Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: पराग गोडबोले
असाच एक शुक्रवार, ऑफिसातला. साधारण अकराचा सुमार आणि सकाळची धामधूम संपवून, हातात कॉफीचा मग घेऊन मी निवांत बसलो होतो. लॅपटॉप झाकून ठेवला होता आणि थोड्याशा कडवट कॉफीचे घोट घशाखाली उतरवत होतो. साहेब सुट्टीवर होते, त्यामुळे जरा टंगळमंगळच सुरू होती सगळ्यांची, त्यातलाच मी एक. कॉफी संपतच येत होती, इतक्यात एक एसएमएस आला, Your account has been credited for Rs 40,000/-. मी चकीत! एवढे पैसे येणं नव्हतंच मला कोणाकडून. तेवढ्यात G pay notification पण आलं, 40,000 रुपये जमा झाल्याचं. महिलेचं नाव दाखवत होतं XXX भोसले. मी विचारात पडलो आणि फोन हातात असतानाच परत एकदा 40,000 जमा झाल्याचा मेसेज आला. एकाच महिलेकडून माझ्या…
प्रत्येक व्यक्तीच्या काही खास आवडीनिवडी असतात. त्यांना काही गोष्टी मनापसून आवडतात तर काही मनापासून नावडतात आणि ही नावड, मग कधीतरी काहीतरी घडतं आणि आवडीत बदलून जाते… माझा एक मित्र आहे, बराच जुना. अगदी शाळासोबती नाही, पण नोकरीच्या ठिकाणी भेटलेला आणि मग त्यानंतर बरीच वर्षे सोबत राहिलेला सुहृदय. त्याच्याही काही अद्भूत आवडीनिवडी. त्यातलीच एक म्हणजे त्याला असलेला कोथिंबीरीचा आत्यंतिक तिटकारा! आता, कोथिंबीर न आवडणारा माणूस तसा विरळाच, पण त्याच्या डोक्यावरचे केस जसे विरळ होत गेले, तसा हा तिटकारा वाढतच गेला… विदर्भातून आलेला म्हणून कोथिंबीरीला धनिया म्हणायची सवय. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर ऑर्डर देताना आधीच सांगणार. नो धनिया, म्हणजे एकतर भाजीत कोथिंबीर नको…
ऑफिसमध्ये होते, आम्ही सगळ्याजणी मिळून डबे खाण्यात गुंग होतो, तोच फोन वाजला. लेकाचा होता. साधारण किती वाजता फोन केला की, मी पटकन फोन उचलते, हे ठाऊक असतं त्याला, इतक्या वर्षांच्या सरावाने. तोंडात घास असतानाच फोन घेतला त्याचा… “काय रे?” आम्ही थेट मुद्दयाचं बोलतो. उगाच ‘हॅलो’ वगैरे म्हणण्याच्या भानगडीत वेळ नाही घालवत बसत. “आई, आबांनी अश्वगंधा पावडर आणायला सांगितली आहे.” “काय आणायला सांगितलं आहे?” “अगं, अश्वगंधा पावडर म्हणाले ते…” ऐकलं आणि मला जोरदार ठसका लागला. लालबुंद झाला चेहरा नुसता. ‘पाणी द्या, पाणी द्या तिला,‘चा आक्रोश झाला आणि तब्बल ग्लासभर पाणी रिचवून मी जरा शांत झाले. तसे या अश्वगंधाचे उपयोग ऐकून ठाऊक…
श्रम करणाऱ्याला, घाम गाळणाऱ्याला या जगात कधीच पोटापाण्याची चिंता नसते. मुंबईत तर नाहीच नाही. बरेच परप्रांतीय मुंबईत येतात आणि पडेल ते काम करून, कष्ट करून, जागा मिळेल तिथे राहून, स्वतःचा जीव जगवतात आणि प्रगती करतात. बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा, बंगाल या भागातून येणारे हे जत्थे अवघ्या महामुंबईत पसरतात आणि स्वस्त श्रमाची गरज अगदी लीलया भागवतात. मुख्यत्वे, बांधकाम क्षेत्रात यांच्या झुंडी अगदी विनासायास सामावल्या जातात, स्थानिकांच्या नाकावर टिच्चून. यांच्यातलेच काहीजण वेगळे मार्ग चोखाळतात त्यातल्या त्यात कमी कष्टाची कामे! असाच एक अवलिया भेळवाला आमच्या ऑफिसशेजारी असलेल्या पेट्रोलपंपाजवळ दिसतो मला, सदैव. लहानखुरी चण, काळासावळा रंग. गुलाबी, नाहीतर भडक लाल, पिवळा अशा रंगांचे शर्ट…
का कोणास ठाऊक, पण दुधाने तोंड पोळल्यामुळे ताकाची उगाचच बदनामी झालीये. पोळणारं दूध आणि समंजस ताक यांच्यात तसंही फक्त एक रंग सोडला तर, बाकी काहीही साम्य नाही. ताकाचं पालकत्व तर दुधाकडेच, पण जन्मदाता आणि हे अपत्य यांच्यात किती तो फरक!! जसा सूर्य आणि चंद्रात फरक. दुधाची साय, सायीचं दही, ते घुसळून मग वर जमा होणारं लोणी आणि मग ती सगळी स्निग्धता काढून घेतल्यावर उरतं ते परमप्रिय ताक. त्याचं दुसरं नाव अमृत आहे म्हणे… मला आवडतं ताक. उगाच ताकाला जाऊन भांडं लपविण्यात काय हशिल? जेवण झाल्यावर आमटीच्या वाटीत घेतलेलं ताक म्हणजे निव्वळ नशा. थोडीशी आमटीची चव आणि थोडी ताकाची. भरपेट जेवणावर…
आज जवळपास दोन वर्षांनी चित्रपटगृहाची पायरी चढताना, अगदी दाटून येत होतं तिला. दोन वर्षांपूर्वीच्या घटना फेर धरून नाचत होत्या तिच्या डोळ्यांपुढे. ती येणारच नव्हती खरंतर, पण जिवलग मैत्रिणीच्या आणि मुलांच्या आग्रहामुळे ती वळली होती, परत त्या दिशेला. मन मारून, इच्छा दडपून जगली होती ती दोन वर्षं… स्वतःलाच दोष देत, दोष नसताना सुद्धा, उगाचच. तो दिवस आठवला, की अजूनही एक विचित्र अशी अपराधाची भावना दाटून येत असे तिच्या मनात. नवरा कंपनीच्या कामासाठी दौऱ्यावर होता. घरात ती, सासूबाई आणि दोन मुलं. मुलगा आठवीत होता आणि मुलगी पाचवीत. रविवारच्या त्या दिवशी, तिचा आणि मैत्रिणीचा मस्त बेत ठरला होता. चित्रपट बघून मग बाहेर खादाडी…
बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एका कार्यातली. त्या काळी साधारणपणे अशीच असायची सगळी कार्य… तेव्हा बँक्वेट्स (Banquets) नव्हती, साधीसुधी कार्यालयं असायची पुण्यात… लग्न लागलं होतं. दुपार टळली होती. खाशी पंगत पण उठली होती आणि कार्यालयातल्या पाहुण्यांवर श्रीखंडाच्या सुस्तीची दाट साय पसरलेली दिसत होती. जांभयांची आवर्तनं सुरू होती. खुर्च्यांची रिंगणं करून गप्पांचे फड जमले होते. काकवा, मावश्या, माम्या, वहिन्या यांच्या गुजगोष्टी सुरू होत्या. ‘तुला सांगते शांते, परवा किनई कहर केला बाई यांनी…’ असे संवाद ऐकू येत होते. जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळत होता. संध्याकाळच्या वरातीला अजून बराच अवकाश असल्याने सगळा थंडा कारभार… काही जण बसल्याजागी पेंगत, वेळ घालवण्याचा प्रयत्न करीत होते. काही…
बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट… संध्याकाळी घरी आल्यावर मी पेपर चाळत असताना, हिने अचानक बॉम्ब टाकला. “ऐक ना, माझ्या मैत्रिणीला तिची स्कूटी विकायची आहे. आपण घेऊया?” “आपल्याला कशाला? एक आहे ना माझी बाइक? डोंबिवलीत कशाला लागतेय?” माझे लगोलग प्रतिप्रश्न, येणाऱ्या संकटाला हुलकावणी देण्यासाठी. “माझ्या मैत्रिणी चालवतात. मला पण वाटतंय शिकावी असं. घेऊया ना, प्लीज.” बाल, राज आणि स्त्री या तीन हट्टांपैकी, एका हट्टाचं भूत आज माझ्या मानगुटीवर बसू पहात होतं. “बघूया,” म्हणत वेळ मारून नेली, पण आता हे भूत सहजी शांत होणाऱ्यातलं नव्हतं, याची मला मनोमन जाणीव झाली. तस्सच झालं अगदी. भुणभूण काही संपेचना. मी तिला म्हणालो, “तुला साधी सायकल चालवता येत…
अलीकडेच मस्त गंमत झाली. तसे घोळ, गमतीजमती माझ्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत, त्यातलीच ही एक नवीन कडी. शनिवारी पुण्याला येण्यासाठी म्हणून ठाण्याहून प्रगती एक्स्प्रेस पकडली, मी पाच वाजता आणि आठच्या सुमारास पुणे स्थानकात उतरलो. अगदी वेळेवर आली गाडी, म्हणून जाम हायसं वाटलं. भाऊ राहतो कर्वेनगरला… त्याच्याकडे जाऊन मग पुढे एका नातेवाईकांकडे जेवायला जायचं होतं. शनिवार असून सुद्धा ऑफिसला गेलो होतो, दिवसभर काम करून जाम दमायला झालं होतं, पण जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. ‘कितीही उशीर झाला तरी, तुला यायचंच आहे;’ हे आधीच बजावण्यात आलं होतं, त्यामुळे तशी मनाची तयारी होतीच झालेली! पुण्यनगरीत उतरल्यावर, प्रवासाचा पुढचा टप्पा होता ‘पुणे मेट्रो’. ही एक…
अलीकडचीच गोष्ट. संध्याकाळी, गाडीत माझ्या समोरच एक बाई बसल्या होत्या. हल्ली पुरुषांचा प्रथम वर्गाचा डबा, अर्धा अधिक बायकांनीच व्यापलेला असतो. या बायका एकदा मुंबईला किंवा दादरला बसल्या की, थेट डोंबिवलीपर्यंत बूड हलवित नाहीत, हा नेहमीचाच अनुभव. परवा माझ्या नशिबाने मला बसायला जागा मिळाली आणि समोरची मध्यमवयीन महिला, नेहमीप्रमाणेच भ्रमणध्वनीत गुंतलेली आणि गुंगलेली. एकंदरीत, नक्कीच सरकारी कर्मचारी असावी, हा माझा तर्क. गाडी सुटली आणि बाईंचा दूरध्वनी वाजला. कोण होतं पलीकडे कोणास ठाऊक… पण तिच्याच कार्यालयातली कोणीतरी सहकारी असावी, असा माझा आपला कयास. तावातावाने बोलणं सुरू झालं… “हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. वरिष्ठ काय सांगतात ते ऐकलंच पाहिजे, एक स्त्री आहात म्हणून…

