Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, August 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क
    पंचांग आणि भविष्य

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    अस्मिता दीक्षितBy अस्मिता दीक्षितAugust 21, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी लेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, अस्मिता दीक्षित, लेखिका अस्मिता दीक्षित, ज्योतिष अस्मिता दीक्षित, ज्योतिषशास्त्र, अष्टम भाव आणि तर्क, कालपुरुषाच्या कुंडलीतील अष्टम, गूढ भाव
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    || श्री स्वामी समर्थ ||

    ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना तर्क लावला तर, गणिते लवकर सुटतात. पत्रिकेत 6 8 12 या भावांना त्रिक भाव म्हटले आहे आणि त्यातून आपल्याला मनस्ताप, कटकटी, आजार, कर्ज, दवाखाना, तुरुंग अशा अनेक गोष्टींची शृंखला पाहायला मिळते. पण प्रत्यक्षात तसे नाही. जे दिसते, तसे नेमके आहे का? हे पाहताना खऱ्या अर्थाने अभ्यास सुरू होतो. जर हे भाव इतके वाईट फलादेश देणारे असते, तर ऋषीमुनींनी ते मुळात पत्रिकेत ठेवलेच नसते. असो.

    चित्रात सगळे रंग पाहिजेत, तसे आयुष्यात सगळी माणसेही हवीत. अगदी त्याचप्रमाणे पत्रिकेत प्रत्येक ग्रह, नक्षत्र, भाव, राशी आणि दशा या प्रत्येकाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. एक दुसऱ्यापेक्षा वेगळा असला तरी, महत्त्वाचा आहे आणि आपल्या आयुष्यात सगळ्यांचेच योगदान आहे. या सर्वाचा सखोल अभ्यास अध्ययन आवश्यक आहे.

    अष्टम भाव विचारात घेताना आपण मृत्यूसम पीडा, वारसाहक्काने मिळणारे धन, मन:स्ताप अशा अनेक गोष्टी विचारात घेतो; कारण ते मृत्यूसम पीडा देणारे आहे, पण मृत्यू नाही, हे लक्षात घ्यायला हवे. अष्टम भाव म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीतील ‘अष्टम’, जे वृश्चिक राशी दर्शवते. इथे मिट्ट काळोख आहे आणि गूढ भाव आहे. आपल्या आयुष्यातील सगळ्या गूढ गोष्टींचा हा भाव आहे. गूढ म्हणून जर या भावाची दशा लागली, तर ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करावा; कारण हा सुद्धा गूढतेकडे नेणारा विषय आहे. ज्याला जे भावते ते केले, तर नकारात्मक फळ मिळणार नाही. त्यामुळे अष्टम भाव किंवा त्याची दशा वाईट आहे, असे नाही तर, त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टी केल्यास तो भाव तितकाच खुलेल आणि दशा सकारात्मक फळ देईल.

    हेही वाचा – वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    एकदा एक सत्यनारायण व्रताची पूजा, मंगळागौर पूजन सांगणारे गुरुजी कर्जबाजारी झाले होते. उत्पन्न शून्य आणि डोक्यावर कर्जाचा भार, असे त्यांचे आयुष्य चालले होते. दशा अष्टम भावाची त्यांनी अंतेष्टी करायला सुरवात केली, तसे अष्टम जागृत झाले आणि पैसा यायला लागला. अष्टम भावाने दर्शवलेल्या गोष्टी करायला सुरुवात केली, तसे अष्टम फळ द्यायला लागले.

    एका मुलाला अष्टम लागले, त्याने विमा एजंट म्हणून नोकरी आणि व्यवसाय करायला सुरुवात केली, त्याचे भोग संपले. प्रत्येक भाव हा काहीतरी देत असतो आणि त्यामागे असलेला एक ठराविक विचारही असतो, तो आपल्याला कळणे म्हणजे ज्योतिष.

    तर्क लावता आला पाहिजे. कुठलाही भाव निष्फळ नाही. उत्तम ग्रहाच्या दशा लागूनही त्या वाईट जातात, कारण आपण भ्रमात राहतो आणि हातावर हात ठेवून बसतो. असेच कुणी तुम्हाला काहीच आणून देत नाही त्यासाठी कष्ट करावेच लागतात त्याला पर्याय नाही.

    अष्टम भाव लागला आहे ना, मग एखाद्याने अंतेष्टीसाठी लागणाऱ्या सामानाचे दुकान काढले तर ते चालणार नाही का? उत्तम चालेल कारण अष्टम भाव बोलायला लागला.

    हेही वाचा – वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मालमत्ता, परदेशवारी, अध्यात्म

    एखाद्या व्यक्तीचा षष्ठ भाव दशेत जागृत झाला तर, त्याला आजार होईल, तो कर्जबाजारी होईल असा अर्थ का घ्यायचा? त्याने घरी तयार केलेले खाद्यपदार्थ विकले, तर धंदा जोरात चालेल नाही का? कारण षष्ठ भावावरून आपले पोट पहिले जाते आणि पोटाला भूक लागते म्हणूनच आयुष्यभर मनुष्य वणवण करत असतो.

    ज्योतिष हे साधे सोपे आहे, पण ते फक्त पुस्तके वाचून येणार नाही; त्यातून शास्त्राचा पाया समजेल, शास्त्राचे नियम समजतील, पण ते प्रत्यक्ष जीवनात कसे लावायचे, यासाठी स्वतः त्यात जीव ओतावा लागतो. अभ्यासाला पर्याय नाही. प्रत्यक्ष पत्रिका सोडवाव्यात म्हणजे त्यातून तर्कशास्त्र विकसित होत जाते.

    पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
    Avatar photo
    अस्मिता दीक्षित

    जवळपास 18 वर्षं IT क्षेत्रात recruitment मध्ये कार्यरत होते. त्यानंतर केसरी टूर्समध्ये 3 वर्षं लेखन केले. तसेच, ‘antarnad18.blogspot.com’ हा स्वतःचा ब्लॉग सुरू केला. लोकमत, सकाळ या दैनिकांमध्ये लेखन केले. ज्योतिष शास्त्राचे कुतूहल पहिल्यापासून होते, त्यामुळे 1999पासून या शास्त्राचे अध्ययन केले आणि अविरत करत आहे. माझे परमगुरु श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत रुजू आहे. त्यांची कृपा आहे म्हणून सर्व चालले आहे, हा ठाम विश्वास आहे. गेली 10 वर्षं ‘हसत खेळत ज्योतिष शिकूया’ या कार्यशाळांचे झूमच्या माध्यमातून आयोजन करत आहे.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 21 ऑगस्ट 2026

    August 21, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 20 ऑगस्ट 2026

    August 20, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 ऑगस्ट 2026

    August 19, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 21 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 21, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 ऑगस्ट 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 30…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 20 ऑगस्ट 2026

    August 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 ऑगस्ट 2026

    August 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 18 ऑगस्ट 2026

    August 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गार शेवाळें गुंडाळली, कां निंबोळी जैसी पिकली

    August 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 21 ऑगस्ट 2026

    August 21, 2026

    राहुल अग्रवाल पार्थच्या घरी गेला आणि…

    August 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 403
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 543
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 250
    • मैत्रीण 24
    • ललित 865
    • शैक्षणिक 85
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.