Author: नीता चंद्रकांत कुलकर्णी

Avatar photo

एमए असून माझे वय 73 आहे. मी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांत कथा लिहित होते. माझा ‘पूजा’ हा कथासंग्रह सरकारी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला आहे. पूर्वी छोट्या ग्रुपमध्ये कथाकथन करत होते. माझे मिस्टर स्टेट बँकेत नोकरीला होते. आता रिटायर आहेत. आम्ही सांताक्रुजला रहात असताना काही वर्षं तेथे कौन्सिलिंग करत होते. पुण्यात आल्यानंतर काही वर्षे मी पौरोहित्य करत होते. सध्या थोडेफार लिखाण सुरू आहे. मोबाइल - 9763631255

सोन्या रुप्याच्या पावलांनी गौरी घरात आल्या. प्रत्यक्ष त्या महालक्ष्मींचं आगमन होतं घरी… किती भाग्याची गोष्ट आहे ना! घरातल्या प्रत्येक खोलीत नेऊन त्यांना घर दाखवलं. दोघींना  नीट बसवलं. साडी,  दागिने हार घातले. आरती, मंत्रपुष्पांजली झाली. आल्या दिवशी साधी भाजी भाकरी… ती दाखवून झाली. दूध देऊन दोघींना आराम करायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच लगबग सुरू झाली. पुरणावरणाचा स्वयंपाक, भाजी, कोशिंबीर, भात वरण… दोघींचा चेहरा तृप्त दिसत होता. गौरी प्रसन्न हसतमुख दिसत होत्या. घरात आनंद उत्साह भरला होता. तो दिवस गडबडीत गेला. रात्री निवांत दोघींसमोर बसले… समई तेवत होती. त्या प्रकाशात गौरीचा शांत, आश्वासक चेहरा उजळला होता. मनातलं तिला ओळखता येतंच, तरी सगळं…

Read More

गणपती, गौरीच्या आगमनाचे दिवस जवळ आले. नेहमीप्रमाणे त्याची तयारी सुरू केली. माझं काम सुरू होतं. मधे जरा दमल्यासारखं झालं म्हणून बसले… शेजारी कोणीतरी आहे असा भास झाला… बघते तर माझी गौरीमायच समोर दिसली. अगदी माझ्याकडे मुखवटे आहेत तशीच! सर्वांग सुंदर… हसरा चेहरा… अतिशय गोड चेहऱ्याची… शांत नजरेनं बघत होती… मला आश्चर्य वाटले. काही सुचेना. तिच्याकडे बघतच बसले. मधुर आवाजात ती म्हणाली, “ओळखलसं ना मला?” “अगं हो गं… तू अशी… आत्ता अचानक कशी आलीस?” गौरी मायला बघून मला अत्यंत आनंद झाला होता. मात्र तिला असं अकस्मात् समोर बघून मी गडबडून गेले होते. “का आले ते सांगते… ये इथं. बैस शांतपणे माझ्याजवळ.…

Read More

घरी गणपती बसवायचं ठरवलं तेव्हाची गोष्ट… कोणाला विचारायला गेलेच नाही. रीतीरिवाज… घराणं… परंपरा… मतं-मतांतरं… चर्चा… हे काही मला नको होतं. माझं मलाच विचारलं, मनाने कौल दिला! प्रत्यक्ष देवाला घरी आणायचं मग भीती कशाची? कुणाची? सुबक सुरेख पितळी मूर्ती घेऊन आले. लहानगी दोन्ही नातवंडं एकदम खूश झाली. त्यांनी आरास केली. बाप्पाची चौरंगावर स्थापना केली. हौसेने सुरेख सजवलं… समई, उदबत्ती, दिवे लावले… फुलं, हारं घातले… पूजा केली… मोदकांचा नैवेद्य दाखवला… टाळ घंटेच्या गजरात आरती झाली… मंत्रपुष्पांजली… अथर्वशीर्षाची आवर्तनं… श्री गणेशाचे ब्रह्मणस्पती सूक्त म्हटलं. सारं काही यथासांग सुरू होतं. घरभर चैतन्य पसरलं होतं. “आमच्याकडे गणपती आहे,” कौतुकाने नातवंडं सांगत होती. आनंदसोहळा सुरू होता.…

Read More

सकाळ झाली. रोजच्या सारखे गुरुजी पूजा करण्यासाठी देवळात निघाले. पूर्वी देऊळ साधेसुधे होते. आता भव्य बांधले होते. पायरीला नमस्कार करून गुरुजी आत आले. अजून चार गुरुजी त्यांच्याबरोबर होते. ते पाचजण मिळून पूजा करत असत. चांदीचा भला मोठा दरवाजा उघडला होता. समोरच सोनं, मोती, हिऱ्याच्या दागिन्यांनी सजलेली देवाची मूर्ती होती. नमस्कार करून त्यांनी पूजा सुरू केली. प्रथम काळजीपूर्वक एकेक दागिना काढायला सुरुवात केली. दुसरे गुरुजी, ते दागिने पेटीत ठेवायला लागले. प्रत्येक वाराचे दागिने वेगळे होते. शुद्ध पाण्याने देवाचे स्नान झाले. चांदीच्या पाच भांड्यात पंचामृत होते. ते घातले. नंतर कोमट पाण्याने देवाला स्नान घातले. पंचाने देवाला पुसले. पितांबर नेसवला. अंगरखा घातला. शेला…

Read More

परंपरेने चालत आलेलं स्तोत्र, मंत्र, आरत्या, पूजा हे सगळं तिला फार आवडायचं. ती मनोभावे ते करायची. पुढच्या पिढीचा मात्र तिला मनातून फार राग होता… यांना काही सांगायची सोय नाही. प्रत्येक गोष्टीचं कारण विचारायचं… ‘हे का?’ आणि ‘ते का?’… जाऊ दे… पण आपलं आपण तरी करायचं, हे तिने ठरवलं होतं. आज श्रावणी सोमवार होता. तिची पूजा आरती झाली. कहाणी वाचून झाली. फराळ करायच्या आधी तिला देवदर्शन करायचे होते. म्हणून ती शंकराच्या देवळात जायला निघाली. निघताना नवऱ्याने, घरच्यांनी तिला जरा टोकलंच… पण त्यांचं न ऐकता ती निघाली. मैत्रिणीला तरी विचारावे म्हणून ती पलीकडे राहणाऱ्या मैत्रिणीकडे गेली. मैत्रिणीने दार उघडले. ती गडबडीत होती……

Read More

चातुर्मास सुरू झाला आहे. आता सणवार सुरू होतील. आपली जीवन पद्धती या हिंदू  संस्कृतीनुसार सुरू असते. संस्कृती म्हणजे काय तर, माझ्या मते – आपल्या श्रद्धा, मूल्य, ज्ञान,  रीतीरीवाज यांनी परिपूर्ण अशी आपली जगण्याची पद्धत! ती अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर, त्याचा सर्वांगीण विचार करून आपल्या पूर्वजांनी ठरवली आहे. अगदी रोजच्या जेवणाचाही त्यात समावेश आहे. तद्नुसार, ऋतुमान आणि शरीरशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी हे पदार्थ ठरवले आहेत. प्रथा, उपवास म्हणून दैनंदिन आहारात बदल करून ते पदार्थ केले जातात.   त्यावेळी हा पोषक आहार आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ हे कितीतरी वर्षांपूर्वीच आपल्याला सांगून ठेवलेल आहे. निरामय आरोग्यासाठी हा आहार आहे. आपल्या संस्कृतीत अनेक सणवार,…

Read More

आमच्या सोसायटीच्या दारातच चिंचेचे झाड आहे. मोठे होत होत ते आमच्या गॅलरीपर्यंत आले. कोवळी पोपटी मऊशार पानं दिसायला लागली. त्यावरून अलगद हात फिरवावा, असं वाटे… पानं मोठी होत जाताना बघणं फार आनंदाचं वाटत होतं. अगदी गॅलरीतल्या कठड्याजवळच फांद्या होत्या. काही फांद्या आतही आल्या… एके दिवशी बघितलं तर गुलाबी पिवळसर रंगाची फुलं दिसली… “अरे, म्हणजे आता चिंचा येणार!” मी अगदी आतुरतेनी वाट पाहायला लागले… कोवळी नाजूक चिंच दिसली… हळूहळू मोठी होत गेली… निसर्गाचा तो सोहळा बघताना फार मजा येत होती. रोज उत्सुकतेने मी बघत होते. होता होता चिंच चांगलीच मोठी झाली. चिंचेचे आकडे तयार झाले. ते बघून मन मागे गेले… शाळेच्या…

Read More

माईची खूप दिवसांपासून इच्छा होती, एकदा तरी आळंदी, पंढरपूर पायी वारी करावी. तो सोहळा डोळे भरून पाहावा. तीन मुलं, तीन मुली… त्यांची शिक्षणं, लग्न, सणवार… यात वारीचा विचारसुद्धा मनात आणता येत नव्हता. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता  माईचं वय झालं होत… आता कुठलं वारीला जायला जमणार? पंढरीची वारी आपल्या नशिबात नाही, असं म्हणून ती गप्प बसायची. घरीच नाम घेत स्वस्थ बसावं झालं… अशी तिने स्वतःच मनाची समजूत काढली होती. वारी जवळ आली होती… त्यामुळे ते दुःख अजूनच जाणवत होते. मुलाला ती म्हणाली, “वारी करायची इच्छा अपुरी राहिली… माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही बघ…. दर्भाचा करून लावावा लागेल!” आईचं बोलणं त्याने…

Read More

“विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन येते,” ती सुनबाईला म्हणाली. “आज कशाला जाता? एकादशीची फार गर्दी असेल.” “अगं, पंढरपूरला जायचं नशिबात नाही. इथल्या तरी विठ्ठलाला भेटून येते. देऊळ जवळ तर आहे…” सासूबाईंचं म्हणणं ऐकून ती म्हणाली, “बरं, या जाऊन.” “आजे मी येणार…” बारका नातू मागे लागला. “अरे, तुला कुठे गर्दीत सांभाळू?” तस नातवानं भोकांडच पसरलं… “मला पण विठ्ठलाला यायचंय…” तशी सुनबाई म्हणाली, “एवढं रडतंय तर न्या की… हे घ्या अकरा रुपये, ठेवा देवाला. या दोघं दर्शन करून…” पोरगं खूश झालं… खिदळायला लागलं… देवळात ही गर्दी होती! लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोरगं आनंदात होतं… नाचत होतं…. रांग हळूहळू पुढे सरकत होती. तसं पोरग…

Read More

इंद्रायणीच्या तीरी असलेल्या आळंदीची आज आठवण येत आहे. आळंदीचं माझ्या मनाशी वेगळंच नातं आहे… तिथे गेल्यानंतर रांगेत उभं असताना हरीपाठ म्हणायचा. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायचं. त्यांच्यामागे विठ्ठल रुक्मिणी आहेत. लांबून त्यांना नमस्कार करायचा. मग उजव्या हाताला निघायचं… ज्ञानेश्वर माऊली समाधीसाठी जिथून आत गेले, ती ही जागा आहे…आत जाताना गुरू निवृत्तीनाथांनी त्यांचा हात धरला असेल… सोपान, मुक्ताबाई बाजूला उभ्या असणार… हे सगळं चित्र समोर उभ राहतं… किती विलक्षण आहे हे सगळं… तिथे डोकं टेकवलं की, पोटात गलबलून येत… डोळे भरून येतात… पाय रेंगाळतात… माऊली आत कसे गेले असतील? इतक्या लहान वयात त्यांना हे कसं साधलं असेल? जे काम करायला…

Read More