Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: अतुला प्रणव मेहेंदळे
अतुला प्रणव मेहेंदळे या ठाणे स्थित प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहेत. त्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात आहेत. शिवाय, त्या LLB शिकलेल्या आहेत. मराठी लेखनही गेली काही वर्ष करत आहेत. वाचन, जुनी गाणी ऐकणे, फिरणे असे इतर छंदही जोपासले आहेत. त्यांना लिखाणाची आवड आहे. त्यांच्या बऱ्याच कथांचं अभिवाचन वेगवेगळ्या ठिकाणी, Social media, You Tube इत्यादींवर केलं जातं. तसेच, दिवाळी अंक, वर्तमानपत्रात विविध कथा छापून येतात. त्यांना राज्यस्तरीय कथा स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे. काही ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही बोलावले जाते. जे त्यांचा अनुभव अजूनच संपन्न करून जाते. आतापर्यंत 60हून अधिक कथा लिहून आणि प्रसिद्ध करून झाल्या आहेत. व्यावसायिक कथालेखन न करता समाजाला आवडेल, रुचेल आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, या हेतूने लघुकथा लिहिल्या आहेत. वय कमी असूनही लिखाणाचा सुरू झालेला हा प्रवास असाच पुढेही सुरू राहो.
“रमा तोंड सांभाळून बोल. कुणाशी बोलत आहेस, त्याचा विचार तरी कर जरा! आजी-आजोबा आहेत ते तुझे… आधी सॉरी म्हण बघू त्यांना… आणि पुन्हा असं बोलायचं नाही. काय कळतंय का काही तुला?” रमा घुश्यातच होती. समीरा म्हणजे तिच्या आईने सांगूनही रमा माफी मागायला तयारच नव्हती. समीराने थोडा वेळ वाट बघून परत तेच सांगायचा प्रयत्न केला. तेवढ्यात सरोजताई मधे पडल्या, “असुदे गं समीरा. लहान आहे ती अजून. कळेल हळूहळू तिला. म्हातारपणी काय त्रास होतात, हे तिला आत्ता कसं कळणार. तू नको ओरडू तिला.” समीरा हे ऐकून चिडलीच, “घ्या! झालं? आता काय बोलणार मी यावर… नेहमीचच झालं आहे हे!” समीरा गप्प बसली अगदी…
शांतनू सगळी तयारी दिलेल्या यादीप्रमाणे घेऊन आला. पुन्हा पुन्हा काही राहिलं नाही ना ते बघून तो बाइकवर बसला. तिथूनच त्याने शाल्मलीला फोन लावला. शाल्मलीने हसतच फोन उचलला आणि त्याने काहीही बोलायच्या आत तीच बोलली, “शालू, तू सांगितल्याप्रमाणे सगळं घेतलं आहे. अजून काही नवी गोष्ट सुचली आहे का, जी आणायला हवी आहे…” हे ऐकून शांतनू खो खो हसायला लागला आणि म्हणाला, “हां हां ठीक आहे… एवढं काही चिडवायची गरज नाहीये. मी घरीच आहे आणि तुला ऑफिसमधून येताना त्रास नको म्हणून विचारलं तर गेलं कुठे?” त्यावर शाल्मली म्हणाली, “ हो रे राजा! सांगितलं तेवढं आणलं ना झालं तर मग. नेहमीच कशाला फोन…
“अगं ऐकलंस का… झाली की नाही तुझी बासुंदी बनवून? आवर पटापट. आत्ता येईल सरू…” गजाननरावांनी पेपर बाजूला ठेवून स्वयंपाकघरात प्रवेश केला. शुभदाताई हसतच म्हणाल्या, “अहो बासुंदी केव्हाच झाली आहे. आता सुनबाईंच्या आवडता ढोकळा करते आहे. काय गं चिनू तुझी आई करते का गं बासुंदी घरी? तिला माहितीही नसेल कशी बनवतात बासुंदी.” “आजी मला चांगले मार्क मिळाले ना की, आई मला छानशी पेस्ट्री बनवून देते. तुला येते का पेस्ट्री बनवता?” असं म्हणून आबांची लाडकी नात चिन्मयी आणि आबा एकमेकांच्या हातावर टाळी देतात. शुभदाताई लटके रागवत चिनूला म्हणतात, “एक रट्टा देते ये तुला. आजीची नक्कल करतेस होय.” निखिल हॉलमध्ये बसून हे सगळे…
“प्राजक्ता, गोडाचा छान मंद सुवास येतोय गं! काय बनवते आहेस एवढं? मला अगदी फिरकूही देत नाहीयेस…” शारदा ताई हॉलमधूनच आपल्या लेकीला विचारत्या झाल्या. प्राजक्ताने मात्र ताकास तूर लागू दिला नाही. जावईबापू पराग आणि नातू श्रीकर हे डबा घेऊन गेले, तरीही त्यांना आज काय बेत आहे, ते काही कळले नाही. तशी कुणकुण लागली होती, पण लेकीच्या आनंदावर त्यांना अजिबात विरजण घालायचे नव्हते. दुपारी प्राजक्ताने दोघींची पाने घेतली आणि मग आईला हाक मारली. शारदा ताईंना थोडी डुलकी लागली होती. लेकीने हाक मारल्यावर मात्र त्यांना अगदी कानकोंडलं झालं. त्यावर प्राजक्ता म्हणाली, “आई, अगं एवढं काय त्यात! या वयात लागायचीच झोप… आणि उलट बरंच…
आज माई अगदी खूशश होत्या… लाडकी लेक आणि जावई येणार होते घरी बऱ्याच वर्षांनी अमेरिकेहून, तेही अधिक महिन्याच्या मुहूर्तावर! माई म्हणजे आमच्या नानांच्या अर्धांगिनी. नाना म्हणजे मधुकर कर्वे आणि माई म्हणजे मालती कर्वे. या सुखी दाम्पत्याला एक छानशी एकुलती एक कन्या म्हणजे ईरा कर्वे. तर, आज माई खूश होत्या आणि त्या सकाळपासून नुसती तयारीच्या लगबगीत होत्या. घराची आवरसावर म्हणू नका, रांगोळी म्हणू नका, गोडधोडाचं जेवण म्हणू नका… आता वयानुसार होत नव्हतं, पण जेवढं जमत होतं तेवढं करत होत्या टुकूटुकू… दुपारी जेवण झाल्यावर सुपारी खायला बंगल्यातल्या झोपाळ्यावर बसल्या आणि भूतकाळात हरवून गेल्या. दोन वर्षांपूर्वी नाना अचानक गेले हृदयविकाराच्या झटक्याने आणि त्या…

