Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संकर्षण… ‘त्या’ स्वप्नाने अनिकेतला दिलं बळ

    June 23, 2026

    असेच कानावर पडलेले संवाद…

    June 23, 2026

    आजची ती…

    June 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…
    अवांतर

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरMarch 20, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, हरीश राणा इच्छामरण, इच्छामरणाला मंजुरी, सुप्रीम कोर्टाकडून इच्छामरणाची परवानगी, सर्वोच्च न्यायालयाची इच्छामरणाला मंजुरी, अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व, हरीश राणाचे आई वडील, हरीश राणाचे माता पिता, हरीश राणा कोमात, हरीश राणा 13 वर्षे कोमात, हरीश राणा कहाणी,
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    हरीश राणा या 31 वर्षीय तरुणाच्या इच्छा मरणाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. गाझियाबाद येथील हरीश राणा हा त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत हुशार आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा गुणवंत मुलगा. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. अचानक एक दिवस तो राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरून कोसळला आणि त्या अपघातामुळे त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली. या एका घटनेने संपूर्ण कुटुंबाचे हसते-खेळते आयुष्यच उद्ध्वस्त झाले.

    गेली 13 वर्षे हा तरुण कोमामध्ये असून, मृत्यूशी झुंज देत होता. “आज ना उद्या आपला मुलगा डोळे उघडेल, तो बरा होईल…” या एकाच आशेवर हरीशच्या आई-वडिलांनी दिल्लीतील ‘एम्स’सारख्या (AIIMS) नामांकित रुग्णालयाचे उंबरठे झिजवले. मात्र, त्यांच्या नशिबात नियतीने कधीच न संपणारा क्रूर डाव मांडला होता. या माता-पित्याने आपल्या तरुण मुलाला तब्बल 13 वर्षे तीळतीळ मरताना पाहिले आहे. कधीतरी एखादा दैवी चमत्कार घडेल आणि आपला मुलगा पुन्हा आनंदी आयुष्य जगू शकेल, या आशेपोटी या दाम्पत्याने आपल्या आयुष्याचे एक तप मुलाच्या सेवेत व्यतीत केले. या काळात त्यांनी आपली शेती, घरदार आणि सर्वस्व विकले, परंतु एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारांनंतरही हरीशच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

    अखेर एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांनीही सर्व इलाज करून हात टेकले आणि ‘आता कोणतीही आशा उरली नाही,’ असे सांगत हरीशला दैव आणि निसर्गाच्या हवाली केले. हरीशला प्रत्येक श्वास घेण्यासाठी अतोनात कष्ट करावे लागत होते. ‘लाइफ सपोर्ट सिस्टीम’वर (जीवरक्षक वैद्यकीय प्रणाली) तो पूर्णपणे परावलंबी होता. त्याला दिवस-रात्रीचा फरकही समजत नव्हता. आपल्या तल्लख बुद्धीच्या मुलाची ही केविलवाणी अवस्था पाहण्यापलीकडे त्याचे आई-वडील काहीच करू शकत नव्हते. आपल्या मनावर दुःखाचा डोंगर असूनही, त्यांनी त्याला या दुर्धर प्रसंगातून उभे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. 13 वर्षांच्या या न संपणाऱ्या वेदना आणि मुलाचा जीवघेणा संघर्ष पाहून त्या माय-बापाचे मन विदीर्ण झाले. अखेर, मुलाचा हा असह्य शारीरिक छळ थांबवण्यासाठी त्यांनी जड अंतःकरणाने सर्वोच्च न्यायालयाकडे ‘निष्क्रिय इच्छामरणा’ची’ (Passive Euthanasia) मागणी केली. न्यायालयाने एम्सच्या डॉक्टरांचे मेडिकल बोर्ड स्थापन करून सखोल अहवाल मागवला होता. हा अहवाल तपासून आणि ही स्थिती सुधारण्यापलीकडे आहे, हे ध्यानी घेऊन कोर्टाने अत्यंत जड अंतःकरणाने निर्णय घेतला.

    हेही वाचा – अंतिम सत्य मात्र एकच!

    हरीशचे वडील अशोक राणा यांनी न्यायालयात जी कैफियत मांडली, त्यात अत्युच्च प्रेमाचे दर्शन घडले. ते म्हणाले होते…

    “माझा मुलगा गेली 13 वर्षे एका अशा अंधारात आहे, जिथे प्रकाशाचा एक किरणही पोहोचत नाही. आम्ही त्याला जिवंत ठेवण्यासाठी आमचे सर्वस्व अर्पण केले, पण आता त्याच्या शरीराच्या मर्यादा संपल्या आहेत. त्याला अशा वेदनेत जिवंत ठेवणं, हा आता आमचा स्वार्थ वाटू लागला आहे, आणि आम्ही त्याला आता या छळात सोडू शकत नाही.”

    सर्वोच्च न्यायालयाने 11 मार्च 2026 रोजी दिलेला हा ‘निष्क्रिय इच्छामरणा’ निकाल केवळ कायदेशीर नव्हता, तर तो मानवी दृष्टिकोनातूनही होता. न्यायमूर्तींनी या प्रकरणातील गुंतागुंत समजून घेताना म्हटले की, “एका पित्यासाठी आपल्या मुलाला मृत्यूच्या स्वाधीन करण्याची परवानगी मागणे, हे जगातील सर्वात कठीण कार्य आहे. पण जेव्हा जगणे हे केवळ शरीराचा छळ बनतं, तेव्हा ‘मृत्यू’ ही शिक्षा नसून ती एक ‘दया’ (Mercy) ठरते.”

    ‘सन्मानपूर्वक मृत्यू’ (Right to Die with Dignity) ही संकल्पना कायदा, नैतिकता आणि वैद्यकशास्त्र यांचा मिलाफ आहे. ज्या व्यक्तींना असाध्य रोग झाला आहे किंवा सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही, अशांना अनावश्यक वेदना टाळण्यासाठी निरोपाची वेळ निवडण्याचा अधिकार असावा, हाच यामागचा उदात्त विचार आहे.

    हेही वाचा – दहा पैशाला एक ‘सिंगल’!

    अखेर, हरीश राणा यांना वेदनांपासून मिळणारी मुक्ती हा मानवी संवेदनांचा विजय आहे. हे प्रकरण आपल्याला शिकवते की, प्रेम म्हणजे नेहमीच हृदयाशी कवटाळून ठेवणे नसते; तर कधीकधी ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, त्याला त्याच्या वेदनेतून मुक्त करण्यासाठी ‘जाऊ देणे’ हीच प्रेमाची सर्वात मोठी परीक्षा असते. हरीश आता या जगाच्या अंधारातून मुक्त होईल, पण त्याच्या माता-पित्याचा हा नि:स्वार्थी त्याग इतिहासात कायम स्मरणात राहील. ज्या मुलासाठी एक काळ आयुष्य मागितले होते, त्याच मुलाला शांतपणे निरोप देताना त्या माता-पित्याच्या डोळ्यांतील अश्रू हेच सांगत होते की — “बाळा, आता तू शांत नीज… तुझा हा कठीण प्रवास आता संपला आहे!”

    वाईट याचंच वाटत की, हरीशचे आई-वडील आयुष्यभर ही भळभळती जखम घेऊन आपले पुढील आयुष्य जगतील. ते ही घटना कधीच विसरू शकणार नाहीत! शेवटी कितीही झालं, हरीशला जरी मुक्ती मिळाली, तरी ते त्याचे आईवडील आहेत. तरुण मुलाच्या असहाय अवस्थेतील इच्छामरणाचे दुःख त्यांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी कायम अस्वस्थ करत राहील!


     

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026 अवांतर

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    June 7, 2026 अवांतर

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    By Team AvaantarJune 21, 2026

    सिद्धांत सावंत आईवर हजारो कविता लिहिल्या गेल्या. आईवर गाणी लिहिली गेली. कथा, चित्रपट, लेख, भाषणं……

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    June 7, 2026

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    संकर्षण… ‘त्या’ स्वप्नाने अनिकेतला दिलं बळ

    June 23, 2026

    असेच कानावर पडलेले संवाद…

    June 23, 2026

    आजची ती…

    June 23, 2026

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 337
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 464
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 727
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    संकर्षण… ‘त्या’ स्वप्नाने अनिकेतला दिलं बळ

    June 23, 2026

    असेच कानावर पडलेले संवाद…

    June 23, 2026

    आजची ती…

    June 23, 2026
    Most Popular

    असेच कानावर पडलेले संवाद…

    June 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.