Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: डॉ. अस्मिता हवालदार
डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.
‘नॉट विदाऊट माय डॉटर’ हे पुस्तक म्हणजे इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन स्त्रीची कहाणी आहे. बेट्टी महमूदी या लेखिका आणि विल्यम हॉफर सहलेखक असून लीना सोहोनी यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. बेट्टीने अमेरिकेत राहणाऱ्या इराणी डॉक्टर सय्यद बोझोर्ग महमूदीशी (मूडी) विवाह केला आणि पाच वर्षांच्या मुलीला घेऊन ती त्याच्याबरोबर इराणला गेली, तेव्हा तिला पंधरा दिवसांनी अमेरिकेत परत जायचे आहे, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात ती तिथे गेल्यावर कुटुंबाच्या नजरकैदेत राहिली. या संकटातून तिने अपरिमित धैर्य दाखवून वाट शोधली आणि स्वतःची सुटका करून घेतली. ही अशक्यप्राय वाटणारी घटना होती; कारण इराणमधले कायदे फार कडक होते. ती घटस्फोट घेऊन परत जाऊ शकत…
ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांच्या ‘अफगाण डायरी -काल आणि आज’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1982 साली प्रसिद्ध झाली आणि आता सातवी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. पुस्तक दोन भागात आहे. 1982 ते 2026 या कालावधीत अफगाणिस्तानात बऱ्याच घडामोडी झाल्या. तालिबानची सत्ता आल्यावर तिथे जे बदल घडले, ते समाज माध्यमांवर पाहिले, ऐकले. अफगाणिस्तानबद्दल कुतूहल वाटत होतं. अगदी शेजारचा देश, एकेकाळचा आपल्या देशाचा भाग असलेला, पण एवढा फरक? का झालं असेल असं? कालचा अफगाणिस्तान… “आम्हाला कसला आलाय इतिहास? आमचा इतिहास म्हणजे फक्त बाहेरच्या लोकांची एकापाठोपाठची आक्रमणं, त्यांनी केलेली लुटालूट आणि माऱ्यामाऱ्या… अभिमानानं सांगावं असं इथं काय घडलंय?” काबूल युनिव्हर्सिटीमध्ये काम करणारे इतिहासाचे प्राध्यापक…
‘चीपर बाय द डझन’ ही चरित्रात्मक कादंबरी फ्रँक बंकर गिलब्रेथ (ज्यु.) आणि अर्नेस्टाइन गिलब्रेथ कॅरे या लेखकांनी त्यांच्या वडिलांवर आणि कुटुंबावर लिहिली आहे. याचा अनुवाद मंगला निगुडकर यांनी केला आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत राहणारे हे कुटुंब. त्यांचे वडील फ्रँक बंकर गिल्ब्रेथ औद्योगिक व्यवस्थापक आणि सल्लागार होते. आधी त्यांचा बांधकामाचा व्यवसाय होता. त्यांनी वेळ आणि गती या विषयाचा अभ्यास केला. कमीत कमी वेळात कमीत कमी कष्टांत जास्तीत जास्त काम करणे हे त्यांचे ध्येय होते. यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबात सुद्धा प्रयोग केले. ‘चीपर बाय द डझन’ नाव देण्याचे कारण त्यांना बारा मुले होती. एवढी मुले का? असे विचारल्यावर ते उत्तर देते,…
स्वामी अवधूतानंद उर्फ जगन्नाथ कुंटे यांनी नर्मदा परिक्रमेच्या अनुभवांवर ‘नर्मदेSS हर हर’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी चार वेळा नर्मदा परिक्रमा केली. तिसरी परिक्रमा झाल्यावर त्यांनी हे पुस्तक लिहिले. नर्मदा परिक्रमा करण्याचे काही नियम असतात. तीन वर्षं तीन महिने तेरा दिवसांत एक परिक्रमा करायची असते आणि नर्मदा एकदाही ओलांडायची नसते. चुकून ओलांडली तर, परिक्रमा भंग होते. परिक्रमा आणि भ्रमंती यात फरक आहे. नर्मदा परिक्रमेला हजार वर्षांची परंपरा आहे. परिक्रमा करणारे सर्वच नियम पाळतात, असे नाही. अमरकंटक ते अमरकंटक अशी एक परिक्रमा होते. नर्मदा गुजरातेत अरबी समुद्राला मिळते. तिथपर्यंत अर्धी परिक्रमा होते. तिथून पुन्हा अमरकंटक… आता नर्मदेवर धरणे बांधल्यामुळे पात्र रुंदावत…
‘One Life’ हा सिनेमा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रागमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. निकोलस विनटन नावाचा लंडनमध्ये राहणारा स्टॉकब्रोकर प्रागमध्ये येतो, तेव्हा हिटलरच्या आक्रमणामुळे घाबरलेले लोक चेकोस्लोव्हाकियामधून निर्वासितांच्या छावण्यांत राहत असलेले तो पाहतो. लहान मुले थंडीत जिवंत राहणार नाहीत, या काळजीने तो आणखी तीन मित्रांबरोबर त्यांना मदत करायचे ठरवतो. या मुलांना इंग्लंडचा व्हिसा मिळवून देऊन लोकांना तात्पुरते दत्तक देण्याची योजना बनवतो. मुलांना ट्रेनमधून इंग्लंडला पाठवायचे आणि कुटुंबांना सांभाळायला द्यायचे. पण यात अनेक अडचणी असल्याने असंभव वाटत असते. निकोलसची आई त्याला सर्वतोपरी मदत करते… व्हिसा मिळवून देण्यापासून फोस्टर पॅरेन्टस मिळवून देण्यापर्यंत! निकी आणि त्याची टीम मिळून 669 मुलांना वाचवतात. हिटलरने पकडून…
झुम्पा लाहिरी या प्रसिद्ध कथा कादंबरीकार असून त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. नेमसेक ही त्यांची गाजलेली कादंबरी! यावर सिनेमा सुद्धा आहे. उल्का राऊत यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. ही अमेरिकेत घडणारी आशिमा आणि अशोक या बंगाली जोडप्याची कथा आहे. गोगोल या नावाभोवती पूर्ण कादंबरी गुंफली आहे. अशोक हा बंगाली तरुण ट्रेनमधून जात असताना निकोलाय गोगोल या लेखकाचे ‘द ओव्हरकोट’ (The Overcoat) पुस्तक वाचत असतो. सहप्रवासी पुस्तकाबद्दल त्याला विचारतो आणि बोलता बोलता अमेरिकेत जाण्याचा सल्ला देतो. पुढे अशोकचा आशिमाशी विवाह होतो. आशिमा इंग्रजी विषयात पदवीधर असते. दोघांचा संसार अमेरिकेत सुरू होतो. त्यांच्या पहिल्या अपत्याचे नाव तो गोगोल ठेवतो. तो…
‘राम रामेति रामेति… सुखी जगण्याचा क्रॅश कोर्स गीतरामायण’ हे लेखक डॉ. राहुल देशपांडे यांचे पुस्तक. नावात सांगितल्याप्रमाणे गीतरामायणातून सुखी जगण्याचा मंत्र विषद करणारे, हे पुस्तक आहे. हाताच्या पंजात मावेल इतका आकार असल्याने सहज घेऊन जाता येते. मीही प्रवासातल्या दोन तासांत वाचले. सुखी जगण्याचा क्रॅशकोर्स म्हणजे हे सेल्फ हेल्प आणि त्यात गीतरामायण… त्यामुळे मला कुतूहल वाटले. मराठीत सेल्फ हेल्पची पुस्तकं फारशी नाहीत, असली तर गाजलेली तरी नाहीत. इंग्रजीमध्ये अशी असंख्य पुस्तकं आहेत. थोड्या थोड्या दिवसांनी एक येत असते आणि नवी पिढी वाचताना दिसते. ‘हाऊ टू विन फ्रेंड्स’ या पुस्तकापासून ते सध्याच्या ‘Atomic habbits’पर्यंत! खरेतर, आपल्याकडे तत्वज्ञान, महाकाव्य आणि संत साहित्याची एवढी…
Whiplash (व्हिप्लॅश) हा सिनेमा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यावर असला तरी, आपल्या आजपर्यंतच्या या नात्याच्या संकल्पनांना धक्का देणारा आहे. शिक्षकी पेशाभोवती परोपकार, सद्गुण आणि सत्शीलतेच वलय असतं, अपेक्षा असते. गुरू – शिष्याच्या नात्याला आपल्या संस्कृतीत परमोच्च स्थान आहे, गुरूला देव मानले आहे. जाझ ड्रमर अँड्र्यू नेमान या शिष्याची आणि टेरेंस फ्लेचर या गुरूची कथा आहे. नेमान 19 वर्षांचा मुलगा असून त्याने एका सुप्रसिद्ध संगीत विद्यालयात प्रवेश घेतला आहे. फ्लेचर हा तिथला सर्वात नावाजलेला प्रतिष्ठित शिक्षक. वाद्यवृंदाचे संयोजन करणारा कंडक्टर आहे. फ्लेचर एकदा अँड्र्यूला ड्रम वाजवताना ऐकतो आणि न आवडल्याने नाराजी दर्शवतो, पण पुन्हा त्याला आपल्या वाद्यवृंदात घेतो. मुख्य ड्रमर कार्ल…
श्री. ना. पेंडसे यांच्या गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत, यशोदा वगैरे गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. कोकणच्या पार्श्वभूमीवर या कादंबऱ्या असल्याने त्यांची प्रादेशिक कादंबरीकार अशी ओळख आहे. रथचक्र ही कादंबरी सुद्धा लोकप्रिय झाली. यावर आधारित टीव्हीवर मालिकाही आली होती. कादंबरी वाचायला घेतल्यावर मुखपृष्ठ लक्ष वेधून घेते. निळ्या रंगांच्या छटात जमिनीत अर्ध्याहून अधिक रुतलेले रथाचे चाक दाखवले आहे. रुतलेल्या रथचक्राशी संबंधित दोन कथा आठवतात – एक रामायणातल्या कैकयीची आणि दुसरी कर्णाची. यापैकी एकाचे हे चाक आहे का? की संसाराच्या रथाचे चक्र आहे? संसाराचा रथ दोन चाकांचा असतो – एक पतीचे आणि दुसरे पत्नीचे… की हे कालचक्र आहे? ‘चक्रवत् परिवर्तन्ते दुःखानि च सुखानि च।’ ही…
नंदा खरे लिखित ‘उद्या’ ही भविष्यकाळाचा वेध घेणारी विलक्षण कादंबरी आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आल्यापासून जगभरात अनिश्चिततेच वातावरण आहे – नोकऱ्यांचे स्वरूप काय असेल? नोकर्या मिळतील की नाही? इथपासून हुकूमशाही येईल… इथपर्यंत. माणसाचे अस्तित्व धोक्यात आहे, ही भीती आहेच. भविष्यात मानव जातीपुढे काय वाढून ठेवले आहे? हे दाखवणाऱ्या या कादंबरीला 2020मध्ये साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. कादंबरी Dystopia (अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतला समाज) प्रकारात येते. ‘सबव्हर्जन सर्व्हेलंस प्रोग्राम्स’ हे शब्द पहिल्याच पानावर, खरं तर अर्ध्या पानावर वाचायला मिळतात आणि आपल्या भुवया उंचावतात. ‘समजायला कठीण वाटतंय’, असं वाटत असताना ‘तरी कळून घ्यायलाच हवं’ हा विचार मनात येतो. अनेक इंग्रजी वाक्ये…

