Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 28 जून 2026

    June 28, 2026

    सारं काही रंगभूमीसाठी!

    June 27, 2026

    वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, June 28
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » नाते… रक्ताचे अन् प्रेमाचे!
    ललित

    नाते… रक्ताचे अन् प्रेमाचे!

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरMay 12, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, आबांचे रक्ताचे नाते, आबांचे प्रेमाचे नेते, आबांची नेपाळ ट्रीप, आबांचा वृद्धाश्रम, आबांचा सुनेकडून छळ, आबांचे मुलाशी तुटलेले नाते, राज नेहाचा प्रेमळपणा, आबा रीनूचे भावनिक नाते,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    संध्याकाळच्या निवांत वेळी आबा नेहमीप्रमाणे फिरायला गेले असताना अचानक खाली कोसळणार, तोच समोरून येणाऱ्या गृहस्थाने त्यांना धरले…

    “आबा, ओळखलंस का मला? मी वरद. अरे, दोन-तीन महिन्यांपूर्वी तू असेच चक्कर येऊन पडत होतास, तेव्हा मीच नाही का तुला सावरले आणि वृद्धाश्रमात सोडले. चल, आजही सोडतो मी वृद्धाश्रमात. चक्कर येते तर असा एकटा फिरायला येत जाऊ नकोस,” वरद म्हणाला.

    “अरे, आता मुलाकडे राहतो, त्यामुळे चक्कर येणे बंद झाले. आज केळीच्या सालीवरून पाय घसरला.”

    “वा छान! मुलाला सद्बुद्धी झाली. त्याने बापाला वृद्धाश्रमातून घरी आणले,” वरद म्हणाला… “बरं, आता कुठे राहतोस? कुठे सोडू मी तुला?”

    घरी पोहोचताच आबांच्या नातीने विचारले, “आजोबा, हे कोण?”

    “रीनू बेटा, हे वरद आजोबा.”

    राज आणि नेहाने वरद अंकलचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. वरदला राज आणि नेहाचा स्वभाव खूप आवडला. रीनू तर काय, खूपच गोड होती. त्यानंतर आबा आणि वरद यांचे एकमेकांना भेटणे, बागेत फिरणे, गप्पागोष्टी करणे सुरू झाले.

    “आबा, पुढच्या महिन्यात मी नेपाळला जातोय. येतोस का तू?”

    “वरद, अरे मला खर्च झेपणार नाही.”

    “आबा, अरे जेमतेम 40 हजार रुपये लागणार! मी विचारू का राजला?”

    “नको, नको. तू राजला विचारू नकोस. राज इतकं करतो माझं, वर एवढा खर्च का करावा त्याने?”

    “आबा, अरे तू त्याच्यासाठी भरपूर खस्ता खाल्ल्या असतील. करू दे ना त्याला थोडंसं बापासाठी.”

    “वरद, तो माझा मुलगा नाही.”

    हेही वाचा – आण्णा… जगण्याच्या इच्छेला फुटली पुनश्च पालवी!

    “आबा, अरे काय म्हणतोस? तो तुझा मुलगा नाही तर, काय नाते आहे तुमचे?”

    “ऐक तर मग,” आबा सांगू लागले.

    साधारणतः तीन महिन्यांपूर्वीची गोष्ट. मी समोरच्या बागेत फिरायला आलो होतो. एक छोटी मुलगी खेळता खेळता पडली. मी तिला डॉक्टरांकडे नेऊन ड्रेसिंग केले आणि तिला तिच्या घरी पोहोचविले. तिच्या आई-बाबांशी परिचय झाला. पहिल्याच भेटीत मने जोडली गेली. त्या छोटीचे नाव रीना आणि तिचे आई-बाबा राज आणि नेहा! रीनाच्या आग्रहास्तव मी शनिवार-रविवारी त्यांच्याकडे जाऊ लागलो. रीनाशी छान गट्टी जमली. मी तिला शिकवू लागलो.

    एका शनिवारी मी रीनाकडे जायला निघालो, त्यावेळी वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी मला विचारले, “वृद्धाश्रमाच्या फीचे 24 हजार रुपये कधी देणार?” त्यांनी मला सुचविले, “तुम्ही शिक्षक होता, ट्युशन घ्या म्हणजे फीच्या पैशांची व्यवस्था होईल.”

    मी राज आणि नेहाला रीनाच्या ट्युशनविषयी विचारले. त्यांनी अगदी आनंदाने मान्य केले.

    “ट्युशनची फी महिन्याला 8 हजार रुपये देऊ,” असे त्यांनी सांगितले.

    मी राजला विनंती केली, “मला गरज आहे म्हणून प्लीज मला 24 हजार रुपये अॅडव्हान्स द्याल का? आणि दर महिन्याला 4 हजार रुपये तुम्ही कापून घ्या, म्हणजे सहा महिन्यांत पैसे फेडले जातील.”

    “आबा, तुम्हाला काही अडचण आहे का? कुणाला पैसे द्यायचे आहेत का?” राजने विचारले.

    वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांचे नाव आणि नंबर देऊन मी त्यांना पैसे ट्रान्सफर करायला सांगितले.

    राजने दुसऱ्या दिवशी मॅनेजर साहेबांना फोन केला आणि त्याला नको ती माहिती मिळाली. वृद्धाश्रमाची फी दरमहा 10 हजार रुपये आहे, माझे पेन्शन केवळ 6 हजार रुपये आहे. माझ्याकडे 24 हजार रुपये बाकी आहेत. मागच्या महिन्यात मला एलआयसी पॉलिसीचे दोन लाख रुपये मिळणार होते. मुलाने माझी सही घेतली, एलआयसीतून पैसे घेतले; परंतु मिळालेले पैसे मला न देता स्वतःच्या घरी फर्निचर करण्यासाठी वापरले.

    राजने तात्काळ 24 हजार रुपये मॅनेजर साहेबांना ट्रान्सफर केले. रीनूची ट्युशन व्यवस्थित चालू झाली; परंतु अचानक एके दिवशी नेहा मला म्हणाली, “आम्हाला पुढच्या महिन्यापासून ट्युशन बंद करायची आहे.” ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली; क्षणभर काहीच सुचले नाही.

    मी नेहाला विनवणी केली, “निदान 24 हजार रुपये फेडेपर्यंत तरी ट्युशन चालू ठेवा. माझ्या शिकविण्यात काही चुकत असेल तर सांगा, मी सुधारणा करीन.”

    नेहा आणि राज दोघांनीही स्पष्ट नकार दिला.

    मी हात जोडून विनवणी केली, “मला प्लीज थोडा वेळ द्या. मी काहीतरी करून तुमचे पैसे परत करीन.”

    पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते.

    “तुम्ही पैसे परत केले नाही तरी चालेल,” नेहा म्हणाली.

    खिन्न मनाने मी वृद्धाश्रमात परतलो. पुढच्या शनिवारी मला धक्काच बसला. मला वृद्धाश्रमातून काढण्यात आले होते. मॅनेजर साहेबांनी थंड आवाजात सांगितले,

    “आजच खोली रिकामी करा.”

    कुठे जायचे? काय करायचे? काहीच समजत नव्हते. जवळ एक रुपयाही नव्हता. नेहा आणि राजला फोन केला, पण त्या दोघांनीही फोन उचलला नाही. समोर कोणताही मार्ग दिसत नव्हता. परमेश्वराचा धावा सुरू केला…

    वरद, परमेश्वर खरोखरच आहे रे. बघ ना, चमत्कार झाला. रीनूचे गोड बोल कानावर पडले,

    “आजोबा, चला आपल्या घरी.”

    तो भास नव्हता, तर चमत्कार होता. अनपेक्षितपणे राज, नेहा आणि रीना आले होते.

    “आजपासून तुम्ही ‘आबा’ नाही, ‘आमचे प्रिय बाबा’…” राज आणि नेहा एक सुरात म्हणाले.

    हे गोड कटकारस्थान राज आणि नेहाने मॅनेजर साहेबांशी संगनमत करून रचले होते. मॅनेजर साहेबांनी आमचा फोटो काढला — मध्यभागी मी, एका बाजूला राज, दुसऱ्या बाजूला नेहा आणि माझ्या पुढे रीना…

    वृद्धाश्रमाला रामराम करून मी माझ्या नव्या घरी आलो. काय तो सुखद धक्का! दरवाजावरील नेमप्लेटवर माझेही नाव झळकत होते. राज आणि नेहाने आमचा तो फोटो डीपीवर ठेवला होता.

    “आबा, थोड्यावेळापूर्वी मी तुझ्या मुलाविषयी ऐकले.”

    “वरद, ऐक ती कर्मकहाणी…”

    मी शाळेत शिक्षकाची नोकरी करत होतो. एका लहानशा फ्लॅटमध्ये मी आणि माझा मुलगा आनंदाने राहायचो. मुलाला अमेरिकेत शिकायला जायचे होते, म्हणून मी लवकर रिटायरमेंट घेऊन मिळालेले सर्व पैसे मुलाला दिले. मुलगा शिक्षण घेऊन परत आल्यावर त्याचे मोठ्या थाटामाटात लग्न करून दिले. होता-नव्हता तो सर्व पैसा संपला.

    “बाबा, एवढ्या लहान फ्लॅटमध्ये राहण्यापेक्षा आपण हा फ्लॅट विकून मोठा फ्लॅट घेऊ,” मुलाने सुचविले. आम्ही मुलाने घेतलेल्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो.

    नवीन फ्लॅटमधील पहिलाच दिवस होता. पांढऱ्याशुभ्र सोफ्यावर मी बसलो होतो,

    “बाबा, तुम्ही डोक्याला तेल लावले आहे, त्यामुळे सोफा खराब होईल. तुम्ही सोफ्यावर बसू नका,” सुनबाईने सांगितले.

    “मी नॉन-व्हेज जेवण बाहेरून मागविले आहे. आज तेच खा.”

    कधी अंडीही न खाणारा मी म्हणालो, “अजिबात भूक नाही मला.”

    मुलगा समोरच बसला होता; परंतु त्याच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही.

    “टीव्ही खराब होईल, तुम्ही चालू करू नका… फ्रीज हळू उघडा… एसी लावायचा नाही… गिझर जास्त वापरू नका… मोठ्याने बोलू नका… चालताना पायांचा आवाज करू नका…” असे मला रोज ऐकावे लागे.

    परवडत नाही म्हणून झाडू-पोछा करणाऱ्या बाईला सुनबाईने कामावरून काढले आणि ते काम माझ्या गळ्यात टाकले. लवकरच मी घरगडी बनलो. सुनबाईला मी घरात नको होतो आणि त्यासाठी तिने माझा अनेक प्रकारे छळ केला. पोटच्या मुलाने कधीही माझी बाजू घेतली नाही.

    हेही वाचा – लग्नाचा 51वा वाढदिवस अन् वृद्धाश्रम

    पण एक मात्र खरं — माझ्या मुलाने मुलाचं नातं जपलं. त्याने मला वृद्धाश्रमात टाकले नाही. मी स्वेच्छेने वृद्धाश्रमात दाखल झालो; नरकयातना आणि पदोपदी होणारा अपमान टाळण्यासाठी!

    “माफ कर मित्रा. मला यातील काहीच माहिती नसल्यामुळे मी तुला नेपाळच्या ट्रिपसाठी आग्रह करत होतो,” संकोचून वरद म्हणाला.

    गप्पा मारण्यात बराच वेळ गेला, त्यामुळे आबांना घरी पोहोचायला उशीर झाला. राज वाटच पाहत होता. घरात शिरताच राजने आबांना मोठा धक्का दिला.

    “बाबा, पुढच्या महिन्यात आपल्याला नेपाळला जायचे आहे.”

    “राज बेटा, तुम्ही जा. मला नका नेऊ. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत रे.”

    “बाबा, माझे पैसे हे तुमचे पैसे आणि तुमचे सुख ते माझे सुख.”

    काही वर्षांपूर्वी मुलाला परदेशात शिकायला जाताना आणि नवीन फ्लॅट घेताना आबाही म्हणाले होते —

    “बेटा, माझे पैसे हे तुझे पैसे आणि तुझे सुख ते माझे सुख.”

    दोन्हीही वेळी नाते वडील-मुलाचेच होते; फरक एवढाच होता — राजबरोबरचे नाते रक्ताचे नव्हते, तर प्रेमाचे होते.

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    सारं काही रंगभूमीसाठी!

    June 27, 2026 ललित

    मारवाडी…

    June 27, 2026 ललित

     ट्रेनला विलंब… वाढली जुईलीच्या मनातील घालमेल!

    June 27, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सारं काही रंगभूमीसाठी!

    By प्रदीप केळुस्करJune 27, 2026

    साईनाथ नाट्यमंडळाने संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत मत्स्यगंधा’ नाटक सादर केलं. नाट्यमंडळाचा दिग्दर्शक सुदर्शन याने देवव्रत…

    मारवाडी…

    June 27, 2026

     ट्रेनला विलंब… वाढली जुईलीच्या मनातील घालमेल!

    June 27, 2026

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 28 जून 2026

    June 28, 2026

    सारं काही रंगभूमीसाठी!

    June 27, 2026

    वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 27, 2026

    मारवाडी…

    June 27, 2026

     ट्रेनला विलंब… वाढली जुईलीच्या मनातील घालमेल!

    June 27, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जे प्राणाचां घरीं, अंगें राबते भाऊ चारी

    June 27, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 341
    • अवांतर 191
    • आरोग्य 124
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 469
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 228
    • मैत्रीण 23
    • ललित 741
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 28 जून 2026

    June 28, 2026

    सारं काही रंगभूमीसाठी!

    June 27, 2026

    वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 27, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.