Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: माधवी जोशी माहुलकर
एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.
पोहे हा प्रकार जवळपास सर्वांच्याच आवडीचा आहे! पोह्यांचे विविध प्रकार महाराष्ट्रात प्रचलित आहेत. अगदी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम तर कांदे पोह्यांशिवाय अपूर्णच आहे! हे समीकरण ठरलेलेच… बटाटे पोहे, मटकीची उसळ पोहे, चण्याचा रस्सा पोहे, दडपे पोहे, नारळाच्या दुधातील पोहे, कोळाते पोहे, चहा पोहे, दूध पोहे, तिखट-मिठाचे पोहे… याशिवाय गोपाळकाला, दिवाळीतील पोह्यांचा चिवडा असे सर्व पदार्थ जाड किंवा पातळ पोह्यांशिवाय अधुरेच नाही का? अशा या पोह्यांचा आज एक नवीन आणि टेस्टी प्रकार म्हणजेचं पोह्यांचे पराठे कसे करतात ते आपण पाहुयात. साहित्य पोहे – दीड वाटी बटाटे – 3 हिरवी मिरची – 2 कोथिंबीर – चिरलेली मूठभर आलं – एक इंच तुकडा धणे…
आशाताई भोसले निवर्तल्या हे स्वीकारायला, अजूनही मन तयार होत नाहीये. अफाट व्यक्तिमत्व असलेल्या आशाताई एका अढळ दीपस्तंभासारख्या जीवनात आलेल्या अनेक संकटांशी सामना करीत होत्या, तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचे खळीदार हास्य कधीच कमी झाले नव्हते! अतिशय खट्याळ, खोडकर परंतु प्रसंगी धीरगंभीर, निडर, आक्रमक… जे रुचेल, पटेल तेच करणाऱ्या आशाताई म्हणजे बंडखोर व्यक्तिमत्त्वाची धनीच म्हणायला हवे! याबाबतीत त्यांचे वैयक्तिक असे स्वतःचे निर्णय असतील तर, ते निभावून नेण्याची क्षमता त्यांच्याकडे निश्चितच होती. खरंतर, लता मंगेशकरसारखी दैवी सुरांची नैसर्गिक देणगी असलेली मोठी बहीण लाभलेल्या आशाताईंना नेहमीच दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. परंतु लता दिदींसारख्या तेजस्वी आणि प्रतिभावान गायिकेसमोर तिच्या इतकेच मानसन्मान मिळवून तिच्याबरोबरीने गात राहून…
भारतीय मसाल्यांचा प्रवास ही एक विस्मयकारक गाथा आहे. या मसाल्यांचा उल्लेख 3000 ते 5000 वर्षांपूर्वीच्या ऋग्वेदात आणि अथर्ववेदात आढळतो. त्याकाळी मसाले केवळ चवीसाठी नाही, तर औषध (Medicine) म्हणून वापरले जात. सुश्रुत आणि चरक यासारख्या ऋषींनी मसाल्यांच्या औषधी गुणधर्मांचे दस्तऐवजीकरण केले. मेसोपोटेमिया आणि इजिप्तच्या संस्कृतींशी भारताचा मसाल्यांचा व्यापार ख्रिस्तपूर्व काळापासून सुरू होता. इजिप्तमधील ‘ममी’ जतन करण्यासाठी भारतीय दालचिनी आणि मिरी वापरली जात असे! मध्ययुगात भारतीय मसाल्यांची मागणी युरोपमध्ये प्रचंड वाढली. काळी मिरी इतकी मौल्यवान होती की, तिला ‘काळे सोने’ म्हटले जाई. अनेकदा खंडणी किंवा कर भरण्यासाठी सोन्याऐवजी मिरी वापरली जात असे. मध्यकाळात मसाल्यांचा व्यापार प्रामुख्याने अरब व्यापाऱ्यांच्या हातात होता. ते भारतातून…
उन्हाळा आला की, विदर्भात चिवळीची आणि घोळीची भाजी दिसायला लागते. पुष्कळ लोक घोळीलाच चिवळ समजतात. परंतु विदर्भातील लोक या दोन भाज्यांमधील फरक अचूक ओळखतात. चिवळीची पाने एकदम बारीक आणि आकाराने तांदळाच्या दाण्यांएवढी असतात. याची देठे लालसर गुलाबी आणि एकदम गवताच्या काड्यांसारखी असतात. याची पाने मऊसर आणि पाण्याने भरलेली असल्याने स्पर्शाला एकदम नरम तसेच थंड असतात. त्यामुळे पूर्वी बऱ्याच गावांमध्ये जेव्हा कूलर, एसी नव्हते, त्या काळात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एका मोठ्या दुरडीत म्हणजे बांबूच्या टोपलीत ही चिवळ भाजी पसरवून घेत आणि त्यावर नरम सुती कापडाची किंवा साडी / पातळाची अथवा धोतराची चौघडी अंथरवून त्यावर लहान बाळांना ठेवत असत. कारण, ही भाजी मुळातच…
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा फटका भारताला बसला आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागल्याने लोकांनी इंडक्शन, इलेक्ट्रिक कूकर, मायक्रेवेव्ह तातडीने विकत घेण्यास सुरुवात केली. परंतु आता तर युद्धविराम झाले तर, या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा पुढे वापर झाला तर बरं, नाहीतर या वस्तू अडगळीत जातील किंवा त्यांचा गरजेनुसार उपयोग केला जाईल, असं वाटतं. कारण, माझ्यासारख्या गृहिणींना अजूनही गॅसवरच स्वयंपाक करायची सवय आहे आणि पोहे, रवा, शेंगदाणे यासारखे पदार्थ भाजण्याकरिता मला गॅसवर कढईत हे पदार्थ भाजायला बरे वाटतात… माझ्या मते शेवटी भारतीय गृहिणींना त्यांच्या किचनमध्ये अनेक पदार्थ वेगवेगळ्या तापमानावर करायची सवय असते; फार क्वचित त्या मायक्रोवेव्ह किंवा ओटीजीचा वापर करताना दिसतात. परंपरागत…
विदर्भात बहुतेक वेळेस सकाळच्या किंवा दुपारच्या नाश्त्याकरिता बनवला जाणारा पोटभरीचा पदार्थ म्हणजे उकडपेंडी (उकरपेंडी)! गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठापासून तयार केला जाणारा चविष्ट असा हा पदार्थ आहे. खूपजण उकडपेंडी ही एकतर फक्त गव्हाच्या पिठाची करतात किंवा फक्त ज्वारीचे पीठ वापरून करतात, परंतु मी मात्र दोन्ही पिठं मिक्स करून उकडपेंडी करते. करायला सोपा आणि फारशी तयारी न करता चटकन होणारा हा पदार्थ आहे. रव्याचा उपमा नाश्त्याचा अविभाज्य अंग झालेला आहे, परंतु कधीतरी थोडाबहुत उपम्यासारखाच परंतु वेगळ्या पिठांचा आणि चवीला वेगळा असा उकडपेंडी हा पदार्थ करायला काहीच हरकत नाही. संध्याकाळी पोळ्या करायचा कंटाळा आला अथवा कुठून थकून-भागून आलात तर ही उकडपेंडी लगेच तयार…
1984 साली क्राऊन कंपनीचा ब्लॅक ॲण्ड व्हाइट टीव्ही आमच्या घरी आला, तोही माझ्या आजीच्या आग्रहाखातर! त्या सालात भारताच्या आयर्न लेडी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती, त्याच्या तीन-चार महिनेआधी हा टीव्ही आमच्या घरी आला होता. त्या सालात जसा या टीव्हीने आमच्या घरात प्रवेश केला, तसा चोवीस तास घरात वाजणारा रेडिओ मान टाकून हिरमुसला होऊन खुंटीवर जाऊन लटकला. त्या काळात त्याच्याकडे जरा दुर्लक्षचं झालं… तेव्हा घराघरातून सतत रेडिओचा आवाज ऐकायला मिळायचा. सकाळी सहा वाजता त्याच्या विशिष्ट ट्युनने रेडिओ सगळ्या लोकांची सकाळ प्रसन्न करायचा. त्यानंतर भक्तीगीतांच्या स्वरांनी सर्व घर न्हाऊन निघायचं. महाराष्ट्रात सकाळी बरोबर सात वाजता मराठी बातम्या देणाऱ्या…
॥ अथश्री इडलीका कुमारी कथा आरंभस्य ॥ दक्षिण भारताचे प्रमुख खाद्यपदार्थांपैकी एक अशी ओळख असलेली ‘इडली’ ही आता संपूर्ण भारतातच नव्हे तर पार साता समुद्रापलीकडे आपल्या नावाचा डंका पिटत आहे. दक्षिण भारताची ही लाडकी इडली नावाची राजकुमारी भारतातील तमाम अन्नपदार्थांमध्ये आपल्या पौष्टिक घटकांमुळे मानाचे स्थान पटकावून बसली आहे. या इडलीकुमारीची कहाणी देखील मनोरंजक आहे बरं का! तुम्हाला जर सांगितले की, इडली ही दक्षिण भारतीय पदार्थ नाही तर, तुमचा यावर विश्वास बसेल? नाही ना? माझाही नव्हता बसला! परंतु मी जेव्हा इडलीच्या इतिहासाचा मागोवा घेतला, तेव्हा या इडलीकुमारीच्या बऱ्याच रंजक कथा समोर आल्या. तुम्हालाही ऐकायला आवडेल, या इडलीकुमारीची कथा… चला तर मग…
उन्हाळ्यात कैरी बाजारात यायला सुरुवात होते, तेव्हापासून विदर्भातील गाव-खेड्यांमध्ये, घरोघरी आंब्याची कढी केली जाते. आमच्याकडे कच्च्या कैरीलाही आंबाच म्हणतात आणि पिकलेल्या आंब्याला सुद्धा आंबाच म्हणतात! रोडगे, वांगी-बटाट्याची भाजी, साधं वरण, गूळ- तूप आणि ही आंब्याची कढी याने हनुमान जयंतीच्या भंडाऱ्यांची सांगता होत असते. वर्धा, नागपूर जिल्ह्यांमध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने जे कार्यक्रम होतात, तेव्हा गावागावांतील हनुमानाच्या मंदिरांमध्ये हा प्रसाद ठरलेला असतो. नाहीच काही तर, मसालेभात आणि कढी हे नागपूरच्या कुठल्याही भंडाऱ्यातील ठरलेले पदार्थ आहेत. याच कढी प्रकारातील वैशिष्ट्यपूर्ण अशी ही आंब्याची किंवा कैरीची कढी आहे. उन्हाळ्यात तलखी देणारा असा पदार्थ आहे. चला तर मग जाणून घेऊया कैरीच्या कढीची रेसिपी! साहित्य कैऱ्या…
यावर्षी नागपूरच्या रेशीमबाग येथे भरलेल्या ‘महालक्ष्मी सरस’ या प्रदर्शनात जाण्याचा योग तीन वर्षांनी आला. तीन वर्षांपूर्वी मी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे ‘दत्तकृपा शेवई केंद्र’ चालवणाऱ्या हिराताई शेकोकार यांच्याकडून पालक शेवया आणि बिटरूट शेवया या प्रदर्शनात विकत घेतल्या होत्या. त्या वेळेस त्यांचे शेवयांमधील हे नाविन्यपूर्ण प्रकार मनाला भावले. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून त्यांच्याकडून मी दोन-तीनदा या विविध प्रकारच्या शेवया आणि पापडा (जो विदर्भात प्रसिद्ध आहे) हिराताईंकडून ॲानलाइन विकत मागवला. आमचे हे सगळे व्यवहार कुरिअरद्वारे चालायचे. हिराताईंच्या व्हॅाट्सॲप नंबरवर मला हव्या असलेल्या पदार्थांची ॲार्डर टाकल्यावर लगेच चार ते पाच दिवसांत नागपूरला घरपोच हे वाळवणाचे पदार्थ मिळायचे. याशिवाय, बाकी आमच्यात तसे फारसे काही…

