Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जुलै 2026

    July 18, 2026

    आराध्याने शर्वायला दिली चांदीची डबी…

    July 17, 2026

    लाखमोलाचा सहवास

    July 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, July 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जुलै 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जुलै 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 18, 2026Updated:July 18, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जुलै महिना, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 18 जुलै 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 27 आषाढ शके 1948; तिथि : पंचमी 27:42; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 17:59;
    • योग : वरियान 20:44; करण : बव 16:06;
    • सूर्य : कर्क; चंद्र : सिंह 23:58; सूर्योदय : 06:09; सूर्यास्त : 19:19;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    श्रेष्ठ गझल गायक मेहदी हसन

    टीम अवांतर

    श्रेष्ठ गझल गायक मेहदी हसन यांचा जन्म 18 जुलै 1927 रोजी राजस्थानातील लूना (झुनझुन जिल्हा) या गावी सांगीतिक परंपरा असणाऱ्या घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव मेहदी हसन खान असे होते. त्यांचे वडील उस्ताद अझीम खान आणि चुलते उस्ताद ईस्माईल खान हे पारंपरिक ध्रुपद गायक होते. त्यांच्याकडेच मेहदींनी ध्रुपद आणि ख्याल गायकीचे प्रारंभीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. मेहदी हसन यांची पिढी ही या कलावंत घराण्याची संगीतसाधना करणारी सोळावी पिढी होती. प्रारंभीच्या काळात बडे गुलामअली खाँ, अब्दुल करीम खाँ, फैयाझ खाँ आणि पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या गायकीचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांनी आपली पहिली मैफल 1935मध्ये फाळणीपूर्व पंजाबातील ‘फजिल्का बंगला’ येथे आपल्या मोठ्या भावासोबत गाजविली.

    हेही वाचा – जरा विसावू या वळणावर…

    भारत-पाकिस्तान फाळणीनंतर  हसन यांच्या कुटुंबाने पाकिस्तानात स्थलांतर केले. तिथे त्यांनी  सुरुवातीला चरितार्थासाठी किरकोळ नोकऱ्या केल्या, पण आपल्या संगीतसाधनेत खंड पडू दिला नाही. 1957 साली पाकिस्तान रेडिओवर ठुमरी गायनाची संधी त्यांना मिळाली. त्यातूनच पुढे गझल गायक म्हणून त्यांना अल्पावधीत लोकप्रियता मिळाली. उर्दू कविता, रुबाया, गझल यांचे त्यांना अतोनात वेड होते.

    ‘ससुराल’ या चित्रपटासाठी त्यांनी ‘जिसने मेरे दिलको दर्द दिया’ हे गीत गायिले आणि पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून त्यांचा प्रवेश झाला. त्यानंतर एक रात अंगारे, अझमत, फिरंगी, सैक्रा, झर्का, मेरी जिंदगी है नगमा, नया रास्ता, शराफत, झीनत शबाना, आइना यासारख्या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.

    भावानुरूप रागांची निवड करून ध्रुपद गायकी, ख्याल गायकी व राजस्थानी लोकसंगीत यांच्या समन्वयातून निर्माण झालेल्या त्यांच्या गझल गायकीने जगभर लोकप्रिय  झाले. पाच दशकांच्या या सुरेल प्रवासातली त्यांची पहिली गझल ‘ गुलोमें रंग भरे बादे नौबहार चले ‘ ही होती. 1962 ते 1980 या काळात त्यांनी गझल गायकी सर्वोच्च पातळीवर नेली. या काळात देश-विदेशांत त्यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक दौरे केले.६ ७

    उर्दू, बंगाली, पंजाबी, फार्सी अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गायन केले. एच्. एम्. व्ही. कंपनीने सरहदें या अल्बमची निर्मिती केली. यात भारतरत्न लता मंगेशकर आणि मेहदी हसन यांनी ‘तेरा मिलना’ हे द्वंद्वगीत गायिले आहे. फरहत शाहजाद यांच्या या गीताला स्वतः मेहदींनी स्वरसाज चढविला होता. हेच द्वंद्वगीत त्यांनी मलिका-ए–तरन्नुम नूरजहाँ यांच्या सोबतही गायिले होते.

    मेहदी हसन यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी भारत सरकारचा के. एल्. सैगल संगीत शहेनशाह सन्मान, नेपाळ सरकारचा गोरखा दक्षिणा बहुसन्मान, पाकिस्तान सरकारचा प्राइड ऑफ परफॉर्मन्स, हिलाल – ए– इम्तियाझ सन्मान, तमघा-ए-इम्तियाझ सन्मानआणि प्रतिष्ठेचा निशान – ए– इम्तियाझ सन्मान हे महत्त्वाचे होत. याशिवाय पार्श्वगायक म्हणून त्यांना पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट निगार पुरस्कार चित्रपटनिहाय सुमारे नऊ वेळा लाभले. 13 जून 2012 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आजचा दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल.  एखाद्या गोष्टीवरून आईसोबत वाद होऊ शकतो, पण वेळीच परिस्थिती हाताळणे उत्तम राहील. भूतकाळातील चुकांमधून शिकणे आयुष्यात पुढे जाण्यासाठी फायदेशीर ठरेल. शिक्षणासाठी परदेशी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल.

    वृषभ – व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणच्या आज तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. महत्त्वाच्या बैठका किंवा चर्चांमध्ये तुमच्या मताला विशेष महत्त्व दिले जाईल, त्यामुळे आत्मविश्वासाने बोला. तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर वरिष्ठांकडून आणि मित्रांकडून पाठिंबा मिळेल. पायांच्या किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करणे टाळा. विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत करण्याची गरज आहे.

    मिथुन – आज नशीबाची मोठी साथ मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृतीमुळे धावपळ करावी लागेल. अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आणि गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रत्येकजण तुमच्या चांगल्या हेतूंना समजून घेईलच, असे नाही, त्यामुळे आपल्या भावनांवर आज नियंत्रण ठेवा.

    कर्क – अनावश्यक वादांपासून दूर राहणे आज तुमच्या हिताचे ठरेल.  दिलेली कोणतीही जबाबदारी प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने पार पाडा. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्याने चूक केल्यास, त्याला रागावण्याऐवजी ती चूक समजावून सांगणे अधिक चांगले होईल. काही काळापासून असणारी मानसिक चिंता हळूहळू कमी होईल. जर तुम्ही एखाद्या कायदेशीर प्रकरणात अडकले असाल तर अनुभवी सल्लागाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

    सिंह – नवीन घर, जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची योजना पुढे जाऊ शकते. मात्र कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी ते नजरेखालून घाला. तुम्हाला सतावत असलेल्या करिअरविषयक चिंता दूर होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्या संवादातून सोडवण्याचा प्रयत्न करा. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्या व्यक्तींनी कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी आपल्या सभोवतालच्या लोकांना काळजीपूर्वक जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.

    कन्या – गुंतवणुकीच्या बाबतीत आज काही चांगल्या संधी मिळू शकतात. तुमची मेहनत हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती ठरेल आणि त्यामुळे यश मिळेल. कामावरून कुटुंबातील सदस्यांसोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या आधीच काही कुरबुरी असतील, तर हलगर्जीपणा टाळा. वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या.

    तुळ – आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामामुळे वरिष्ठ प्रभावित होतील. त्यामुळे पदोन्नतीबद्दल सकारात्मक चर्चा होऊ शकते. इतरांशी बोलताना सभ्यता आणि संयम राखा. अवाजवी खर्चामुळे बजेट बिघडू शकते, त्यामुळे विचारपूर्वक खर्च करा.  पालकांशी बोलताना शब्दांची काळजीपूर्वक निवड करा.

    वृश्चिक – भावनेच्या आहारी जाऊन आज कोणताही मोठा निर्णय घेणे शहाणपणाचे नाही. हट्टीपणा आणि अहंकारापासून दूर राहणे फायदेशीर ठरेल. थकीत रक्कम वसूल झाल्याने आर्थिक दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी एखादा विरोधक तुमच्या विरोधात नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो, त्यामुळे आपले विचार आत्मविश्वासाने आणि तथ्यांसह मांडा. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासंबंधी किंवा स्पर्धा परीक्षांसंबंधी चांगली बातमी मिळू शकते.

    हेही वाचा – संत जनाबाई… प्रत्यक्ष जगताना विठूरायाची साथ!

    धनु – व्यवसायाच्या दृष्टीने तयार झालेली नवीन नाती भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. आज तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल. सामाजिक कार्यक्रमांमधील तुमचा सहभाग वाढेल. सरकारी योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते, परंतु कोणत्याही ऐकीव बातमीच्या आधारावर घाईने निर्णय घेणे टाळा. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करा. दिरंगाईमुळे आणखी समस्या निर्माण होऊ शकतात.

    मकर – भूतकाळात हातून झालेली एखादी चूक आज समोर येऊ शकते, त्यामुळे परिस्थिती संयमाने आणि समजूतदारपणे हाताळा. विनाकारण सल्ला देणे किंवा इतरांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देणे टाळा. घरातील वातावरण आनंदी असेल. तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. वडिलांशी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल.

    कुंभ – आज तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा मिळेल, लोक तुमच्या शब्दांनी प्रभावित होतील. तणाव कमी करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आरोग्याच्या किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. प्रलंबित आर्थिक प्रकरण पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. तुमची दीर्घकाळापासूनची इच्छा आज पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

    मीन – नोकरीच्या शोधात असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस नवी आशा घेऊन आला आहे. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नातेसंबंध बिघडतील असे काहीही बोलणे टाळा. खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी बजेट सांभाळणे आवश्यक असेल. परदेशाशी संबंधित व्यवसाय किंवा कामात नफा होण्याची शक्यता आहे. संततीवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवू शकता, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते आपली क्षमता अधिक चांगल्या प्रकारे दाखवू शकतील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जुलै 2026

    July 17, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जुलै 2026

    July 16, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 जुलै 2026

    July 15, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जुलै 2026

    By Team AvaantarJuly 17, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 17 जुलै 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 26…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जुलै 2026

    July 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 जुलै 2026

    July 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 जुलै 2026

    July 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जुलै 2026

    July 18, 2026

    आराध्याने शर्वायला दिली चांदीची डबी…

    July 17, 2026

    लाखमोलाचा सहवास

    July 17, 2026

    जरा विसावू या वळणावर…

    July 17, 2026

    संत जनाबाई… प्रत्यक्ष जगताना विठूरायाची साथ!

    July 17, 2026

    पोई भाजी (मलबार स्पिनॅच, मायाळू) एक पौष्टिक प्रकार!

    July 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 362
    • अवांतर 198
    • आरोग्य 130
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 493
    • फिल्मी 57
    • फूड काॅर्नर 238
    • मैत्रीण 24
    • ललित 786
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जुलै 2026

    July 18, 2026

    आराध्याने शर्वायला दिली चांदीची डबी…

    July 17, 2026

    लाखमोलाचा सहवास

    July 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.