Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: डॉ. विवेक वैद्य
General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.
काल सहज चहाच्या निमित्ताने काही आठवणी, काही प्रसंग आठवले. खरेतर त्या आठवणी त्या त्या व्यक्तीशी निगडित आहेत.. म्हणून त्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेले छोटे प्रसंग… देवामामा…. देवामामा हा माझ्या आईचा सख्खा भाऊ नाही. तर गुरूबंधू. विखरण येथे आईचे मामा राहायचे त्यांचे गुरू तेच आईचेही गुरू आणि देवामामाचेही गुरू. देवामामा आईच्या मानाने खूप लहान. देवामामा राहायचा खेड्यावर. आमच्या गावापासून बऱ्यापैकी दूर. आधीचे फार काही आठवत नाही, पण तो भेटायला यायचा फक्त एप्रिल-मे महिन्यात. घरी भरपूर शेती. त्यामुळे पावसाळ्याच्या अगोदर शेतीची औजारे घ्यायला, दुरुस्त करायला, खते – बी-बियाणे घ्यायला तो आमच्या तालुक्याच्या ठिकाणी यायचा. सकाळी घरून जेवण करून निघायचा मोटरसायकलवर. सगळी कामे निपटून…
उत्तरार्ध वडिलांची इस्टेट नावावर करण्यासाठी सौरभला अक्काची सही पाहिजे होती. म्हणून तो अक्काच्या गावी गेला होता. निबंधकाच्या ऑफिसमधून सही करून दुपारी सगळेजण घरी आले तेव्हा सौरभचे मन काहीसे उदास होते. आपली सावत्र बहीण इतकी चांगली असेल अशी त्याने कल्पनाही केली नव्हती. आपण काय काय विचार करत होतो आणि प्रत्यक्षात काय घडले. दुसरीकडे, सीमा आणि रीमा या सख्ख्या बहिणींनी हक्कसोडपत्रावर सह्या करताना नाकीनऊ आणले होते. घरी येतानाच प्रतिभाचा फोन आला, “काय रे झाले का काम?” “हो” “अक्काने पैसे किती घेतले?” ” घरी आल्यावर बोलतो सविस्तर, आता परत फोन करू नको.” तो काहीसे रागाने म्हणाला. जेवण झाल्या झाल्या रवी म्हणाला, “मी शेतात जाऊन…
पूर्वार्ध सौरभ अक्काच्या गावी पोहोचेपर्यंत संध्याकाळ होत आली होती. घामाने आणि गर्मीने अंग चिकट झाले होते. बऱ्याच दिवसांनी तो लाल एसटीने प्रवास करून आला होता. अंगही दुखत होते. कारने पाच-सहा तासात आरामात पोहोचला असता, पण प्रतिभाने खोडा घातला. कारने जाल तर, उगाच अक्काला वाटेल आपला भाऊ पैसेवाला आहे आणि ती जास्तीचे काही मागेल. अगोदरच सीमा आणि रीमा यांनी हक्कसोडपत्रावर सह्या करताना नाकीनऊ आणले होते. खरेतर, दोघेही श्रीमंत घरी दिलेल्या पण तरी वडिलांची इस्टेट भावाच्या नावावर करण्यासाठी सह्या करायला त्यांनी खूप नखरे केले. अवाच्यासवा पैसे मागितले. अखेर मोठ्या काकांना मधे टाकून एक आकडा फिक्स केला आणि दादापुता करून त्यांच्या सह्या घेतल्या.…
तर ही गोष्ट मी सरकारी क्वार्टरमध्ये राहत होतो तेव्हाची. आमच्या फ्लॅटच्या शेजारचे साठेकाका रिटायर होऊन त्यांच्या फ्लॅटमध्ये नवीन पटेल आणि अवनी पटेल हे जोडपे राहायला आले. लग्नाला बहुतेक 1-2 वर्षेच झाली असणार. अवनी दिसायला सुंदर. मराठी अस्खलित बोलायची. कदाचित इंटरकास्ट लग्न असावे. अर्थात, या वयात मला फक्त दृष्टीसुख. अधूनमधून ‘Hi’, ‘हॅलो’ चालायचे. नवीन सकाळीच जायचा तो थेट संध्याकाळी यायचा. माझीही सकाळी लवकर ड्युटी असायची. मी पण सकाळी आठेक वाजता निघायचो. स्कूटरवरून जायचो. काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की, मी सकाळी ड्युटीसाठी स्कूटरवरून घराबाहेर पडलो की, अवनी तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीत येऊन मला बघायची… मी जाईपर्यंत! सुरुवातीला वाटले, योगायोग असेल… तिची गॅलरीत…
आपल्या एकुलत्या एक हुशार मुलाला शिक्षणासाठी विलायतेत पाठवण्यासाठी वाडवडिलांनी सांभाळून ठेवलेली शेती भैरूने विकायला काढली, तेव्हा गावकऱ्यांनी त्याला वेड्यात काढले. “अरे, तो मुलगा शिकून तिथेच नोकरी पकडेल, एखाद्या गोऱ्या मड्डमेशी लग्न करून तिथेच राहील आणि म्हातारपणी तू काय भीक मागून पोट भरशील का?” पण भैरूला आपल्या मुलावर भरवसा होता. शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. खुद्द भैरू बऱ्यापैकी शिकला होता. त्याला लिहिता-वाचता यायचे, तो रोजचा पेपर वाचायचा, कीर्तन – प्रवचनाला जायचा, गावातल्या मास्तरांशी बोलायचा… त्याचे शिक्षण सुटले ते घरच्या परिस्थितीमुळे आणि पालकांच्या, समाजाच्या त्यावेळी शिक्षणाकडे बघण्याच्या उदासीनतेमुळे… त्याने शेती विकली. मुलानेही त्याच्या विश्वासाचे चीज केले. तो यशस्वी होऊन भारतात परतला. त्याला लठ्ठ…
तो नेहमीसारखाच कॉफी शॉपमध्ये बसलेला. त्याच कोपऱ्यातल्या जागी. तीच संध्याकाळची वेळ. त्याच्यासामोर ती पुन्हा येते. यावेळी चेहरा झाकलेला नसतो. गॉगलही लावलेला नसतो. मेकअप ही साधासाच. लिपस्टिक नाही. ती मोकळेपणाने हसते. “सर, इथे बसू शकते?” तो दोन मिनिट कन्फ्यूज होतो… मग ओळख पटल्यावर ओळखीचे स्मित देतो. “बसा ना.” ‘नक्कीच काही कामासाठी आली असेल. मागच्या वेळी आपण बोललो होतो ना! नंतर विचारू सावकाश…’ त्याच्या मनात विचार येतात. “कॉफी?” “अर्थातच,” ती सहजतेने म्हणते. तो वेटरला ऑर्डर देतो. “काय काम काढले?” तो विचारतो. “काहीच नाही. सहज भेटायला आले.” “सहज?” त्याला आश्चर्य वाटते. “हो, आज पूर्ण मोकळी आहे. रात्रीही बुकिंग नाही. मग म्हटले तुम्हाला भेटावे.”…
त्या दिवशी खुशबू माझ्याकडे आली तेव्हा तिच्याबरोबर एक लहान चणीची मुलगी होती. चेहरा ओढणीने झाकलेला होता. त्यामुळे ती कोण मला समजले नाही. खुशबू बंगाली. इथे देहविक्रय करते. दिसायला ठीकठाक. पण स्वभाव मनमोकळा. गप्पा मारायला लागली की आवरावे लागायचे. बरेचदा इथे नव्या मुली येतात. त्यांना घेऊन या ओळखीच्या बाया येतात. त्यामुळे हीसुद्धा कोणी नवी मुलगी असेल असे वाटले. (नवी मुलगी म्हणजे धंद्यातली नवी नाही तर गावातली नवी.) “क्या हुआ? कौन है ये?” “सर्दीखांसी हुआ है, बैद बाबू… ये तुम्हारी पोती है.” “पोती?” “मेरी लडकी है.” आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. खुशबू स्वतःला माझी मुलगी म्हणवून घेते किंवा तसे नाते मानते. म्हणजे…
कथा पहिली त्यादिवशी अगदी किरकोळ कारणावरून दंगा झाला आणि त्याला ऑफिस सुटताच तडक घरी यावे लागले. एरवी रोज ऑफिस सुटल्यावर बारमध्ये जाऊन ड्रिंक घेऊन बऱ्याच उशिरा तो घरी जात असे. मग जेवण आणि झोप. पण आज सगळेच गडबडलं. आता दारू मिळणे शक्यच नव्हते. घरीही एखादी बाटली शिल्लक नव्हती. तो स्वतःवरच चिडला. पण इलाज नव्हता. अखेर बऱ्याच उशिरा तो जेवायला बसला. आज पोटात दारू नसल्याने जेवण जाणार नाही, असेच त्याला वाटले. पण तसे झाले नाही. बऱ्यापैकी जेवण गेले. झोप लगेच लागणार नव्हतीच. तो थोड्यावेळाने सहज स्वयंपाकघरात डोकावला तर, त्याची बायको जेवत होती. म्हणजे? ही रोज आपले जेवण झाल्यावर जेवते? त्याला ती…
आज आंघोळीला जात असताना फोन आला. समोरच्याशी बोलून नंतर फोन बाथरूममध्येच विसरलो. चष्माही बाथरूममध्येच राहिला. बाहेर आल्यावर थोड्या वेळाने लक्षात आले, तोपर्यंत लहान भाऊ अतुल आंघोळीला गेला होता. त्याला अंघोळीला खूप वेळ लागतो. (त्यामुळे तो माझ्यापेक्षा खूप गोरा आहे! ते जाऊ द्या…) तर सांगायचे असे की, आता तो 20-25 मिनिटे बाहेर येणार नाही… म्हणून काय करावे? हा प्रश्न पडला. एरवी मी रिकामा असलो तर मोबाइल पाहतो किंवा टीव्ही. पण आता मोबाइल बाथरूममध्ये… टीव्ही बघावा तर चष्माही बाथरूममध्ये… करणार काय? मग स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. वाढत्या वजनामुळे सकाळचा नाश्ता बंद केला आहे. पण आज टाइमपास करायचा होता, मोबाइल मिळेपर्यंत… मग प्लेट भरून…
प्रिय अरुण यास, खरेतर तुझी माझी मैत्री कशी झाली ते आठवत नाही. कधीतरी ती शाळेत पाचवीत असताना झाली आणि काही दिवसांत घट्ट होत गेली. शाळेचे रंगीबेरंगी दिवस संपले. कॉलेजही झाले. तू दुकान टाकले. व्यापार, धंदा करू लागला. मी नोकरीला लागलो. मैत्री टिकून होती. पण अर्थातच पूर्वीसारखा वेळ नसायचा. तुला धंदा वाढवायचा होता… मला नोकरीत प्रमोशन… नेमका गैरसमज कुठे झाला माहीत नाही. कदाचित माझ्याकडून चूक झाली असावी. पण त्या किरकोळ गोष्टीचा मी पर्वत केला आणि तुझ्याबद्दल मनात अढी ठेवली. त्याच दरम्यान तुझे लग्न ठरले. तू स्वतः पत्रिका द्यायला आला. मी वरवर हसून स्वागत केले, पण तुझ्या लग्नाला जाणार नाही, हे आधीच…

