Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    August 20, 2026

    कानडा राजा

    August 20, 2026

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, August 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » नोकरी करणाऱ्या मातेची बाळासाठी तगमग
    ललित

    नोकरी करणाऱ्या मातेची बाळासाठी तगमग

    हेमा पाटीलBy हेमा पाटीलJuly 2, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, बाळाचं बारसं, बारशाच्या चालीरीती, बाळाचं नाव अनंत, हे बंध रेशमाचे, बाळाच्या आईची नोकरी, बाळाचे संगोपन सासूकडे, बाळाचे संगोपन नणंदेकडे, बाळाच्या संगोपनाचा प्रश्न, नोकरीवर जाणारी माता, बारशाच्या पंगती, मातेला बाळाच्या संगोपनाची चिंता
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 2

    बारशासाठी सगळ्या कदम भावकीला आमंत्रण होते. भावकीतल्या आलेल्या बायकांच्या ताटात एकेक पेढा आणि घुगऱ्या घालायचे चालले होते. अजून उमाची ओटी भरणे सुरू होते. नातू झाला म्हणून पारूबाई खूपच आनंदात होती. आपल्या एकुलत्या एका लेकाला मुलगा झाला, घराण्याचा वंशवेल वाढला; त्यामुळे तिने अगदी जोरदार बारसे केले होते. लाडूचे गावजेवण घातले होते.

    बारशाला येणाऱ्या बायका बाळासाठी झबलं, टोपडं आणि तिच्यासाठी ओटी आणत होत्या. पाव्हण्या बायका एखादा डाग आणत होत्या. पारू बाईची नजर बहिरी ससाण्यासारखी तीव्र होती. दूर असूनही सुनेच्या ओटीत कुणी काय घातले, याकडे तिचे बरोबर लक्ष होते.

    पुरूष माणसांची बाहेरच्या मांडवात पंगत बसली होती. पुरुषांच्या दोन पंक्ती उठल्याशिवाय बायकांची पंगत बसणार नव्हती. त्यामुळे आत बायकांचा कलकलाट सुरू होता. कामाशिवाय मोकळ्या असणाऱ्या बाया तोंड बंद थोड्याच ठेवतात? काम चालू असले तरी तोंडाने बडबड चालूच असते म्हणा. आतला बायकांच्या  दंग्याचा आवाज ऐकून पुरुषांना जेवायचे थांबवले आणि बायकांची पंगत बसवली.

    एवढा वेळ हाकेची वाट पाहणाऱ्या बायका, “बायांनो या जेवाय” अशी हाक आली की, रंगात आलेल्या गप्पा सोडून बाहेर मांडवात जाण्याची घाई करू लागल्या. रंगात आलेला प्रसंग सोडून निघालेल्या रखमेला रंजी म्हणाली,

    “व्हय गं रखमे, फुडं काय झालं त्येवडं सांग की.” पण आता ते सांगण्यापेक्षा रखमीला पंगतीत जागा मिळवायची होती, त्यामुळे ती ते ऐकून न ऐकल्यासारखे करून बाहेर पडली. त्यात शाळेतील शिक्षिकाही मागे नव्हत्या. गावच्या बायकांसारखी रेटारेटी करणे मात्र शिक्षिकांना जमत नव्हते; किंवा ते आपल्या पदाला शोभणारे नाही, म्हणून त्या करत नव्हत्या, इतकेच. नाही तर, त्यांनाही जेवायची घाई होती. एवढा वेळ एकमेकींशी मनसोक्तपणे गप्पा मारणाऱ्या बायकांना गप्पा अर्धवट सोडून जेवायला जायची घाई झाली होती. याचे कारण घरी लवकर जाता येईल हे होते!

    हेही वाचा – बारशामध्ये आत्याला मान आणि आई?

    शिक्षिकांची काही या पंगतीत वर्णी लागली नाही. चेहरा पाडून त्या उंबरठा ओलांडून परत आत आल्या आणि नाईलाजाने उमाजवळ बसल्या. उमाला मघापासून जो प्रश्न पडला होता तो तिने विचारला,

    “तुम्हाला कुणी आमंत्रण दिलं?”

    “कदम बाई, तुम्ही विसरला पण महेश गुरूजींनी आम्हाला आठवणीने बारशाला बोलावले.” देशमुख बाई ठसक्यात बोलल्या.

    यावर उमा म्हणाली,

    “मी सासुरवाशीण, मी कशी कुणाला मनानं आमंत्रण देणार?” हे ऐकून त्या पुढे काहीच बोलल्या नाहीत.

    “बाळ सव्वा महिन्याचं झालं. अजून किती दिवस सुट्टीवर आहे?”

    “बाळ तीन महिन्यांचे होईपर्यंत,” उमाने उत्तर दिले.

    “मग कसं करणार? बाळाकडे कोण बघणार?”

    “आहेत की सासूबाई आणि ताईसाहेब. मधल्या दोन सुट्ट्यांमध्ये बाळाला पाजण्यासाठी येत जाईन घरी…” उमा म्हणाली.

    हेही वाचा – गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

    “हो, नोकरी सोडू नका कदम बाई. पोरं काय होतील मोठी घरातल्या माणसांसोबत. नोकरी परत मिळायचे अवघड. त्यात तुम्ही नोकरीला लागल्यापासून गावातच आहात.”

    उमाने मान डोलावली.

    होईल थोडी ससेहोलपट, पण नोकरी सोडायची नाही, असे तिने मनाशी ठरवले. त्याचवेळी तिचे लक्ष बाळाकडे गेले. ते जोरजोरात मुठी चोखत होते. आणखी दीड महिन्याने या बाळाला घरात ठेवून आपल्याला नोकरीवर रूजू व्हावे लागेल. कसे राहील बाळ आपल्या वाचून? असे वाटून तिने त्या बाळाला छातीशी घट्ट कवटाळले.

    क्रमशः
    Avatar photo
    हेमा पाटील

    मी 58 वर्ष वयाची गृहिणी असून, मु. पो. चाफळ, ता. पाटण, जिल्हा सातारा येथे राहते. गेल्या 8 वर्षांपासून सतत लिहिते आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लिखाण करते. काही काल्पनिक गोष्टी, कथा तसेच लघुकथा लिहिण्यास आवडतात. लिखाण हा छंद असला तरी माझ्यासाठी ते मन मोकळं करण्याचे साधन आहे. माझं लिखाण वाचकांना आवडतं हे लक्षात आल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि ‘स्वामित्व’ हे माझ्या कथांचं पहिलं पुस्तक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित केलं. त्यानंतर चार महिन्यांत म्हणजे 12 एप्रिल 2026 रोजी ‘गुज अंतरीचे’ हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. हा कथासंग्रह वेलवेट कविशा पब्लिकेशन संस्थेच्या माध्यमातून झालेल्या वर्ल्ड रेकॉर्डचा एक भाग आहे. एका मंचावर विविध साहित्यिकांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्याची नोंद घेतली.

    Related Posts

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    August 20, 2026 ललित

    अशीही एक भाऊबीज… पूर्वार्ध

    August 19, 2026 ललित

    धनवापसी… मोडक आजोबांची प्रतीक्षा

    August 19, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    By हेमा पाटीलAugust 20, 2026

    भाग – 9 मोगऱ्याच्या वेलापाशी विचारात गढलेली उमा आपल्या पोटात काय असेल, मुलगा की मुलगी?…

    अशीही एक भाऊबीज… पूर्वार्ध

    August 19, 2026

    धनवापसी… मोडक आजोबांची प्रतीक्षा

    August 19, 2026

    मनावरचा घाव

    August 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    August 20, 2026

    कानडा राजा

    August 20, 2026

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गर्वें पर्वताचीं शिखरें,  तैसा महत्त्वावरूनि नुतरे 

    August 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 20 ऑगस्ट 2026

    August 20, 2026

    अशीही एक भाऊबीज… पूर्वार्ध

    August 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 402
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 541
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 250
    • मैत्रीण 24
    • ललित 862
    • शैक्षणिक 85
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    August 20, 2026

    कानडा राजा

    August 20, 2026

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.