Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: डॉ. विवेक वैद्य
General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.
तिचे ऑपेरेशन होऊन सात दिवसानंतर तिला सुटी मिळाली. घरी आल्यावर रात्री पहिल्यांदाच तिला खूप शांत झोप लागली… ना बेलचा आवाज, ना नर्सेसची धावपळ… सकाळी बऱ्याच उशिरा जाग आली. तेही कुकरच्या शिट्यांनी… स्वयंपाकांची बाई आलेली दिसते… ती मनात म्हणाली. तेवढ्यात तिच्या नणंदेचा आवाज आला. “वहिनी उठते ना?” तिने एकदम डोळे उघडून बघितले तिची मोठी नणंद तिच्या कॉटजवळ उभी होती. “अगं बाई, ताई तुम्ही?” तिने उठण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा – सुमी अन् रंगलेला काचापाणी खेळ! तिला हाताने थांबवत नणंद म्हणाली, “हळूहळू उठ, चहा घेऊन फ्रेश हो. मी छान गरम भात लावला आहे, तो मेतकूट तूप टाकून खा. छान वाटेल.” “पण ताई? अनुपची…
सकाळची वेळ. आल्हाददायक वातावरण असतं. तो आणि ती बाइकवरून जात असतात. बाइकचा वेग फार नसतो. सकाळ असली तरी, रस्त्यावर देखील फारशी गर्दी नसते. तिची ओढणी खांद्यावरून घसरून खाली आलेली… काही समजण्याच्या आत अचानक ती ओढणी बाइकच्या चाकात अडकते… बाइकस्वाराचा ताबा सुटतो अन् बाइक वेडीवाकडी होत खाली पडते… पण त्या अगोदरच ती खाली पडून ओढणीमुळे बाइकच्या मागे फरफटत जाते… थोडा पुढे जाऊन तोही पडतो… गाडी वेगात नसल्याने दोघांना खूप लागत नाही, थोडंफार खरचटतं आणि मुका मार लागतो. पण… फरफटत गेल्याने तिचे कपडे फाटतात… मांडीवर… छातीजवळ… ती तोल सांभाळत उठते. काहीशी बधिर झालेली असते… पण परिस्थिती लक्षात येताच फाटलेल्या ठिकाणी हात ठेवून…
माझ्या वडिलांच्या दवाखान्यापासून मुसलमान वस्ती काही अंतरावर होती. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक मुस्लीम रुग्ण यायचे. अनेक रुग्णांशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. त्याकाळात वडील माफक फी घ्यायचे… अर्थात, तेव्हा पैशाचे स्तोमही नव्हते! वडिलांची चांगली प्रॅक्टिस असूनही बरेचदा आम्हालाही कोणाकडून उसने पैसे घ्यावे लागायचे. वडिलांकडचे सर्वच रुग्ण हातातोंडाशी गाठ असलेले असल्याने अनेकदा कमी पैसे किंवा अगदी मोफत देखील उपचार करावे लागायचे. त्याकाळी उपकाराची जाण असायची, त्यामुळे वडिलांनी पैसा कमी, पण आदर जास्त मिळवला. दवाखान्यात गर्दी झाली आणि मी रिकामा असलो तर, वडिलांना मदत करायला जायचो. केसपेपर काढणे, गोळ्यांच्या पुड्या बांधून देणे अशी कामे करायचो. त्यामुळे अनेक पेशंट मला ओळखायचे. रजियाबी या कायम यायच्या.…

