Author: पराग गोडबोले

मोबाइल - 9323277620

थायलंड, मलेशिया आणि मग शेवटचा टप्पा सिंगापूर. खूप छान चालली होती आमची सहल. आम्ही पंचवीस जण अगदी एकसंघ झालो होतो, पण घरून प्रस्थान करून आठवडाभर झाला होता आणि हॉटेलचं अन्न खाऊन विटलेल्या मनाला आता साध्यासुध्या ‘वरण-भाताची’ प्रचंड ओढ लागली होती. हॉटेलमधली न्याहारी ‘कॉन्टिनेंटल’ पद्धतीची असायची. अमाप आणि असंख्य पदार्थ, पण आपल्या पारंपरिक रसनेला मानवेल, असं काहीच नसायचं. काही वेळा इडली, पोहे किंवा उपमा असायचा, पण त्यांना म्हणावी तशी चवच  नसायची. त्यामुळे हिरमोड व्हायचा, पण शेवटी तेच घशाखाली उतरवायला लागायचं… दुसरा काहीच पर्याय नसायचा. दुपारचं आणि रात्रीचं भोजन भारतीय हॉटेलमध्ये व्हायचं. हल्ली भारतीय जेवण म्हणजे पंजाबी जेवण हेच समीकरण सगळीकडे रूढ…

Read More

पंचतारांकित हॉटेल्स म्हणजे एक वेगळीच दुनिया. तिथे समाजातल्या वरच्या थरातल्या, उच्चभ्रू लोकांचा वावर… चकचकाट आणि झगमगाट पैशांचा, सुबत्तेचा आणि आढ्यतेचा. तोऱ्यात मिरवणारे देशी, विदेशी पाहुणे, त्यांच्यासमोर मर्यादशील वागणारे आणि बोलणारे, पढवलेले कर्मचारी, असा सगळा माहौल. मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये काम केलेले बरेच जण आहेत माझ्या ओळखीचे. त्यांच्याशी बोलताना बऱ्याच सुरस कहाण्या ऐकायला मिळतात, याच थरातल्या लोकांच्या! आपण कधीही न ऐकलेल्या आणि कधीही न अनुभवलेल्या… तशीच एक कहाणी. मुंबईतलं एक प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल. कॉर्पोरेट इंडियाच्या आणि सरकारातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा, परदेशी पाहुण्यांचा सदैव राबता असलेलं… असाच एक मोठ्या हुद्दयाचा सरकारी अधिकारी महागड्या गाडीतून उतरून, उंची कपडे लेऊन, चेहेऱ्यावर उर्मट भाव वागवत हॉटेलमध्ये यायचा.…

Read More

पुण्याच्या विस्तारीत उपनगरातला, एक नव्यानेच उदयाला येत असणारा निवासी भाग. काही इमारतींमध्ये राहणारे रहिवासी, काही इमारतींचे काम सुरू… वगैरे नेहमीचंच दृश्य. माझा एक मित्र राहायला गेलाय तिथे नुकताच. या इमारतींपैकी एका इमारतीच्या तळमजल्याला मारवाडी समाजाच्या दुकानदाराची दोन दुकानं, नुकतीच सुरू झालेली… एक मिठाईचं आणि दुसरं जनरल स्टोर. माझा आत्तापर्यंचा अनुभव असा की, कुठल्याही नव्या विभागात पहिलं दुकान असतं ते मारवाड्याचं. तिथेही तेच दृश्य, परिचित! आगे दुकान, पीछे मकान या तत्वावर त्यांचा ठाम विश्वास. एक दुकान आधी सुरू होतं, मग त्याचा कोणीतरी नातेवाईक येतो आणि शेजारीच औषधांचं, हार्डवेअरचं, किराणा सामानाचं  किंवा इतर तत्सम दुकान सुरू करतो. लोकं राहायला यायच्या आधी यांचे…

Read More

दुसरा शनिवार होता. माझा सुट्टीचा दिवस. नवऱ्याला तर सुट्टीच आणि लेक पण शनिवारी डबा न घेता जातो. मला थोडी विश्रांती आणि त्याला पण रोजच्या पोळीभाजीमधून सुटका, काहीतरी वेगळं चमचमीत खायला! उशिराच उठले थोडी. आमचा सगळ्यांचा चहा केला. चार माणसं आम्ही, त्यातही चार पंथ! आबांना बिनसाखरेचा अन् कमी दुधाचा. नवऱ्याला ग्रीन टी, मला आपला दुधाचा, गोड चहा आणि लेकाला कॉफी. हे सगळं करून, पोहे फोडणीस टाकून पेपर चाळत असतानाच आबा आले. सकाळी फिरायला जाऊन, मित्रांशी गप्पाटप्पा करून, पूजेसाठी फुलं खुडून, आबा निवांत परत यायचे. मग आंघोळ, न्याहारी, पूजा आटोपून निवांत पेपर वाचन असं साग्रसंगीत बेत. आज आल्यावर जरा वेगळेच वागत होते.…

Read More

नुकताच महिनाभर झाला होता तिचं लग्न होऊन. मजेत चालले होते दिवस. ती, तिचा नवरा, मोठा दीर, जाऊ, सासू, सासरे सगळे एकत्र राहायचे. घर तसं बऱ्यापैकी मोठं, पण एकत्र मोठ्या कुटुंबात राहायची सवय नसलेल्या तिला, ते वातावरण अंगवळणी पडायला अंमळ जड जात होतं, पण करत होती ती प्रयत्न, रमायचा आणि जमवून घ्यायचा! घरचे सगळे चांगले होते; पण अपत्य नसलेल्या, लग्न होऊन तीन वर्ष झालेल्या दिराची नजर काहीतरी वेगळीच होती. न्याहाळत असायचा तो तिला. ती पाठमोरी असली, तरी ती नजर रेंगाळतेय आपल्या पाठीवर, असा सदोदित भास व्हायचा तिला. विचित्रच वाटायचं काहीतरी… ती टाळायची त्या नजरेला नजर देणं, पण एक चमत्कारिक अशी काहीतरी…

Read More

नुकताच एका आजोबांच्या वर्षश्राद्धाला उपस्थित राहण्याचा प्रसंग आला. आजोबा अगदी अलगद उंबरठा ओलांडून पल्याड गेलेले. माणूस गेल्याचं दु:ख होतंच घरच्यांना, पण आयुष्यातली सगळी भौतिक सुखं अनुभवून, सुखवस्तू आयुष्य जगून परलोकी गेलेल्या आजोबांचं श्राद्ध, म्हणजे एक छोटसं कौटुंबिक एकत्रीकरणच होतं जणू… मुलगा, मुलगी, सून, जावई, लग्नाच्या उंबरठ्यावर असलेली नातवंडं, सगळा गोतावळा जमला होता श्राद्धाला. वर्ष उलटून गेल्यामुळे वातावरण थोडंसं हलकं. चेहरे लांबट न ठेवता, थोड्या गप्पा, थोडे हास्यविनोद, थट्टामस्करी सगळं अलगद सुरू होतं. आजोबांच्या आठवणी, त्यांचे किस्से, त्यांचा लाघवी स्वभाव, सचोटी, प्रामाणिकपणा यांची उजळणी होत होती. त्यांच्यामुळे आज आपण इथवर पोहोचलोत याची जाणीव सगळ्यांनाच होती… आणि ती व्यक्त होणाऱ्या भावभावनांमधून दिसत…

Read More

ऑफिसमध्ये होते आणि नेहाचा मेसेज आला… ‘आत्तू, आमच्या नव्या घराचा ताबा मिळालाय. तुझी खूप आठवण आली किल्ल्या घेताना.’ मेसेज बघता क्षणी मी फोन लावला तिला. खूप उत्साहात होती पोर. आवाजात नुसता आनंद भरलेला… काय सांगू आणि किती सांगू असं झालं होतं तिला. मी म्हटलं, “फोटो पाठव घराचे!” “नाही, तू प्रत्यक्ष यायला हवंस बघायला.” “मी येईनच गं, पण तुमचं सगळं काम झालं की, सजवलेलं घर पाहायला येईन. तोवर फोटो तर पाठव.” “फोटो कशाला, थांब व्हिडीओ कॉल करते… ठेव फोन.” पुढच्याच क्षणाला व्हिडीओ कॉल आला आणि घरभर नाचून तिने घराची प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा, ओपन टेरेस, अगदी संडास, बाथरूमची पण सैर घडवून…

Read More

रविवारी, नेहेमीप्रमाणे डोंबिवलीत फडके रोडला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघालो. रविवार सकाळची ही प्रदक्षिणा फार उत्साहवर्धक असते माझ्यासाठी. कधी शेपू मिळतो, कधी मॉडर्न कॅफेचा डोसा, तर कधी धनलक्ष्मीचा अप्पम! हवं ते पिशवीत किंवा पोटात पाडून घेण्यासाठी चौकस नजर हवी फक्त. कधी अवचित एखादा वासूदेवही भेटतो, पिसांची टोपी घालून चिपळ्या वाजवणारा. दुर्लक्षित, पण चैतन्यदायी… जाता जाता, ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरात डोकं टेकवलं… काही क्षण बसलं की, आठवड्याचा सगळा शीण पळून जातो कुठल्या कुठे आणि नवी ऊर्जा, नवा वारा भरला जातो शिडात. तर, याच फडके रोडवर परवा एक हातगाडी दिसली, पेरूची. इतर कोणतीही फळं नाहीत, फक्त पेरू एके पेरू! फिकट हिरवे, पिवळे, रसरशीत पेरू……

Read More

आज थोडा उशीरच झाला ऑफिसमध्ये पोहोचायला. पोहोचले सव्वा दहा वाजता. नुसती धावपळ, घामाघूम करणारी. ऑफिसच्या वातावरणात गेल्यावर, थंडाव्याचं मोरपीस अंगावर फिरल्यावर जरा बरं वाटलं. तशी साडेनऊची वेळ, पण एक तास flexi time असतो. साडेनऊ ते साडेदहा या तासाभरात कधीही येऊ शकता तुम्ही… तेवढा वेळ उशिरापर्यंत थांबायचं म्हणजे दिवस गणला जातो. धप्पकन् बसले खुर्चीत, ओढणीनं वारा घेत. ग्लासभर पाणी ढोसल्यावर जरा जीवात जीव आला. वॉशरूममध्ये जाऊन तोंडावर पाण्याचे सपकारे मारून, पावडरचा हलकासा हात फिरवून, केस सारखे केल्यावर बरं वाटलं. लॅपटॉप उघडला, त्याला मनोभावे नमस्कार केला रोजच्याप्रमाणे आणि लॉगिन केलं. कामाचा फड आता रंगात येणार होता. सव्वाअकराची गूगल मीट होती. मुद्द्यांची उजळणी…

Read More

शनिवारी संध्याकाळीच आमच्या घरात रविवारच्या सकाळच्या न्याहारीची चर्चा जोर धरू लागते. साबुदाण्याची खिचडी करायची असेल तर साबुदाणा भिजवावा लागतो. आंबोळी असेल तर तशी तयारी करावी लागते, कारण न्याहारी हा एक सोहळा असतो रविवारी. अर्थात, तो सगळ्यांच्याच घरात असतो, आमचं काही फार वेगळं नाही. पोहे, उपमा, फोपो (फोडणीची पोळी) वगैरे काही असेल, तर मला स्फुरण चढतं आणि मी माझ्या पाककलेचे प्रयोग घरच्या लोकांवर करायला सिद्ध होतो. बायको तर म्हणते, “तू शेफच व्हायला हवा होतास. उगाच नको त्या क्षेत्रात मुशाफिरी करत बसलास. आमच्या डोक्याला ताप जरा कमी झाला असता आणि वेगवेगळे पदार्थही चाखायला मिळाले असते आम्हाला.” जाऊ द्या, तो विषय नाही. ती…

Read More