Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: प्रदीप केळुस्कर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299
वासंतीताई सैरभैर झाल्या होत्या… ‘आत्ता जाऊन येते,’ म्हणून सांगून गेलेली आशा दीड तास उलटला तरी आली नव्हती! काळोख पसरू लागला होता आणि वासंतीताईंना टॉयलेटला जायचं होतं. त्यांना मदतीशिवाय चालता येत नव्हतं. परत परत त्त्यांचे लक्ष पार्कच्या गेटकडे जात होतं… आशा येईल आणि आपल्याला टॉयलेटला नेईल म्हणून त्या गेटकडे पाहात होत्या. मोठा नि:श्वास सोडत होत्या… त्यांची ही परिस्थिती पाहून त्यांच्याच वयाची एक स्त्री पुढे आली… “तुम्हाला काही हवं आहे काय?” त्या स्त्रीचा त्यांना एकदम आधार वाटला… “होय हो… मला आधाराशिवाय चालता येत नाही. माझी मदतनीस आशा… ‘पाच मिनिटांत येते, म्हणून गेली ती आलेलीच नाही. मला टॉयलेटला जायचंय हो… नाहीतर गडबड होईल…”…
खूप वर्षांनी कोकणात आलो. बारा वर्षांपूर्वी कोकण सोडले आणि मराठवाड्यातील वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून रुजू झालो. अर्थात, कोकणातील घडामोडींवर सुद्धा लक्ष होतेच, पण जास्त भर मराठवाडा. या भागातील अनेक पत्रकार, संपादक मित्र होतेच, शिवाय, अनेक सर्वसामान्य लोक सुद्धा अजून संपर्कात होते. अधूनमधून पत्रकारांच्या मीटिंग्स व्हायच्या. त्यावेळी पण मित्रमंडळी भेटायची. यावर्षी मुद्दाम वेळ काढून आंबे खायला म्हणून कोकणात आलो. रत्नागिरी भागात बरीच मित्रमंडळी होती, म्हणून मुक्काम रत्नागिरीत ठेवला. मी येणार हे कळताच मिलिंदने मला फोन लावला… “पम्या, सरळ पावसमध्ये यायचं. माझं मोठ्ठं घर आहे… माझी घरची पन्नास आंबा कलमे आहेत… हवे तितके आंबे खा. माझी चारचाकी आहे, तेव्हा तुला वाटेल तिथे फिरू.”…
गोरेगाव मेट्रो प्लॅटफॉर्मवर मी उभी होते. दुपारची वेळ. फारशी गर्दी नव्हती. वाट पहात असताना अचानक बाजूला लक्ष गेले. संकेत आहे का तो? थोडा रोडावला होता. पण तो निश्चित संकेतच… मी त्याच्या जवळ गेले आणि हळूच म्हणाले, “संकेत…” तो चटकन वळला. “कल्पू तू? आज इथे?” “मी मावशीकडे आले होते, परत चालले… तू?” “माझा जॉब इथेच आहे… रोजची हीच वेळ माझी घरी जायची.” “घरी? आई बरी आहे का रे तुझी?” “आई गेली गेल्यावर्षी…” “अरेरे! पण तशी चांगली होती ना ती… काय झाले?” “माझी काळजी तिला… माझं लग्न होत नाही आणि मला नोकरी पण मिळत नव्हती त्यावेळी…” “चल कॉफी घेऊ… इथे छान कॅफे…
आईचा साठावा वाढदिवस म्हणून समीराने आठ दिवसांची रजा घेतली आणि पुढील आठ दिवस आईसोबत घालवायचे हे तिने निश्चित केले. ती नवऱ्याला म्हणाली, “सुबोध, मी आठ दिवस रजा घेते आहे.” “का? अचानक? बरे वाटतं नाही की नोकरीचा कंटाळा आला?” “नोकरीचा कंटाळा करून कसे चालेल? नोकरी मिळावी, पैसे मिळावे म्हणून तर एवढी वर्षं शिक्षण घेतले.” “मग?” “अरे, आईला पुढील शनिवारी साठ वर्षं पूर्ण होत आहेत, घरी एकटी आहे ती… बाबा गेल्यापासून एकटी झाली आहे, विवेक पण हॉस्टेलमध्ये आहे.” “विवेक पण येणार आहे काय?” “तो पण येईल. नाहीतरी आई वेडाच आहे तो… तुला पण जमले तर पोहोच ना शनिवारपर्यंत…” “मी बघतो… शुक्रवारी रात्रीच्या…
भाग – 3 प्रणिता नांदेची फेसबुक पोस्ट पाहून वंदनाने एस ए (Struggler Actors) हा व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिन मनीषला फोन केला आणि नंतर व्हॉट्सॲप ग्रुपवर याची माहिती पोस्ट केली. तेव्हा तिचा मोबाइल नंबर मिळाला. तिने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते – “आज माझा या जगातील शेवटचा दिवस, मी पुरती निराश झाले आहें, आईवडिलांशी भांडून मी मुंबईत आले… पण माझा लोकांनी गैरफायदा घेतला. कामे मिळत नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत…. अलविदा!” याची माहिती पोलिसांना दिल्यावर त्यांनी मोबाइल नंबरवरून तिचा पत्ता शोधला. वाशीच्या सेक्टर 20मध्ये ती रहात होती. पोलिसांनी तिची चाळ शोधून काढली. घराचे दार आतून बंद केलेले होते. पोलिसांनी धक्के मारून दार उघडले. कॉटवर…
भाग – 2 आज शूटिंग नसल्याने वंदना सकाळी निवांत आठ वाजता उठली. गेले पाच दिवस तिला सहाच्या शूटिंगसाठी जावं लागे… तिच्यासारख्या नवीन ॲक्ट्रेसना तर वेळेत हजर रहावंच लागे. कॉफी पिता-पिता तिने आधी आपला एस ए (Struggler Actors) हा व्हॉट्सॲप ग्रुप ओपन करून बघितला. त्यानंतर तिने फेसबुक ओपन केलं आणि ती पोस्ट पाहू लागली. एवढ्यात तिचे लक्ष एका फोटोकडे गेलं, बेडवर पडलेल्या एका तरुणीचा फोटो होता, मुलगी अस्ताव्यस्त पडली होती. वंदनाने निरखून पाहिले आणि ती मनात म्हणाली, “अरे, ही तर प्रणिता नांदे!” तिने लिहिलेला मजकूर वाचून तिला धक्का बसला. प्रणिताने लिहिले होते – “आज माझा या जगातील शेवटचा दिवस, मी पुरती…
भाग – 1 सकाळी आठ वाजता वंदनाला जाग आली, तिला आज शूटिंगला जायचं नव्हतं, नाहीतर गजर लावून उठायची तिला सवय. गेले पाच दिवस तिला सहाच्या शूटिंगसाठी हजर राहावं लागे… सेटवर सहा वाजता पोहोचायचं तर, तिला पाचची ट्रेन पकडावी लागे. तिचा सीन कधी कधी रात्री आठ वाजता यायचा, कधी यायचा पण नाही, पण तिच्यासारख्या नवीन ॲक्ट्रेसना हजर रहावंच लागे. दिलेले कपडे घालून दिवसभर तिथे बसायचे, जेवायचे. सोबतच्या कनिष्ठ कलाकारांबरोबर गप्पा झोडायच्या. कंटाळा आला की, एखादी सिगरेट ओढायची… एवढे करून दिवसाला जेमतेम अडीच हजार रुपये हातात यायचे. रात्री उशीर झाला तर टॅक्सी करून यावे लागे, म्हणजे त्याच्यात सहाशे-सातशे रुपयांची फोडणी. रात्रीचे जेवण…
अर्जुन कॅन्टीनमध्ये बसून कॉफी पित होता. एका हातात सिगरेट होती. सिगरेटचा एक झुरका आणि एक घोट कॉफी सुरू होतं. इतक्यात अलका समोर येऊन बसली. “काय कसला विचार चाल्लाय?” “दोन दिवस बंक मारायचा…” “कुठे? ट्रेकिंग की मॅरेथॉन?” “ट्रेकिंग नाही आणि मॅरेथॉन नाही, वारीला जावं म्हणतोय?” “वारीला? आणि तू?” “का?” “अरे पक्का नास्तिक तू! कुठल्या देवळात कधी जात नाहीस…” “मग तुला काय वाटलं मी आस्तिक झालोय? मी बदललो नाही…” “मग?” “हे बघ, आपला विश्वास असो वा नसो, पण लाखो वारकरी वारीत येतात ना! मनोभावे विठ्ठलचा जयघोष करतात… पंढरपूरच्या दिशेने पायी जातात. बरोबर त्यांचा छोटा संसार असतो. तुळस असते… कुत्रा असतो… हे वारकरी…
उत्तरार्ध शहरातल्या दहा मजली हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावर वर्दे आजोबा ॲडमिट होते. त्यांना कुणीच भेटायला येत नव्हते, म्हणून हॉस्पिटलमधील स्टाफला आश्चर्यच वाटत होते. रसिका नर्सला त्या 80 वर्षांच्या वर्दे आजोबांबद्दल आत्मीयता होती आणि कुतूहलही. रसिकाने एकदा त्यांच्या बेडखालील छोटी बँग उघडली. त्या बॅगेत आजोबांचे दोन-तीन कपडे आणि काही वर्तमानपत्रांतील कात्रणे होती. एका कात्रणात वर्दे आजोबांच्या सत्काराचा फोटो होता. तिने चटकन मोबाइल काढला आणि त्याचा फोटो घेतला आणि वर्दे आजोबांचाही. नंतर हे दोन्ही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी पोस्ट पाहिली होती आणि अनेकांनी मेसेज टाकले होते. वर्दे आजोबा हे पेशाने शिक्षक होते. दुसऱ्या दिवशी त्यांचे माजी…
पूर्वार्ध त्या दहा मजली हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावर नेहेमीप्रमाणे गडबड सुरू होती. पेशन्ट ॲडमिट होत होते, काही बरे होऊन बाहेर पडत होते. काही हे जग सोडून जात होते. नर्सेस, वॉर्डबॉईज इकडून तिकडे धावत होते. डॉक्टर्स या पेशन्टकडून त्या पेशन्टकडे जात होते… रसिका नर्स प्रत्येक पेशन्टचे ब्लडप्रेशर घेत होती, नाडी चेक करत होती, ऑक्सिजन लेव्हल पहात होती. एकएक पेशन्ट करत करत ती त्या आजोबांच्या जवळ आली… “काय वर्दे आजोबा? कसं वाटतंय?” आजोबानी हात वर केला आणि जणू ‘मी बरा आहे,’ असे सांगितले. “भूक लागली काय? मोसंबी ज्युस आणू का?” वर्दे आजोबानी मान हलवली. तशी रसिका पटकन बाहेर गेली आणि कॅन्टीनमधून ज्युस घेऊन…

