Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पोट सहनशील, पण…
    आरोग्य

    पोट सहनशील, पण…

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरAugust 5, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, डॉ प्रज्ञावंत देवळेकर, डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर, लेखक प्रज्ञावंत देवळेकर, शिळ्या अन्नाचे सेवन, फ्रीजमधील अन्न धोकादायक, शिळं अन्न अपायकारक, शिळ्या अन्नाने पोटांचे विकार, शिळ्या अन्नाने तब्येतील धोका,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    एक 45च्या आसपासची टिपिकल भारतीय गृहिणी ओपीडीत आली होती. चेहरा उतरलेला, डोळ्यांखाली काळी वर्तुळं, केसांची घनता कमी झालेली, खांदे झुकलेले, त्वचा निस्तेज आणि हातात नेहमीची फाईल…

    बिचारीची तक्रारही तिच्यासारखी साधीच होती, ”डॉक्टर, पोट काही केल्या नीट होत नाही. सारखं जुलाब, पोटात मुरडा, कधी उलटी, कधी अॅसिडिटी, कधी गॅसेस तर कधी नुसताच गच्चपणा…”

    नेहमीप्रमाणं कारणमीमांसा सुरू झाली – औषधं, पाणी, ताणतणाव, इतर आजारांचा इतिहास… पण सगळं ठीक! मग सहज विचारलं, ”जेवणाचं काय? तुम्हीच बनवता?”

    उत्तर आलं, अगदी अभिमानानं… “हो डॉक्टर, मीच बनवते.”

    हेही वाचा – त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    “…आणि काहीच वाया घालवत नाही?” – मी.

    “हो. अन्न वाया कसं घालवायचं? फ्रीजमध्ये ठेवते… खाल्ल्याशिवाय समाधानच नाही…”

    इथंच केसचा खरा खलनायक समोर आला. किंबहुना, शाकाहारी, मांसाहारी, मिश्रहारी प्राण्यांच्या यादीसोबत अजून एक श्रेणी जोडायला हवी, ती म्हणजे उष्टाहारी प्राणी आणि तो म्हणजे भारतीय मध्यमवर्गीय गृहिणी!

    त्यांना जे सांगितलं तेच तुम्हालाही सांगतो…

    शिळं म्हणजे फक्त थंड झालेलं नव्हे! बर्‍याच जणांचा गैरसमज असतो की, अन्न शिळं झालं म्हणजे फक्त चव बदलते; पण वैद्यकशास्त्र सांगतं, शिळं अन्न म्हणजे जंतूंसाठी खुलं आमंत्रण!!

    शिजवलेलं अन्न थंड होताच, त्यात बॅक्टेरिया,फंगस वाढायला सुरुवात होते. विशेषतः, भात, मटकी, रस्साभाजी, दही आणि मांसाहार हे पदार्थ शिळे राहिले की, त्यात साल्मोनेला, इ. कोलाय (Escherichia coli), स्टॅफिलोकोकस यासारखे जंतू मौज करायला लागतात.

    ‘उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे सुरक्षित होतं!’ हा अजून एक मोठा गैरसमज. फ्रीज जंतूंची वाढ फक्त मंद करतो, पण पूर्ण थांबवत नाही. शिवाय, अन्न वारंवार फ्रीजमधून बाहेर काढणं… पुन्हा गरम करणं… अर्धवट गरम अन्न… हे सगळं मिळून पोटासाठी एक टाइम-बॉम्ब तयार करतात.

    या गृहिणीच्या पोटात नक्की काय चाललंय, ते तपासणीअंती कळेलच जसं गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आतड्यांची सूज, पचनसंस्थेची बिघडलेली नैसर्गिक जंतूसंरचना अर्थात गट फ्लोरा…

    हेही वाचा – स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    थोडक्यात, दररोज थोडं-थोडं विष… आणि हळूहळू पोट हार मानतं! शिळं अन्न खाल्ल्याचे संभाव्य दुष्परिणाम म्हणजे सतत जुलाब, पोटदुखी आणि मुरडा, उलटी, मळमळ, आम्लपित्त, अशक्तपणा आणि दीर्घकाळात कुपोषण…

    शिळं कधी चालेल? तर कधीतरीच! लगेच फ्रीजमध्ये ठेवलेलं, 24 तासांच्या आतलं, नीट गरम केलेलं, ज्याचा वास, चव, रंग बदललेला नाही ते! फ्रीजबाहेर ठेवलेलं दोन-तीन वेळा गरम केलेलं, आंबट वास येणारं, रंग बदललेलं, फसफसणारं हे तर सरळ डस्टबिन योग्य!

    हे पेशंट औषधांमुळं बरे होतीलच, पण खरं औषधंय ‘शिळं अन्न टाळणं’!

    मी तर नेहमी म्हणतो पोटासारखा सहनशील अवयव नाही, पण ते एकदा बिघडलं तर काही म्हणजे काहीच उमजू देत नाही!

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026 आरोग्य

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026 आरोग्य

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    By रविंद्र परांजपेAugust 15, 2026

    ‘अवांतर’ या मुक्त व्यासपीठावर ‘आरोग्य’ या सदराखाली आत्तापर्यंत मी एकावन्न लेख लिहिले. आरोग्य सदरातील माझा…

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026

    हर्निया (आंत्रवृद्धी) विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    जेन झी

    August 15, 2026

    भिऊ नकोस, मी आहे!

    August 15, 2026

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 397
    • अवांतर 204
    • आरोग्य 139
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 536
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 853
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.