आयुर्वेदानुसार आणि आधुनिक मानसशास्त्रानुसार, अहंकार (Ego) हा केवळ मनाशी संबंधित नसून त्याच्याशी संंबंधित सततचा ताण, राग, चिंता आणि चिडचिड यांचा शरीरावरही परिणाम होऊ शकतो. अहंकार, राग आणि मानसिक ताणामुळे उद्भवू शकणाऱ्या समस्या –
हृदयविकार
- उच्च रक्तदाब
- सततचा ताण आणि चिडचिड
- हृदयावर वाढलेला ताण
पचनाचे विकार
- आम्लपित्त / ॲसिडिटी
- पोटातील अस्वस्थता
- IBS सारख्या तक्रारींमध्ये ताणाची भूमिका
मानसिक आरोग्यावर परिणाम
- नैराश्य
- अतिचिंता
- एकाकीपणा
- सतत तुलना आणि असुरक्षिततेची भावना
हेही वाचा – कावीळसाठी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट… काही घरगुती उपाय
निद्रानाश
- सतत विचार, चिंता आणि मनातील अस्वस्थतेमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
स्नायूंचा ताण
- सततच्या मानसिक ताणामुळे मान, खांदे आणि पाठीच्या स्नायूंमध्ये कडकपणा आणि वेदना जाणवू शकतात.
आयुर्वेदातील ‘प्रज्ञापराध’ संकल्पना
आपल्या शरीराच्या आणि निसर्गाच्या गरजांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे, याला आयुर्वेदात ‘प्रज्ञापराध’ असे म्हटले जाते.
- पित्त — राग, चिडचिड, जळजळ यांच्याशी संबंधित
- वात — भीती, चिंता, अस्वस्थता यांच्याशी संबंधित
थोडक्यात : आरोग्यासाठी केवळ औषधेच नव्हे, तर मनःशांती, सकारात्मक विचार, संयम आणि अहंकारावर नियंत्रण देखील महत्त्वाचे आहे.
मन शांत नसेल, तर औषधंही काम करत नाहीत!
औषध घेतल्यावरही फरक जाणवत नाहीये? रक्त तपासणं, स्कॅनिंग, टेस्ट… सगळं नॉर्मल येतंय, पण तरीही त्रास कमी होत नाहीये? कदाचित त्रास शरीरात नसून, मनात असतो. ताण, चिंता, भीती, राग, अपराधीपणा या सगळ्या मनाच्या विषारी भावना तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम करतात. या मानसिक असंतुलनामुळे पचन, झोप, हार्मोन्स, रोगप्रतिकारक शक्ती अशा अनेक शारीरिक गोष्टी बिघडतात आणि मग औषधं दिली तरी, तयार नसलेल्या जमिनीवर पाणी घातल्यासारखं काम होतं.
मन जेव्हा अशांत असतं…
औषध हे ‘support’ आहे – ‘मुख्य उपचार’ नाही. कोणताही डॉक्टर – हृदयाचा असो, त्वचेचा असो, पचनाचा असो, किंवा होमिओपॅथिक – जर पेशंटचा mental state अस्थिर असेल, तर औषधं हळूहळू किंवा कमी काम करतात.
हेही वाचा – HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब
मग उपाय काय?
- मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा… सकाळी 10 मिनिटं ध्यान, प्रार्थना, किंवा नुसतं शांत बसणं.
- नेहमी स्वतःशी प्रेमाने बोला – “मी ठीक आहे. मी बरा होतोय. मी माझ्या शरीराचा आदर करतो.”
- रोज थोडा वेळ निसर्गात घालवा… फुलं बघा, मातीला हात लावा, गच्चीत बसा.
- सकारात्मक लोकांशी बोला… नकारात्मक लोकांचं तात्पुरतं social detox करा!
- तुमचा ताण बोलून व्यक्त करा… डायरी लिहा, मित्राशी बोला, गरज लागली तर, थेरपिस्टकडे जा.
मनाचं आरोग्य म्हणजे शरीराच्या उपचारांचा पाया असतो. मनावर उपचार झाल्यावर औषधं जास्त प्रभावी होतात, आहार पचतो, झोप येते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि शरीर बरे होण्याचा वेग दुप्पट होतो.
(सौजन्य – समर्थ आरोग्य फाऊंडेशन)
संपर्क – 9150014545


