Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    May 14, 2026

    Dnyaneshwari : ब्रह्मादिक समस्त, उंचा मुखामाजीं धांवत

    May 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 मे 2026

    May 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, May 14
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…
    शैक्षणिक

    शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    Team AvaantarBy Team AvaantarMay 14, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, सर्वांसाठी सर्वोत्तम शिक्षण, वर्गात बोलणारे विद्यार्थी, जास्त बोलणारे विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य, विद्यार्थ्यांमधील गुणांना प्रोत्साहन, विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना चालना,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. किशोर महाबळ

    विद्यार्थी वर्गात, वर्गाबाहेर, शाळेच्या कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमात, आणि अनेकदा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपापसात बोलतात, गप्पा मारतात. त्यातही काही विद्यार्थी तर गप्पा मारण्याची एकही संधी सोडत नाहीत, असा शिक्षकांचा नेहमीचा अनुभव असतो. यामुळे शिस्त बिघडते, असेही त्यांना वाटते. या जास्त बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शांत बसायला लावण्यातच शिक्षकांचा भरपूर वेळ जातो. विद्यार्थ्यांच्या या वागण्यावर आपल्याला टीका करता येईल, पण मुळात ते असे का वागत असावेत, याची कारणेही शोधून काढली पाहिजेत.

    शालेय विद्यार्थी अत्यंत संवेदनशील असतात. त्यांना आजूबाजूच्या असंख्य गोष्टींबद्दल, घटनांबद्दल खूप उत्सुकता असते. त्यांना रोज असंख्य अनुभवही येत असतात. वयाबरोबर शरीरात होणारे बदल हेही नवे प्रश्न, नवे अनुभव देत असतात. आई, वडील, नातेवाईक, शिक्षक आणि समाजातील अन्य लोकांचे वर्तनही ते बारकाईने बघत असतात, अनुभवत असतात आणि त्याबद्दलही त्यांना बोलावेसे वाटते. नाविन्याची आवड असल्याने काहीही नवीन दिसले, अनुभवले की, ते मित्रमैत्रिणींना सांगावेसे वाटते तसेच ते सांगितल्याशिवाय राहवत नाही. हे शाळेतच सांगता येणे शक्य असते. मात्र, प्रत्यक्षात शाळेत दिवसभरात दर दोन तासिकांच्या मधील अल्पसा वेळ आणि मधली सुट्टी वगळता मुक्तपणे गप्पा मारण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळच नसतो. मग अशावेळी जो वेळ मिळेल, त्या वेळेत ही संवादाची संधी घेतली जाते.

    खरेतर आपापसात भरपूर बोलणे ही या वयातील मुलामुलींची मानसिक गरज असते. शिवाय, अनेक गोष्टी ते फक्त आपल्या मित्रांशीच बोलू शकतात. मुलींच्या बाबतीत तर ही बाब फारच महत्त्वाची असते. आपल्या सुख-दुःखाच्या गोष्टी मैत्रिणींना सांगण्यातून त्यांना मानसिक समाधान मिळते. अशा असंख्य कारणांमुळे शाळेत थोडासाही मोकळा वेळ मिळाला तर, विद्यार्थी लगेच आपापसात बोलू लागतात. हे सगळे अगदी नैसर्गिक आहे. म्हणूनच जगातील नामवंत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना परस्परांशी मुक्तपणे बोलता यावे, यासाठी दैनंदिन वेळापत्रकात विशेष वेळ दिला जातो. आपल्याकडे अजूनही असा विचार झालेला दिसत नाही. विद्यार्थ्यांमधील या संवादाकडे म्हणूनच फक्त नकारात्मक भूमिकेतूनच न बघता खरेतर सकारात्मक दृष्टीने बघायला हवे.

    हेही वाचा – ‘वेगळ्या’ चित्रकारांचा शोध

    या संबंधात आणखी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. सर्वच विद्यार्थी खूप बोलके नसतात. काहींना आत्मविश्वास नसल्याने ते सगळ्यांशी बोलत नाहीत, काही शांत आणि अबोल असतात. काही विद्यार्थीच कोणाशीही सहजगत्या संवाद साधू शकतात, हे थोडे बारकाईने निरीक्षण केल्यास लक्षात येईल. त्यांचे मित्रमंडळ खूप मोठे असते. त्यांना सहजगत्या इतरांशी संवाद साधता येतो. त्यांच्यात इतरांपेक्षा काकणभर जास्त आत्मविश्वास असतो. सर्वसाधारण विद्यार्थ्यांपेक्षा त्यांचे थोडे जास्त वाचन असते आणि त्यामुळे त्यांच्याजवळ इतरांना सांगण्यासारखे भरपूर असते. ते सहसा बहुश्रूत असतात. त्यांच्यात संवाद साधण्याची कला आणि कौशल्य उपजतच असते. असे विद्यार्थी सहसा वक्तृत्व कलेतही निपुण असतात. या सर्व गुणांमुळेच या विद्यार्थ्यासोबत नेहमी मित्र-मैत्रिणींचा घोळका असतो. याशिवाय, काही प्रमाणात नेतृत्वाचेही गुण असतात. हे विद्यार्थी इतर विद्यार्थ्याच्या तुलनेत एकदम वेगळे आहेत हे चटकन लक्षात येते. या विद्यार्थ्यामध्ये बुद्धिमत्तेची विशेष चमक असते. ही बुद्धिमत्ता त्यांना शिक्षक, प्राध्यापक, राजकीय नेते, संस्थांचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते होण्यासाठी उपयुक्त ठरते.

    आपण आपल्या शाळेत थोडा शोध घेतला तर, ज्यांच्यात अशी बुद्धिमत्तेची चमक आहे, असे विद्यार्थी प्रत्येक वर्गात आढळतील. ही बुद्धिमत्ता सर्व विद्यार्थ्यांमध्ये सुप्तरूपात असतेच! काहीजणांमध्ये ती अधिक प्रकर्षाने असते. एका विशिष्ट स्तरापर्यंत सर्वांमधील ही बुदधिमत्ता विकसित करण्याचा प्रयत्न करणे, हे गरजेचे आहे. आधुनिक काळात; यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य शिकावेच लागणार. इतरांसमोर आपले मत मांडण्याची, ते इतरांना पटवून देण्याची, नीट मुद्देसूदपणे विचार मांडण्याची क्षमता सर्वच विद्यार्थ्यांना विकसित करावी लागेलच. तेव्हा ही आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता ज्यांच्यात प्रकर्षाने आहे, त्यांच्यात ती अधिक विकसित कशी करता येइल आणि ज्यांच्यात ती सुप्तरूपात आहे, ती विशिष्ट स्तरापर्यंत तरी कशी विकसित करता येईल, याचा आपण विचार करूया.

    हेही वाचा – शाळांमधील चित्रकारांचा शोध

    आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपापसात संवाद साधण्यासाठी जास्तीतजास्त संधी सहजगत्या कशा देता येईल, याचा विचार करूया. प्रत्येक वर्गात प्रत्येक शिक्षकाने अभ्यासविषयातील कोणत्याही मुद्द्यावर विद्यार्थ्याना गटागटात चर्चा करायला प्रोत्साहन द्यायचे आहे. यासाठी सर्व शिक्षक मोलाची भूमिका बजावू शकतात. भाषा विषयाचे शिक्षक पाठ्यपुस्तकातील एखाद्या विचारप्रवर्तक सुविचारावर परस्परांशी बोलण्यास विद्याथ्र्यांना प्रोत्साहन देऊ शकतात. विज्ञानाचे शिक्षक हे वर्गात शिकविलेला सिद्धांत विद्यार्थ्यांनी परस्परांना समजावून देण्यास सांगू शकतात. गणिताचे शिक्षक हेही असेच एखादे गणित विद्यार्थ्यांनी गटात चर्चा करून सोडवावे, असे सांगू शकतात. इतिहासाचे शिक्षक पाठ्यपुस्तकात नोंदविलेली एखादी ऐतिहासिक घटना का घडली असेल, याचा गटांद्वारे विचार करण्यास विद्यार्थ्यांना सांगू शकतात. या पद्धतीने सर्व विषयांचे शिक्षक विद्यार्थ्यांना रोज परस्परांशी संवाद साधण्याची संधी देऊ शकतात.

    वर्गात एका बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्याचा गट करता येऊ शकतो किंवा थोडा प्रयत्न केला तर समोरच्या आणि मागच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांचेही गट करता येऊ शकतात. यासाठी विद्यार्थ्यांची रोज वर्गात बसण्याची जागा बदलूनही हे साध्य करता येऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांनाही वर्गातील इतर विद्यार्थ्यांशी चर्चेची संधी मिळू शकेल. जितक्या जास्त जणांशी त्यांची चर्चा होईल तितका त्यांना अधिक फायदा होईल. विचारशक्तीला चालना मिळेल, मेंदूचा विकास होईल, संवाद कौशल्ये शिकता येतील, पाठ्यपुस्तकांचा अधिक अभ्यास करावा लागेल. इतरांची मते कळल्याने विषयाकडे कोणकोणत्या दृष्टिकोनातून बघता येऊ शकते हे कळेल, सर्जनशीलता वाढेल. कसे बोलावे, आपले मत कसे मांडावे हे शिकता येईल. आपल्या विरोधी मत ऐकण्याची सहिष्णुता विकसित होईल. असे असंख्य फायदे वर्गातील या छोट्या चर्चासत्रांमुळे होतील. या पद्धतीमुळे सर्वच विद्यार्थ्यांना कृतिशील करता येते. सर्वानाच बोलण्याची संधी मिळते. हे सारे आधुनिक शिक्षणपद्धतीत अपेक्षित आहे. चर्चेच्या माध्यमातून विषय चांगला समजतो आणि तो दीर्घकाळ लक्षातही राहतो, असे शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्राने तर फार पूर्वीच सिद्ध केले आहे. शिवाय विषयाचे आकलन वाढण्यासाठी त्यांना अध्ययन प्रक्रियेत सामील करून घेतले पाहिजे, असा या शास्त्रातला महत्त्वाचा सर्वमान्य सिद्धांत आहेच. असे असूनही विद्यार्थ्यांना परस्परांशी संवाद साधण्याची वारंवार संधी न देऊन आपण जो त्यांच्यावर अन्याय करीत आहोत तो दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवा.

    (‘सर्वांसाठी सर्वोत्तम शिक्षण’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    विद्यार्थ्यांना क्लासेसची आवश्यकता किती?

    May 5, 2026 शैक्षणिक

    प्रत्येक विद्यार्थ्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलेच पाहिजे…

    May 2, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    विद्यार्थ्यांना क्लासेसची आवश्यकता किती?

    By Team AvaantarMay 5, 2026

    संगीता भिडे साधारण १९९७-९८ च्या दरम्यान ‘न्यू इंग्लिश स्कूल – ठाणे’ येथे ‘महाराष्ट्र विद्या प्रबोधिनी…

    प्रत्येक विद्यार्थ्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलेच पाहिजे…

    May 2, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    April 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    May 14, 2026

    Dnyaneshwari : ब्रह्मादिक समस्त, उंचा मुखामाजीं धांवत

    May 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 मे 2026

    May 14, 2026

    …अन् मैतर पांडूच्या संसाराची घडी बसली!

    May 13, 2026

    गोट्या… अप्पांची सावली!

    May 13, 2026

    जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी…

    May 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 297
    • अवांतर 185
    • आरोग्य 110
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 418
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 206
    • मैत्रीण 19
    • ललित 623
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    May 14, 2026

    Dnyaneshwari : ब्रह्मादिक समस्त, उंचा मुखामाजीं धांवत

    May 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 मे 2026

    May 14, 2026
    Most Popular

    शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    May 14, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.