मागील दोन लेखांमधून आपण आम्लपित्तासाठी योगाभ्यास तसेच आहार मार्गदर्शन घेतले. आता या लेखात आपण वातविकार या विषयावर मार्गदर्शन घेऊयात.
वातविकाराविषयी थोडक्यात…
आयुर्वेदानुसार शरीरातील वात दोष असंतुलित झाल्यास निर्माण होणाऱ्या शारीरिक तथा मानसिक विकारांना वातविकार म्हणतात. वात म्हणजे वायू… शरीरातील श्वास, पचन, रक्तप्रवाह, मज्जासंस्था आदी हालचालींना नियंत्रित करतो. मात्र, याचे असंतुलन वातविकारास कारणीभूत ठरते आणि शरीरातील विविध अवयवांमध्ये वेदना जाणवतात.
वाताचे असंतुलन झाल्यास पुढील लक्षणे दिसून येतात –
संधीवात, सांधेदुखी, आमवात, कंबरदुखी, गुडघेदुखी, कंपवात इत्यादी. याशिवाय बद्धकोष्ठता, पोटात गॅस, हातपाय सुन्न पडणे, चिंता, भीती, निद्रानाश ही देखील वातविकाराची मुख्य लक्षणे आहेत.
आहाराच्या अनियमित आणि अयोग्य सवयी, अनियमित झोप तसेच विसंगत जीवनशैली ही वातविकाराची मुख्य कारणे आहेत.
आता आपण वातविकार नियंत्रणासाठी योगाभ्यास मार्गदर्शन घेणार आहोत.
हेही वाचा – कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
योगासने अभ्यास
शयनस्थितीतील आसने
- उत्तानपादासन
- पवनमुक्तासन
- मर्कटासन
- सर्वांगासन
- मत्स्यासन
- शवासन
विपरीत शयनस्थितीतील आसने
- शलभासन
- धनुरासन
- मकरासन
बैठक स्थितीतील आसने
- उष्ट्रासन
- पद्मासन
- वज्रासन
- अर्धमत्स्येंद्रासन
- पश्र्चिमोत्तानासन
- शवासन
योगाभ्यास करताना शवासन आणि मकरासन ही विश्रांतीदायक आसने अवश्य घ्यावीत.
हेही वाचा – अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
प्राणायाम अभ्यास
- कपालभाती
- अनुलोम-विलोम प्राणायाम
- भस्त्रिका प्राणायाम
हस्त मुद्रा
- वायू मुद्रा
- अपानवायू मुद्रा
अशा रितीने आपण वातविकार निवारणार्थ योगाभ्यासातील उपयुक्त योगासने, प्राणायाम आणि हस्त मुद्रा याविषयी जाणून घेतले. माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ या पुस्तकात वरील सर्व अभ्यासाची कृती आणि आरोग्य लाभ याबाबत सविस्तररीत्या मार्गदर्शन केले आहे.
वातविकार निवारणासाठी नियमित योगाभ्यास नक्कीच उपयुक्त आहे. पुढील लेखात आपण वातविकार निवारणार्थ आहार – काय खावे? आणि घरगुती उपाय याबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत.
या संदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत संबंधित विषयांवर उपयुक्त सर्वसमावेशक सविस्तर मार्गदर्शनपर वस्तुपाठ सादर केले असून त्यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे निरामय आरोग्याचा परिपाक होय.
क्रमश:
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


