Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चिकनी चमेली अन् रोहन

    July 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा

    July 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, July 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » चिकनी चमेली अन् रोहन
    ललित

    चिकनी चमेली अन् रोहन

    विशाल कुलकर्णीBy विशाल कुलकर्णीJuly 26, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, विशाल कुलकर्णी, लेखक विशाल कुलकर्णी, चिकनी चमेली, चिकनी चमेली आणि रोहन, रोहन आणि चिकनी चमेली मैत्री, तृतीयपंथी चिकनी चमेली, राजाला रोहनच्या मैत्रीचे आश्चर्य, राजाला रोहनची चिंता, रोहनची माणुसकी, चिकनी चमेलीचा रोहनबद्दल आपलेपणा
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पूर्वार्ध

    “ए हीरो वो देख, आ गयी तेरी ‘चिकनी चमेली’?”

    राजाने रोहनच्या पोटात कोपराने ढोसत, खुसखुसत सांगितले, तसे रोहनने त्या दिशेने पाहिले. चमेली नेहमीप्रमाणेच चमकत होती. साधारण गव्हाळ म्हणता येइल असा वर्ण, शार्प फिचर्स आणि नावाला साजेशी चमचम करणारी चंदेरी साडी. पदर कंबरेला खोचलेला, तोंड बहुदा तिचे नेहमीचेच जर्दा पान खाऊन लालभडक झालेले. रोहनकडे नजर जाताच तिने त्याला एक कचकचीत डोळा मारला आणि…

    “रूक रे, आती मैं अब्बीच!” असे म्हणत पुढच्या व्यक्तीकडे वळली.

    “रोहन्या, तू पण ना, या जगाबाहेरचा आहेस साल्या. तुला सापडून सापडून ही चमेलीच सापडली? अबे, भीक मागणारीच हवी होती, तर त्यातही कोणीतरी ‘बाई’ शोधायची होतीस? हे काय? धड बाई ना बाबा?”

    रोहन नुसताच हसला, तोवर चमेली समोर येऊन उभी राहिली होती.

    “किंव रे चमडी? साले, अकेला होता है, तो मेरे पीछे पीछे आके इधर उधर हात लगाने को मंगताय और मेरे चिकने को मेरेइच खिलाफ भडकाताय क्या?”

    चमेलीने आपली जेमतेम अडीच इंचाची छाती पुढे काढत एका हाताने राजाच्या पृष्ठभागावर एक लाडीक फटका मारला आणि दोन्ही हात छातीसमोर आणत आपल्या परंपरागत पद्धतीने दोन खणखणीत टाळ्या वाजवल्या.

    “किंव रे चिकणे, तेरे को बोला था ना, ऐसे दोस्तों से तो दुश्मन भले कर के!”

    “चमेली, तू काय त्याच्याकडे ल़क्ष देते? तुला तर माहिती आहे ना त्याचा स्वभाव? तो असाच आहे. तुला पाहिल्यावर तर त्याला अजूनच चेव येतो.”

    रोहनने हसत हसत राजाला शालजोडीतला दिला, तसा राजा हसायला लागला. बस स्टॉपवरील लोकांनी त्यांना बघून न बघितल्यासारखे केले. पहिल्या दिवशी जेव्हा चमेली या बस स्टॉपवर दिसली, तेव्हा रोहनने तिला हाक मारून जवळ बोलावले होते. त्यावेळी मात्र लोकांच्या, विशेषतः तरुण मुलींच्या, नजरा पार विचित्र झाल्या होत्या. होणारच ना हो! एक देखणा, गोरा गोमटा अगदी सहा फुटी, एखाद्या ग्रीक देवतेसारखा दिसणारा तरुण तिथल्या इतक्या सुंदर मुली सोडून एका भीक मागणार्‍या तृतीयपंथीयाशी एवढी जवळीक दाखवतो, हे तसे थोडे विचित्रच होते.

    हेही वाचा – प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    इतरांचे सोडा, पहिल्या भेटीत राजाची प्रतिक्रिया सुद्धा अशीच काहीशी होती. अर्थात, ते साहजिकही होते म्हणा, कारण राजा गेल्या सहा महिन्यांपासून रोहनला ओळखत होता. बीडसारख्या तुलनेने कमी विकसित जिल्ह्यातून शिक्षणासाठी म्हणून मुंबईला आलेला रोहन जागिरदार, राजाचा रूम पार्टनर होता. अतिशय सरळ, सभ्य पण मराठवाड्याचा असल्याने तो झटकाही त्याच्यात होताच. स्त्रियांच्या बाबतीत अगदीच शामळू नसला तरी, फार पुढारलेलाही नव्हता. अतिशय हुशार, अभ्यासू मुलगा. एकच दोष होता रोहनमध्ये तो म्हणजे त्याचं भावनाप्रधान कवीमन!

    तसा रोहन कधीच कुणाच्या अध्यात-मध्यात नसायचा. मुलींचे वावडे नव्हते त्याला, पण स्वत:हून ओळख करून घेणे, त्यांच्या मागे-पुढे रेंगाळणे असले प्रकार त्याच्या गावीही नसायचे. अगदी स्वतःहून ओळख करून घेणार्‍या मुलींशीही त्याचे वागणे जेवढ्यास तेवढे. तसा तो उशिराच मुंबईत आला होता, कॉलेजचे प्रवेश कधीच संपलेले होते. पण बहुदा रोहनच्या वडिलांची पोहोच चांगली असावी, त्यामुळे त्याला कॉलेजला प्रवेश मिळून गेला होता. हॉस्टेल मात्र फुल्ल झालेले असल्याने तिथे डाळ शिजली नाही. पण कॉलेजमध्ये पहिल्याच दिवशी ओळख झालेल्या राजेश जगतापने त्याला आपली रूम (आणि भाडेही अर्थातच) शेअर करण्याची ऑफर दिली आणि त्याने ती सहज स्वीकारली.

    तसा रोहन सधन घरचा. वडिलांचा छोटासाच, पण स्वतःचा कारखाना होता. घरी लक्ष्मी पाणी भरत होती. पण या वेड्याला मुंबईची ओढ लागलेली. वडिलांच्या मागे लागून त्याने मुंबईत कॉलेजला प्रवेश घेतला होता. येताना बाइक बरोबर घेऊन आलेला. पण एकदा राजबरोबर बसने प्रवास केला आणि गच्च भरून वाहणार्‍या बसची मज्जा त्यालाही आवडायला लागली. त्यानंतर आठवड्यात किमान तीन दिवस बसने कॉलेजला जायचे, हे ठरूनच गेले.

    गेले सहा महिने राजा त्याचा सभ्यपणा अनुभवत होता. विशेषतः, तरूण मुलींच्या बाबतीत हा मुलगा इतका सोवळा कसा काय राहू शकतो? तेही आपल्याकडे एवढे अ‍ॅसेट्स असताना? याचे राजाला कोडे पडले होते. म्हणूनच परवा जेव्हा बस स्टॉपवर रोहनने चमेलीला हात केला, तेव्हा राजापण शॉक झाला होता.

    “रोहन…., आयला कॉलेजमध्ये इतक्या पोरी तुझ्या मागे लागताहेत. त्यांच्याकडे ढुंकूनही पाहात नाहीस आणि आज चक्क हा तृतीयपंथी?”

    तसा रोहन गालातल्या गालात हसला. या आणि अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया येणार, हे माहीत होते त्याला. पण त्याचा स्वभावच असा होता की, जे पटेल तेच करणार. दुनिया जाये तेल लेने..! पण नकळत तो त्या विचारातच हरवला. त्याला चमेलीशी झालेली पहिली भेट आठवली…

    तसे तर, कॉलेज आणि रूम दोन्हीही अंधेरीतच असल्याने त्याचे नेहमी बसने किंवा बाइकनेच जाणे व्हायचे. पण त्या दिवशी तो बाबांच्या आग्रहावरून लोकल ट्रेनने विरारला त्यांच्या एका स्नेह्यांच्या घरी गेला होता. तिथेच जेवण वगैरे झाले. परत येताना तसा बराच उशीर झाला होता त्याला. रात्री 11 वाजून गेले होते. उलटे अंधेरीकडे जायचे असल्याने लोकल गाड्यांना फारशी गर्दी नव्हती. लोकलने मीरा रोड ओलांडले आणि अचानक कसलास गलका ऐकू आला म्हणून त्याने आवाजाच्या रोखाने पाहिले. दोन-तीन तृतीयपंथी मिळून आपल्यातल्याच एका तृतीयपंथीयाला मारहाण करत होते.

    “तेरे को कित्ते बार बोला, इदर नइ आने का करके. तेरा इलाका अंधेरी है ना, तो उदरीच धंदा करने का, ये हमारा इलाका है, इदरकू फिरसे दिखी ना तो टांग तोड देगी मैं तेरा… बोलके रखती पैलेसेच.”

    एका साडी नेसलेल्या (गुडघ्यापर्यंत वर घेतलेली), पूर्णपणे पुरुषी दिसणार्‍या, गालावर दाढीची खुंटे बाळगणार्‍या तृतीयपंथीयाच्या तोंडी ती स्त्रियांची भाषा फार मजेशीर, काहीशी विचित्रही वाटत होती. ते तिघेही तृतीयपंथी तसलेच सांडच्या सांड दिसत होते. त्यातल्या त्यात ज्याला ते मारहाण होते, तो तृतीयपंथी मात्र गोरापान, नाजूक चणीचा, देखण्या चेहर्‍याचा…

    “अरे जमना मौसी, मैं तो किसी से मिलने गयी थी नालासोपारा में. धंदा करने नै आयी थी रे इदर…”

    तो चौथा गयावया करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण ते त्या तिघा / तिघींच्या पचनी काही पडत नव्हते. तिघे मिळून चौथ्याला मारहाण करतच होते. डब्यातलं पब्लिक नेहमीप्रमाणेच तमाशा बघत होतं. शेजारचा माणूस मरत असेल तरी, जोपर्यंत स्वतःला धक्का लागत नाही, तोपर्यंत आपण त्या गावचेच नाही, अशी वृत्ती असते. येथे तर चार तृतीयपंथीयांच्या आपापसातील भांडणात पडण्याचे त्यांना काहीच कारण वाटत नव्हते. सुरुवातीला रोहनने पण दुर्लक्षच केले. पण त्या तिघांचा जोर वाढतच चालला तसा त्याला राहवेना, तो उठून मधे पडला.

    “ए छोडो उसको, उसने बोला ना, वो यहां धंदा करने नहीं किसी से मिलने आया था करके?”

    तसा त्यांच्यापैकी एकाने त्याच्याकडे मोहरा वळवला. दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत त्याने विचारले,

    “ए चिकने, तेरी सगेवाली लगती है क्या रे ये चमेली?” तसं गाडीतलं पब्लिक हसायला लागलं. रोहन क्षणभर गोरामोरा झाला. पण लगेच त्याने स्वतःला सावरून घेतलं…

    “हो आहे! या जगातला प्रत्येक माणूस माझा नातेवाईकच आहे. काय म्हणणं आहे? सोडा त्याला.”

    रोहनने बाह्या मागे सरकवल्या आणि तावातावात पुढे झाला… तेवढ्यात पुढचं स्टेशन आलं, तसे रोहनचा रुद्रावतार पाहून त्या तिघांनी पळ काढला. जाता जाता एक जण पिंक टाकून गेलाच तरीही…

    “जिसको तू ‘त्याला’ बोल रहा है ना, वो एक हिजडा है…, ना मर्द, ना औरत! दूर ही रहना… फिर कभी देख लेंगे तेरे को.”

    “सच तो कहा है साब उन्होंने. मैं तो हूं ही एक हिजडा. ना मर्द, ना औरत! हम जैसों से दूर ही रहो आप. भले घर के लगते हो!”

    इतका वेळ मार खाणारा तो चौथा विव्हळत म्हणाला. तसे रोहनने त्याला खांद्याला धरून उठवले, तिथल्याच एका बेंचवर बसवले.

    “इन्सान तो हो, मेरे लिये उतना ही काफी है!”

    रोहन हसून म्हणाला, तशी त्याच्या डोळ्यात एक मिश्किल चमक परत आली.

    “मुंबई में नये लगते हो बाबू!”

    अंधेरी आलं दोघेही उतरून आपापल्या दिशेने रवाना झाले. पण हे नातं इथेच संपायचं नव्हतं. पुढे कुठल्या ना कुठल्या ठिकाणी रोहनची आणि ‘त्या’ची भेट होत राहिली. कुठल्यातरी क्षणी मैत्री झाली. एक पुरुष आणि एक तृतीयपंथी या पलीकडे जाऊन दोन माणसे या पातळीवरची ती मैत्री होती. झोकून देणं हा रोहनचा स्वभावच होता.

    “ए चिकने, चल अपनी बस आ गयी.”

    चमेलीच्या आवाजाची नक्कल करत राजाने रोहनचा शर्ट खेचला तसा रोहन परत वर्तमानात आला आणि खांद्यावरची सॅक सांभाळत बसकडे धावला.

    ” रोहन्या, यार मला एक सांग, नक्की काय, म्हणजे कसलं रिलेशन आहे तुझं चमेलीबरोबर?” राजाने न राहवून विचारले.

    “कसलं म्हणजे?” रोहनने डोळे मिचकावत उलट विचारले तसा राजा गडबडला.

    “म्हणजे…? म्हणजे… तसलं काही नसणार याची खात्री आहे मला. पण हे जरा विचित्रच वाटत नाही का तुला?”

    हेही वाचा – सलग 131 डॉट बॉल्स…

    “काय विचित्र आहे त्यात. मी ही एक माणूस आहे, तूही एक माणूस आहे, चमेलीही माणूसच! मग जर तुझ्याशी माझी घनिष्ट मैत्री होऊ शकते तर चमेलीशी का नाही?”

    राजा भडकला…

    “शब्दांचे खेळ नको खेळू माझ्यासोबत. तुझ्या चमेलीसोबतच्या नात्याला कसलेही ऑब्जेक्शन नाहीये माझे, तो तुझा व्यक्तिगत मामला आहे. पण एक मित्र म्हणून फक्त ते संबंध कशा स्वरुपाचे आहेत, हे जाणून घ्यायची इच्छा आहे मला. तू जर त्या ‘कल्याणी’च्या प्रपोजलला सहमती दिली असतीस, तर ते समजण्यासारखे होते. एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यातील नाते समजण्यासारखे आहे. पण एक पुरुष आणि एक…! हे काहीतरी विचित्र आहे असं नाही वाटत तुला?”

    त्यांच्याच क्लासमधली कल्याणी देशमुख, भावी कॉलेज क्वीन आत्तापासूनच हात धुवून रोहनच्या मागे लागली होती. पण रोहन काही तिला दाद द्यायला तयार नव्हता. त्या पार्श्वभूमीवर रोहनची चमेलीशी असलेली मैत्री जवळच्या सगळ्या मित्रांमध्ये चर्चेचा विषय होऊ पाहत होती. राजाला एकच भीती वाटत होती, ती म्हणजे हे जर कॉलेजमध्ये पसरले तर, त्याचा रोहनच्या करिअरवर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे तो आता थोडासा गंभीर झाला होता या विषयावर. ही वेळ कधी ना कधी येणार होतीच, त्यावर रोहनकडे स्पष्टीकरण पण तयार होते. राजाने निर्वाणीने हा प्रश्न विचारला आणि स्वतःच्याही नकळत रोहन परत भूतकाळात शिरला…

    Avatar photo
    विशाल कुलकर्णी

    विशाल विजय कुलकर्णी राहणार - मु.पो. चिंचवड, पुणे - 33. शिक्षणाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, व्यवसायाने विक्री आणि विपणन (Sales & Marketing) क्षेत्रातील अनुभवी. साहित्य आणि सर्जनशील लेखन ही माझी खरी ओळख आहे. शब्दांशी असलेली नाळ जपत मी कथा, कविता, ललित लेख, सामाजिक विषयांवरील लेखन आणि वैचारिक अभिव्यक्ती अशा विविध साहित्यप्रकारांत सातत्याने लेखन करत आलो आहे. माझ्या ‘Beyond Thresholds’ या इंग्रजी पुस्तकासह ‘यलगार’ आणि ‘ओलेत्या ओळी पावसाच्या...’ ही ई-पुस्तके (अमेझॉन केडीपी) आहेत. काही वेबसाइट्स तसेच फेसबुक सारखी विविध सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे, मासिके आणि ‘ऐसी अक्षरे मेळवीन’, ‘कविता माझी सखी’, ‘माझी भटकंती’ या माझ्या वैयक्तिक ब्लॉग्सवर नियमितपणे लेखन करतो. लेखन ही केवळ आवड नसून संवाद घडवण्याचे, विचारांना दिशा देण्याचे आणि ब्रँड्सना प्रभावी शब्दांची ताकद देण्याचे माध्यम आहे, या विश्वासातून मी VKS Storycraft Media या मालकी हक्काच्या (Proprietary) संस्थेची स्थापना केली आहे. VKS Storycraft Media ही संस्था कॉपीरायटिंग, कंटेंट रायटिंग, ब्रँड स्टोरीटेलिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि व्यवसायाभिमुख आशय निर्मिती (Business Content Creation) या क्षेत्रात व्यावसायिक सेवा प्रदान करते.

    Related Posts

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026 ललित

    विठ्ठल विठ्ठल… दोन बहिणींची पंढरीची वारी

    July 25, 2026 ललित

    आराध्याला पुन्हा भेटला शिवा…

    July 24, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    By प्रदीप केळुस्करJuly 25, 2026

    भाग – 1 सकाळी आठ वाजता वंदनाला जाग आली, तिला आज शूटिंगला जायचं नव्हतं, नाहीतर…

    विठ्ठल विठ्ठल… दोन बहिणींची पंढरीची वारी

    July 25, 2026

    आराध्याला पुन्हा भेटला शिवा…

    July 24, 2026

    दारू सोडली… कायमची!

    July 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चिकनी चमेली अन् रोहन

    July 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा

    July 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026

    थायरॉइड विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    July 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 373
    • अवांतर 199
    • आरोग्य 133
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 506
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 241
    • मैत्रीण 24
    • ललित 805
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चिकनी चमेली अन् रोहन

    July 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा

    July 26, 2026
    Most Popular

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.