लेखक: डॉ. विवेक वैद्य

Avatar photo

General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.

“माझे 200 रुपये बाकी आहेत तुझ्याकडे… लक्षात आहे ना?” कोणीतरी कानात बोलले त्याच्या आणि त्याला जाग आली. अस्वस्थ होऊन उठला तो… घड्याळ्याकडे नजर टाकली. पहाटेचे तीन वाजलेले. हा आवाज ओळखीचा होता. खूप वर्षांपूर्वी अगदी त्याच्या जवळचा… पण नेमका कोणाचा? त्याच्या लक्षात येत नव्हते. त्याने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप आता दूर पळाली होती. कोणाचा आवाज असावा आणि दोनशे रुपये कोणाकडून घेतले… जाम आठवेना त्याला. व्यवहाराला अगदी चोख होता तो. कोणाचा एक पैसा कधी ठेवला नव्हता. पण हे 200 रुपये? डोक्यात प्रकाश पडत नाहीये आपल्या. अचानक लखलखले डोक्यात त्याच्या… प्रकाश… हो प्रकाशच तो! त्याचा कॉलेजमधला लास्ट ईयरचा रूम पार्टनर. एक्झाम…

Read More

मुंबईच्या मुलुंडमधील एका हॉस्पिटलमध्ये मला रेसिडेन्ट डॉक्टर म्हणून नोकरी मिळाली. पगार पाचशे रूपये. (1985 सालची गोष्ट) हॉस्पिटलच्या समोरच्याच एका बिल्डिंगमधल्या फ्लॅटमध्ये राहायची सोय होती. लहान गावात वाढल्यामुळे मुंबईच्या वातावरणाची सवय नाही. ती धावपळ… ते फाडफाड इंग्रजी बोलणारे लोक पाहून जीव दडपून जायचा. रेसिडेन्ट डॉक्टर हे नाव ऐकायला छान वाटत असले तरी, पडेल ते काम करावे लागायचे. ते अपेक्षित होते. आम्ही शिकायला आलो होतो, पैसे कमवायला नाही. मार्था म्हणून मॅट्रन होत्या. त्या एकदम तरबेज. कोणत्या operationला काय काय autoclaveला लावायचे इथपासून ते कोणता सीरियस पेशंट कसा हँडल करायचा, हे सर्व त्यांना माहिती. पण त्यांचा एक मोठा दुर्गुण होता. त्या भयंकर अहंकारी…

Read More

आत्मारामच्या बुढ्याले वावरातून येताना रस्त्याच्या कडेला एक कुत्र्याचे पिल्लू पडलेले दिसले. जोरजोरात श्वास घेत… अर्धवट बेशुद्ध… बुढ्याले दया आली. त्याने पिल्लाला थोडे पाणी पाजून पाहिले… आजूबाजूला कोणी आहे का ते पाहिले… पिल्लाच्या आईचा तपास केला, पण कोणी दिसले नाही. पिल्लाला असेच सोडून दिले तर, ते वाचणे कठीण याची कल्पना आल्याने बुढ्याने त्याला उचलून सरळ घरी आणले. घरी आणल्यावर त्याला ओल्या फडक्याने पुसून बुढ्याने थोडे दूध पाजले आणि त्याला कपड्यात गुंडाळून ठेवले. आत्माराम संध्याकाळी खताच्या थैल्ल्या घेऊन घरी आला आणि कुत्र्याच्या पिल्लाला पाहून संतापलाच, “अप्पा, काहून हे रिकामे काम घेऊन आला. कुत्रागित्रा कुठे पाळता पुन्हा? डोक्याले काय कमी ताप आहे का?…

Read More

गणपत माझा जवळचा मित्र नव्हता. तो आणि मी शाळेत सोबत शिकलो होतो एवढंच. त्यामुळे तोंडओळख होती. पुढे बरेच वर्षांनी त्याचा माझा पुन्हा संबंध आला. एका हॉस्पिटलला त्याची पत्नी ॲडमिट होती आणि त्याचवेळेस मी काही कामानिमित्त गेलो, तिथे तो भेटला. कर्तव्य म्हणून मी ॲडमिट असलेल्या त्याच्या पत्नीची रूममध्ये जाऊन चौकशी केली. तिथेच कळले की, तो जवळच 10 एक किलोमीटरवर राहतो आणि शेती करतो. याव्यतिरिक्त फारसे काही कळाले नाही. मात्र, त्यानंतर गणपत अधूनमधून नियमित भेटू लागला. शेतीची काही अवजारे, कधी खत, बी-बियाणे यांच्या खरेदीसाठी यायचा, तेव्हा आवर्जून भेटायचा. खूप आग्रह केला तर, अर्धा कप चहा घ्यायचा. नेहमी जुन्या मोटरसायकलवरून यायचा. त्यालाच कधी…

Read More

मित्राच्या भावाच्या लग्नाला गेलो होतो. संकेत आणि मी एकाच कॉलेजमध्ये चार वर्षे रूमपार्टनर. त्यामुळे घट्ट संबंध. आता दोघेही नोकरीमुळे वेगवेगळ्या गावी. तरीपण त्याच्या आग्रहामुळे गेलो लग्नाला. लग्न एका छोट्या तालुक्याच्या गावी होतं. गाव छोटं असलं तरी व्यवस्था उत्तम होती. तर, मुख्य मुद्द्यावर येतो. तिथे एक निळा ड्रेस घातलेली चटपटीत मुलगी होती. भराभर काम करत होती. नवरीच्या सोबत राहायची. नवरीची जवळची नातेवाईक असावी. बहुतेक सगळे तरुण तिच्या सौंदर्याने, उत्साहाने, दिलखुलास हास्याने घायाळ झाले. त्यात अर्थात संकेतही होता. लग्न लागल्या लागल्या संकेत मला बाजूला घेऊन म्हणाला, “यार, त्या निळ्या ड्रेसवालीचा काही ट्रेस लागतं नाही. नवरीकडची असल्याने एकदम विचारणेही बरोबर नाही. तू तिचे नाव…

Read More

मी, आई आणि बाबा दरवर्षी आठ दिवस सुट्टीमध्ये गावी जातो. मी यावर्षी नववीत गेलो. आमच्या गल्लीच्या पुढच्याच गल्लीत तात्याकाका राहतो. तो बऱ्याच वेळा माझ्याशी गप्पा मारतो. मीही त्याला खूप प्रश्न विचारतो. तात्याकाका एकटा राहतो. काकू वारल्या कधीच… म्हणजे मला तर आठवतच नाही. त्याचा एकुलता एक मुलगा साकेत शहरात नोकरी करतो. यावेळी काय झाले कोणास ठाऊक, पण आई गावी आल्या आल्या मला म्हणाली, “कौस्तुभ, तात्याकाकाने काहीही सांगितले तर, त्याला उलट प्रश्न विचारायचे नाहीत. तो जे सांगेल ते निमूट ऐकून घ्यायचे.” “का पण?” “मी सांगते म्हणून.” आईही काहीही सांगते… आता विचारायला काय हरकत आहे? पण आईने सांगितलेले मी ऐकतो. आईचे नेहमीच बरोबर…

Read More

बाहेर विजा कडाडत आहेत… वातावरण कुंद… पाऊस भरून आलेला… शकुताई त्यांच्या रूममध्ये होत्या. शाल पांघरून पडल्या होत्या. आज त्यांचा मुलगा कुणाल आणि सून रितू घरीच होते. दुपारचे साधारण चार वाजले असावेत. अचानक त्यांना रितूचा आवाज ऐकू आला आणि त्यांनी कान टवकारले. “कुणाल, तू जातो की नाही नाश्ता घ्यायला? किती दिवस झाले, पण तू ऐकतच नाहीस.” “अगं, बाहेर तर बघशील? किती भरून आलं आहे. रस्त्यात मीच पावसात सापडेन!” “असू दे. भिजलास तरी चालेल. पण आज जाच.” शकुताई आश्चर्यचकित झाल्या. एवढ्या पावसाळी वातावरणात कुणालला नाश्ता आणायला पाठवते आहे रितू? त्यांनी पुन्हा कान टवकारले. “उद्या आणला तर नाही चालणार का?” “नाही. आजच आणायचा…

Read More

तिचे ऑपेरेशन होऊन सात दिवसानंतर तिला सुटी मिळाली. घरी आल्यावर रात्री पहिल्यांदाच तिला खूप शांत झोप लागली… ना बेलचा आवाज, ना नर्सेसची धावपळ… सकाळी बऱ्याच उशिरा जाग आली. तेही कुकरच्या शिट्यांनी… स्वयंपाकांची बाई आलेली दिसते… ती मनात म्हणाली. तेवढ्यात तिच्या नणंदेचा आवाज आला. “वहिनी उठते ना?” तिने एकदम डोळे उघडून बघितले तिची मोठी नणंद तिच्या कॉटजवळ उभी होती. “अगं बाई, ताई तुम्ही?” तिने उठण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा – सुमी अन् रंगलेला काचापाणी खेळ! तिला हाताने थांबवत नणंद म्हणाली, “हळूहळू उठ, चहा घेऊन फ्रेश हो. मी छान गरम भात लावला आहे, तो मेतकूट तूप टाकून खा. छान वाटेल.” “पण ताई? अनुपची…

Read More

सकाळची वेळ. आल्हाददायक वातावरण असतं. तो आणि ती बाइकवरून जात असतात. बाइकचा वेग फार नसतो. सकाळ असली तरी, रस्त्यावर देखील फारशी गर्दी नसते. तिची ओढणी खांद्यावरून घसरून खाली आलेली… काही समजण्याच्या आत अचानक ती ओढणी बाइकच्या चाकात अडकते… बाइकस्वाराचा ताबा सुटतो अन् बाइक वेडीवाकडी होत खाली पडते… पण त्या अगोदरच ती खाली पडून ओढणीमुळे बाइकच्या मागे फरफटत जाते… थोडा पुढे जाऊन तोही पडतो… गाडी वेगात नसल्याने दोघांना खूप लागत नाही, थोडंफार खरचटतं आणि मुका मार लागतो. पण… फरफटत गेल्याने तिचे कपडे फाटतात… मांडीवर… छातीजवळ… ती तोल सांभाळत उठते. काहीशी बधिर झालेली असते… पण परिस्थिती लक्षात येताच फाटलेल्या ठिकाणी हात ठेवून…

Read More

माझ्या वडिलांच्या दवाखान्यापासून मुसलमान वस्ती काही अंतरावर होती. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक मुस्लीम रुग्ण यायचे. अनेक रुग्णांशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. त्याकाळात वडील माफक फी घ्यायचे… अर्थात, तेव्हा पैशाचे स्तोमही नव्हते! वडिलांची चांगली प्रॅक्टिस असूनही बरेचदा आम्हालाही कोणाकडून उसने पैसे घ्यावे लागायचे. वडिलांकडचे सर्वच रुग्ण हातातोंडाशी गाठ असलेले असल्याने अनेकदा कमी पैसे किंवा अगदी मोफत देखील उपचार करावे लागायचे. त्याकाळी उपकाराची जाण असायची, त्यामुळे वडिलांनी पैसा कमी, पण आदर जास्त मिळवला. दवाखान्यात गर्दी झाली आणि मी रिकामा असलो तर, वडिलांना मदत करायला जायचो. केसपेपर काढणे, गोळ्यांच्या पुड्या बांधून देणे अशी कामे करायचो. त्यामुळे अनेक पेशंट मला ओळखायचे. रजियाबी या कायम यायच्या.…

Read More