Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
लेखक: पराग गोडबोले
आज down/up केलं लोकलसाठी. म्हणजे ठाकुर्लीला चढून, कल्याणकडे जाणाऱ्या गाडीत बसून परतीचा प्रवास केला. थोडा वेळ जास्त जातो, पण हमखास बसून प्रवासाची खात्री असते. वाचायला छान वेळ मिळतो… मुंबईचा प्रवास असला की, मी बऱ्याचदा ही पद्धत अवलंबतो. बरेच असे प्रवासी असतात माझ्यासारखे. अर्थात, शिरस्त्याप्रमाणे मुलुंड किंवा भांडुपला आपण उभं राहून दुसऱ्याला जागा देऊन थोडा परोपकार पण करायचा असतो, तोही मी नियमितपणे करतो. शिणलेले सगळेच असतात! थोडा वेळ बसायला जागा मिळाली की, सगळ्यांनाच बरं वाटतं, तेवढंच. आज मला मस्त खिडकीची जागा मिळाली. समोर एक पस्तिशीचा तरुण बसला होता. कपाळावर छान चंदनाचा टिळा होता. बॅगा वगैरे रॅकवर ठेवून आम्ही स्थानापन्न झालो… त्याने…
तसं बघायला गेलं तर आमचं चौघांचं मस्त कुटुंब. चौघे म्हणजे मी, माझे यजमान, लेक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, माझे सासरे… आमचे सगळ्यांचे आबा! वय वर्ष 79. वयोमानानुसार आलेली विस्मृती आणि कानाला यंत्र, एवढं सोडलं तर, तब्येत तशी ठणठणीत… पण, यंत्र काढून ठेवलं की, एकदम कुंभकर्णाचा अवतार. नगारे वाजवले तरी, कळणार नाही अशी स्थिती!! दंताजीचं ठाणं उठलेलं, पण काही चुकार दात बोळक्यातून लुकलुकणारे… आम्हाला आमच्या सगळ्यांच्याच बालपणाची आठवण करून देणारे… पांढरा शुभ्र सदरा लेंगा हा घरातला वेष. उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र चट्टेरीपट्टेरी, नाडीची, गुडघ्यापर्यंत येणारी अर्धी चड्डी. वर उघडाबंब देह आणि जानव्याने पाठ खाजवण्याची खास लकब… डोक्यावरचे, विरळ होत जाणारे केस, पण…
शनिवारची सकाळ. नेहेमीप्रमाणेच लताबाई आली घरकामाला. ती आली आणि केर काढू लागली की, माझी नुसती तारांबळ उडते. इथे बसू का तिथे बसू? या खोलीत जाऊ का त्या खोलीत जाऊ? असे यक्षप्रश्न ठाण मांडून माझ्यासमोर उभे ठाकतात आणि मी बापुडवणा, पाय पोटाशी धरून बसून राहतो सोफ्यावर, नाही तर खुर्चीवर! खाली उतरायची बंदी असते मला, ती पंधरा मिनिटं… केर काढत असताना उतरलो आणि पाणी प्यायला जरी गेलो तरी, ‘नाचू नको केरात!! कितीही वेळा सांगितलं तरी, लक्षात कसं येत नाही तुझ्या?’ अशी टकळी सुरू होते. लादी पुसताना उतरलो तर, ‘पाय उठतात रे लादीवर, का अंत बघतोस माझ्या सहनशक्तीचा? नसतोस घरी तेच बरं असतं…’…

