Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, June 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » लीला आजीचं बोलणं ऐकून आरू आणि शिव दोघेही चिडले
    ललित

    लीला आजीचं बोलणं ऐकून आरू आणि शिव दोघेही चिडले

    शोभा भडकेBy शोभा भडकेMay 10, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकथा, शिव आराधना, राम आराधना, राम सिया, शिव सिया, दिनकररावांची नाराजी, शिव आरू प्रेमकहाणी, पूर्वी पवन प्रेमकहाणी, शिव आरूचे देवदर्शन, आरूला कुत्र्याच्या पिलाची आठवण, शिवकडून आरूचे कौतुक, राम सियाचे देवदर्शन, आरू सुधा स्नेहबंध, प्रेमळ सासू सुधा, प्रेमळ सून आरू, प्रेमळ सून आराधना
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 25

    आरू आणि शिव घरी पोहचले होते. त्यांची गाडी गेटच्या आत दारात उभी राहिली त्यातून ते दोघे खाली उतरले होते. “आपलंच घर आहे ते… आणि मी तुला घरीच घेऊन आलोय,” असं शिवने तिला सांगितलं.

    “कायSSS काहीही… वेड्यात काढत आहात का?” आरूचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते. समोरच्या घराला पाहून थक्क झाली होती ती! तिचा विश्वास बसला नाही, त्याच्या बोलण्यावर…

    “आरू, काय चाललंय तुझं?” भावना तिला समजावत हळू आवाजात, पण जरा चिडून म्हणाली.

    “अगं बघ ना किती मोठं घर… नाही, नाही… खूप मोठा असा बंगला आहे. मी कधी लांबून पण बघितला नाही, असा हा महाल! …आणि हे म्हणत आहेत आपलंच आहे. कोण विश्वास ठेवील? वेड लागलंय का मला? हां, मला महितीय की, हे लई श्रीमंत आहेत… पण एव्हढे! काहीही…” समोरच्या दिव्यांनी झगमतगत असलेल्या त्या बंगल्याला पाहून आरू म्हणाली.

    “यावर नंतर चर्चा करत बसलात तरी चालेल… आत जाऊ या,” शिव शांतपणे म्हणाला.

    “नाही…” आरू एकदम म्हणाली.

    “नाही?” तिच्या बोलण्याचा अर्थ न समजून शिवने एक भुवई उडवत आश्चर्य व्यक्त केले.

    “नाही… म्हणजे मी ते… म्हणजे एवढं मोठं… म्हणजे… खूपच मोठं… म्हणजे मी… म्हणजे मला काय म्हणायचंय… अरे, देवा काय होतंय मला… मला काय बोलायचं ते मलाच कळणार!” ती गोंधळून काय बडबडत होती, तिचं तिलाच कळत नव्हतं.

    हेही वाचा – आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…

    भावनाचं ऐकून… समोर एवढं मोठं घर पाहून ती भांबावली होती. स्वप्नातही तिने विचार केला नसेल की, आयुष्यात एवढ्या मोठ्या घराची एक झलकदेखील पाहायला मिळेल… आणि आज अशाच मोठ्या घरात ती सून म्हणून आली होती! समोर दिसणाऱ्या महालासारख्या घरात, त्या घरची लक्ष्मी म्हणून पाऊल टाकणार होती. आता ती समोरच्या घराकडे पाहात थिजल्यासारखी जागेवरच स्तब्ध उभी होती…

    “चल…” शिव तिचा हात पकडून म्हणाला.

    पण ती जागीच उभी होती. तिचं पाऊलच उचललं जात नव्हतं. दडपण… भीती की, त्याच्या हाताच्या स्पर्शाने? माहीत नाही कशाने… पण शरीरभर मुंग्या आल्यासारखं झालं तिला… हृदयाची धडधड कैक पटीने वाढली… पोटात काहीतरी घुसळल्यासारखं झालं तिला.

    शिवला तिची अवस्था समजली. ती काही इतक्यात सावरणार नाही लक्षात आल्यावर मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं…

    भावना त्याच्या या कृतीने डोळे मोठे करून त्या दोघांकडे पाहू लागली…

    अचानक आपण हवेत असल्यासारख आरूला जाणवलं आणि ती तिच्या तंद्रीतून बाहेर आली आणि आपल्याला कोणी तरी उचलून घेतलंय हे लक्षात आल्यावर तिने मान वर करून ज्याने उचलून घेतलं त्याच्याकडे पाहिलं तर, नजरेला, तिच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ शिवचा चेहरा दिसला. जो समोर पाहून निर्विकरपणे पुढे चालत होता. त्याने तिच्याकडे पाहिलं नाही किंवा मुद्दाम टाळलं… त्याच त्यालाच माहीत!

    “ओ… ओ… का… काय करताय? मला उचलून का घेतलं? मी… मी चालत येते ना… मला चालता येतं ना!” ती शिवला पाहून अडखळत म्हणाली.

    ते दोघे आता दरवाज्यापर्यंत पोहचले होते… आणि आरूने समोर पाहिले तर दारात आकाश, समर… अजून कोणीतरी स्त्री आणि सुधा हातात आरतीचं ताट घेऊन उभ्या अन् या दोघांकडे आश्चर्याने थक्क होऊन पाहात होत्या… त्यांची ती नजर पाहून आरूला लाज वाटत होती. त्यामुळे ती अवघडून गेली होती… आणि आता त्याने खाली सोडावं म्हणूण झटापट करत होती… पण शिवने तिला गच्च पकडून ठेवलं होतं.

    दारात पोहोचल्यावर शिवने तिला व्यवस्थित खाली उतरवलं आणि तिच्या बाजूला उभा राहिला.

    “क्या बात है मिस्टर शिवराज सरपोतदार! तुम्ही तर खूपच रोमँटिक निघालात… आमच्या वहिनी साहेबांना डायरेक्ट उचलून घेऊन आलात… एकच नंबर हां!” असं म्हणत आकाशने त्याला डोळा मारत एक जोरदार शिट्टी वाजवली.

    त्याचं ऐकून सगळे त्या दोघांकडे पाहून मिश्किल हसू लागले… बिचाऱ्या आरूने तर मानच खाली घातली. तिला खूपच लाज वाटत होती…

    “आकाश जास्त आगाऊपणा करू नकोस… विसरू नकोस, मी तुझा बॉस आहे ते!” शिवने आता ओळखलं होतं की, आरू कुठल्याही क्षणी रडेल… आरूला रडणं खूपच जवळ होतं… कशालाही ती रडत होती… अगदी समोरच्याला तिच्या रडण्याचा कारणही कळणार नाही असं काहीही… आतापर्यंत त्याला या गोष्टीचा खूप अनुभव आलेला म्हणून तो आकाशला ओरडला… की बास आता मस्करी करू नको!

    “ओ… बॉस तू ऑफिसमध्ये… इथे नाही!” आकाश त्याचं बोलणं उडवून लावत म्हणाला. शिवने त्याच्याकडे खुन्नस देऊन पाहिलं… त्याचा आकाशवर काहीच परिणाम झाला नाही.

    “…आणि नाव घेतल्याशिवाय घरात प्रवेश नाही तुम्हा दोघांना! पूर्वी आणि सिया दिने निक्षून सांगितलं आहे… ही जबाबदारी आम्हा दोघांवर दिली आहे… काय समर?” आकाश त्यांच्यासमोर आडवा हात करत म्हणाला.

    “यू आर राइट… आकाश ब्रो!  दादा-वहिनी चला घ्या पटकन उखाणा.”.

    “नाव? आणि ते कोणाचं? डोन्ट टेल मी, तुम्हाला माझं नाव माहीत नाही…” शिव त्या दोघांना टफ लूक देत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून खाली मान घातलेल्या आरूला हसू आवरता आलं नाही आणि ती खळखळून हसू लागली…

    ज्या काही चालीरीती आहेत, त्या लवकरात लवकर कराव्यात, असे शिवला वाटत होतं. त्यामुळे त्याची घाई सुरू होती… पण सुधा देखील निवांत उभ्या होत्या… उलट, आकाशची मस्ती एन्जॉय करत हसत होत्या… त्यामुळे शिव जास्तच वैतागला होता.

    पण आता आरूला असं मनमोकळं हसताना पाहून त्याचा तणाव क्षणात गायब होऊन त्याच मन फुलून आलं… कालपासून तिचा उदास आणि निर्विकार चेहरा पाहून त्याच्या मनाला असंख्य वेदना होत होत्या. त्या वेदना क्षणात गायब झाल्या… तिचं निखळ हास्य पाहून, हरवून गेला तो आणि एकटक तिच्याकडे पाहू लागला! ती अजूनही हसत होती… तिच्या हसण्यात बाकीचे पण सामील झाले…

    “बरं बास…  खूप झाली मस्ती! आणि नव्या नवरीने, घरच्या सुनेने एवढं मोठ्याने हसणं शोभत नाही… सुधा सुनेला रीतिभाती समजावून सांग…”  लीला आजी कडक आवाजात दरडावून म्हणाल्या.

    हेही वाचा – शिवच्या बंगल्याबाहेर गाडी उभी राहिली… पण आरू घरात येईना!

    हे ऐकल्यावर आरू हसायची थांबली आणि आत डोकावून पाहू लागली… आणि थोडा राग पण आला… तिच्या चेहऱ्यावरचे भाव देखील बदलले होते. ती काही बोलणार, तोच मागून भावनाने तिचा खांदा हाताने दाबत तिला शांत राहायला खुणावलं.

    शिवला पण त्यांचा राग आला… पणं तो काही बोलला नाही. तो कधीच घरातल्या गोष्टींमध्ये सहभाग घेत नव्हता. फक्त गोष्टी त्याच्या सिया दिबद्दल असतील तर तो मधे बोलायचा…

    “हो… आई…” म्हणत सुधा यांनी वेळ मारून नेली.

    “… आणि शिव नाव घ्यायचं म्हणजे आराधनाचे नाव. शब्दांची गुंफण घालून त्यात घ्यायचं असतं. त्याला उखाणा असे म्हणतात,” सुधा यांनी त्याला नीट समजावून सांगितलं.

    “ओह… असंय का!” तो चेहऱ्यावर समजल्यासारखे भाव आणून म्हणाला. त्यावर आरू पुन्हा गालात हसली… आणि त्याने तिच्याकडे भुवई उडवत पाहिलं.

    “हो असंच आहे… आरू वहिनी तुमचं हसून आणि शिव तुझं त्यांच्याकडे पाहून झालं असेल तर घ्या आता नाव!” आकाश पुन्हा त्याला चिडवत म्हणाला.

    क्रमशः

    Avatar photo
    शोभा भडके

    मूळ गाव कांबी, जिल्हा बीड. मूळ राहण्याचे ठिकाण बीड. मी लेखनाला सुरुवात करायच्या आधी फक्त एक वाचक होते. म्हणून प्रतिलिपी ॲपवर कथा वाचनच करत होते. तेव्हा ध्यानीमनीही नव्हतं मी एखादी स्टोरी लिहू शकेन. पण वाचन करत करता मनात आलं आणि लिहू लागले. लिहिलेलं वाचकांना आवडत गेलं, तसं माझा लिहिण्याचा हुरूप वाढत गेला... आज लेखनामुळे आर्थिकदृष्ट्या पण स्वावलंबी झाले आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

    Related Posts

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026 ललित

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026 ललित

    मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…

    June 26, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    By प्रणाली वैद्यJune 26, 2026

    भाग – 31 “मी माधवला म्हणाले खरी की, मी शर्वायशी बोलेन… पण  अजूनपर्यंत मला त्याच्याशी…

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026

    मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…

    June 26, 2026

    …अन् आईच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले!

    June 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026

    Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    June 26, 2026

    मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…

    June 26, 2026

    Recipe : चमचमीत आलू पराठा अन् खमंग बटाटावडा…

    June 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 340
    • अवांतर 191
    • आरोग्य 123
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 468
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 228
    • मैत्रीण 23
    • ललित 738
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.