Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » …अन् मैतर पांडूच्या संसाराची घडी बसली!
    ललित

    …अन् मैतर पांडूच्या संसाराची घडी बसली!

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करMay 13, 2026Updated:May 16, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लघुकथा, पांडूची कथा, मैतर पांडूची कहाणी, पांडूचे पहिले लग्न, पांडूच्या पत्नीकडून फसवणूक, पांडूचे दु:ख, पांडूंचा आत्महत्येचा विचार, पांडूची गजानन महाराजांकडे सेवा, पांडूची भक्त सेवा, पांडूचे दुसर लग्न, पांडूच्या संसाराची घडी बसली, पांडूंची महादेवबाबांशी ओळख
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    उत्तरार्ध

    पंधरा दिवसात पांडूच्या लग्नाची पत्रिका आली, पांडूचा फोन पण आला. लग्न कोलगांवला होते. मी आणि दाजी लग्नाला गेलो. पांडूकडून लग्नाला फक्त मित्र नंदू आणि पत्नी तसेच आम्ही दोघे. सगळे मिळून 20 ते 25 माणसे. लग्न लागले, आम्ही आहेर केला. पांडूची चेष्टामस्करी केली आणि निघालो.

    पांडू आज गृहस्थाश्रमाला लागला. आता निदान दोनवेळचे जेवण मिळेल. त्याच्या बर्‍यावाईट प्रसंगात त्याच्या सोबत राहणारी धर्मपत्नी मिळाली, चला चांगले झाले…

    पंधरा दिवसांनंतर नंदूचा फोन आला, म्हणाले – “तुमच्या मित्राचे काहीतरी बिघडले आहे. काही बोलत नाही. परवा दुकानात आला, तो पाच-सहा सिगारेटी ओढत बसला. तुम्ही येऊन जा.” मी म्हटले “अजून याच्यामागचे कष्ट, हाल संपत नाहीत काय?” दाजी आणि मी परत कलंबिस्तला पोहोचलो. पांडूची बायको घरात मोबाइलवर बोलत होती, तिने आमची दखलही घेतली नाही. पांडूला शोधले, तो परड्यात पोफळीला पाणी लावत होता. आम्ही त्याला बाजूला घेतले आणि “काय प्रकार आहे,” असे म्हणताच तो रडू लागला. खोदून खोदून विचारल्यावर कळले ते असे, त्याच्या बायकोचे कोलगांवला एका मुस्लिम फळविक्रेत्यावर प्रेम होते, त्या गृहस्थाचे पहिले लग्न झालेले, तो परत हिच्याबरोबर शादी करणार होता. घरच्यांचे ती काहीएक ऐकून घेऊना… तेव्हा, लग्नानंतर सुधारेल म्हणून तिचे पांडूशी लग्न लावून दिले. पण लग्नानंतर ती पांडूशी एक शब्द बोलली नव्हती. त्याच्यासमोर आपल्या याराशी हसत बोलत होती. आम्ही ठरविले, तिच्याशी काही बोलावे, पण आम्ही बोलणार, हे लक्षात येताच ती फोन घेऊन बाहेर गेली. जाताना म्हणाली, “हे लग्न माझ्या घरच्यांनी जबरदस्तीने लावले आहे, याविषयी माझ्याशी काहीही बोलू नका.”

    केविलवाण्या चेहेर्‍याच्या पांडूचा निरोप घेऊन आम्ही निघालो. तिच्या आई-वडिलांना भेटायचे ठरविले. पण ते केवळ रडत राहिले. चार दिवसांनी नंदूचा फोन, पांडूची बायको तिच्या याराबरोबर सगळे कपडे, दागिन्यांसकट त्याच्या मोटर सायकलवर बसून गेली आणि दुसर्‍या दिवशी पांडू पिशवीत दोन-तीन कपडे घालून घराला कुलूप लावून गेला.

    हेही वाचा – बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    गेली दोन वर्षे नंदू आणि मी पांडूचा शोध घेतोय. कोण म्हणतं तो अक्कलकोटला आहे, कोण म्हणतं काशीला गेला, कोण म्हणतं त्याने जीव दिला… कधीतरी पांडू येऊन चावीने कुलूप काढील, या आशेवर मी आणि नंदू आहोत…

    मधे दोन वर्षे गेली आणि अचानक बांद्याच्या नंदू केमिस्टचा फोन आला…

    “तुमचा मित्र घरी आला आहे अशी बातमी कळली, यावेळी एकटा नाही नवीन बायको आहें सोबत, तुम्ही ताबडतोब या…” माझ्या कानावर विश्वास बसेना. पांडू परत आला, पांडू परत आला… तो सुद्धा सोबत नवीन बायकोसह!

    मला खूप आनंद झाला. कधी एकदा पांडूला पाहातो, असे झाले. दुसऱ्या दिवशी मी नंदू केमिस्टकडे बांद्याला गेलो आणि दोघे पांडूच्या गावी म्हणजेच घरी पोहोचलो.

    घर उघडे होते, दोन वर्षांपूर्वी मी आणि नंदू कुलूप पाहून गेलो होतो, पुन्हा पांडू दिसेल अशी आम्हाला आशा नव्हती… आणि आत्ता घर उघडे होते.

    आम्ही आत गेलो, आम्ही येणार याची पांडूला कल्पना नव्हती. पांडू पाठीमागच्या बागेत होता. कोयता घेऊन झाडावर आलेल्या वेली तोडत होता आणि सोबत त्याची पत्नी पण दुसऱ्या झाडाला अळी काढत होती. केवढे सुंदर दृश्य. हेच तर पांडूला हवे होते. त्याला साथ देणारी सहचारिणी हवी होती.

    आमच्याकडे दोघांचे लक्ष नव्हते. दोघे एकमेकांशी बोलत काम करत होती. मी मुद्दाम खाकरलो, तेव्हा पांडूचे माझ्याकडे लक्ष गेले. पांडू खूश झाला आम्हाला पाहून… धावत आला आणि मला मिठी मारली. मग नंदूला मिठी मारली. माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन त्याने आनंदाश्रू मोकळे केले…

    आम्हाला पाहून त्याची पत्नी आधीच घरात गेली होती. आम्ही तिघे एकमेकांना धरून घरात आलो. तोपर्यत पांडूच्या बायकोने पाणी आणि गुळाचा खडा समोर ठेवला देखील. माझ्या नजरेतील समाधान पांडूने पाहिले आणि तो बोलू लागला,

    “अवी, दोन वर्षांपूर्वी माझी परिस्थिती काय होती तू जाणतोस. मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो. ती करण्याआधी शेगावला जाऊन गजानन महाराजांचें दर्शन घ्यावे, पहिले आणि शेवटचे! म्हणून थोडे चालत थोडे बसने शेगावला पोहोचलो. कारण मी महाराजांचा भक्त आहें. त्यांना माझे दुःख सांगावे आणि मग आयुष्य संपवावे, असा विचार केला.

    शेगावला मी धर्मशाळेत राहिलो. रोज स्वामींचे दर्शन घेत होतो. हळूहळू तिथे असलेल्या सेवेकरी मंडळीची माझी ओळख झाली. माझ्या मनात विचार आला, मला इथे सेवेकरीचें काम मिळेल काय? म्हणजे महाराजांची सेवा झाली आणि माझ्या मनाला शांती मिळेल, हा हेतू. मी काही सेवेकरी मंडळींना माझी इच्छा सांगितली. त्यांनी त्यांच्या मुख्य सेवेकरी माणसाकडे नेले. त्यांनी सांगितले, इथे सेवा द्यावी लागते, त्याचा मोबदला मिळत नाही. सलग पंधरा दिवस सेवा दिल्यावर मधे काही दिवस विश्रांती, पुन्हा सेवा.

    मी तयार होतोच. मग एका सेवेकरी ग्रुपमधून मी मंदिर परिसरात सेवा द्यायला लागलो. तेथे अनेकांच्या ओळखी झाल्या. त्यातील महादेवकाका मला फार जवळचे झाले. त्यांच्यासोबत मी भाकर तुकडा खायचो. माझ्याबद्दल त्यानी विचारले, तेंव्हा मी माझी सगळी माहिती दिली.

    त्यांचं म्हणणं असायचा, “त्या गजानन बाबावर ईश्वास ठेव, तुझं भलं होईल.”

    “आमची सेवेकरी मुदत संपली आणि माझे सगळे साथीदार त्यांच्या त्यांच्या घरी जायला निघाले, मी कुठे जाणार? महादेव काका मला म्हणाले, “पोरा, माजा बारूबार माज्या गावाकडं चल, काय असलं तो भाकरी तुकडा खाऊ आणि पंधरा दिसांनी परत येऊ…”

    मी त्यांच्याबरोबर त्याच्या गावी गेलो, तीन खोल्यांचं मातीचं घर होत. दोन दुभत्या म्हशी होत्या त्यांच्या. दहा गुंठायचं रान भोवती, पण पाऊस पडत नसल्याने दुष्काळी भाग. त्त्यांची प्रेमळ म्हातारी आणि लेक त्यांच्या घरी होती.

    त्यांची लेक सकाळपासून कामाला सुरुवात करायची. म्हशीचे शेण काढायची, मग दूध काढायची. रानातून म्हशींना चारा शोधून आणायची. पण ती गप्प गप्प असायची. घरातले जेवण, भांडीकुंडी सर्व तीच करायची. दोघे नवरा-बायको मात्र तिच्याकडे पाहून डोळे पुसायची. एकदा म्हातारी मला म्हणाली “पांडोबा, या लेकीचं कसं व्हायचं याची चिंता वाटते रे बाबा… तो गजानन बाबा काय तरी इलाज सांगाल.”

    मी म्हटलं, “काय झाल?”

    “अरे, माजी तरणी पोर यवतमाळच्या नागोजी पाटलाला दिली. पन दोन साल पाऊस पडला न्हाई, पानी न्हाई, कर्ज झालं त्याच्या डोस्क्यावर आनी त्यानं ईश खाऊन जीव दिला की!”

    हेही वाचा – पाप आणि पुण्य

    “अरेरे… फारच वाईट… आमच्या कोकणात पाऊस भरपूर, त्यामुळं कोणी आत्महत्या करत नाही.”

    “होय बाबा, पोरीला घेऊन आलो आमी, अव्हडी तरणी पोर, कशी दिस काढंल?”

    “महाराजांवर विश्वास ठेवा, ते काळजी घेतील तिची.”

    “होय बाबा, महाराज हाईत मागं… बघू…”

    मग माझ्या लक्षात आलं, दोघा म्हाताऱ्यांचं काहीतर हळूहळू बोलणं सुरू होतं. एक दिवस म्हातारी आनी म्हातारे माज्या जवळ बसले. मला म्हातारी म्हणाली “पांडबा, तुज्या लग्नाचा बी खेळखंडोबा झालाय म्हणे, तू बी जीव द्यायला गेला व्हता म्हणे?”

    मी मान हालवली.

    “असं जीव देऊ नये बाबा, माणसाला जीव लई पुण्याईने मिळतो, तू असं करीनास, बघ तुला पटतंय तर, जबरदस्ती न्हाई. तू आमच्या लेकीबरोबर पाट का लावत न्हाईस?”

    “काय?”

    आता म्हातारे बोलू लागले “लई दिसापासून मनात होतं, गजानन बाबांनी जणू तुला पाठीवलं, म्हणून तुसानी इथं बोलावून घेतला, माजी पोरगी तुला सुखात ठेवील.”

    आणि अव्या, नंदू माझा माझ्या कानावर विश्वास बसेना. मी स्वामींना हात जोडले. “स्वामी, तुम्ही चमत्कार घडवता आहात.”

    मग दोन दिवसांनी आमचं त्याच्या गावातील गजानन महाराजांच्या देवळात लग्न झालं…”

    मी पुढे झालो आणि पांडूला मिठी मारली. शेवटी पांडूला त्याची घरवाली मिळाली होती.

    तोपर्यत “जेवणं तयार आहें, पानावर बसा,” असा आतून निरोप आला. मी, नंदू आणि पांडू केळीच्या पानावर वाढलेला भात, आमटी, केळफुलाची भाजी, लोणचं असं जेवणं आनंदाने जेवलो.

    मग पांडूला समाधान आणि सुख मिळालं. त्या दोघांनी मिळून बागेत सुपारीची झाडे लावली, काजू कलमे लावली, शेती केली.

    दोन वर्षांनंतर मी बायकोला घेऊन आणि नंदू त्याच्या बायकोला घेऊन पांडूच्या बाळाच्या बारशाला जाऊन आलो.

    समाप्त
    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Related Posts

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026 ललित

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026 ललित

    चमचम

    August 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    By प्रणाली मंगेश महाशब्देAugust 22, 2026

    I Love You! तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर, झालं असं की, काल आम्ही सगळे…

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026

    विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक समस्या

    August 22, 2026

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 546
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 867
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.