात आलं आणि लिहू लागले. लिहिलेलं वाचकांना आवडत गेलं, तसं माझा लिहिण्याचा हुरूप वाढत गेला... आज लेखनामुळे आर्थिकदृष्ट्या पण स्वावलंबी झाले आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

    Related Posts

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026 ललित

    अगतिक मातृत्व

    May 24, 2026 ललित

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    By सुधीर करंदीकरMay 24, 2026

    आपण गाडी घेऊन बाहेर पडलो की, पार्किंगला जागा मिळेल का? हा प्रश्न प्रत्येकाच्याच समोर असतो,…

    अगतिक मातृत्व

    May 24, 2026

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026

    रमेश वेटर अन् न दिलेली टीप

    May 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026

    शिवचा हात दरवाजात सापडला अन्…

    May 24, 2026

    अगतिक मातृत्व

    May 24, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 24 ते 30 मे 2026

    May 24, 2026

    Dnyaneshwari : परि ऐसिया तूतें स्वामी, कहींच नेणों जी आम्ही

    May 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 24 मे 2026

    May 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 307
    • अवांतर 187
    • आरोग्य 113
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 430
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 213
    • मैत्रीण 19
    • ललित 649
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026

    शिवचा हात दरवाजात सापडला अन्…

    May 24, 2026

    अगतिक मातृत्व

    May 24, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.