Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अट

    August 31, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026

    मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!

    August 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » गुलकंद
    ललित

    गुलकंद

    अतुला प्रणव मेहेंदळेBy अतुला प्रणव मेहेंदळेJuly 13, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकहाणी, सारिका साहिल प्रेमकहाणी, साहिल सारिका प्रेमकहाणी, व्हॅलेंटाइन डे स्पेशल, साहिल सारिका व्हॅलेंटाइन डे, साहिलचे अव्यक्त प्रेम, जबाबदार पिता साहिल, साहिलचे अबोल प्रेम, साहिल सारिका अबोल प्रेम, साहिल सारिका स्नेहबंध
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सारिका आणि साहिल सोहोनी यांच्या लग्नाला आता जवळ जवळ 20 वर्ष झाली. सौरभ, त्यांचा मुलगासुद्धा आता पुढच्या महिन्यात 18 वर्षांचा होईल. सासू-सासरे जाऊन आता 5- 6 वर्षं होत आली. काळाच्या पडद्याने त्याचं काम चोख केलंय. तिघेही आता त्या धक्क्यातून बाहेर आलेत. लग्नानंतर काही महिने सोडले तर, साहिल आणि सारिका यांना एकांत असा मिळालाच नव्हता. आधी आईबाबा आणि मग सौरभचे लाड आणि शिक्षण यात दोघेही व्यग्र होऊन गेले. पण आज सारिकाच्या मनात एकच विचार राहून राहून येत होता…

    “सगळीकडे प्रेमाचा विषय चालू आहेत. प्रेमाचा महिना म्हणून उदो उदो चालू आहे. पण मला मात्र साहिलने इतक्या वर्षांत एकदाही काही सरप्राइज म्हणून आणलं नाहीये की, प्रेमाने आपलं कौतुक केलं नाहीये. साधं ‘आज तू छान दिसतेयस,’ असं म्हणून पण कित्येक वर्ष लोटली आहेत. काय बाई आपलं नशीब. आणि तो सौरभ… आपला मुलगा म्हणायचा खरा पण तो सुद्धा अगदी साहिलवर आहे. त्यालाही कसलं कौतुक नाही.

    परवाच विवियाना मॉलमध्ये अभी भेटला होता… अभिषेक विचारे. अचानक कित्येक वर्षांनी भेटला. कॉलेजनंतर प्रथमच. तोही आता शिफ्ट झालाय ठाण्यातच. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर म्हणाला, ” सारिका तू अजूनही तशीच आहेस. स्लिम ट्रिम… आणि दिसतेस पण तशीच. पन्नासची वाटतच नाहीस गं!” कसले हुरळून गेलो होतो आपण. मनावर हळूवार कुणीतरी मोरपीस फिरवलं असं झालं. ’अभी तो मैं जवान हू!!’ असं वाटून गेलं. पण या दोघांना काय त्याचं…

    साहिलने इतक्या वर्षांत काही आणलं नाही तर, आज काय मोठं जगावेगळं घडणार आहे?… असा विचार करत असतानाच दारावरची बेल वाजली आणि सारिका भानावर आली. “आले वाटतं मोठे साहेब,” असं म्हणतच ती उठली. साहिल अगदी दमून भागून आला होता. त्याचा चेहरा जरा पडलाच होता.

    “काय रे काय झालं? सगळं ठीक आहे ना? आज काय तुझी बॉसिण ओरडली की काय निघता निघता?” असं म्हणून हसतच सारिका त्याची बॅग घेऊन आत गेली. साहिल डायरेक्टर म्हणून मोठ्या कंपनीत कामाला होता, पण त्याच्या वरच्या पदावर त्याची बॉस खन्ना जरा स्ट्रिक्ट आणि खडूस होती. “नाही गं, आज जरा जास्त थकायला झालं आहे. फिरती होती ना खूप. त्यामुळे पाय दमले. आज पटकन जेवू आणि झोपू.” सारिका त्याच्याकडे पाठ करून तोंड वेंगाडत आत जाताना मनात म्हणाली, “काय मेलं नशीब आहे राव. याला आजच्या दिवसाचं काहीच नाहीये. म्हणे पटकन जेवू आणि झोपू… मी हा येणार म्हणून याच्या यायच्या वेळी इतकी छान तयार झाले आहे. त्याला आवडते अगदी तश्शीच. पण छ्या! आपलं आयुष्य नुसतं दुसऱ्या पुरुषांनी कौतुक करण्यातच जायचं!”

    हेही वाचा – आईचं वाण…

    सौरभने पण आल्यावर आई छान दिसते आहेस, इतकी साधी कॉम्प्लिमेंट सुद्धा दिली नाही. उलट “आज रात्री जेवण झाल्यावर मी माझ्या एका मित्राकडे जाणार आहे. 11पर्यंत परत येईन,” असं फर्मान सोडलं. सारिकाने रात्री जेवणाचा छान बेत केला होता. तवा पुलाव, टोमॅटो सूप आणि सोबत हार्ट शेपची खमंग कुरकुरीत कटलेट. निदान त्यावरून तरी साहिलची ट्यूब पेटली तर पेटेल, असं तिला वाटत असतानाच सौरभने विचारलं, “आई आज काही स्पेशल आहे का? काय एकदम बाबांच्या आवडीची कटलेट आणि त्याला हार्टचा आकार वगैरे… क्या बात है! मी काही विसरलो तर नाही ना. वाढदिवस वगैरे आहे का कुणाचा.”

    त्यावर सारिका म्हणाली, “नाही रे. मला वाटलं आज करावीत. वेळ होता म्हणून केली. बाकी स्पेशल काय असणार? इथे सगळे दिवस सारखेच.” साहिलने ऐकून न ऐकल्यासारखं केलं… आणि सगळ्यांचं जेवण झालं. सौरभ लगेचच जेवून बाहेर गेला. आता सारिका सगळं आटोपून साहिल व्हरांड्यात फेऱ्या मारत होता, तिथे येऊन बसली. बराच वेळ झाला काही बोलली नाही. शेवटी साहिलच म्हणाला, “काय बाईसाहेबांचं काही बिनसलं आहे की काय? आणि आमच्या लक्षातच आलं नव्हतं इतक्या वेळात. काही झालं आहे का?”

    त्यावर सारिका त्याच्याकडे बघत डोळ्यातली आग ओकत त्याला म्हणाली, “साहिल तुला अजिबात आजकाल माझ्यासाठी वेळ नसतो. चार प्रेमाचे शब्द तर दूरच पण मी आज इतकी तयार झाले होते. तुझं लक्ष सुद्धा गेलं नाही माझ्याकडे. आज काय आहे माहिती सुद्धा नाही तुला! बरोबर आहे म्हणा इतक्या वर्षांत कुठे आपण सेलिब्रेशन केलं आहे, या दिवसाचं की, तुला आज लक्षात राहील. मलाच आपलं वय झाल्याने म्हातारचळ लागल्यासारखं झालं आहे की, काय कोण जाणे! जाऊदे माझं मेलीचं नशीबच फुटकं…” असं म्हणून ती डोळ्यात पाणी आणून जायला उठली. तेव्हा लगेचच साहिलने तिच्या दंडाला धरून तिला समोर धरलं. तिची हनुवटी वर करत तिच्या डोळ्यातलं पाणी टिपलं आणि हलकेच हसत तिच्यापुढे गुडघ्यावर बसून केव्हापासून शर्टच्या आत लपवून ठेवलेलं गुलाबाचं फूल काढून म्हणाला, “असं कसं… आम्हाला नाही कळणार तर कुणाला कळणार? अगं सरे, तूच माझी व्हॅलेंटाइन आहेस गं, गेली 21 वर्षं! लग्नाआधीचं एक वर्ष आणि आता त्यानंतरची 20 वर्षं.”

    आता मात्र सारिका लाजली. तिने त्याच्या हातातल्या गुलाबाचा स्वीकार केला आणि ते फूल हलकेच डोक्यावर मारून म्हणाली, “चल वेडाच आहेस. म्हणजे तुझ्या लक्षात होतं. उगीच लक्षात नसल्याचं दाखवलंस न माझ्यासमोर.” असं तिने म्हणताच त्याने तिला परत एकदा खुर्चीत बसवलं आणि आत गेला. एक छान गिफ्ट तिच्यासमोर धरलं, “एवढंच नाही. हे पण आणलं आहे तुझ्यासाठी. एक सांगू? सरू, तू सौरभच्या मुंजीत हॉलवर येताना नेसलेला डाळिंबी रंगाचा शालू तुला इतका खुलून दिसत होता. अहाहा! त्यात तू एकदम टवका दिसत होतीस… आणि मेधाताईच्या मुलीच्या लग्नात नेसलेली आमसुली रंगाची बारीक काठाची पैठणी तर, लाजवाब… त्यावर तू घातलेले मोत्याचे झुमके आणि तीन पदरी बारीक मोत्याचा नाजूक सर.. वाह काय दिसत होतीस तू! असं वाटत होतं की, जणू तुझंच लग्न होतंय! …आणि आपल्या पहिल्या रात्री तू घातलेला….”

    सारिका अजूनच लाजली… तिच्या गालावर गुलाब फुलले, “साहिल पुरे पुरे… काय हे तुझं चहाटळ वागणं. इतक्या जुन्या गोष्टीही लक्षात आहेत तुझ्या? पण कधी एकदाही बोलला नाहीस मला ते. कौतुक केलं असतंस तेव्हाच तर छान वाटलं असतं ना?”

    “अगं कसं सांगणार. तुला तर माहितीच आहे आईबाबा सोबत असले की, माझी हिंमतच नाही व्हायची… आणि सगळं सांगायला कशाला पाहिजे. माझ्या डोळ्यांत बघून तुला मठ्ठोबाला काही वाचता आलं नाही, त्याला मी काय करू? अगं, माझ्यासाठी तूच माझी मधुबाला, माधुरी आणि तूच माझी दीपिका पदुकोण! त्यासाठी अशा प्रेमदिवसाची काय गरज.. आपलं प्रेम म्हणजे ना प्रेमाचा गुलकंद आहे. जेवढा जास्त जुना तेवढा जास्त मुरलेला आणि मिट्ट गोड. कशातही मिसळा गोडवा तोच! पण तरी तुला हवं म्हणून हे तुझ्यासाठी…” असं म्हणून त्याने गिफ्ट समोर धरलं… आणि हळूच कानात म्हणाला, ” बाईसाहेब हे आपण हनिमूननंतर आता पहिल्यांदाच दोघेच डिसेंबरमध्ये बाहेर जाणार आहोत ना त्यासाठी आणलं आहे. तेव्हा हे घालायचं. मला 20 वर्षापूर्वीची माझी सरू परत पाहायची आहे. केवढी वणवण केली माहिती आहे यासाठी मी आज.”

    त्यावर सारिका त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली, “इश्श, चल चावट. साहेब जास्तच मूडमध्ये दिसतायत. आपल्याला एक 18 वर्षांचा मुलगा आहे, तो येईल आता. आवर घाला स्वतःला. आणि ऑफिसची फिरती आहे, हे खोटं सांगून जावंच कशाला! म्हणूनच मग पाय दुखतात. आता तुझी पन्नाशी पार झाली आहे विसरू नकोस.”

    हेही वाचा – अधिकाचं देणं

    साहिल डोळे मिचकावत हसला आणि म्हणाला, “छ्या.. मी तर अजून चाळीस पण नाही… आणि माझा मुलगा त्याच्या मित्र की, मैत्रिणीला भेटायला गेलाय, हे न कळायला तू आई म्हणून डोळेझाक करत असशील, तुझं पुत्रप्रेम उफाळून येत असेल; पण मी बाप म्हणून याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. पण असूदे! हे वयच असतं मित्र मैत्रिणींना भेटायचं… आपणही गेलो आहोत यातून… फक्त ‘ती’ हद्द पार होत नाही ना, हे तपासायला हवं अधून-मधून सारिका बाई… आणि चला आता उद्या सकाळी जायचं आहे कामाला तेव्हा आपण पटापट रात्रीची कामं उरकून घेऊ. काय?”

    सारिका तर अवाकच झाली. साहिलचं सौरभवर लक्ष आहे, हे बघून ती मनोमन सुखावली. आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाने शहारली. तेव्हाच साहिल म्हणाला, “ए बाई, रात्रीचं काम म्हणजे झोपायला जायचं का, असं म्हणत होतो मी… काय तुझे विचार गं सरू!” असं म्हणून भुवया उंचावून डोळे मिचकावत तो उठला आणि खोलीत जायला निघाला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून सारिका म्हणाली, “कित्ती प्रेम करतो हा आपल्यावर… सांगत नाही फक्त… आणि सांगून झालं तर ते प्रेम कसलं? उगीच आपण रूसलो. हे प्रेम भल्याभल्यांना कळत नाही तर, मी तर किस झाड की पत्ती!” असं म्हणत गालातल्या गालात हसत तीही खोलीकडे जायला उठली. त्यावेळी तिच्या मनात मात्र एकच गाणं वाजत होतं,

    “सलोना सा सजन है और मैं हूँ,

    जिया में इक अगन है और मैं हूँ”

    Avatar photo
    अतुला प्रणव मेहेंदळे

    अतुला प्रणव मेहेंदळे या ठाणे स्थित प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहेत. त्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात आहेत. शिवाय, त्या LLB शिकलेल्या आहेत. मराठी लेखनही गेली काही वर्ष करत आहेत. वाचन, जुनी गाणी ऐकणे, फिरणे असे इतर छंदही जोपासले आहेत. त्यांना लिखाणाची आवड आहे. त्यांच्या बऱ्याच कथांचं अभिवाचन वेगवेगळ्या ठिकाणी, Social media, You Tube इत्यादींवर केलं जातं. तसेच, दिवाळी अंक, वर्तमानपत्रात विविध कथा छापून येतात. त्यांना राज्यस्तरीय कथा स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे. काही ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही बोलावले जाते. जे त्यांचा अनुभव अजूनच संपन्न करून जाते. आतापर्यंत 60हून अधिक कथा लिहून आणि प्रसिद्ध करून झाल्या आहेत. व्यावसायिक कथालेखन न करता समाजाला आवडेल, रुचेल आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, या हेतूने लघुकथा लिहिल्या आहेत. वय कमी असूनही लिखाणाचा सुरू झालेला हा प्रवास असाच पुढेही सुरू राहो.

    Related Posts

    अट

    August 31, 2026 ललित

    मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!

    August 31, 2026 ललित

    ‘अफगाण डायरी : काल आणि आज’… मनाला भिडणारा काळाचा पट

    August 30, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    अट

    By अतुला प्रणव मेहेंदळेAugust 31, 2026

    “श्रावणी अगं झालीस का तयार? चल बाई, येतीलच आता मुलाकडचे इतक्यात.” श्रावणीची आई वसुधाताई हाका…

    मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!

    August 31, 2026

    ‘अफगाण डायरी : काल आणि आज’… मनाला भिडणारा काळाचा पट

    August 30, 2026

    अरे देवा…

    August 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अट

    August 31, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026

    मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!

    August 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु

    August 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑगस्ट 2026

    August 31, 2026

    ‘अफगाण डायरी : काल आणि आज’… मनाला भिडणारा काळाचा पट

    August 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 415
    • अवांतर 206
    • आरोग्य 142
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 559
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 24
    • ललित 890
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अट

    August 31, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026

    मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!

    August 31, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.