Author: नीता चंद्रकांत कुलकर्णी

Avatar photo

एमए असून माझे वय 73 आहे. मी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांत कथा लिहित होते. माझा ‘पूजा’ हा कथासंग्रह सरकारी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला आहे. पूर्वी छोट्या ग्रुपमध्ये कथाकथन करत होते. माझे मिस्टर स्टेट बँकेत नोकरीला होते. आता रिटायर आहेत. आम्ही सांताक्रुजला रहात असताना काही वर्षं तेथे कौन्सिलिंग करत होते. पुण्यात आल्यानंतर काही वर्षे मी पौरोहित्य करत होते. सध्या थोडेफार लिखाण सुरू आहे. मोबाइल - 9763631255

येई वो विठ्ठले माझे माऊली ये निढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे… आलीया गेलीया हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे माझा मायबाप… विठ्ठलाची ही आरती मला फार आवडते. ‘येई वो…’ किती प्रेमाने, लडिवाळपणे, आपलेपणाने  विठू माऊलीला साद घातलेली आहे… “अरे ये रे…” लांबवर कोणी दिसतंय का हे बघायला आपण कपाळावर (निढळावर) आडवा हात धरतो. डोळे बारीक करून कोणी दिसतंय का, हे आतुरतेने बघायला लागतो. तशीच आम्ही तुझी वाट बघतोय… तू येरे…. आमचा प्रतिपाळ करणारा तो माय आणि बाप दोन्ही आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांबरोबर त्याला निरोप दिलेला आहे… त्यामुळे त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहोत… तो येणार ही मनाशी खात्री  आहे… त्याची वाट…

Read More

सकाळी साडेसहाची वेळ. शांत वातावरणात गाण्याचे सूर कानावर पडले – “जाता पंढरीसी सुख वाटे जीवा…” कुणीतरी रेडिओ लावलेला असावा. इतक्या सकाळी कधी आवाज ऐकू आला नसल्याने तिकडे लक्ष गेले. हळूहळू आवाज बंद झाला. दुसरी दिवशी पण, “सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले…” ऐकू आले. तिसऱ्या दिवशी फिरायला निघाले तेव्हा आवाज कुठून येतो ते समजले… एक पन्नास-पंचावन्न वर्षांच्या बाई रस्ता झाडत होत्या. त्यांनी मोबाईलवर गाणी लावली होती. आपल्याच तंद्रीत त्या गाणी ऐकत काम करत होत्या. त्यांना विचारलं, “ताई तुम्ही नवीन आलात का?” “हो बदलीवर आले आहे, आठ दिवसांच्या… माझी मैत्रीण इथं काम करायची, तिला बरं नाही म्हणून मी येत आहे…” “असं का?…

Read More

वारीचं कुतूहल काही केल्या उलगडत नाही. त्यातल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक, अप्रूप वाटत राहतं. मला तर या वारकऱ्यांच्या पांढऱ्या कपड्यांचं पण वाटतं! शर्ट, पायजमा, टोपी पांढरे  शुभ्र… इतके पांढरे कपडे घालून कसे येतात हे लोक? त्याविषयी  विचारावं असं वाटलं. आळंदी पुणे वारीला गेले होते, तेव्हा त्यांच्याशी संवाद साधला. घोळका करून रस्त्याच्या कडेला वारकरी बसले होते. गंमत अशी असते की – “नमस्कार माऊली कुठून आले?” – अशी सहज सुरुवात करून त्यांच्याशी बोलता येते. औपचारिकपणा अजिबात नसतो. तेही अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारतात. त्यातल्या काही दादांनी जे सांगितलं ते तुम्ही वाचा – “आम्ही हे कपडे फक्त वारीलाच घालतो, इतर वेळेस नाही. घरी गेलो की…

Read More

सखूबरोबर वारीला पंढरपूरला जायची तुळशीबाईची तयारी सुरू झाली होती. पितळेचे तुळशी वृंदावन सखूने लख्ख घासून घेतलं. हळदीकुंकू वाहून तुळशीची पूजा केली. हार घातला. भक्तीभावाने नमस्कार केला… बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय! असा गजर करून सखूने तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलं आणि म्हणाली, “तुळशीबाई चला निघूया वारीला…” हा सोहळा इतर झाडं कौतुकाने बघत होती. “किती गं भाग्यवान दरवर्षी तुला वारी घडते.” “ये गं बाई जाऊन…” “विठुरायाला, रुक्मिणी मातेला आमचा नमस्कार सांग…” असं म्हणून झाडांनी तिला हात जोडले. “मी कुठली जाते! सखुबाई दिवसभर मला डोक्यावर घेते, म्हणून घडतं बघा. येते हं जाऊन…” असं म्हणत, झाडांचा निरोप…

Read More

श्रीयुत जनार्दन महाराजांच्या दिंडीबरोबर बहिणीने आणि मी आळंदी ते पुणे पायी वारी करायची ठरवली. त्या दिंडीचे नियोजन शैलाताई करत होत्या. त्यांनी सांगितले, “वारीमुळे आळंदीपासूनचा पाच-सहा किलोमीटरचा रस्ता वाहनांसाठी बंद असतो. त्यामुळे आपल्याला  बऱ्यापैकी चालावे लागणार आहे. म्हणून आपण लवकर निघू. तुम्ही बरोबर पहाटे पाच वाजता सारसबागेच्या दारात या.” आदल्या दिवशीच मी बहिणीकडे रहायला गेले. बहिणीचा मुलगा डॉक्टर श्रीपाद पुजारी रात्री दोन वाजता दीनानाथ हॉस्पिटलमधून घरी आला होता. त्याला इमर्जन्सी आली म्हणून जावं लागलं होतं. तेव्हा, तिच्या सुनेने डॉक्टर दिप्तीने आम्हाला सोडायचे ठरले. पहाटे साडेचार  वाजता आम्ही गाडीने निघालो. थोडा पाऊस पडून गेला होता. रस्त्यावर नीरव शांतता होती. रस्ता एकदम सुनसान…

Read More

आषाढ महिना सुरू झाला की, “भेटी लागी जीवा लागलीसे आस…” अशी स्थिती वैष्णवजनांची असते. मन धावू लागते पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलच्या दर्शनासाठी… आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रभरातून दिंड्या निघतात, त्यातील वारकऱ्यांच्या मुखी अखंड ‘ग्यानबा तुकारामा’चा जप आणि विठूरायाची भजनं असतात. या वारीत वर्षानुवर्षे सहभागी होणारे असतात, तसे पहिल्यांदाच वारीचा अनुभव घेणारे असतात. शनिवार, दि. 25 जुलै 2026 रोजी पंढरपुरी चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा जमेल, त्यानिमित्ताने… लेखनवारी माऊलींची पालखी निघाली डौलात कळस हालला वर बघा गगनात वारीचे गारूड भल्याभल्यांना भुलवते संसार सोडून म्हातारी वारीत पळते पाण्याची घागर डोक्यावर वाहते तेच मस्तकं आज वृंदावन पेलते थंडी वारा पाऊस सारंच सोसते सखी बरोबर आनंदाने फुगडी खेळते…

Read More

भुरभूर… भुरभूर पाऊस सुरू झाला. मी लगेच गॅलरीत गेले. समोरच्या घरातली छोटी मुलं बाहेर येऊन “येरे येरे पावसा तुला देतो पैसा” म्हणत नाचायला लागली. दोघं अगदी गोड आहेत… पाऊस वाढला. मुलं आत गेली. बराच वेळ पाऊस पडला. अंगणात पाणी साठलं होतं. थोड्या वेळाने पाऊस थांबला. मुलं आता काय करतील? कदाचित पावसाच्या साचलेल्या पाण्यात होड्या सोडतील… पाऊस आला धो धो पाणी व्हायलं सो सो सो पाण्यात बोट सोडली सोडली हातभर जाऊन बुडली बुडली… बोट बुडणार हे माहीत असलं तरी बोट सोडायचा मोह होतोच… माझं मन माझ्या लहानपणात गेलं. त्या मुलांवरून आठवले शाळेचे दिवस… नवीन रेनकोट घेतलेला. नेमका शाळेत जायच्या आणि यायच्या…

Read More

सकाळची वेळ… ती बेडरूममधून उठून बाहेर आली आणि म्हणाली, “अहो, दुधाची पिशवी आत आणता का? मगाशीच बेल वाजली…” “अरे, बेल कधी वाजली? मला नाही ऐकू आली. थांब… तू नको जाऊस मी घेतो. तुला बरं नाही. तू दोन दिवस अगदी आराम करायचा. हे आपल ठरलं आहे ना… म्हणून तर सकाळ संध्याकाळ डबा सांगितला आहे. दोन वेळचा चहा… तो काय, मी करीन!” तो एका दमात हे बोलला. ती आत गेली. त्याच्या लक्षात आलं आज आपण प्रथमच दूधाची पिशवी आत घेत आहोत, नाहीतर प्रत्येक वेळेस बेल वाजली की, तीच दार उघडते… हेही वाचा – मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे! पिशवी कापून दूध पातेल्यात…

Read More

सकाळी बागेत चालायला गेले होते. नेहमीचा ग्रुप बसला होता. सगळ्याजणी पासष्ठ ते पंच्याहत्तरीच्या आहेत. एक, दोन राऊंड घेऊन थोडा वेळ गप्पा मारत बसतात. संगीताचा खणखणीत आवाज लांबूनच कानी आला… “इतकं गुण्यागोविंदानी शांततेत सगळं जग चाललं होतं, तर मी म्हणते कशाला भांडणं उकरून काढायची?” “हो गं खरंच, त्या ट्रम्पला युद्ध करायची काय गरज होती?” जया म्हणाली, “त्यांचंही काहीतरी कारण असेल ना? त्याशिवाय का कोणी युद्ध करेल?” आज यांचा वेगळाच विषय ऐकून राऊंड न घेता मी तिकडेच गेले विचारलं, “आज काय इराण अमेरिका विषय का?” “सध्याचा तोच ज्वलंत प्रश्न आहे. म्हणूनच आज आम्ही त्याची चर्चा करत आहोत. ये…” मी त्यांच्या गप्पा ऐकायला…

Read More