Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: शोभा भडके
मूळ गाव कांबी, जिल्हा बीड. मूळ राहण्याचे ठिकाण बीड. मी लेखनाला सुरुवात करायच्या आधी फक्त एक वाचक होते. म्हणून प्रतिलिपी ॲपवर कथा वाचनच करत होते. तेव्हा ध्यानीमनीही नव्हतं मी एखादी स्टोरी लिहू शकेन. पण वाचन करत करता मनात आलं आणि लिहू लागले. लिहिलेलं वाचकांना आवडत गेलं, तसं माझा लिहिण्याचा हुरूप वाढत गेला... आज लेखनामुळे आर्थिकदृष्ट्या पण स्वावलंबी झाले आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
भाग – 33 राम आणि सिया घराजववळ पोहचले होते आणि जसं आरूने वर्णन केलेलं अगदी तसंच इथे सगळे जमा झाले होते… नवरा-नवरीला पाहायला! गर्दी बघून तर सियाला पुन्हा अवघडल्यासारखं झालं, कारण सगळे तिच्याकडेच पाहात होते आणि तिने नजर खाली करून घेतली होती… रामच्या हे लक्षात आल्याने तिचा हात हातात धरला तसं तिला आधार जाणवला, पण हृदयावरचं दडपण काही कमी झालं नव्हतं. “रा… राम, ही सगळी लोक इथे पण आलीत. म्हणजे मंदिरात पण होती…” सिया जरासी चाचरत पण हळू आवाजात रामसोबत चालत त्याच्या दिशेने सरकून म्हणाली. “सिया, हे गाव आहे. इथे सगळ्यांना नव्या नवरीचं कौतुक आणि उत्सुकता असते तिला पाहण्याची! त्यासाठीच…
भाग – 32 शिवने गाडी स्टार्ट केली आणि दोघे गावी निघाले. शिवच्या एकदम जवळ येण्याने आरू अर्थात आराधना घाबरली होती, त्यानंतर तिने त्याच्याकडे पाहिलच नाही… खिडकीतून बाहेर बघत राहिली… खिडकी उघडी होती त्यामुळे छान हवा येत होती. आराधनाला मोकळ्या हवेची सवय होती आणि तिला छानही वाटत होतं. शिव तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहात होता… ती बाहेर हात काढून हवेला जणू धरण्याचा प्रयत्न करतेय… तिच्या या निरागसपणावर गालातल्या गालात हसत होता. गाडीत एकदम शांतता होती. मघाशी ज्या प्रकारे तो जवळ आला होता, तसं पुन्हा होऊ नये म्हणून आरूने आता शांत राहणंच पसंत केलं. बाहेरच्या थंड हवेसोबत खेळत प्रवासाचा आनंद घेऊ लागली. “मी…
भाग – 31 “ओ… मी राहीले ना,” पवन राम आणि सियाच्या मागे निघाला तोच मागून पूर्वीचा आवाज आला. पवनने मागे वळून पाहिले आणि डोक्यालाच हात लावला आणि हसतच तिच्या जवळ आला… “ओ, तुम्हाला हसायला काय झालं? आह… आई गं…” कळवळून पूर्वी त्रासिक सुरात म्हणाली. “अगं ये, ये… काय करतेस? टोचला का बघू! थांब जरा मी काढतो…” पवनने तिचा हात हातात घेऊन पाहू लागला, तर बोटाला काटा टोचून त्यातून रक्त आलं होतं… तर झालं असं होतं… गाडीतून आत्या मामा-मामी बाकीचे घराकडे उतरले आणि पवन, पूर्वी राम, सिया मंदिराकडे गेले. पवनने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. खरंतर पूर्वीला वाटलं की, राम…
भाग – 29 आत्याच्या घरी देखील रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू होती. सिया चेंज करून हॉलमध्ये आली होती. शरू आत्या आणि कलावती तयार जेवण घेऊन हॉलमध्ये आल्या. आज सगळे हॉलमध्ये बसून जेवणार होते. मामा आणि सखाराम बाहेर गॅलरीत होते. राम टेरेसवर गावाकडे काही महत्त्वाचे फोन करत होता. लग्नासाठी सगळे इकडे शहरात आल्यामुळे गावाकडे शेती आणि घराकडे लक्ष द्यायला त्याने भावकीतील त्याचा चुलत भाऊ बाळूला सांगितलं होतं. त्यातच आज रात्रीची पाण्याची बारी असल्यामुळे पिकाला पाणी द्यायचं काम त्याला सांगत होता. तर, पवन त्याच्या रूममध्ये लॅपटॉपवर ऑफिससंबंधित काहीतरी काम करत होता. लग्नामुळे त्याच्या सुट्टया पडल्या होत्या. पण काही महत्त्वाची कामं तो घरून करत…
भाग – 28 आरूने पटकन दरवाजा लावल्यावर शिवचा हात दरवाजात सापडला… थोडंसच लागलं होतं आणि रक्तही थोडंसच आलं होतं, पण आरू घाबरून गेली होती. तिच्यामुळेच त्याला लागलं, म्हणून वाईट वाटलं तिला. या गडबडीत ती हे देखील विसरून गेली की, तिच्या अंगावर साडी नाही, फक्त ब्लाऊज आणि पेटीकोटवर ती होती! तिच्या डोळ्यातलं पाणी गालावर ओघळून आलं आणि तिच्या मुसमुसण्याचा आवाज शिवच्या कानावर आला… तेव्हा तो भानावर आला. “आरा… आराधना… प्लीज रडू नकोस. काय झालंय? तू… तू शांत हो आधी…” जवळ येत तिच्या खांद्याला हात लावत तो अडखळून बोलत होता आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण ती आता जास्तच रडायला…
भाग – 27 राम दारात उभा राहून सियाकडे एकटक पाहात होता. त्याने पाहिलं की, तिला केसात लावलेले गजरे काढायला जमत नाही, तेव्हा तो पुढे आला आणि त्याने केसांवरील तिच्या हातावर आपला हात ठेवला. त्याच्या हाताचा स्पर्श होताच, तिने झटकन मान वर करून आरशात पाहिलं तर तो तिच्या केसातले गजरे काढत होता… तिने आपला हात खाली घेतला आणि आरशातून एकटक त्याच्याकडे पाहू लागली… डोळे भरुन आले तिचे… त्याने एक एक करत सारे गजरे काढले आणि टेबलवर ठेवले आणि तिचे केस मोकळे केले… मग त्याने मान वर करून आरशातून तिच्याकडे पाहिले तर, ती भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडेच पाहताना दिसली… नजरानजर झाली… आज दोघांच्या…
भाग – 26 “चला… चला… पटकन नाव घ्या दोघे आणि लवकरात लवकर प्रवेश करा घरात,” आजी अजून काही बोलण्यापूर्वी घाई करत आकाश म्हणाला. “काय नाव घ्या? मला असलं काही येत नाही… मॉम जे काही असेल ते पटकन उरक… मला जाम कंटाळा आलाय इथे उभं राहून!” शिव वैतागून म्हणाला. “अजिबात नाही… जोपर्यंत तुम्ही उखाणा घेत नाहीत, तोपर्यंत मी घरात येणारं नाही…” आरूने आता आजीवरचा राग शिववर काढत म्हटलं. त्यावर त्याच्या भुवया उंचावल्या… पण काही क्षणच! समोर आरू होती, ती कधी कशी वागेल, कधी काय बोलेल याचा नेम नव्हता… त्याच्या बाबतीत तर तिचा मूड कधीही आणि कसाही बदलत होता… त्यात त्याचा राग…
भाग – 25 आरू आणि शिव घरी पोहचले होते. त्यांची गाडी गेटच्या आत दारात उभी राहिली त्यातून ते दोघे खाली उतरले होते. “आपलंच घर आहे ते… आणि मी तुला घरीच घेऊन आलोय,” असं शिवने तिला सांगितलं. “कायSSS काहीही… वेड्यात काढत आहात का?” आरूचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते. समोरच्या घराला पाहून थक्क झाली होती ती! तिचा विश्वास बसला नाही, त्याच्या बोलण्यावर… “आरू, काय चाललंय तुझं?” भावना तिला समजावत हळू आवाजात, पण जरा चिडून म्हणाली. “अगं बघ ना किती मोठं घर… नाही, नाही… खूप मोठा असा बंगला आहे. मी कधी लांबून पण बघितला नाही, असा हा महाल! …आणि हे म्हणत आहेत आपलंच…
भाग – 24 शिवने पुढे होऊन सियाला मिठीत घेतलं, तसं तिला जास्तच भरून आलं. आरू त्याच्याकडेच पाहात होती आणि आता आपल्या राम दादाचा चेहरा पाहून तिलाही वाईट वाटू लागलं… वहिनी रडतेय म्हणूण दादाला त्रास होतोय ते पाहून तिने स्वतःचं रडणं आवरतं घेतलं आणि सियाजवळ आली… “ओ, काय चाललंय तुमचं? आमच्या वहिनीला रडवताना काहीचं कसं वाटत नाही तुम्हाला? लई झालं, व्हा बाजूला… वहिनी बास हां आता, अजिबात रडायचं नाही… तुम्हाला रडताना पाहून माझा दादा पण रडेल काही वेळाने!” आरू सियाचे डोळे पुसत हसत म्हणाली. आरूने सियाचा मूड तर फ्रेश केला… वरून सगळयांना हसवलंही! तिने स्वतःला तर केव्हाच सावरलं होतं. आता भावूक झालेल…
भाग – 23 आरू रडत होती, सगळ्यांना दिसत होतं… रामने जवळ घेण्याची ती वाट पाहत होती आणि राम तिच्याकडे पाठ फिरवून उभा होता! आरूला रडताना पाहून शिवला रामचा रागच आला. “राम काय चाललंय? आरू रडतेय, बघा ना तिच्याकडे…” सिया रामला ऐकू जाईल अशा आवाजात त्याच्या जवळ जात म्हणाली. “दादा, सोड ना तुझा राग आता… थांबव ना तिला!” पवन पण त्याला समजावत म्हणाला. “ए पोरी बास कर की आता! आसं किती येळ रडणार हाईस… पोरी एक ना एक दिस सगळ्याच पोरींना सासरी जायलाच लागतं, रीतच हाय ती. त्यातून कोन बी नाय सुटलं. आता तुझं लगीन झालंय तर तुझं हे लहान लेकरागत…

