Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जुलै 2026

    July 9, 2026

    चांगली बोहनी…

    July 9, 2026

    पावसाळा

    July 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, July 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!
    फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरMarch 29, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेख, आंब्याची कढी, कैरीची कढी, विदर्भ स्पेशल रेसिपी, विदर्भ स्पेशल कढी, विदर्भ स्पेशल आंबा कढी, विदर्भ स्पेशल कैरी कढी, हनुमान जयंती भंडारा, हनुमान जयंती कार्यक्रमात कढी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    उन्हाळ्यात कैरी बाजारात यायला सुरुवात होते, तेव्हापासून विदर्भातील गाव-खेड्यांमध्ये, घरोघरी आंब्याची कढी केली जाते. आमच्याकडे कच्च्या कैरीलाही आंबाच म्हणतात आणि पिकलेल्या आंब्याला सुद्धा आंबाच म्हणतात! रोडगे, वांगी-बटाट्याची भाजी, साधं वरण, गूळ- तूप आणि ही आंब्याची कढी याने हनुमान जयंतीच्या भंडाऱ्यांची सांगता होत असते. वर्धा, नागपूर जिल्ह्यांमध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने जे कार्यक्रम होतात, तेव्हा गावागावांतील हनुमानाच्या मंदिरांमध्ये हा प्रसाद ठरलेला असतो. नाहीच काही तर, मसालेभात आणि कढी हे नागपूरच्या कुठल्याही भंडाऱ्यातील ठरलेले पदार्थ आहेत. याच कढी प्रकारातील वैशिष्ट्यपूर्ण अशी ही आंब्याची किंवा कैरीची कढी आहे. उन्हाळ्यात तलखी देणारा असा पदार्थ आहे. चला तर मग जाणून घेऊया कैरीच्या कढीची रेसिपी!

    साहित्य

    • कैऱ्या – 2 (थोड्या पिवळसर असल्या तरी चालतील)
    • बेसन – 1 चमचा
    • दालचिनी – 1 तुकडा
    • आले- लसणाची पेस्ट – 1 चमचा
    • मिरे – 3-4
    • लवंगा – 3-4
    • गूळ – कैरीच्या आंबटपणानुसार
    • मीठ – चवीनुसार
    • मेथीदाणे – 8 ते 10
    • हिंग – 1 लहान चमचा
    • हिरव्या किंवा लाल मिरच्या – 2
    • धणेपूड – 1 चमचा
    • जिरेपूड – 1 चमचा
    • मोहरी – 1 लहान चमचा
    • हळद – 1 चमचा
    • कढीपत्ता – 8-10 पाने
    • कोथिंबीर – अर्धी वाटी (बारीक चिरलेली)
    • तेल – फोडणीसाठी

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल भातावरचे पिठले

    कृती

    1. प्रथम कैऱ्या उकडून त्यांचा गर काढून घ्यावा.
    2. या गरामधे चमचाभर बेसन टाकून दोन्ही घोटून एकजीव करावे.
    3. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकावे आणि गरजेप्रमाणे पाणी टाकून परत एकदा हे मिश्रण घोटून घ्यावे.
    4. स्टीलच्या कढईत फोडणीपुरते तेल टाकून ते तापल्यावर त्यामध्ये मोहरी, जिरे टाकून ते तडतडल्यावर एक चमचा हिंग टाकावा. लगेच कढीपत्त्याची पाने चुरचुरीत करून घ्यावीत.
    5. हिरव्या किंवा लाल मिरच्यांचे तुकडे घालून नंतर दालचिनीचा तुकडा, मिरे, लवंग आणि मेथीदाणे टाकावे.
    6. त्यानंतर या फोडणीत आले-लसणाची पेस्ट घालून धणे, जिरे पूड टाकावी. थोडी हळद टाकून मसाले मिक्स करावेत.
    7. यानंतर लगेच घोटलेल्या कैरीचा आणि बेसनाचा घोळ त्यात टाकावा, नंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार गूळ, कोथिंबीर टाकावी.
    8. जीभेची तलखी वाढवणारी ही कैरीची किंवा आंब्याची कढी व्यवस्थित उकळून घ्यावी.

    हेही वाचा – Recipe :  विदर्भ स्पेशल… दाणेभात अन् ठेचा


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    Recipe : वरी तांदूळ – आमरस खीर अन् लाल भोपळ्याच्या कुरकुरीत वड्या

    July 3, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : जॅमचे आइस्क्रीम अन् स्वस्त आणि मस्त जेली!

    July 2, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या

    June 30, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : वरी तांदूळ – आमरस खीर अन् लाल भोपळ्याच्या कुरकुरीत वड्या

    By Team AvaantarJuly 3, 2026

    नीलिमा विजय खडतकर खीरीसाठी साहित्य वरी तांदूळ – पाव कप दूध – 1 कप घट्ट…

    Kitchen Tips : जॅमचे आइस्क्रीम अन् स्वस्त आणि मस्त जेली!

    July 2, 2026

    Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या

    June 30, 2026

    Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    June 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जुलै 2026

    July 9, 2026

    चांगली बोहनी…

    July 9, 2026

    पावसाळा

    July 8, 2026

    गोष्ट सरोजताई अन् समीराची!

    July 8, 2026

    गुंतागुंतीचा माणूस…

    July 8, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : रथांगांचा मेळावा, जेवीं रथु म्हणिजे पांडवा 

    July 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 353
    • अवांतर 193
    • आरोग्य 128
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 482
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 231
    • मैत्रीण 24
    • ललित 767
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जुलै 2026

    July 9, 2026

    चांगली बोहनी…

    July 9, 2026

    पावसाळा

    July 8, 2026
    Most Popular

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.