Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आपल्या आरोग्याचं प्रतिबिंब

    September 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लहरी जैसिया जळीं, परमाणुकणिका स्थळीं

    September 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 सप्टेंबर 2026

    September 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, September 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आपल्या आरोग्याचं प्रतिबिंब
    आरोग्य

    आपल्या आरोग्याचं प्रतिबिंब

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरSeptember 19, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर, आरोग्याचं प्रतिबिंब, कॉर्पोरेट कल्चर, आरोग्य आणि कॉर्पोरेट कल्चर, एसीचे दुष्परिणाम, सिक बिल्डिंग सिंड्रोम, परिसराची स्वच्छता, ऑफिसचे वातावरण,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    एक जोडपं ओपीडीत आलं होतं. तिला ॲसिडिटी आणि डोकेदुखीचा त्रास होता… जुजबी पूर्वइतिहास विचारून, सगळे पॅरामीटर्स चेक करत तिला लक्षणजन्य औषधं दिली… पण दोघांच्या काहीतरी खाणाखुणा सुरू होत्या.

    “काही विचारायचं का?” मीच त्यांना विचारलं, तेव्हा “काही नाही डॉक्टर ही म्हणते तुम्हीही औषध घ्या,पण मला काही झालेलं नाही,” त्यानं हसत सांगितलं.

    “झालं नाही कसं? परवा कार्डिओलॅाजिस्टकडं जाऊन आले. ईसीजी केला होता… काल डायलमध्ये मी न्युरोचा नंबर बघितला…” तिनं तक्रार नोंदवली.

    “ठीक आहे, औषधं नका घेऊ… अगदी WHOत जाऊन दाखवा, पण एकदा सांगा तरी काय तक्रार आहे?” मी त्याला थोडं कम्फर्टेबल केलं.

    “काही नाही ओ डॅाक्टर, डोळे आणि नाक चुरचुरायचे म्हणून एका डॉक्टरांकडून औषधं घेतली, बरं वाटलं; पण थकवा-घबराट व्हायला लागली म्हणून ईसीजी काढला. काल-परवापासून थोडं डोकं जड वाटत होतं म्हणून सेफरसाईड न्युरोला दाखवावं म्हटलं…” त्यानं स्पष्टिकरण दिलं.

    हेही वाचा – विषाची परीक्षा…

    त्याचं वय 35. एका मोठ्या बिल्डरकडं चीफ अकाऊंटंट. काम उत्तम. ऑफिस आधुनिक… एसी, काचेच्या भिंती, शांत वातावरण… पण गेल्या काही महिन्यांपासून काही विचित्र तक्रारी सुरू झाल्या. सकाळी ऑफिसमध्ये गेल्यावर थोड्याच वेळात डोकं जड होणं, डोळे चुरचुरणं, नाक बंद होणं आणि सगळ्यात जास्त म्हणजे एक अजब थकवा!

    घरी परतल्यावर मात्र बरं वाटायचं. सुरुवातीला कामाचा ताण असेल, झोप कमी झाली असेल म्हणून दुर्लक्ष केलं. पण तक्रारी वाढतच गेल्या. शेवटी डॉक्टरांकडं जाऊन लक्षणजन्य औषधंही घेतली, पण ऑन-ऑफ तक्रारी सुरूच आहेत…

    सगळ्या तक्रारी ऑफिसमध्येच वाढत होत्या आणि बाहेर पडल्यावर कमी होत होत्या. इसका मतलब समझे दया?

    यह तो “सिक बिल्डिंग सिंड्रोम” हैं!

    एक काळ असा होता की ‘इन-डोअर’ म्हणजे सुरक्षितता, विश्रांती आणि ताजेतवानेपणा याचं प्रतीक होतं… पण आधुनिक काळात विशेषतः 24X7 एसी ऑफिसेस आणि काचांच्या इमारतींमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हेच ठिकाण कधीकधी आजाराचं कारण बनतं. याला वैद्यकीय भाषेत ‘सिक बिल्डिंग सिंड्रोम’ असं म्हणतात.

    त्यांना जे सांगितलं तेच तुम्हालाही सांगतो – हा असा विकार आहे, ज्यात एखाद्या बंद जागेत, जसं की ऑफिस, मॉल किंवा एसी बिल्डिंग इथं सातत्यानं राहिल्यानंतर डोकंदुखी, डोळ्यांची जळजळ आणि कोरडेपणा, घसा खवखवणे, नाक बंद होणे किंवा शिंका, त्वचेचा कोरडेपणा, एकाग्रता कमी होणं, सतत थकवा जाणवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या जागेतून बाहेर पडल्यावर या तक्रारी कमी होतात.

    ‘सिक बिल्डिंग सिंड्रोम’ हा कुठल्या एकाच एका कारणानं होत नाही, तर अनेक गोष्टींचा मिलाफ असतो. जसं बंद एसी सिस्टिम पर्यायानं मोकळी हवा कमी, फिल्टरमध्ये धूळ, बुरशी, बॅक्टेरियांचा निवास… सोबत पर्फ्युम-फ्रेशनर, भिंतींचा रंग, काच साफ करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल, फरशी पुसण्यासाठी वापरले जाणारे केमिकल यांची संमिश्र रासायनिक प्रक्रिया… यामुळं इमारत ‘आजारी’ नसते, पण तिचं वातावरण माणसाला आजारी बनवतं…

    इथं गरज औषधांपेक्षा जास्त असते परिस्थिती बदलण्याची.

    त्यांना काही साधे सल्ले दिले – जसं दर तासाला पाच मिनिटांचा ब्रेक घेऊन बाहेर मोकळ्या हवेत जाऊन येणं, पुरेसं पाणी पिणं आणि ऑफिस प्रशासनाला एसीचे फिल्टर्स साफ करायला सांगणं… काही आठवड्यांतच त्यांच्या तक्रारी कमी होतील.

    हेही वाचा – डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    ‘सिक बिल्डिंग सिंड्रोम’ आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो ती म्हणजे “आपण ज्या वातावरणात राहतो, तेच आपल्या आरोग्याचं प्रतिबिंब असतं.”

    आधुनिक सुविधा उपयोगी आहेत पण त्यांचा अतिरेक किंवा चुकीची देखभाल आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आपण शरीराची काळजी घेतो डाएट, व्यायाम, औषधं… पण कधी आपल्या आजूबाजूच्या ‘हवेची’ काळजी घेतो का? कारण कधी कधी आजार आपल्या शरीरात नसतोच तो आपल्या भिंतींमध्ये, हवेत आणि सवयींमध्ये दडलेला असतो!

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    गणेशोत्सव आणि आयुर्वेद

    September 15, 2026 आरोग्य

    शरीरात वात आणि पित्त वाढवण्याचे एक कारण — अहंकार!

    September 12, 2026 आरोग्य

    शांतता ऐकणारे कान

    September 9, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    गणेशोत्सव आणि आयुर्वेद

    By Team AvaantarSeptember 15, 2026

    गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात श्रद्धा, उत्साह आणि आनंदाने साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण आहे.…

    शरीरात वात आणि पित्त वाढवण्याचे एक कारण — अहंकार!

    September 12, 2026

    शांतता ऐकणारे कान

    September 9, 2026

    HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब

    September 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आपल्या आरोग्याचं प्रतिबिंब

    September 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लहरी जैसिया जळीं, परमाणुकणिका स्थळीं

    September 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 सप्टेंबर 2026

    September 19, 2026

    अमृतसिद्धी योगावर गुरुजींचा शर्वाय-आराध्याला आशीर्वाद

    September 18, 2026

    उमा महेशरावांवर होती नाराज

    September 18, 2026

    तीन पिढ्या आणि ज्येष्ठा गौरी

    September 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 440
    • अवांतर 208
    • आरोग्य 148
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 588
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 30
    • ललित 928
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आपल्या आरोग्याचं प्रतिबिंब

    September 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लहरी जैसिया जळीं, परमाणुकणिका स्थळीं

    September 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 सप्टेंबर 2026

    September 19, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.