Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » महालक्ष्मी सरस… ग्रामीण जिद्दीची अनोखी गाथा!
    अवांतर

    महालक्ष्मी सरस… ग्रामीण जिद्दीची अनोखी गाथा!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरMarch 27, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, महालक्ष्मी सरस प्रदर्शन, ग्रामीण गृहउद्योग, महिला गृहउद्योग, ग्रामीण अर्थचक्राला बळ, ग्रामीण कारागीरांचे कष्ट, अचलपूरच्या हिराताई शेकोकार, रत्नागिरीच्या सीमाताई कदम, ग्रामीण खाद्यपदार्थ, अस्सल ग्रामीण पदार्थ,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    यावर्षी नागपूरच्या रेशीमबाग येथे भरलेल्या ‘महालक्ष्मी सरस’ या प्रदर्शनात जाण्याचा योग तीन वर्षांनी आला. तीन वर्षांपूर्वी मी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे ‘दत्तकृपा शेवई केंद्र’ चालवणाऱ्या हिराताई शेकोकार यांच्याकडून पालक शेवया आणि बिटरूट शेवया या प्रदर्शनात विकत घेतल्या होत्या. त्या वेळेस त्यांचे शेवयांमधील हे नाविन्यपूर्ण प्रकार मनाला भावले. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून त्यांच्याकडून मी दोन-तीनदा या विविध प्रकारच्या शेवया आणि पापडा (जो विदर्भात प्रसिद्ध आहे) हिराताईंकडून ॲानलाइन विकत मागवला. आमचे हे सगळे व्यवहार कुरिअरद्वारे चालायचे. हिराताईंच्या व्हॅाट्सॲप नंबरवर मला हव्या असलेल्या पदार्थांची ॲार्डर टाकल्यावर लगेच चार ते पाच  दिवसांत नागपूरला घरपोच हे वाळवणाचे पदार्थ मिळायचे. याशिवाय, बाकी आमच्यात तसे फारसे काही बोलणे व्हायचे नाही. परंतु यावेळी रेशीमबागेतील प्रदर्शनात गेल्यावर हिराताईंनी मला एवढ्या गर्दीतून बरोबर ओळखले आणि हाक मारून विचारले की, “ताई, मला ओळखलं का?” मीपण त्यांचा स्टॅाल शोधतच होते. त्यांना मला भेटून खूप आनंद झाला होता. त्यांच्या मुलाने आमचा दोघींचा फोटोपण काढला. त्यांच्यासोबत मला फोटो काढताना पाहून तेथील लोकांचे कुतूहल वाढले आणि हिराताईंनी त्यांना माझ्याबद्दल सांगितले की, त्यांच्याकडून घेतलेल्या शेवयांच्या या ताई रेसिपी करतात आणि त्या रेसिपींचे फोटो देखील हिराताईंनी मला, तिथे जमलेल्या लोकांना दाखवायला सांगितले. ते फोटो आणि त्यांच्या रेसिपीज् पाहून त्या दिवशी नक्कीच हिराताईंचा माल खपला असेल, कारण मी निघेस्तोवर त्यांच्या स्टॉलवर गर्दी बरीच वाढली होती….

    हिराताईंच्या येथे पालक, बिटरूट शेवयांसोबत टोमॅटो शेवई, पाइनॅपल शेवई विक्रीला असतात. त्यापैकी मी पालक शेवया, बिटरूट शेवया आणि पाइनॅपल शेवया वापरल्या आहेत. बिटरूट आणि पाइनॅपल शेवयांची खीर केली तर, पालक शेवईचा उपमा केला होता… जो चविला उत्तम होतो. आता मला त्यांच्याकडील टोमॅटो शेवया वापरून पाहायला आवडेल. याशिवाय, त्यांच्याकडे विदर्भातील प्रसिद्ध वाळवणाचा पापडा हा प्रकार सुद्धा मिळतो जो नाश्त्याकरिता उत्तम पर्याय आहे!

    हेही वाचा – आठवडी बाजारातील भातकं!

    ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन हे केवळ एक प्रदर्शन नसून महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था आणि महिला सक्षमीकरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’मार्फत (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) आयोजित केले जाणारे हे प्रदर्शन ग्रामीण कारागिरांच्या कष्टाला हक्काची बाजारपेठ मिळवून देते. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा आहे. गृहिणींना उद्योजिका बनवण्यामध्ये या प्रदर्शनाचा मोठा वाटा आहे. यामुळे महिलांच्या हातात थेट आर्थिक उत्पन्न येते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढते. शहरातील पैसा ग्रामीण भागात वळवण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. मध्यस्थांची (Middlemen) साखळी मोडीत काढून, कारागिरांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळतो. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल या प्रदर्शनातून होते, जी ग्रामीण अर्थचक्राला गती देते.

    या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दुर्मीळ हस्तकला, वारली चित्रकला, पैठणी, कोल्हापुरी चपला आणि मातीची भांडी पाहायला मिळतात. एवढेच नाही तर, या प्रदर्शनात धनगरी घोंगडी, ज्याला कांबळ देखील म्हटले जाते, तेपण येथे विक्रीस उपलब्ध होते. यंत्रयुगाच्या काळात या पारंपरिक कला टिकवून ठेवण्याचे आणि त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘महालक्ष्मी सरस’ करते. ग्रामीण महिलांना आपले उत्पादन शहरात कसे विकायचे, पॅकेजिंग कसे असावे आणि ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण या प्रदर्शनामुळे मिळते. अनेक बचत गटांच्या उत्पादनांना येथूनच ‘ब्रँड’ म्हणून ओळख मिळते.

    महालक्ष्मी सरसचे खास आकर्षण म्हणजे तेथील खाद्यदालन! ज्वारीची भाकरी, पिठलं, झणझणीत नागपूरी सावजी मटण/ चिकन रस्सा, कोकणी मासे आणि पुरणपोळी यासारख्या अस्सल मराठमोळ्या पदार्थांची चव शहरवासीयांना एकाच छताखाली चाखायला मिळते. यावेळेस तर येथे कोकणातील प्रसिद्ध पातोळ्या, रस शिरवाळे, उकडीचे मोदक, सोलकढी यांचेपण स्टॅाल्स पहायला मिळाले. थोडक्यात सांगायचे झाले तर, ‘महालक्ष्मी सरस’ हे केवळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीचे ठिकाण नसून, ते ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती, जिद्द आणि अस्मितेचे दर्शन घडवणारा एक मोठा उत्सव आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे गृहउद्योग हे केवळ व्यवसाय नसून त्या त्या भागाची संस्कृती आणि तिथल्या कष्टकरी महिलांच्या जिद्दीचे दर्शन आहे.

    या प्रदर्शनाचा सर्वात मोठा आणि लोकप्रिय विभाग आहे, घरगुती आणि पारंपरिक पदार्थांच्या गृहउद्योगांचा! ज्यामधे कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला, खान्देशी मसाला, कोकणी मालवणी मसाला आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी, वायगांवची हळद, भिवापूरी मिर्चीचे तिखट, कांडप यंत्रावर केलेले विविध प्रकारचे मसाले, घरगुती पद्धतीने बनवलेले कैरी, लिंबू, मिरचीचे लोणचे आणि नाचणी, तांदूळ, बटाट्याचे पापड-कुरडया, मुगवड्या, कळण्याच्या वड्या वगैरे… शिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या डाळी, तांदूळ (उदा. आंबेमोहर, वाडा कोलम) आणि हातसडीचे तांदूळ इत्यादी. या प्रदर्शनामुळे अनेक छोटे गृहउद्योग आज मोठ्या ब्रँडमध्ये रूपांतरित झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी गोळा केलेला शुद्ध मध आज शहरांमधील मोठ्या दुकानांपर्यंत पोहोचला आहे. कोकणातील महिला बचत गटांनी पॅकेजिंग सुधारल्यामुळे त्यांच्या सुक्या मासळीला मुंबई-पुण्यासारख्या शहरांत मोठी मागणी निर्माण झाली आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की, या प्रदर्शनातील उत्पादने विकत घेताना आपण थेट एका ग्रामीण कुटुंबाला आणि त्यांच्या मेहनतीला पाठिंबा देत असतो. यातील बहुतांश उत्पादने ही रसायनमुक्त आणि नैसर्गिक असतात, जे आपल्या आरोग्यासाठीही उत्तम असतात. ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या गावात राहून ग्राहकांच्या नेमक्या आवडीनिवडी कळत नाहीत. या प्रदर्शनात हजारो शहरी ग्राहक येतात, त्यांच्याशी थेट संवाद साधल्यामुळे ग्राहकांना कोणत्या प्रकारची चव आवडते? कोणत्या रंगाच्या किंवा डिझाइनच्या वस्तूंना जास्त मागणी आहे? वस्तूंची किंमत किती असावी? हे सर्व थेट व्यावहारिक ज्ञान त्यांना मिळते.

    मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या विक्रीमुळे महिलांना आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन समजते. क्यूआर कोड (QR Code), गूगल पे किंवा कार्ड पेमेंट कसे वापरावे, याचे तंत्र त्या आत्मसात करतात. कच्चा माल, वाहतूक आणि स्टॉलचा खर्च वजा करून प्रत्यक्ष नफा कसा मोजावा, याचे शिक्षण त्यांना मिळते. जेव्हा एखादी ग्रामीण महिला आपल्या हाताने बनवलेली वस्तू मोठ्या आत्मविश्वासाने शहरी ग्राहकाला विकते, तेव्हा तिचा आत्मविश्वास कैक पटीने वाढतो. संवाद कौशल्य सुधारल्यामुळे त्या केवळ कारागीर न राहता एक ‘व्यावसायिक’ म्हणून घडू लागतात. महालक्ष्मी सरस प्रदर्शनात सहभागी होणे, ही ग्रामीण महिला बचत गटांसाठी एक मोठी संधी असते. याची नोंदणी प्रक्रिया ही मुख्यत्वे ‘उमेद’अंतर्गत (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) राबवली जाते.

    हेही वाचा – दहा पैशाला एक ‘सिंगल’!

    ‘महालक्ष्मी सरस’ या प्रदर्शनात यावेळेस मला कोकणातील एका महिला उद्योजिका सीमा कदम यांच्याशी संवाद साधता आला. सीमा कदम या रत्नागिरीतून आलेल्या होत्या. जसे हिराताईंच्या विविध शेवयांनी मला भुरळ पाडली होती, तशी सीमा कदम यांच्या कांडप यंत्रावर तयार केलेल्या गोडा मसाला, मालवणी मसाला, गरम मसाला, फिशफ्राय आणि करी मसाला, चिकन तसेच मटण मसाला, ताजे रसरशीत ओलसर कोकम, कोकमाचे आगळ, कोकम सरबत, टपोरा काजू इत्यादी गोष्टींनी मोहात पाडले आणि त्या मी विकतही घेतल्या. आता त्यांचा एकदा आस्वाद घेतला की, मग सीमाताईंचे कौतुक करायला, त्यांची विविध उत्पादने खरेदी करायला आणि त्यांना भेटायला – जेव्हा केव्हा हे प्रदर्शन नागपुरात भरेल, तेव्हा आवर्जून त्यांच्या स्टॉलवर जाईन हे निश्चित! अचलपूरच्या हिराताई शेकोकार आणि रत्नागिरीच्या सीमाताई कदम यांचे नाव त्यांच्या उत्पादनांमुळे माझ्या कायम स्मरणात राहील! महालक्ष्मी सरस या प्रदर्शनातील या दोन महिला उद्योजकांशी माझे चांगले सूर जुळले आहेत! आपण सर्वजण जेव्हा अशा प्रदर्शनांना भेट देतो आणि तिथून काही खरेदी करतो, तेव्हा आपण नकळतपणे एका ग्रामीण कुटुंबाच्या स्वावलंबनाचा आधार बनत असतो. चला तर मग, या आपल्या मातीतील या अस्सल कौशल्याचा अभिमानाने स्वीकार करूया!

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026 अवांतर

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026 अवांतर

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    April 6, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    By हर्षा गुप्तेApril 13, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. गेल्या लेखात मी डॉगी ब्रँडीबद्दल जुजबी…

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    April 6, 2026

    स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!

    March 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    स्वरचैतन्याचा अस्त…

    April 18, 2026

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…

    April 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 271
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 389
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 562
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.