Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेख, मराथी संस्कृती, प्राचीन संस्कृती, कच्ची रसोई पक्की रसोई, तळणाचे पदार्थ, पाण्यावर बनवलेले पदार्थ, भारतीय खाद्यसंस्कृती, प्राचीन खाद्यसंस्कृती, मंगलकार्यातील पक्की रसोई, पाण्यावरचे खाद्यपदार्थ,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील पदार्थ खात असत. सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असताना देखील त्या आपला हा नियम मोडत नसत. त्या सेटवर नेहमी आपले जेवण स्वतःच तयार करायच्या… त्याकरिता त्या स्वतःसोबत एक स्टोव्ह, स्वयंपाकाची भांडी आणि शिधा सोबत नेत असत. तुपात किंवा तेलात तळलेले अन्न ‘पवित्र’ मानले जाते आणि त्याला बाहेरील अशुद्धतेचा विटाळ होत नाही, अशी त्यांची धार्मिक धारणा होती.

    पक्की रसोई लवकर खराब होत नाही, त्यामुळे शूटिंगच्या लांबच्या वेळापत्रकात ते सोयीचे पडायचे. ‘ शोले’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक प्रसिद्ध किस्सा सांगितला जातो की, रामगडच्या सेटवरही त्यांनी आपले सोवळे पाळले होते. तिथेही त्या आपले वेगळे अन्न आणि पक्की रसोई यावरच भर देत असत. त्यांच्या या सवयीचा सर्व कलाकार (धर्मेंद्र, अमिताभ बच्चन इत्यादी) खूप आदर करत असत.

    माझ्या लहानपणी आमच्या घरी लग्नकार्याच्या वेळेस एक उत्तर प्रदेशी महाराज स्वयंपाकाकरिता यायचे. त्यांचा माझ्या वडिलांना नेहमी एक प्रश्न असायचा की ,”पक्की रसोई में क्या बनेगा और कच्ची रसोई में क्या बनेगा? इसकी लिस्ट दीजिए!” पक्क्या आणि कच्च्या रसोईतील त्यांचे पदार्थ ठरलेले असायचे आणि त्याकरिताच ते हा प्रश्न विचारायचे! ‘कच्ची रसोई’ आणि ‘पक्की रसोई’ या संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला प्राचीन भारतीय समाजशास्त्र, आयुर्वेद आणि अन्नाकडे पाहण्याचा अध्यात्मिक दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल. हिंदू धर्मशास्त्रांनुसार, अन्नाचे दोन प्रकारात वर्गीकरण केले गेले – कच्ची रसोई आणि पक्की रसोई! कच्च्या रसोईत हे अन्न ‘कच्चे’ मानले जाते, कारण ते पाण्यात शिजवले जाते. पाणी हे कोणत्याही गोष्टीला शोषून घेणारे माध्यम आहे, असे मानले जाई. त्यामुळे ज्या व्यक्तीने ते शिजवले आहे, त्या व्यक्तीचे विचार आणि शारीरिक शुद्धता त्या अन्नात लवकर उतरते. म्हणूनच, जुन्या काळात कच्ची रसोई केवळ आपल्या घरातील स्त्रियांनी किंवा अत्यंत जवळच्या व्यक्तींनी बनवलेलीच खाल्ली जात असे.

    तूप किंवा तेल हे अग्नीचे रूप मानले जाते. जेव्हा एखादा पदार्थ (उदा. पुरी, अनारसे, गुजिया, इमरती) कडकडत्या तुपात तळला जातो, तेव्हा तो ‘संस्कारित’ होतो. तुपामुळे त्या अन्नावर एक प्रकारचे संरक्षण कवच तयार होते, ज्यामुळे बाहेरील अशुद्धतेचा (किंवा बनवणाऱ्याच्या स्पर्शाचा) त्यावर परिणाम होत नाही. म्हणूनच पक्की रसोई ही सामाजिक मेजवान्यांमध्ये – जसे की भंडारा किंवा मोठी लग्नकार्ये यामध्ये – अधिक वापरली जाते.

    कच्ची रसोई सहसा पितळेच्या किंवा मातीच्या भांड्यात शिजवली जाई तर, पक्की रसोई करण्यासाठी लोखंडी कढईचा वापर अनिवार्य मानला जाई. आजही हलवायांकडे तुम्ही पाहिलं असेल, तर इमरती, कचोरी किंवा जिलेबी नेहमी मोठ्या लोखंडी कढईतच तळली जाते. लोखंडी कढई आणि कढत तूप हे ‘पक्क्या’ अन्नाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. जुना काळ आठवून पाहा… जेव्हा रेल्वेमध्ये ‘पँट्री कार’ नसायची. तेव्हा उत्तर भारतीय लोक आपल्या सोबत कापडी पिशवीत डब्यामधे ‘अचारी पुरी आणि मठरी, कचोरी’ असे पदार्थ घेऊन प्रवास करायचे. हे पदार्थ पाच-सहा दिवस खराब होत नसत. यालाच ‘पक्की शिदोरी’ म्हटले जाई.

    हेही वाचा – Recipe : पोळीचे चटकदार खस्ते!

    महाराष्ट्रात प्रवासाला निघताना आजही अनेकजण दशमी (दूध आणि गूळ घालून बनवलेली पोळी) किंवा पुरी-बटाट्याची भाजी नेतात. याचे कारण तेच आहे — हे पदार्थ ‘पक्के’ असल्यामुळे लवकर खराब होत नाहीत आणि ते ‘कच्च्या’ अन्नापेक्षा जास्त काळ टिकतात. महाराष्ट्रात आपण जरी याला ‘कच्ची-पक्की रसोई’ म्हणत नसलो, तरी “पाण्यातले अन्न” आणि ‘तेला-तुपातले अन्न’ हा फरक आपल्याकडेही तितकाच महत्त्वाचा आहे.

    कच्च्या रसोईत पाण्याचा अंश जास्त असतो. विज्ञानानुसार, ज्या अन्नात ओलावा जास्त असतो, तिथे जिवाणूंची (Bacteria) वाढ वेगाने होते. त्यामुळे हे अन्न 4-6 तासांत खराब होऊ लागते. त्याला ‘बासी’ म्हणजेच ‘शिळे’ मानले जाते. त्याकरिताच कच्च्या रसोईतील अन्न लगेचच संपवले जातात. पक्क्या रसोईत (पुरी, मिठाई, मठरी) तळल्यामुळे पाण्याचा अंश निघून गेलेला असतो आणि त्यावर तुपाचा थर असतो. त्यामुळे हे अन्न 24 ते 48 तास किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकते. महाराष्ट्रात वरण-भात, आमटी, पोळी, भाकरी, कोशिंबीरी हे पदार्थ कच्ची रसोईमध्ये येतात. आपल्याकडे सणावारांना पुरी, भजी, वडे असे तळणीचे तसेच रबडी, बासुंदी यासारखे गोड पदार्थ पक्की रसोईमध्ये येतात, असे म्हणावे लागेल. कारण, महाराष्ट्रात कच्ची रसोई किंवा पक्की रसोई असा संबंध नसून आपल्याकडे सणावारांना किंवा  धार्मिक कार्याकरता जो प्रसाद वगैरे केला जातो अथवा विशेष अतिथींना पाहुणचार करताना जे तळणाचे किंवा गोडाधोडाचे पदार्थ केले जातात, त्याचा संबंध सोवळ्या-ओवळ्याशी असावा!

    महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीमध्ये ‘कच्ची रसोई’ आणि ‘पक्की रसोई’ हे शब्द उत्तर भारताप्रमाणे सर्रास वापरले जात नाहीत, तरीही ती संकल्पना मात्र पूर्णपणे अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात रोजच्या जेवणात जे पदार्थ आपण मुख्यत्वे खातो, ते ‘कच्ची रसोई’ मध्ये मोडतात. वरण-भात हे पाण्यात उकळून शिजवले जाते, त्यामुळे हे ‘कच्चे’ मानले जाते. पोळी (चपाती), भाकरी जरी या भाजल्या जात असल्या तरी, पीठ मळताना पाण्याचा वापर होतो आणि त्या तुपात तळल्या जात नाहीत म्हणून कच्च्या रसोईत त्यांचा समावेश होतो. सण-समारंभात किंवा प्रवासात जे पदार्थ आपण बनवतो, ते ‘पक्की रसोई’मध्ये येतात. विशेष म्हणजे, पुरणपोळीला भरपूर साजूक तूप लावून खाल्ले जाते, तरीही ती ‘कच्ची’ मानली जात असे. मात्र, तळलेली करंजी, अनारसे किंवा सांजोरी, पाकातील पुरी हे ‘पक्के’ पदार्थ आहेत. शिवाय, लाडू, पेढे हे सर्व ‘पक्की रसोई’चे पदार्थ आहेत.

    महाराष्ट्रात ‘कच्ची रसोई’ आणि ‘पक्की रसोई’चा संबंध ‘सोवळ्या’शी जोडला जातो. जुन्या काळी देवकार्यात किंवा ब्राह्मणांना जेवायला वाढताना ‘कच्चे अन्न’ (वरण-भात, भाजी, आमटी, पोळी वगैरे) वाढण्याचे नियम खूप कडक असत. ते पदार्थ सोवळ्यातच बनवले जात. प्रवासात किंवा उपवासाच्या दिवशी जे पदार्थ चालतात (उदा. साबुदाणा खिचडी किंवा तळलेले पदार्थ), त्या बाबतीत नियम थोडे शिथिल असत. थोडक्यात सांगायचे तर, शब्दांची नावे बदलली तरी अन्नाचे शास्त्र संपूर्ण भारतात सारखेच आहे. उत्तर भारतात त्याला ‘पक्की रसोई ‘म्हणतात. तर, महाराष्ट्रात आपण त्याला तळण किंवा फराळ म्हणतो. दक्षिण भारतात त्याला ‘ भक्षणम्’ किंवा ‘नेय प्रसादम्’ (तुपाचा प्रसाद) म्हटले जाते. हे सर्व प्रकार एकाच तत्त्वावर चालतात!

    कच्ची आणि पक्की रसोई या केवळ जेवणाच्या पद्धती नसून, त्या काळाच्या सामाजिक विज्ञानाचा आणि आरोग्यशास्त्राचा एक अद्भूत नमुना आहेत. शास्त्रानुसार, दूध हे पक्के मानले जाते. पूर्वीच्या काळात किंवा आजही जर तुम्ही कुणाच्या घरी पाणी पिण्यास कचरत असाल (सोवळ्यामुळे), तर दूध पिणे सुरक्षित मानले जाते; कारण दुधाला अग्नीवर तापवून ‘संस्कारित’ केलेले असते. म्हणूनच पक्क्या रसोईच्या जेवणात दुधाचे पदार्थ (जसे की, खीर किंवा बासुंदी) हमखास असतात.

    हेही वाचा – वर्ध्यातील गोरस पाक म्हणजे स्वर्गीय सुख!

    प्राचीन समजुतीनुसार, अग्नी हा शुद्धीकरण करणारा सर्वात मोठा घटक आहे. जेव्हा एखादा पदार्थ (उदा. इमरती किंवा पुरी) उकळत्या तेलात किंवा तुपात टाकला जातो, तेव्हा अग्नी त्यातील सर्व ‘दोष’ नष्ट करतो, अशी धारणा होती. म्हणूनच, पक्की रसोई ही ‘विश्वमान्य’ होती; ती कोणीही बनवली तरी ती पवित्र मानली जात असे. एखाद्या पाहुण्याला तुम्ही कच्ची रसोई (डाळ-भात) वाढली, तर त्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही त्याला घरचा माणूस मानता आणि जर पक्की रसोई (पुरी-मिठाई) वाढली, तर तो परका किंवा पाहुणा मानला जातो. विशेष तळणाचे आणि गोडाधोडाचे पदार्थ करून त्यांचा सन्मान केला जातो. त्यामुळे उत्तर भारतात आजही एक म्हण प्रचलीत आहे, “कच्ची खाए दोस्ती, पक्की खाए नातेदारी…” किंवा “कच्ची रसोई घर की, पक्की रसोई पर की…”


     

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    पोळी करणे… चंमतग

    June 19, 2026 फूड काॅर्नर

    माझी सरगुंड्यांची घसरगुंडी!

    June 19, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    पोळी करणे… चंमतग

    By प्रणाली मंगेश महाशब्देJune 19, 2026

    दोन मैत्रिणींमधला संवाद… पहिली – अगं फोटो बघितला का? आज किनाई माझ्या लेकाने मला पोळी…

    माझी सरगुंड्यांची घसरगुंडी!

    June 19, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    June 22, 2026

    Dnyaneshwari : कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी

    June 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 336
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 464
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 22
    • ललित 725
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026
    Most Popular

    बेटर हाफ

    June 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.