कॉलेजच्या फायनल इअरला होतो. क्लासमध्ये नवीनच मुलगी आलेली. धारदार नाक, गोरीपान, सडपातळ… सगळ्या मुलांच्या नजरा तिच्याकडे… तरीही ती अप्राप्य वाटतं होती. तिच्यासोबत एक मुलगी सतत असायची. कदाचित तिची एकमेव मैत्रीण!
मी तिच्या भानगडीत पडलो नाही. पण कधीतरी… तिच्याकडे पहिले तर ती माझ्याकडे बघत असायची. नजरानजर व्हायची. डोळ्यांची भाषा कळायची. माझ्यात तिने काय बघितले कोण जाणे? कदाचित माझा निरागस चेहरा. माझे सिन्सिअर वागणे. तिच्यामागे न लागणे…
एकदा मी मोटरसायकल काढत होतो पार्किंगमधून. तीही त्याचवेळी आली. माझ्याजवळ येतं हळू आवाजात म्हणाली,
“आपसे मिलना हैं… बात करनी हैं.”
हा स्पष्ट इशारा होता.
“कल सॅटरडे हैं. एक्सट्रा क्लास चार बजे होगी. बंक करके पार्क मे मिलेंगे, कॉलेज के पीछे.”
माझा आवाज शांत होता. पण हात थरथरत होते. हृदयाची गती एक्सप्रेससारखी होती.
“अकेली नहीं आ सकती. परी आयेगी साथ में.”
परी तिच्या मैत्रीणीचे नाव असावे.
माझ्या चेहऱ्यावर नकळत “ही कशाला कबाब में हड्डी!” असे भाव आले असावे.
तिला उमगले.
“घर वाले अकेली को नही छोडते.”
“ठीक हैं. मोबाइल नंबर दे दो.”
“मोबाइल नहीं हैं.”
हेही वाचा – प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…
मी तिच्याकडे अठराव्या शतकातल्या वास्तूकडे पाहावे तसे पाहिले.
“मैं कल मिलती हूं,” असं म्हणून ती घाईघाईत निघून गेली.
दुसऱ्या दिवशी मी पार्कात… पावणेचार वाजताच!
बरोबर चार वाजून पाच मिनिटांनी ती आली.
परी सोबत होती. पण ती मागे थांबली.
एका कोपऱ्यात गेलो. बेंचवर बसलो… जवळ जवळ खेटूनच. गुलाबाचा सुगंध धुंद करत होता. तिने खास आज काढला असावा.
“क्या बात करनी हैं?”
मी चाचरत विचारले.
तिने उत्तर दिले नाही. त्याऐवजी माझ्या हातावर हात ठेवला. शरीरात विद्युप्रवाह सुरू झाला. मी तिचा हात घट्ट धरला तेवढ्यात…
परी धावत आमच्याकडे आली. धपापत.. जेमतेम बोलली,
“तेरा भाई दिखा मुझे शायद तुझेही ढूंढ रहा हैं…”
ती ॲथलीटच्या चपळाईने उठली…
“बाद में मिलती हूं,” असं म्हणत ती मागच्या गेटने पसार झाली.
मी सुन्न… बधीर…
मग लक्षात येते परी तिथेच उभी.
“तू नहीं जाती?” मी विचारतो.
“नहीं. अब मैं बोलती हूं, वैसा कर…”
ती माझ्या अगदी जवळ बसते. हातात हात घेते.
“मेरी आखों में देख.”
मी तिच्या डोळ्यात पाहतो. तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करतो. सुंदर नाही… पण गोड चेहरा. चेहऱ्यावर समंजस भाव. डोळ्यांत माझ्याविषयी काळजी. मला अगदी छान वाटते तिच्याकडे बघताना.
तिचा भाऊ येतो. उंचपुरा धिप्पाड. इकडेतीकडे पाहात. आमच्याकडे पाहतो संतापात.
परीला पाहून काहीतरी तोंडातल्या तोंडात बोलतो.
परीचा हात थरथरतो.
मी तिचा हात घट्ट धरतो. आश्वासक थोपटतो. भाऊ निघून जातो.
परी हात सोडते. ओढणीने चेहऱ्यावरचा घाम पुसते.
“बच गये, तुम भी और वो भी!” ती म्हणते.
“आप का क्या?”
ती बोलत नाही… निघते.
मला काहीतरी बोलायचं असते. पण त्याआधीच ती घाईने निघून जाते.
दुसऱ्या दिवसापासून ती कॉलेजला येतं नाही. तिसऱ्या, चौथ्या दिवशीही नाही. महिना उलटून गेलेला.
परी दिसते. पण मला टाळते.
परी एकटीही सापडत नाही.
मी अस्वस्थ…
एकदा लायब्ररीतून बाहेर पडताना परी दिसते… एकटीच. मी त्वरित गाठतो तिला.
मी काही बोलण्याच्या आधीच ती म्हणते, “मुझ से बात मत करो. मुझे नहीं पता वो कहां हैं?”
हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!
मी तिचा रस्ता अडवतो, “मुझे तुमसे ही बात करनी हैं…”
ती बावरते. “मुझ से?”
“हां. क्या तुम वोही पार्क में मुझे मिलोगी कल?”
“क्यों?” तिच्या चेहऱ्यावर समजत नसल्याचे भाव.
“उस दिन तुमने मेरा हाथ थामा था… कल मैं तुम्हारा हात पकडना चाहता हूं.”
ती आश्चर्याने माझ्याकडे बघते.
“क्या तुम्हे मंजूर हैं?” मी विचारतो.
ती लाजून मान खाली घालते. काही न बोलता धावत सुटते…
मी उद्या पार्कमध्ये कोणता ड्रेस घालून जाऊ याचा विचार करतोय…



1 Comment
छान वाटली..book kuthe millel