Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शिव आणि आरूच्या लग्नात दिनकररावांनी हुंडा म्हणून…

    June 14, 2026

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    कृष्ण-सुदामाच्या प्रेमाची पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, June 14
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”
    फूड काॅर्नर

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    Team AvaantarBy Team AvaantarJune 14, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, शिळ्या पोळ्यांचा वापर, लज्जतदार शिळ्या पोळ्या, सेयाल फुलका, शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा, मॅगीला पर्याय सेयाल फुलका, शिळ्या पोळ्यांचा सेयाल फुलका
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    तृप्ती देव

    शिळ्या पोळ्या असतील तर, त्यांचं नशीब प्रत्येक घरात वेगवेगळं असतं. कुठे कुटके होतात, कुठे गूळ-तूप घालून लाडू, कुठे फोडणीची पोळी, कुठे चिवडा, तर कुठे भाजीचा रोल! पण काही लोक शिळ्या पोळ्यांनाही अशी दुसरी इनिंग देतात की, त्या पोळ्या स्वतःच म्हणतील, “काल आम्ही साध्या होतो, आज आम्ही इंटरनॅशनल झालो!”

    असाच एक सिंधी पदार्थ आहे — सेयाल फुलका.

    रात्रीच्या उरलेल्या पोळ्या घ्यायच्या. साधारण तीन-तीन पोळ्यांचा एक गठ्ठा करायचा आणि त्यांची घट्ट गुंडाळी करायची. मग त्या रोलचे उभे बारीक काप करायचे. कापल्यावर त्या अगदी छोट्या चकत्यांसारख्या दिसतात. पहिल्यांदा पाहिलं की वाटतं, “अरे, पोळ्यांचं हा नवीन अवतार कधी झाला?”

    आता कढईत तेल गरम करायचं. त्यात मोहरी, हिंग, हिरव्या मिरच्या आणि कढिलिंबाची पानं टाकायची. फोडणीचा सुगंध आला की, कांदा आणि टोमॅटो घालून छान परतायचे. मग त्यात मीठ, तिखट, हळद, थोडासा मॅगी मसाला आणि चिमूटभर कसुरी मेथी… हा मसाला परतताना घरात असा सुगंध दरवळतो की, घरचे लोक स्वयंपाकघरात डोकावून विचारतात, “आज काय स्पेशल आहे?” आणि आपण मनात म्हणत असतो, “स्पेशल काही नाही रे, कालच्या पोळ्यांची पदोन्नती चालू आहे!” त्यात आणखीन एक तुम्ही ॲड करू शकता – बारीक चिरलेल्या भाज्या टाकू शकता.

    हेही वाचा – मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!

    मसाला तेल सोडू लागला की, त्यात पोळ्यांच्या प्रमाणात पाणी घालायचं. पाण्याला छान उकळी आली की, कापलेल्या पोळ्या त्यात सोडायच्या. हलक्या हाताने ढवळायचं आणि दोन-तीन मिनिटं शिजू द्यायचं.

    इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. पोळ्या पूर्ण गच्च शिजवायच्या नाहीत. त्या पाण्यात थोड्या मऊ झाल्या, मसाल्याचा रंग आणि चव त्यांच्यात उतरली की, लगेच गॅस बंद करायचा. कारण जास्त शिजवल्या तर, त्या सेयाल फुलक्याऐवजी “पोळीची खिचडी” बनण्याची शक्यता असते!

    गॅस बंद केल्यावर वरून भरपूर कोथिंबीर भुरभुरायची आणि गरमागरम खायला द्यायचं. मॅगीला एक छान पर्याय आहे.

    हेही वाचा – आठवडी बाजारातील भातकं!

    खरंच, आपल्या आजी-आईंना ‘रिसायकलिंग’ हा शब्द कदाचित माहिती नव्हता, पण उरलेल्या पोळ्यांचं सोनं कसं करायचं, हे त्यांना नक्की माहिती होतं. सिंधी लोकांनी तर शिळ्या पोळीला इतका मान दिला आहे की, तिच्यापासून थेट एक स्वतंत्र पदार्थच तयार केला. म्हणून पुढच्या वेळी शिळ्या पोळ्या दिसल्या तर त्यांना लगेच दोष देऊ नका. त्या कदाचित शांतपणे म्हणत असतील..

    “आम्हाला फक्त एक संधी द्या… आम्ही सेयाल फुलका बनून परत येऊ!”

    पासपोर्ट नाही, व्हिसा नाही, विमानाचं तिकीट नाही… पण कधी पंजाब, कधी चेन्नई, कधी हैदराबाद, कधी इटली तर कधी थायलंडला फेरी मारून येते. फरक एवढाच की, प्रवास गॅससमोर उभं राहून होतो!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कृष्ण-सुदामाच्या प्रेमाची पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल लबाड वांगी किंवा फसवी वांगी!

    June 12, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : हे ठरू शकते बोर्नव्हिटाला पर्यायी पेय… स्वस्त आणि मस्त!

    June 9, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कृष्ण-सुदामाच्या प्रेमाची पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    By माधवी जोशी माहुलकरJune 14, 2026

    पोह्यांचा इतिहास पाहिला, तर हा पदार्थ महत्त्वाचा आणि पवित्र ठरवण्यामागे थेट द्वापारयुगातील ‘कृष्ण-सुदामा’ भेटीचा फार…

    Recipe : विदर्भ स्पेशल लबाड वांगी किंवा फसवी वांगी!

    June 12, 2026

    Kitchen Tips : हे ठरू शकते बोर्नव्हिटाला पर्यायी पेय… स्वस्त आणि मस्त!

    June 9, 2026

    Recipe : कढीगोळे… विदर्भातील एक आवडता पदार्थ!

    June 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शिव आणि आरूच्या लग्नात दिनकररावांनी हुंडा म्हणून…

    June 14, 2026

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    कृष्ण-सुदामाच्या प्रेमाची पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 14 ते 20 जून 2026

    June 14, 2026

    Dnyaneshwari : जे मन बुद्धि इहीं घर केलें माझां ठायीं

    June 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 14 जून2026

    June 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 328
    • अवांतर 190
    • आरोग्य 120
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 454
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 223
    • मैत्रीण 20
    • ललित 703
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शिव आणि आरूच्या लग्नात दिनकररावांनी हुंडा म्हणून…

    June 14, 2026

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    कृष्ण-सुदामाच्या प्रेमाची पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.