Author: डॉ. शैलेंद्र वैशंपायन

Avatar photo

डॉ. (प्रा.) शैलेंद्र आर. वैशंपायन, आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘डॉ. व्ही.’ या नावाने परिचित आहेत. त्यांना 26 वर्षांचा चिकित्सकीय आणि 25 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. ते होमिओपॅथीवरील चार पुस्तकांचे आणि चार शोधनिबंधांचे लेखक असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित होमिओपॅथिक नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक व्याख्याने दिली असून ‘Dr V’s World of Homoeopathy’ हा त्यांचा पॉडकास्टही आहे. थायरॉईड विकार, चिकित्सकीय संशोधन आणि हॅनिमॅनियन होमिओपॅथी ही त्यांच्या विशेष अभ्यासाची क्षेत्रे आहेत.

संपूर्ण जगाच्या पाठीवर भारतासारखी संस्कृती शोधूनही सापडणे कठीण. या संस्कृतीचे एक विलक्षण वैशिष्ट्य आहे — तिने बाहेरून आलेल्या गोष्टी केवळ स्वीकारल्या नाहीत, तर त्या इतक्या आत्मसात केल्या की, कालांतराने त्या मूळच्या भारतीयच असाव्यात, असे आपल्यालाच वाटू लागले. आपल्या रोजच्या संगीतातली पेटी असो, तबला असो किंवा आपल्या जेवणातील अनेक पदार्थ असोत — आज आपण ज्यांना अगदी सहजपणे ‘आपले’ म्हणतो, त्यापैकी अनेक गोष्टींची पाळेमुळे भारताबाहेर सापडतात. पण त्या आपल्या जीवनात इतक्या खोलवर रुजल्या आहेत की, सण-समारंभांपासून दैनंदिन आयुष्यापर्यंत त्यांच्याशिवाय आपले पान हलत नाही. बाहेरून आलेली गोष्ट कुठून आली, यापेक्षा तिच्यातले चांगले काय आहे हे पाहणे, तिला स्वीकारणे, आपल्या गरजेनुसार तिच्यात बदल करणे…

Read More