Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु

    August 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑगस्ट 2026

    August 31, 2026

    ‘अफगाण डायरी : काल आणि आज’… मनाला भिडणारा काळाचा पट

    August 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अरे देवा…
    ललित

    अरे देवा…

    नीता चंद्रकांत कुलकर्णीBy नीता चंद्रकांत कुलकर्णीAugust 30, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, अभिजात मराठी, नीता चंद्रकांत कुलकर्णी, लेखिका नीता कुलकर्णी, लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी, देवाचे खरे दर्शन, श्रद्धेबरोबर विवेक, दागिन्यांनी मढलेला देव, देवाची श्रीमंती, देवाचे मूळ रूप, भक्त आणि देव, भक्ताचे देवदर्शन, देवाचे अलंकार
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सकाळ झाली. रोजच्या सारखे गुरुजी पूजा करण्यासाठी देवळात निघाले. पूर्वी देऊळ साधेसुधे होते. आता भव्य बांधले होते. पायरीला नमस्कार करून गुरुजी आत आले. अजून चार गुरुजी त्यांच्याबरोबर होते. ते पाचजण मिळून पूजा करत असत. चांदीचा भला मोठा दरवाजा उघडला होता. समोरच सोनं, मोती, हिऱ्याच्या दागिन्यांनी सजलेली देवाची मूर्ती होती. नमस्कार करून त्यांनी पूजा सुरू केली. प्रथम काळजीपूर्वक एकेक दागिना काढायला सुरुवात केली. दुसरे गुरुजी, ते दागिने पेटीत ठेवायला लागले. प्रत्येक वाराचे दागिने वेगळे होते.

    शुद्ध पाण्याने देवाचे स्नान झाले. चांदीच्या पाच भांड्यात पंचामृत होते. ते घातले. नंतर कोमट पाण्याने देवाला स्नान घातले. पंचाने देवाला पुसले. पितांबर नेसवला. अंगरखा घातला. शेला पांघरला… आणि नेहमी प्रमाणे दागिने घालायला सुरुवात केली. सर्वात मोठा सोन्याचा हार देवाच्या गळ्यापाशी नेला आणि काय झालं कळलं नाही… हार गळून पडला!

    “फासा तुटला का काय?” एका गुरुजींनी विचारले.

    हातात घेऊन बघितले तर, तो नीट होता. परत त्यांनी हार घेतला आणि घालायला लागले, तर तो खाली घरंगळाला… “अरेच्च्या, असं काय होतंय…” गुरुजींनी हार बाजूला ठेवला आणि हिऱ्याची कंठी घेतली. ती घालायला लागले, तर ती पण खाली आली. दुसऱ्या गुरुजींनी प्रयत्न केला तरी तसंच…

    तिसरे गुरुजी देवाजवळ आले. त्यांनी मोठी मोत्याची माळ घालायचा प्रयत्न केला तर… ती अचानक तुटलीच! मोती विखरून पडले. आता मात्र सगळे घाबरले. आज कुठलाही दागिना  देवाला घालता येत नव्हता. काहीतरी विपरीत घडते आहे, याची जाणीव झाली… सगळेजण घाबरले. ताबडतोब ट्रस्टींना फोन केला. ते धावत आले. त्यांनी वेगवेगळे दागिने घेऊन घालायचा प्रयत्न केला, पण आज एकही दागिना मूर्तीवर टिकत नव्हता.

    हेही वाचा – आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…

    गुरुजींना काय वाटले कोण जाणे, त्यांनी शेवंतीच्या फुलांचा हार देवाच्या गळ्यात घातला. तो मूर्तीवर स्थिर राहिला. हे काय गूढ आहे, हे कोणाला उमगेना…

    ही वार्ता लगेचच गावात पसरली. देवाला बघायला खूप गर्दी झाली. आज देवाचे मूळ रूप सर्वांसमोर होते!

    जवळ राहणारी म्हातारी काठी टेकत निघाली, “मला देवाला बघू दे…” म्हणायला लागली. लोकांनी तिला वाट करून दिली. जवळ जाताच म्हातारीला रडू आले. ती देवाशी बोलायला लागली… म्हणाली,

    “किती दिवसांनी दिसलास रे. सोन्या, मोत्यांच्या, हिऱ्यांच्या दागिन्यात पार बुडून गेला होतास.  तुझ्या या रूपाचं दर्शन घ्यायला डोळे आतुरले होते रे! आज माझा जीव सुखावला. माझा देव  दिसला… मला भेटला…”

    म्हातारीच बोलणं ऐकून लोकांचे डोळे भरून आले…

    प्रसादासाठीचे पेढे, बर्फी, लाडू यांनी भरलेले चांदीचे मोठे बाऊल बाजूला होते. म्हातारीने हातातले मूठभर शेंगदाणे देवाच्या तोंडाशी नेले…

    “खा रे देवा…”

    देव तिच्याकडे बघून हसला… असा तिला भास झाला. अत्यंत प्रेमाने देवाकडे बघत म्हातारीने हात जोडले…

    दागिन्यांची ही अतर्क्य गोष्ट सर्वांसमोर घडली होती. अवाक् होऊन गुरुजी बघत होते. जे घडत आहे, त्याचा अर्थ काय असेल? याचा सगळे विचार करायला लागले. तो उमगायला थोडा वेळ जावा लागला. देवाला दागिने नको आहेत का? असाच प्रश्न मनात आला.

    देव भावाचा भुकेला आहे. त्याला हे दिखाऊ सुंदर पण नको, तर निर्मळ मन हवं आहे… हे त्यांच्या लक्षात आले. देवाचं देवपण सोन्या-चांदीत नाही… दगडातल्या त्या देवपणाचं दर्शन आज भाविकांना झालं.

    हेही वाचा – संत जनाबाई… प्रत्यक्ष जगताना विठूरायाची साथ!

    देवाला दागिने घालायची हौस आपल्याला आहे. तो निर्गुण निराकार आहे… त्याच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेऊन सर्व भाविकांना मनोमन आनंद होत होता. प्रत्येकजण सुखावला होता… गावात चर्चा रंगली.

    गावकऱ्यांना समजलं की, देवाने आज आपल्याला महत्त्वाची बाब लक्षात आणून दिलेली आहे. आता आपण प्रत्येक कृती करताना विचारपूर्वक करायला हवी आहे. मी जे करतो आहे, ते देवाला आवडेल का? असे प्रत्येकानी स्वतःच्या मनाला विचारायला हवे आहे. आपले वागणे संयमपूर्वक हवे.

    पटलं का तुम्हाला? तुम्ही सुज्ञ आहात. ही कथा का लिहिली, हे तुम्हाला कळले असेलच. ते अंतःकरणापासून जाणून मात्र घ्या… आणि मुख्य म्हणजे, तसं वागायचा प्रयत्न करा… श्रद्धा ठेवा, पण त्याबरोबर विवेकाची साथ असू दे!

    Avatar photo
    नीता चंद्रकांत कुलकर्णी

    एमए असून माझे वय 73 आहे. मी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांत कथा लिहित होते. माझा ‘पूजा’ हा कथासंग्रह सरकारी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला आहे. पूर्वी छोट्या ग्रुपमध्ये कथाकथन करत होते. माझे मिस्टर स्टेट बँकेत नोकरीला होते. आता रिटायर आहेत. आम्ही सांताक्रुजला रहात असताना काही वर्षं तेथे कौन्सिलिंग करत होते. पुण्यात आल्यानंतर काही वर्षे मी पौरोहित्य करत होते. सध्या थोडेफार लिखाण सुरू आहे. मोबाइल - 9763631255

    Related Posts

    ‘अफगाण डायरी : काल आणि आज’… मनाला भिडणारा काळाचा पट

    August 30, 2026 ललित

    जुम्मन चाचाची अधुरी प्रेमकहाणी!

    August 30, 2026 ललित

    कोलांटी उडी

    August 29, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    ‘अफगाण डायरी : काल आणि आज’… मनाला भिडणारा काळाचा पट

    By डॉ. अस्मिता हवालदारAugust 30, 2026

    ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांच्या ‘अफगाण डायरी -काल आणि आज’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1982…

    जुम्मन चाचाची अधुरी प्रेमकहाणी!

    August 30, 2026

    कोलांटी उडी

    August 29, 2026

    श्रमिक

    August 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु

    August 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑगस्ट 2026

    August 31, 2026

    ‘अफगाण डायरी : काल आणि आज’… मनाला भिडणारा काळाचा पट

    August 30, 2026

    अरे देवा…

    August 30, 2026

    जुम्मन चाचाची अधुरी प्रेमकहाणी!

    August 30, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 30 ऑगस्ट ते 05 सप्टेंबर 2026

    August 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 415
    • अवांतर 206
    • आरोग्य 142
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 558
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 24
    • ललित 888
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु

    August 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑगस्ट 2026

    August 31, 2026

    ‘अफगाण डायरी : काल आणि आज’… मनाला भिडणारा काळाचा पट

    August 30, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.