Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 सप्टेंबर 2026

    September 18, 2026

    लग्न – आकड्यांमध्ये अडकलेली भावना!

    September 17, 2026

    नातं भाऊ बहिणीचं…

    September 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, September 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » नमकीनचं दुकान अन् त्याचा सेठ…
    ललित

    नमकीनचं दुकान अन् त्याचा सेठ…

    डॉ. विवेक वैद्यBy डॉ. विवेक वैद्यJune 19, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी लेखक, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, नमकीनचे दुकान, मिठाईचे दुकान, शेठ लालाभाई, लालाभाई शेठ, शेठ लालाजी, लालजी शेठ, 500 रुपयांचे नमकीन, दसऱ्याची खरेदी, मित्र कमलला भेटणं, कमलबरोबर स्कॉचचा आनंद, शेठच्या पत्नीचे निधन
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    कमल हा माझा जुना मित्र. गावाच्याबाहेर एकटाच राहतो. मोठे घर. मुलगा पुण्यात सर्व्हिसला… वहिनी कधीच्याच अनंताच्या प्रवासाला गेलेल्या. तर, सांगण्याचा उद्देश असा की, दर दसऱ्याला रात्री तो मला आवर्जून बोलावतो. सोने देऊन एकमेकांना मिठी मारून, मग खास या दिवसासाठी ठेवलेली स्कॉच तो काढतो. सोबत खारवलेले काजू!

    अगदी लिमिटेड स्कॉचची ती थोडीशी झिंग घेऊन मी निघतो. रात्रीचे दहा-साडेदहा वाजलेले असतात. थंड हवा असते… मोटरसायकलवर ती थंड हवा आणि पोटातली स्कॉच एन्जॉय करत मी रस्ता कापतो… अजूनही त्याच्या बंगल्याकडे फार वस्ती झालेली नाही. रस्ता निर्मनुष्य असतो. नाही म्हणायला गावाच्या वेशीवर एक मिठाई नमकीनचे मोठे दुकान झाले आहे. दसऱ्याची दिवसभरची गर्दी आटोपून नोकर आवरा आवर करत असतात. सेठ हिशोब करत बसलेला असतो. त्या दिवशी तो नमकीनचा वास माझ्या नाकात जाताच नकळत माझी गाडी त्या दुकानाकडे वळते.

    खरेतर मी सुरुवातीला गेलो, तेव्हा नोकर कंटाळलेले होते काम करून… दसऱ्याला तोबा गर्दी असते दुकानात. पण सेठ मात्र लगेच बोलला,

    “बोला सर काय देऊ?”

    “चांगले असेल ते द्या थोडे थोडे.”

    मग त्याने नोकराला फरसाण, शंकरपाळे, चकली सगळ्यांचा थोडा थोडा नमुना द्यायला लावला. सगळेच पदार्थ अप्रतिम होते. नाही नाही म्हणत मी 500 रुपयांची खरेदी केली. पैसे देताच मालक बोलला,

    “पुन्हा या साहेब. जय श्रीकृष्ण…”

    मालक लक्षात राहिला. उभा चेहरा, उभे गंध, पायजमा, झब्बा आणि शांत चेहरा.

    हेही वाचा – सासू, सून अन् लेक…

    आता दरवर्षीचा नियमच झाला… परत जाताना शेठकडून फरसाण घेऊनच घरी जात होतो. मी दसऱ्याला गेलो की, सेठ स्वतःच म्हणायचा, “या तुमचीच वाट पाहात होतो.”

    पाच-सात वर्षे झाली या सगळ्याला.

    यंदाच्या दसऱ्याला कमलकडे गेलो. यावेळी माझ्याही घरी कोणी नव्हते. पत्नी मुलीकडे गेलेली दुसऱ्या गावी. गप्पा रंगल्या. दोनचे चार पेग कधी झाले समजलेच नाही. मधे एकदोनदा उठायचा प्रयत्न केला तर, कमलच म्हणाला,

    “जाशील रे, वहिनी नाही घरी, मग जायची कशी घाई करतो?”

    घडाळ्याचा काटा साडेअकराच्या पुढे गेला तसा घाईत उठलो. म्हटलं, “बाबा उद्या ऑफिस आहे. घरी जावंच लागेल.”

    गाडी मेन रस्त्याला लागली. थोडा स्पीड जास्तच होता. नाका पास केला आणि आठवले नमकीन घेतले नाही यावर्षी. पुढे गेलेली गाडी पुन्हा उलट फिरवली तरी वाटतं होते… दुकान बंद झाले असेल. इतक्या रात्रीपर्यंत काय उघडे राहील?
    पण तरी गाडी दामटली. दुकानाचे एक शटर उघडे होते. हुश्श…

    गाडी लावून दुकानात गेलो. एकच जुना नोकर जांभया देत बसला होता. मला बघून त्याच्या चेहऱ्यावर सुटकेचे भाव आले…
    “या साहेब. तुमचीच वाट बघत होतो.”

    “…आणि सेठ गेले घरी?”

    “सेठ आलेच नाही दुकानात!”

    “का रे?”

    “कालच सेठानी वारली…”

    “कसे काय?”

    “अटॅक आला साहेब.”

    “…आणि तरी दुकान उघडले.”

    “आम्हीच सेठला सांगितलं, माल तयार होऊन पडलेला, लोकांच्या मोठ्या मोठ्या ऑर्डरी होत्या. आम्ही सगळ्या नोकरांनी मिळून चालवले दुकान. सेठ दरवर्षी आम्हांला बोनस देतो, कपडे देतो, आमच्यासाठी इतकं करतो तर, आम्हीही काहीतरी करायला पाहिजे ना? हा घ्या तुमचा माल. फरसाण, चोळफल्ली, शंकरपाळे, चकल्या पॅकच करून ठेवला आहे.”

    मी पैसे दिले आणि सहजच विचारले,

    “आज एवढ्या उशिरापर्यंत कसे काय उघडे दुकान?”

    “तुमच्यासाठीच साहेब. नऊ-साडेनऊ वाजेपर्यंत सगळे नोकर गेले. मी बंद करणार तेवढ्यात सेठचा फोन आला. ते सर दरवर्षी येतात रात्री उशिरा. त्यांना माल दिल्याशिवाय दुकान बंद करू नको. केव्हाची वाट पाहत होतो साहेब तुमची!”

    हेही वाचा – होप फॉर द बेस्ट!

    माझी दारू खाडकन उतरली. हायवेवरचे भले मोठे दुकान… चार-पाच नोकर दिमतीला, असा असामी… आणि मी वर्षाला 500 रुपयांचा माल घेणारा किरकोळ गिऱ्हाईक… त्याने माझी आठवण ठेवावी. त्यासाठी मध्यरात्रीपर्यंत नोकराला थांबवावे. मला एकदम भरून आले. माझ्या डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेईना. डोळे पुसून मी घाईघाईने दुकान बंद करत असलेल्या नोकराकडे गेलो.

    “तुमच्या सेठचे नाव काय रे?”

    (त्यांचे नावही माहीत असू नये, याची पहिल्यांदाच खंत वाटली.)

    “लालाजी, लालाभाई म्हणतात त्यांना!”

    “कुठे राहतात ते?”

    नोकराने पत्ता सांगितला. तो मी नीट लक्षात ठेवला. उद्या सकाळी लालाभाईकडे जाऊन त्यांचे सांत्वन करायचे, हे माझे पाहिले काम असणार आहे.

    Avatar photo
    डॉ. विवेक वैद्य

    General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.

    Related Posts

    लग्न – आकड्यांमध्ये अडकलेली भावना!

    September 17, 2026 ललित

    नातं भाऊ बहिणीचं…

    September 17, 2026 ललित

    उमा महेशरावांवर होती नाराज

    September 17, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    लग्न – आकड्यांमध्ये अडकलेली भावना!

    By तृप्ती देवSeptember 17, 2026

    मुलाच्या लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात केली आणि एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश झाला. एकीकडे काही मुलींच्या…

    नातं भाऊ बहिणीचं…

    September 17, 2026

    उमा महेशरावांवर होती नाराज

    September 17, 2026

    आनंदाचे फुगे

    September 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 सप्टेंबर 2026

    September 18, 2026

    लग्न – आकड्यांमध्ये अडकलेली भावना!

    September 17, 2026

    नातं भाऊ बहिणीचं…

    September 17, 2026

    उमा महेशरावांवर होती नाराज

    September 17, 2026

    आनंदाचे फुगे

    September 17, 2026

    अज्ञानाची रात्र संपते, तेव्हा…

    September 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 438
    • अवांतर 208
    • आरोग्य 147
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 586
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 29
    • ललित 927
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 सप्टेंबर 2026

    September 18, 2026

    लग्न – आकड्यांमध्ये अडकलेली भावना!

    September 17, 2026

    नातं भाऊ बहिणीचं…

    September 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.