Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, July 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 12, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    हा जीतु ना नोहे । लोक कल्पी येणें भावें । तैसें जिणें होआवें । ऐसी आशा ॥195॥ पै चालतु कां नोहे । कीं वारेनि जातु आहे । जना ऐसा भ्रमु जाये । तैसें होईजे ॥196॥ माझें असतेपण लोपो । नांवरूप हारपो । मज झणें वासिपो । भूतजात ॥197॥ ऐसीं जयाचीं नवसियें । जो नित्य एकांता जातु जाये । नावेंचि जो जिये । विजनाचेनि ॥198॥ वायू आणि तया पडे । गगनेंसीं बोलों आवडे । जीवें प्राणें झाडें । पढियंतीं जया ॥199॥ किंबहुना ऐसीं । चिन्हें जया देखसी । जाण तया ज्ञानेंसीं । शेज जाहली ॥200॥ पैं अमानित्व पुरुषीं । तें जाणावें इहीं मिषीं । आतां अदंभाचिया वोळखीसी । सौरसु देवों ॥201॥ तरि अदंभित्व ऐसें । लोभियाचें मन जैसें । जीवु जावो परी नुमसे । ठेविला ठावो ॥202॥ तयापरी किरीटी । पडिलाही प्राणसंकटीं । तरी सुकृत न प्रकटी । आंगें बोलें ॥203॥ खडाणे आला पान्हा । पळवी जेवीं अर्जुना । कां राहे पण्यांगना । वडिलपणें ॥204॥ आढ्यु आतुडे आडवीं । मग आढ्यता हारवी । नातरी कुळवधू लपवी । अवेवांतें ॥205॥ नाना कृषीवळु आपुलें । पांघुरवी पेरिलें । तैसें झांकी निपजलें । दानपुण्य ॥206॥ वरिवरी देह न पूजी । लोकांतें न रंजी । स्वधर्मु वाग्ध्वजीं । बांधों नेणे ॥207॥ परोपकारु न बोले । न मिरवी अभ्यासिलें । न शके विकूं जोडलें । स्फीतीसाठीं ॥208॥ अंगभोगांकडे । पाहतां कृपणु आवडे । एऱ्हवीं धर्माविषयीं थोडें । बहु न म्हणे ॥209॥ घरीं दिसे सांकड । देहींची आयती रोड । परी दानीं जया होड । सुरतरूसीं ॥210॥ किंबहुना स्वधर्मीं थोरु । अवसरीं उदारु । आत्मचर्चे चतुरु । एऱ्हवी वेडा ॥211॥

    हेही वाचा –  सार्थ ज्ञानेश्वरी : जयाचेनि उजाळें, उघडती बुद्धीचे डोळे

    अर्थ

    ज्याच्या योगाने हा जिवंत आहे की नाही, अशी लोक आपल्याविषयी शंका धरतील, अशा प्रकारचा आपला आयुष्यक्रम असावा अशी त्यास आशा असते. ॥195॥ पलीकडे असलेला तो चालतो आहे की नाही, किंवा वार्‍यानेच जात आहे अशा प्रकारचा आपल्याविषयी जगात भ्रम उत्पन्न व्हावा तसे आपण व्हावे (असे त्यास वाटते.) ॥196॥ मी एक अमका आहे, अशी माझ्या अस्तित्वाची कोणास आठवणच होऊ नये, माझे नाव अथवा रूप कोणाच्या डोळ्य़ासमोर येऊ नये, कदाचित मला पाहून प्राणिमात्र भितील, तर तसे होऊ नये ॥197॥ याप्रमाणे ज्याचे नवस असतात व जो सदोदित एकांतामधे जात असतो व ज्याला एकांत जीवाइतका आवडतो. ॥198॥ वायूचे व त्याचे पटते, आकाशाशी बोलणे त्याला आवडते. (त्यास बोलण्याचा कंटाळा असतो); व ज्याला झाडे ही जीवाप्रमाणे आवडतात. ॥199॥ फार काय सांगावे! अशी लक्षणे तू ज्या पुरुषाच्या ठिकाणी पाहशील, त्या पुरुषाचे व ज्ञानाचे एकच अंथरुण झाले आहे, असे तू समज. ॥200॥ साधकामधे असणारा अमानित्व हा जो गुण म्हणतात तो या लक्षणांनी जाणावा. आता अदंभाच्या ओळखीकरता त्याच्या लक्षणांचा अभिप्राय सांगतो. ॥201॥ तर ऐक. अदंभित्व असे आहे; ज्याप्रमाणे लोभ्यांचे मन (आपल्या धनाविषयी इतके आसक्त) असते की, जीव गेला तरी तो आपली धन ठेवलेली जागा सांगत नाही. ॥202॥ अर्जुना, त्याप्रमाणे त्याच्या प्राणांवर जरी संकट आले, तथापि आपण केलेले पुण्यकर्म हे देहचेष्टेने अथवा वाचेने उघड करत नाही. ॥203॥ खोड्याळ गाईला आलेला पान्हा ती गाय जशी चोरते, अथवा उतार वयाला आलेली वेश्या उतार वयासारखी राहते काय? (तर नाही. मग ती आपले उतार वय झाकते). ॥204॥ श्रीमंत मनुष्य एकटा अरण्यात सापडला असता तो (जसा) आपली श्रीमंती लपवितो अथवा कुलीन स्त्री (जशी) आपले अवयव झांकते, ॥205॥ अथवा शेतकरी पेरलेले बीज (जसे माती टाकून) झाकतो त्यांप्रमाणे तो आपल्या हातून झालेले दान आणि पुण्य झांकतो ॥206॥ देहाची वरवर पूजा करत नाही, (लोकांना फसविणारा बाह्य वेष धारण करून देहाला सजवीत नाही), व लोकांच्या मनाजोगते बोलून त्यांचे मनोरंजन करत नाही व आपण केलेला धर्म आपल्या वाचारूपी ध्वजेवर बांधण्याचे त्यास माहीत नसते. (आपण केलेला धर्म तो आपल्या तोंडाने बोलून दाखवत नाही). ॥207॥ आपण दुसर्‍यावर केलेल्या उपकाराचा तोंडाने उच्चार करत नाही, आपण जो काही (वेदशास्त्र वगैरेचा) अभ्यास केला असेल त्याचा डौल मिरवीत नाही व आपली भरभराट व्हावी म्हणून जो आपण मिळविलेले पुण्य विकण्यास धजत नाही, ॥208॥ तो आपल्या शरीराला जे (विषय) भोग देतो त्यावरून (त्याच्या उदारपणाचा) अंदाज केला तर, तो कृपण आहे असे वाटेल; एऱ्हवी धर्माच्या कामी त्याचे औदार्य पाहिले तर, तो आपल्या जवळचे धन वगैरे खर्च करण्यास थोडेफार असे म्हणत नाही. ॥209॥ घरामधे सर्व गोष्टींची टंचाई दिसते, शरीराचा बांधा रोडका असतो;  परंतु दानाच्या बाबतीत तो कल्पतरूशी प्रतिज्ञेने चढाओढ करतो. ॥210॥ फार काय सांगावे! स्वधर्मामध्ये तो थोर असतो, योग्य प्रसंगी तो उदार असतो, आत्मचर्चा करण्यात तो हुशार असतो. एऱ्हवी (इतर गोष्टीत) तो वेडा असतो. ॥211॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आथिलेचि गुण वानितां, मान्यपणें मानितां

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : आथिलेचि गुण वानितां, मान्यपणें मानितां

    July 11, 2026 अध्यात्म

     सार्थ ज्ञानेश्वरी : जयाचेनि उजाळें, उघडती बुद्धीचे डोळे

    July 10, 2026 अध्यात्म

     सार्थ ज्ञानेश्वरी : जया ज्ञानालागीं, गगन गिळिताती योगी

    July 9, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : आथिलेचि गुण वानितां, मान्यपणें मानितां

    By Team AvaantarJuly 11, 2026

    अध्याय तेरावा अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् । आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥7॥ तरी कवणेही विषयींचें । साम्य होणें…

     सार्थ ज्ञानेश्वरी : जयाचेनि उजाळें, उघडती बुद्धीचे डोळे

    July 10, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जया ज्ञानालागीं, गगन गिळिताती योगी

    July 9, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : रथांगांचा मेळावा, जेवीं रथु म्हणिजे पांडवा 

    July 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 जुलै 2026

    July 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    July 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 12 जुलै 2026

    July 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 357
    • अवांतर 196
    • आरोग्य 129
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 486
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 234
    • मैत्रीण 24
    • ललित 775
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.