Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट
    ललित

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करMay 9, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लघुकथा, पांडूची कथा, मैतर पांडूची कहाणी, हुतूतू खेळाडू पांडू, पांडूची कौटुंबिक स्थिती, पांडूची ताई, पांडूच्या ताईचा सासुरवास, पांडूच्या ताईचा सासूरवास, पांडू ताईच्या घरी गडी, सेल्समन पांडू,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पूर्वार्ध

    इयत्ता तिसरीचा वर्ग सुरू होता. गुरुजी हजेरी घेत होते. एवढ्यात दरवाज्याकडे एक मुलगा पाठीवर दप्तर घेऊन उभा असलेला दिसला. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिले आणि ‘आत ये’ म्हणाले. तो मुलगा आत आला, जुनी ठिगळं मारलेली खाकी पँट आणि सदरा, बारीक केस आणि थोडीशी शेंडी असा अवतार होता. कदाचित एक-दोन महिन्यांपूर्वी त्याची मुंज झालेली असावी. गुरुजी आम्हा मुलांना म्हणाले, “हा एक नवीन विद्यार्थी आपल्या वर्गात आला आहे.” त्याच्याकडे बघून म्हणाले, “हं! काय नाव तुझे? कुठून आलास? या आधी कुठल्या शाळेत होतास?”

    तो मुलगा मान वर करुन म्हणाला, “मी पांडुरंग वसंत दामले. गाव कलंबिस्त, ता. सावंतवाडी.”

    गुरुजी म्हणाले, “बरं, बरं, म्हणजे बांद्याजवळ. मग घरी कोण कोण असतं?”

    “घरी फक्त आई. वडील दोन वर्षांपूर्वी वारले. भाऊ-बहीण कोणी नाही.”

    गुरुजी म्हणाले, “मग या गावात कोण राहतं?”

    तो म्हणाला, “या गावात माझी चुलत बहीण मणेरीकरांकडे दिली आहे. तिच्या घरी राहून शाळेत येणार. आमच्या गावापासून सहा मैलांवर शाळा आहे. म्हणून या गावात आणि या शाळेत आलो.”

    गुरुजी म्हणाले, “बस बस.” आणि तो शेवटच्या रांगेत वासू आणि दिनूच्या बाजूला बसला.

    ही माझी पहिली ओळख पांडू दामलेशी.

    शाळेच्या मधल्या सुट्टीत हुतूतू खेळायचो. पांडू बाजूला उभा राहून खेळ पाहायचा. पण खेळायला यायचा नाही. खरंतर आम्हा सर्वांपेक्षा तो उंच होता आणि त्याचे पाय लांब होते. त्यामुळे तो हुतूतू चांगला खेळेल, असा आमचा अंदाज होता. मी त्याला म्हटले, “अरे ये ना खेळायला.”

    हेही वाचा – एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    पांडू म्हणाला, “माझ्याकडे एकच चड्डी आहे, ती फाटली तर उद्या काय घालू? आणि ताईची सासरची मंडळी फार तापट आहेत. जरा काही झाले तर मला उपाशी ठेवतील.”

    मी गप्प झालो. आम्ही बाकी मुले श्रीमंत नसलो तरी, घरी आई होती आणि उपाशी राहात नव्हतो.

    आमची सकाळची साडेसातची शाळा. पण पांडू नेहमी उशिरा येत होता. गुरुजींच्या पण हे लक्षात आले. पण ते दुर्लक्ष करत होते. एकदा तर तो चक्क नऊ वाजता घामाघूम होऊन वर्गात आला. गुरुजी ओरडले, “दामले उभा रहा. कालचा वर्गपाठ दाखव… आणि रोज का उशीर होतो? उद्यापासून उशीर झाला तर वर्गात घेणार नाही. जा तिकडे कोपर्‍यात ओणवा उभा रहा.”

    पांडू जाऊन कोपर्‍यात ओणवा झाला. गुरुजी शिकवत होते. अर्ध्या तासानंतर त्यांच्या लक्षात आले. दामले ओणवा आहे. ते म्हणाले, “जा जाग्यावर जाऊन बस आणि सांग तुला रोज का उशीर होतो? आणि तुझा गृहपाठ का अपुरा असतो?”

    पांडू मुसमुसत म्हणाला, “ताईच्या सासरची माणसे फार छळतात. सगळी घरची कामे करून घेतात. शाळेतून गेल्यावर गुरांना चरायला नेणे, गुरांना गोठ्यात बांधणे, गवतकाडी घालणे, भांडी घासणे आणि रात्री भांडी घासून झाली की, सगळी लाइट बंद. बरे कंदील-दिवा पण पेटवायचे नाही. पुस्तक वाचायला किंवा गृहपाठ करायला देत नाहीत.”

    गुरुजी गप्प झाले. म्हणाले, “बस तू.” त्यावेळपासून गुरुजी पांडूला शिक्षा करायचे बंद झाले. मला पांडूची खूप दया आली. मी त्याला म्हटले, “तू माझ्या शेजारी पहिल्या रांगेत बस” आणि पांडू माझ्याशेजारी बसू लागला. त्यावेळपासून तो माझा जवळचा मित्र झाला. मी त्याला माझी पाटी दाखवू लागलो. गृहपाठ दाखवू लागलो. माझी पुस्तके घरी न्यायला देऊ लागलो. तो गुरे चरायला नेताना पुस्तके नेऊ लागला. त्याचा थोडा-थोडा गृहपाठ पुरा व्हायला लागला.

    आमची हुतूतूची मॅच पाचवी बरोबर ठरली. मी पांडूला म्हटले, “तू चांगला उंच आहेत. तू खेळ ना रे. मी माझ्या मोठ्या भावाचे कपडे तुला देतो.” मी खरोखरच माझ्या भावाच्या चड्ड्या, बनियन आणि शर्ट त्याला दिले. पांडू खूश झाला आणि खेळू लागला. खरंतर, आमच्या वर्गात सर्वात चांगला तोच खेळत होता! मी घरुन येताना पांडूसाठी बटर, बिस्किटे आणून देत होतो. तसेच, आमच्या वर्गातील दाजी त्याला चिंचा, आवळे, बोंडू, आंबे आणत होता. पांडू वर्गात फार हुशार नव्हता. त्याचे भाषाविषय चांगले होते. पण गणित कच्चे होते.

    आम्ही पाचवीत असताना शाळेच्या क्रीडा स्पर्धा सुरू होत्या आणि आमच्या शाळेची मॅच गावातील दुसर्‍या शाळेबरोबर होती. पांडू आमचा हुकमी एक्का. मॅचचे ठिकाण गावाबाहेर होते. म्हणून आम्ही सर्व सकाळी लवकर मैदानाकडे गेलो. पांडूला घरुन बाहेर पडण्याचा प्रश्न होताच. पण शाळेत परीक्षा आहे, असे ताईला सांगून तो मैदानाकडे आला. खेळ रंगात आला होता. एवढ्यात पांडूच्या ताईचे सासरे हातात गुरांना मारतात ती काठी घेऊन मैदानात आले आणि शिव्या घालत त्यांनी पांडूची गचांडी पकडून तिथल्या तिथे गुरासारखे मारू लागले.

    आमचे गुरुजी त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या गृहस्थांनी गुरुजींनापण शिव्या घालायला सुरुवात केली. पांडू त्यांना हिसका देऊन पळाला आणि त्याच्या पाठीमागे काठी उगारुन ताईचे सासरे,,, आम्ही सारे सुन्न होऊन पाहात होतो. त्या दिवसापासून पांडू जो मैदानातून पळाला तो परत शाळेत आला नाही.

    दिवस जात होते. पांडू परत आईकडे कलंबिस्तला गेला, असे कळले. पांडू दामले नावाचा मित्र आयुष्यातून वजा झाला होता. आम्ही बाकी मुले गावातच एसएससी झालो. पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेलो. काहीजण नोकरीला लागले. काहीजण घरची शेती बागायती सांभाळू लागले. मी पण मोठ्या शहरात जाऊन पदवीधर झालो. नोकरीला लागलो आणि जिल्ह्यात एका मोठ्या शहरात स्थायिक झालो.

    या दरम्यान एका हौशी नाट्य ग्रुपकडे आकर्षित झालो. नाटके, एकांकिका करू लागलो. असेच एकदा एका स्पर्धेच्या निमित्ताने बेळगावला एकांकिका करण्यास गेलो. वरेरकर नाट्यमंडळामध्ये रात्रौ दहाची एकांकिका. नऊ वाजता मेकअप करत असताना कुणीतरी म्हणाले, ‘तुला भेटायला कुणीतरी आले आहे.’ मी बाहेर येऊन पाहतो, तो पांडू दामले! आता उंच झाला होता. अंगाने भरला होता. अंगावर भारी नाही, पण बरे कपडे होते. मी त्याला कडकडून मिठी मारली… “म्हटले मित्रा होतास कुठे? आणि मी इथे आलो आहे, हे तुला कसे कळले?”

    हेही वाचा – एका संपाची कहाणी

    पांडू म्हणाला, “या वाटेने जाताना जाहिरात पाहिली. त्यात तुझे नाव दिसले. म्हणून तुला भेटायला आलो. मी आता बेळगावात असतो. माझ्या मामेभावाची छोटीशी आयुर्वेदिक औषध कंपनी आहे. त्या कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो. टेम्पोत औषधे भरून गावोगावी जातो. त्या टेम्पोबरोबर मी ऑर्डर्स घ्यायला जातो. आता माझे बरे चालले आहे.”

    मी खूश झालो. एवढ्या आयुष्यात पांडूला सुख कसले ते मिळाले नव्हते. आता तरी सुखाने दोन घास खाईल! माझा नोकरीचा पत्ता त्याने घेतला. त्यानंतर तो महिन्या-दोन महिन्यांनी माझ्या ऑफिसमध्ये येत राहिला. शाळेचे जुने दिवस, जुने मित्र, हुतूतूच्या मॅचेस अनेक अनेक आठवणी आम्ही काढल्या… पांडूची बांद्याला नंदू केमिस्टशी मैत्री होती. हा नंदू केमिस्ट पांडूच्याच गावचा होता.

    असेच पाच-सहा महिने गेले. मी पांडूची वाट पाहात होतो. पण पांडू इकडे फिरकलाच नाही. त्याचा फोन वगैरे मला माहीत नव्हता आणि चौकशी करायची कुठे? एवढ्यात लक्षात आले, बांद्याचा नंदू केमिस्ट याचा मित्र आहे. त्या बाजूला जाताना मी नंदू केमिस्टला भेटलो. नंदू म्हणाला, पांडू गावी आलाय. भावाने कंपनीतून काढून टाकले. याचे फारसे शिक्षण नाही. आता गावी येऊन भिक्षुकी करतो आणि थोड्याफार केळी-पोफळी आहेत. स्वयंपाक त्याला पहिल्यापासून येतोच.

    मी खूश झालो. म्हटले चला, पांडू गावात मजेत आहे, नंदू म्हणाला, बहुतेक तुमच्या मित्राचे लग्न ठरतेय. कोलगांवची मुलगी पाहुणे घर बघायला येऊन गेली. तुम्हाला पत्रिका येईलच. मी भलताच आनंदी झालो. चला पांडू एकदाचा स्थिर होऊ दे. लहानपणापासून त्याने काढलेले हाल माझ्या डोळ्यासमोर आले.

    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Related Posts

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026 ललित

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026 ललित

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    By तृप्ती देवJune 25, 2026

    कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे दिसायला अगदी साधे असतात; पण त्यात दडलेल्या…

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    माझे चुरमुरे खाणे…

    June 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!

    June 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 339
    • अवांतर 191
    • आरोग्य 123
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 466
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 732
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.