दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 27 जुलै 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 05 श्रावण शके 1948; तिथि : त्रयोदशी 16:14 ; नक्षत्र : मूळ 10:27;
- योग : वैधृति 22:54 ; करण : गरज 29:18;
- सूर्य : कर्क; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:17;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
महाराष्ट्रीय बेंदूर
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
भारताचे मिसाइल मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम
टीम अवांतर
भारताचे माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ आणि मिसाइल मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम (धनुष्कोडी) येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलबदीन अब्दुल कलाम होते. त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात प्रमुख भूमिका बजावली. ते 2002 ते 2007 या कालावधीत भारताचे राष्ट्रपती होते. त्यांच्या वैज्ञानिक कामगिरी आणि लोकप्रियतेमुळे त्यांना मिसाइल मॅन आणि लोकांचे राष्ट्रपती (People’s President) ही उपाधी मिळाली.
कलाम यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून वैमानिक अभियांत्रिकीची पदवी मिळवली आणि 1958मध्ये ते डीआरडीओमध्ये रुजू झाले. 1969मध्ये ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो – ISRO) ते एसएलव्ही-III चे प्रकल्प संचालक होते. एसएलव्ही-III हे भारतात आरेखन आणि उत्पादित केलेले पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहन होते. 1980मध्ये एसएलव्ही-III ने रोहिणी नावाचा उपग्रह पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत यशस्वीरीत्या सोडला, त्यामुळे भारताचा अंतराळ कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला. कलाम यांनी इस्रोमध्ये प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या पुढील विकासाचे निरीक्षण केले, ज्यामध्ये ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा समावेश होता.
हेही वाचा – Bookshelf : अमूल्य ठेव्याची नीट ओळख करून देणारे ‘राम रामेति रामेति…’
डीआरडीओच्या पुन्हा सेवेत आल्यानंतर कलाम यांनी (1982) एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाची योजना आखली. त्यामध्ये त्यांनी अनेक यशस्वी क्षेपणास्त्रे तयार केली. त्यांपैकी भारताचे पहिले मध्यम-श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी, ज्यामध्ये एसएलव्ही-III चे पैलू समाविष्ट होते; ते प्रथम 1989मध्ये प्रक्षेपित करण्यात आले. आणखी एक यश म्हणजे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे सामरिक क्षेपणास्त्र पृथ्वी.
कलाम भारताच्या संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते (1992–1999) आणि नंतर त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळवून सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले (1999-2001). या काळात त्यांनी सरकारच्या क्षेपणास्त्र प्रणालींच्या विकसनात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यामुळे भारताला अणुक्षमता मिळाली. 1998मध्ये ते पोखरण-2 मालिकेतील अणुचाचण्यांच्या मुख्य समन्वयकांपैकी एक होते. त्या वेळी राजस्थान राज्यातील पोखरणच्या चाचणी रेंजवर पाच चाचणी स्फोट करण्यात आले. देशाच्या अणुचाचण्यांमध्ये त्यांच्या प्रमुख भूमिकेमुळे भारत अणुशक्ती राष्ट्र म्हणून मजबूत झाला. 1998मध्ये कलाम यांनी टेक्नॉलॉजी व्हिजन-2020 नावाची देशव्यापी योजना पुढे आणली. या योजनेत कृषी उत्पादकता वाढवणे, आर्थिक विकासाचे साधन म्हणून तंत्रज्ञानावर भर देणे आणि आरोग्य सेवा तसेच शिक्षणाची उपलब्धता वाढवणे इत्यादी समाविष्ट होते.
भारताला विकसित देशात रूपांतरित करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यास ते वचनबद्ध राहिले. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या अनेक विद्यापीठीय क्षेत्रात अभ्यागत प्राध्यापक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे (तिरुवनंतपुरम) संस्थापक कुलगुरू होते. कलाम यांनी अनेक पुस्तके लिहिली : विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र; भाषांतरित – अग्निपंख), इग्नाइटेड माइंड्स, इटर्नल क्वेस्ट (बालसाहित्य – कादंबरी). त्यांच्या असंख्य पुरस्कारांमध्ये देशातील तीन सर्वोच्च सन्मानांचा समावेश होता : पद्मभूषण (1981), पद्मविभूषण (1990) आणि भारतरत्न (1997).
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे 27 जुलै 2015 रोजी व्याख्यान देत असताना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याचवर्षी ओडिशा राज्यातील एका क्षेपणास्त्र चाचणी स्थळाचे नाव अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले. 2017मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आढळलेल्या जीवाणूच्या एका नवीन प्रजातीचे नाव सोलिबॅसिलस कलामी असे ठेवण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
(संदर्भ – मराठी विश्वकोश)
आजचे राशीभविष्य
मेष – तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकतात फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलू नका, अशाने तुमचे हितचिंतक दुखावले जाण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी कोणतेही दडपण न घेता, कामांचा उरक दाखवाल.
वृषभ – आज खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील – लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील. प्रवास केल्यानंतर ताबडतोब फलित मिळणार नाही, परंतु भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. तुम्ही जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल.
मिथुन – उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. मुलांशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करून करा. जोडादाराने दिलेल्या सरप्राइझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल.
कर्क – दयाळू स्वभावामुळे अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे चांगला वित्तपुरवठा होईल. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे. ज्याच्यावर विश्वास ठेवावा, अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध रहा, परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने ज्ञानात भर पडले तसेच नवीन लोकांशी संपर्क होईल.
सिंह – तणावमुक्तीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घ्या. भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. नवीन प्रकल्पासाठी सहजपणे भांडवल उभे कराल, थकलेली देणी परत मिळवाल. नव्याने गुंतवणूक करताना सावध रहा, यासंदर्भात जाणकारांचा सल्ला घ्या. तुमचे पालक तुमच्या जोडादीराला आज सुंदरशी बेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल.
कन्या – नोकरीच्या ठिकाणी आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील, परंतु यासोबतच अनावश्यक खर्च टाळावा लागेल. अन्यथा बजेट बिघडू शकते. कुटुंबातील एखादा सदस्य राईचा पर्वत करण्याची शक्यता आहे, अशावेळी संयमाने परिस्थिती हाताळा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, त्यामुळे नव्या ओळखी होतील, त्यांचा भविष्यात उपयोग होईल.
तुळ – तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत – तर फायद्यात रहाल. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वाद होण्याची शक्यता आहे. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल.
वृश्चिक – चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि आनंदी असेल. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे, सतर्क रहा. इतरांनी आपले काम करावे, अशी अपेक्षा बाळगू नका. रागावर नियंत्रण ठेवा, कोणी दुखावले जाणार नाही, याची काळी घ्या. व्यवसायात नवीन करार करताना सतर्क रहा. एखादी त्रुटी भविष्यात त्रासदायक ठरू शकते.
हेही वाचा – नळ स्टॉपची कहाणी…
धनु – कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल. वेतनवाढीची शक्यता आहे. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडेदेखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. घरातील लहान सदस्यांसोबत पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. व्यवसायात नव्या तंत्रज्ञानाचा वापर तसेच, उत्पादनाची जाहिरात करणे फायद्याचे ठरेल.
मकर – कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडतेय असे नाही तर, तुमची इच्छाशक्ती कमी पडतेय. तुमची खऱ्या क्षमता काय आहेत, ते ओळखा. त्या लोकांना उधार देऊ नका, ज्यांनी मागील उधारी चुकवलेली नाही. जवळच्या व्यक्तींबरोबर कोणताही वाद घालू नका. वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्परसंमतीने सोडवता येतात. कलात्कम आणि सर्जनशील क्षमता यामुळे तुम्ही कौतुकाचे धनी व्हाल.
कुंभ – अनावश्यक गोष्टींवर विचार करण्यात शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. संततीकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना दिवस यशदायी ठरले. बऱ्याच काळापासून प्रतीक्षित कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. दुसºयांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे लाभ होईल.
मीन – तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील, परंतु बोलताना सांभाळून बोला. तुमच्या योजनांबद्दल कोणाकडेही वाच्यता करू नका, अनय्था, तुमचे प्रक्लप रखडतील. मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल. धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, त्यामुळे मन प्रसन्न राहील.


