Author: माधवी जोशी माहुलकर

Avatar photo

एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

चहा! माणसांमधील दूरावा मिटविणारा…. परक्याला आपलसं करून घेण्याची किमया या चहानेच साधू शकते. गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करणारी, सर्वांच्या खिशाला परवडणारा आबालवृद्धांच्या पसंतीस उतरणारा असा हा चहा! अनेक वेळा समस्यांचे निराकारण करणारे पेय म्हणजे चहा! चहाचा पहिलाच घोट सैरभैर धावणारे मन शांत करते आणि समस्येतून मार्ग निघतो… सकाळच्या वेळेस कुटुंबासोबत चहाचे घोट घेत गप्पा करणे म्हणजे आपल्या सर्वांच्या घरातील आवडता ‘टी टाइम’. सकाळचा एक कप वाफाळलेला चहा तर सर्वांकरिता गरजेचाच वाटतो… अनेक घरांमध्ये त्या सकाळच्या तासाभरात दोन वेळेस चहा तर नक्कीचं होतो! सकाळी सकाळी एका बाजुला मंद आचेवर दूध तापवत ठेवून दुसऱ्या शेगडीवर चहाचे आधण ठेवताना गृहिणीचा मूड प्रसन्न…

Read More

ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो भले छीन लो मुझसे मेरी जवानी मगर मुझको लौटा दो बचपन का सावन वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी आज बऱ्याच दिवसांनी जगजित सिंगची ही गझल कानावर पडली आणि नकळत माझे मन भूतकाळात गेले. चाळ हा तसा सगळ्याच मराठी लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय! बहुतेक मध्यमवर्गीय लोक याच चाळ संस्कृतीमध्ये वाढलेले… या चाळीच्या असंख्य आठवणी अनेकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. जे लोक या चाळींमधे राहिलेले आहेत, त्यांचे त्यांच्या शेजाऱ्यांशी अजूनही ऋणानुबंध आहेत. आम्हीसुद्धा अशाच चाळ संस्कृतीमध्ये लहानाचे मोठे झाले आहोत… आमची चाळ अगदी मुंबईतल्या चाळीसारखी खूप मोठी नव्हती, पण…

Read More

विदर्भ काही खास कारणांसाठी प्रसिद्ध आहे. खवय्येगिरी करणाऱ्यांना काही रेसिपींनी नवनवीन वैदर्भीय पदार्थांची वेळोवेळी ओळख करून दिलेली आहे. कोल्हापूरचा जसा तांबडा पांढरा रस्सा, सोलापूरची शेंगा चटणी, पुण्याचा मिसळपाव, मुंबईचा वडापाव आणि पावभाजी, कोकणातीस मासे, तांदळाची भाकरी आणि सोलकढी हे लोकांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत, तसे मिरचीची भाजी, सांबार वडी, पाटवडी रस्सा, डाळकांदा हे आम्हा विदर्भवासीयांचे मनपसंद मेन्यू आहेत. गाव-खेड्यांमधून काही परंपरागत पदार्थांची मेजवानी हमखास वैशिष्ट्यपूर्ण ठरते. सुगीच्या दिवसांत पिके तरारून वर आलेली असतात. त्या काळ्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच तयार झालेली पिकं आपापसांत वाटून खाण्यासाठी शेतांमधून विविध प्रकारची गावजेवणं घालण्यात येतात. कोणी काही नवस बोललेले असतात, त्याकरिताही अशा जेवणाची मेजवानी…

Read More

दिवाळी, दसरा, होळी अशा प्रत्येक महत्त्वाच्या सणावारांना हमखास आईची आठवण येते. कोणालाच ऐकू न येणारी ही अज्ञात स्पंदनं हृदयात कुठेतरी जाणीव करून देत असतात… कधीच न विझणारी तिच्या विचारांची ज्योत मनात असते अन् ती जीवनातील अनेक चढ-उताराच्या प्रसंगी तुम्हाला मार्गदर्शन करत असते… जणू तुम्हाला सांगत असते की, “घाबरू नकोस! तू एकटी नाहीस… कारण माझा अंश तुझ्यात आहे! मी तुझ्यामध्येच आहे!” आई प्रत्येक क्षणाला आठवते… विशेषतः सणावारांच्या दिवसांत तर जास्तच! जीवनात रंग भरायला तीच शिकवते! तिने दिलेली एकूण एक शिकवण लहानपणापासून मनात अधोरेखित होते… रूचकर स्वयंपाक कसा करायचा? कोणता पदार्थ कुठल्या सणाला करायचा? घरातील सर्वांच्या आवडी-निवडी कशा लक्षात ठेवायच्या? कुळाचारांचे पूजाविधी…

Read More

दिवाळीला मी दरवर्षी घरीच शेव तयार करते आणि ती तयार करत असताना मला नेहमी ग्रामीण भागातील आठवडी बाजार आठवतो. नोकरीच्या निमित्ताने बहुतांश लोकांचे ग्रामीण भागात वास्तव्य असतं, त्याप्रमाणे आमचेही विदर्भातील चंद्रपूर, अहेरी, वर्धा जिल्ह्यांतील देवळी, आर्वी, वर्धा शहर, अमरावती, नागपूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरस्ती झालेली आहे. त्यामुळे अहेरी, आर्वी, देवळी या छोट्या गावांत भरणारे आठवडी बाजार कायम लक्षात राहिले आहेत. या आठवडी बाजारांमध्ये शेतकरी त्यांच्या शेतातील ताज्या भाज्यांसोबत प्रत्येक ऋतुनुसार शेतीत उपलब्ध असणारी पपई, पेरू, बोर यासारखी फळे विक्रीसाठी ठेवतात. हा आठवडी बाजार म्हणजे प्रत्येक गावातील लोकांचे आकर्षण बिंदू आहे. या बाजारात भाजीपाला आणि फळे तर विक्रीस असतात, परंतु सोबत…

Read More

भाग – 1 मी कुंती, तसे माझे जन्मनाव पृथा… माझे पिता शूरसेन महाराजांनी दिलेले! पण त्यांच्या आतेभावाला कुंतीभोज महाराजांना मला दत्तक दिल्यामुळे त्यांच्या नावावरून मला ‘कुंती’ हे नामानिधान प्राप्त झाले. राजघराण्यात जन्म होऊनही आणि दत्तक राजकन्या असूनही मला त्या राजवैभवात कधी जास्त रमावेसे नाही वाटले… लहानपणापासूनच मी थोडी विरक्त स्वभावाची होते. जेव्हा बाबांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी मला लहानपणीच कुंतीभोज महाराजांना दत्तक दिले तेव्हापासूनच माझ्या बालसुलभ मनामध्ये अनेक प्रश्न उभे रहिले होते, दत्तक म्हणजे काय असतं? हे समजण्याचे माझे वयही नव्हते. ज्या आईच्या उदरात मी नऊ महिने वाढले, तिने काहीच प्रतिकार केला नसेल का बाबांना? का तिच्या मातृत्वाला, ममतेला न…

Read More

साधारणत: 1990च्या दशकापर्यंत सुपर बाजाराचे लोण आपल्याकडील शहरांमधे पसरले नव्हते. मुळात त्यावेळी महिनाभराचा किराणा हा एखाद्या मोठ्या किराणा दुकानदाराकडूनच विकत घेतला जायचा. तो किराणा दुकानदार आपले सर्व वाणसामान वर्तमानपत्रांच्या कागदात बांधून घरपोच करत असे, तर काही लोक दर महिन्यात किराणा सामान जातीने दुकानात जाऊन, तिथे एक-दोन तास उभं राहून मगच घरी आणत असत. दर महिन्याला घरी आणलेला किराणा कागदांच्या पुड्या सोडून, त्यातील मोहरी, बडीशेप, जिरं यासारखे जिन्नस निवडून ते काचेच्या एकसारख्या बरण्यांमध्ये भरण्याचा कार्यक्रम घरोघरी चालत असे. काही घरांत गहू, तांदूळ, तूरडाळ यांचे कट्टे वर्षभरासाठी घेतले जायचे. हे धान्य भरण्याकरिता या घरांमध्ये लोखंडी कोठ्या असायच्या. त्या काळात मध्यमवर्गीय लोक रेशनकार्डचे…

Read More

विदर्भाच्या सणावारातील संस्कृतीचे एक आगळेवेगळे दर्शन नेहमीच स्वतःचे एक वैशिष्ट्य राखून आहे. या विशेष सणांपैकी एक सण म्हणजे दिवाळीच्या आधी आणि दसऱ्यानंतर कराष्टमीला केली जाणारी आठवीची पूजा! दसरा झाला की, हिवाळ्याची चाहूल लागलेली असते, शेतातील पिकं तरारून वर आलेली असतात, शेतक-यांच्या दृष्टीने हीच खरी त्याची संपत्ती! निसर्गाचे दान त्यांच्या पदरात भरभरून पडले तरच शेतकऱ्याचे कुटुंब सुखासमाधानाने येणारी दिवाळी आनंदाने साजरी करू शकतो. त्या निसर्गाच्या प्रती कृतज्ञता म्हणून तसेच लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून विदर्भात ही आठवीची पूजा केली जाते. या पूजेला ‘गजांत लक्ष्मी पूजन’ असेही म्हटले जाते. आठवीच्या पूजेचे सर्व साहित्य बाजारातून आणल्यावर ज्वारीच्या कणसाचा मांडव टाकला जातो. त्याच्या खाली…

Read More