Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 14, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 14 मे 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 24 वैशाख शके 1948; तिथि :  द्वादशी 11:20; नक्षत्र : रेवती 22:33;
    • योग : प्रीति 17:53; करण : गरज 22:00;
    • सूर्य : मेष; चंद्र : मीन 22:33; सूर्योदय : 06:05; सूर्यास्त : 19:04;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    प्रदोष

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे)

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    प्रसिद्ध भारतीय चित्रपटनिर्माते–दिग्दर्शक मृणाल सेन

    टीम अवांतर

    प्रसिद्ध भारतीय सिनेनिर्माते–दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म 14 मे 1923 रोजी आताच्या बांगलादेशात असलेल्या फरिदपूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव माणिकबाबू पण ‘मृणालदा’ या नावानेच ते चित्रपटसृष्टीत ओळखले जायचे. कॉलेजमध्ये असताना ‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) या संघटनेशी ते संलग्न होते. याचदरम्यान, चित्रपटाच्या सौंदर्यशास्त्रावरील ब्लादिमीर नेल्सन यांचे सिनेमा ॲज ग्राफिक्स आर्ट हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. तेव्हापासून त्यांची चित्रपटविषयक आस्था आणि रुची वाढीस लागली. सुरुवातीला काही काळ पत्रकारिता तसेच वैद्यकीय प्रतिनिधीची नोकरी केल्यानंतर कलकत्त्यामधील एका चित्रपटस्टुडिओत ध्वनितंत्रज्ञ म्हणून त्यांनी काम केले. इथूनच त्यांच्या सिनेकारकीर्दीस सुरुवात झाली.

    1955 साली ‘रात भोरे’ (द डॉन ) हा पहिला बंगाली चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला; मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतरच्या ‘नील आकाशेर नीचे’ या चित्रपटामुळे ते सर्वसामान्य रसिकांना परिचित झाले तर, त्यांचा ‘बैशे श्राबोन’ हा चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखवला गेल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. पुढील काळात पुनश्‍च, प्रतिनिधी, आकाशकुसुम आणि माटीर मानिष हे चित्रपट त्यांनी केले. त्यानंतर शासकीय अनुदानातून कमी खर्चात बनविलेल्या भुवन शोम या हिंदी चित्रपटाने त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर मानाचे स्थान मिळवून दिले.

    हेही वाचा – …अन् मैतर पांडूच्या संसाराची घडी बसली!

    मृणाल सेन यांचे नेटके कलात्मक दिग्दर्शन, उत्पल दत्त आणि सुहासिनी मुळ्ये यांचा उत्कृष्ट अभिनय, हलकाफुलका निरागस विनोद, अर्थगर्भ संहिता, अमिताभ बच्चन यांनी सूत्रधार म्हणून दिलेला उसना आवाज अशा अनेक गुणवैशिष्ट्यांमुळे हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीत युगप्रवर्तक ठरला. याच चित्रपटापासून भारतातील वास्तवदर्शी चित्रपट चळवळीला चालना मिळाली, तसेच सेन यांच्या कारकीर्दीला नवे वळण लाभले.

    सेन यांनी चित्रपटमाध्यमाचा वापर कुशलतेने आणि समर्थपणे केला. केवळ एकाच पठडीतील साचेबद्ध चित्रपट न बनविता त्यांनी सातत्याने नवनवीन प्रयोग केले. त्यांच्या चित्रपटांचे शेवट हे प्रेक्षकांना अंतर्मुख व्हावयास भाग पाडणारे, अगदी अनपेक्षित आणि वेगळे असत. 1979 नंतर त्यांच्या चित्रपटाचा रोख बदलला. चित्रपटातील सामाजिक वास्तवाच्या चित्रणाऐवजी मानवी अंतर्मनाच्या चित्रणाकडे ते वळले. त्यांनी बंगालीशिवाय अन्य भाषांतही चित्रपट निर्माण केले. आपल्या एकूण कारकीर्दीत त्यांनी सुमारे 28 चित्रपट, 14 लघुपट आणि 5 अनुबोधपट निर्माण केले.

    कान्स, बर्लिन, व्हेनिस, मॉस्को, कार्लोव्ही व्हेरी, माँट्रिऑल, शिकागो, कैरो यासारख्या चित्रपटमहोत्सवांतून मृणाल सेन यांचे चित्रपट गौरविण्यात आले.  तसेच भारत सरकारतर्फे पद्मभूषण, भारतीय चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार हे त्यांना लाभलेले अन्य पुरस्कार होत. फ्रान्स सरकारने त्यांना कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले. रशियन सरकारनेही ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप या किताबाने त्यांना सन्मानित केले. 30 डिसेंबर 2018 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आनंदाची एखादी बातमी तुमचा दिवस खास बनवू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना हवी असलेली बातमी मिळू शकते, तर अविवाहित जातक एखाद्या खास व्यक्तीला भेटतील आणि लग्नाची बोलणी पुढे सुरू होतील. कुटुंब आणि नातेवाईक प्रत्येक पावलावर तुम्हाला साथ देतील. अनावश्यक वादांपासून दूर राहिल्याने मनःशांती लाभेल. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

    वृषभ – एखाद्या गोष्टीमुळे तुमचे मन थोडे अस्वस्थ होऊ शकते. मेहनतीमुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. कोणाशीही आर्थिक बाबींवर चर्चा करणे टाळा. शेअर बाजारात सावधगिरीने पावले उचलणे फायदेशीर ठरेल. एखादा जवळचा मित्र अनपेक्षितपणे भेटायला येऊ शकतो, ज्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कुटुंबाशी सुसंवाद ठेवा, त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागून आनंदी वातावरण राहील.

    मिथुन – जुन्या मित्राला भेटल्याने तुम्ही काहीसे भावनिक आणि आनंदी असाल. तुमच्या मेहनतीला हळूहळू फळ मिळू लागेल. संततीच्या आनंदासाठी नवीन खरेदी शक्य आहे. तथापि, वाढत्या खर्चामुळे थोडीशी चिंता वाटू शकते, परंतु सावधगिरी बाळगल्यास सर्व काही नियंत्रणात राहील. अनोळखी व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. तब्येतेची काळजी घ्या, जंक फूड खाण्याचे टाळावे.

    कर्क – प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या. मालमत्ता किंवा कर्जासंबंधीच्या बाबींमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. शासकीय कामांमध्ये होणाऱ्या थोड्या विलंबामुळे निराशा येऊ शकते, पण संयम ठेवा. जुनी कर्जे फेडण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. राग आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. कौटुंबिक समस्या प्रेम आणि सामंजस्याने सोडवाव्या लागतील.

    सिंह – आर्थिक बाबतीत नशीब तुमच्या बाजूने असेल. प्रतिस्पर्ध्यांचे डावपेच उधळून लावण्यासाठी हुशारीने वागावे लागेल. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक भागीदारासोबत नवीन योजनांवर चर्चा करणे फायदेशीर ठरू शकते. गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात, पण घाई करू नका. याबाबत जाणकारांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

    कन्या – मोठी स्वप्ने सत्यात उतरवण्याची सुरुवात होऊ शकते. गरजू व्यक्तीला मदत केल्याने आंतरिक आनंद मिळेल. सध्या प्रवासाच्या योजना पुढे ढकलणे उत्तम राहील. पालकांचा सल्ला तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकतो. संततीच्या भविष्यासंबंधीचा निर्णय कुटुंबीयांशी सल्लामसलत केल्यानंतरच घेणे, इष्ट ठरेल. सकारात्मक विचार आज चमत्कार घडवू शकतो.

    तुळ – सतर्कता ही तुमची सर्वात मोठी ताकद असेल. विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु तुम्ही शहाणपणाने प्रत्येक परिस्थिती हाताळाल. तुमची एक मोठी इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याची नवीन संधी मिळू शकते. सामाजिक स्तरावर मिळणाऱ्या सन्मानामुळे आत्मविश्वास आणखी वाढेल.

    वृश्चिक – कुटुंबाकडे आणि स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जोडीदारासोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, परंतु प्रेमळ संभाषणामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. व्यवसायासाठी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात मोठ्या ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खर्च नियंत्रणात ठेवणे योग्य ठरेल.

    हेही वाचा – गोट्या… अप्पांची सावली!

    धनु – समाजात तुमचा प्रभाव आणि आदर दोन्ही वाढतील. घरातील एखादी शुभ घटना आनंदी वातावरण निर्माण करेल. शासकीय कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेऊन नवीन जबाबदारी सोपविली जाऊ शकते. दूर राहणाऱ्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीने भावूक होऊ शकता. संततीच्या करिअरसंबंधीचा एक निर्णय भविष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतो.

    मकर – गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यनिष्ठेमुळे वरिष्ठ खूश होतील. समाजसेवा किंवा धर्मादाय कार्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करू शकते, त्यामुळे सावध रहा. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.

    कुंभ – करिअरच्या दृष्टीने नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याची कल्पना फायदेशीर ठरू शकते. नातेवाईकांशी किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, परंतु वडीलधाऱ्यांचा पाठिंबा तुम्हाला त्यातून मार्ग काढण्यास मदत करेल. मित्रमैत्रिणींमुळे व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्नही साकार होऊ शकते.

    मीन – साशंकतेमुळे तुम्ही थोडे गोंधळून जाऊ शकता आणि एखादा महत्त्वाचा सौदा शेवटच्या क्षणी अडकू शकतो, त्यामुळे संयम ठेवा. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमचा तणाव वाढवू शकतात, मात्र वरिष्ठांकडून पाठबळ मिळेल. नोकरीच्या नवीन संधी तुमच्या आयुष्यात नवी आशा घेऊन येऊ शकते. जोडीदारासोबत वाद घालणे टाळा. स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 22 ऑगस्ट 2026

    August 22, 2026 पंचांग आणि भविष्य

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 23, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 ऑगस्ट 2026; वार : रविवार भारतीय सौर : 01…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 22 ऑगस्ट 2026

    August 22, 2026

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 21 ऑगस्ट 2026

    August 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026

    विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक समस्या

    August 22, 2026

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्माचा वेळु चुके, कां नित्य नैमित्तिक ठाके

    August 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 545
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 867
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.