Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आदर्श शिक्षिका

    September 7, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – वक्तृत्व, नेटवर्किंग, स्वयंरोजगार

    September 7, 2026

    कलियुगातील श्रावणबाळ

    September 7, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, September 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आदर्श शिक्षिका
    ललित

    आदर्श शिक्षिका

    अतुला प्रणव मेहेंदळेBy अतुला प्रणव मेहेंदळेSeptember 7, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मी मराठी, अभिजात मराठी, अतुला प्रणव मेहेंदळे, अतुला मेहेंदळे, लेखिका अतुला प्रणव मेहेंदळे, आदर्श शिक्षिका पुरस्कार, शिक्षक दिन विशेष, कठोर सुहासिनीबाई, आदर्श शिक्षिका मनस्वी, मनस्वीकडून आईला श्रेय, मनस्वीचे शिक्षण, घरात आईचे वर्चस्व,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सुहासिनीबाई आज अगदी आनंदात होत्या. त्यांच्या लेकीचा मनस्वीचा आज ‘आदर्श शिक्षिका’ म्हणून शासनातर्फे सन्मान होणार होता. “हे बघायला आज हे हवे होते. ह्यांना खूप आनंद झाला असता, आपल्या लेकीला पुरस्कार मिळतोय बघून… दरवेळी आपल्याला हवं तसं थोडीच घडतं. पण कधीकधी आपल्या मनासारखं नाही घडत तेच योग्य असतं आणि भल्याचं असतं असंच आजच्या दिवसावरून म्हटलं पाहिजे. नाहीतर मनस्वीचा हा सन्मान अशक्यच होता.” असा विचार सुहासिनीबाईंचा सुरू होता. त्या झोपाळ्यावर बसून चहा घेत होत्या.

    तेवढ्यात मनस्वी आलीच… “अग आई, मी निघते पुढे. शाळेत एक-दोन कामं आहेत. ती झाली की, आपण सगळेच ह्यांच्याबरोबर निघूयात? नाहीतर मानसच्या गाडीतून जाऊयात. आज त्याने सुट्टीच टाकली आहे कंपनीत.” असं म्हणताच सुहासिनीबाई मानेने होकार भरत्या झाल्या आणि मनस्वी निघाली सुद्धा पायात चप्पल अडकवून. नंतर केदारराव म्हणजे जावईबापू पण काही कामानिमित्त बाहेर गेले आणि मानस त्याचं काहीसं काम करत त्याच्या खोलीत बसला होता.

    सुहासिनीबाई आता गाणी ऐकत परत आठवणीत रमल्या. आठ वर्षांपूर्वी गोविंदराव गेल्यावर मनस्वी आणि जावईबापूंनी हट्ट करून आपल्याला इथे त्यांच्या घरी आणलं. “आम्हाला तरी मोठं कोण आहे आता!” असं म्हणत कायमचंच घरात मानाचं स्थान दिलं. तशा पूर्वीपासूनच आपण किती कठोर आणि कडक शिस्तीच्या होतो. पहिल्यापासून पितृसत्ताक समाज असूनही त्याकाळी आपल्यावर आपल्या आईचा धाक आणि मग आपला आपल्या मुलीवर धाक. हे म्हणायचे पण, “अहो, एवढ्या धाकात ठेवाल तर मुलगी दूर जाईल तुमच्यापासून. नाहीतर तुम्हाला किंमत देईनाशी होईल.” पण आपण पण अडून बसलो एकाच गोष्टीवर. मुलीला काय करायचं आहे शिकून. नंतर केवळ घर, संसार, धुणी आणि मुलं एवढंच तर असतं आयुष्यात. याच गोष्टीचा आपण कायम ध्यास घेतला आणि मनस्वीला शिकण्याची आवड असूनही तिला आपण सांसारिक शिक्षणाचे धडे देत होतो.

    पण गोविंदरावांना मात्र हे अजिबात मान्य नव्हतं. मनस्वीने खूप शिकावं असं त्यांना वाटायचं. आमचे दोघांचे यावरून वाद सुद्धा व्हायचे. पण मग एके दिवशी मी हुकमी हत्यारच काढलं. आजही मला आठवतो तो दिवस जेव्हा मी त्यांना निक्षून सांगितलं, “हे बघा, तुम्ही या बाबतीत मधे पडू नका. मी आई आहे मला कळतं तिचं भलं! आणि मधे पडायचंच असेल तर मला तसं सांगा. मी यापुढे तिचं काहीच करणार नाही. तुम्हीच तिला शिकवा आणि नंतर उजवा कुठे हवी त्या घरी. म्हणजे कळेल अतिशिकलेल्या मुलीला उजवणं किती कठीण असतं ते.” त्यानंतर मात्र गोविंदराव शांत झाले आणि मी विसाव्या वर्षी मनस्वीला उजवली पाठकांच्या घरी.

    हेही वाचा – दृष्टिकोन…

    मी मोकळी झाले खरी, पण ही शांत बसेल तर मनस्वी कसली. जावईबापूंना पहिली दोन वर्ष छान प्रेमात गुंडाळलं आणि मग हळूच शिक्षणाबद्दल बोलली. केदाररावांनी पण होकार दिला अगदी लगेचच. हे सांगण्यासाठी ती माहेरी आली तेव्हा किती आनंदी होती, हे मी आजही विसरू शकत नाही. “आई ह्यांनी मला शिकायला परवानगी दिली आहे आणि त्यांनी तर असंही सांगितलं की, मला खरंतर शिकलेलीच मुलगी हवी होती जी स्वतःच्या पायांवर उभी असेल. पण सासू-सासऱ्यांमुळे ते गप्प बसले होते इतकंच.” त्यावेळी का कुणास ठाऊक, पण आपल्याला मनाच्या एका कोपऱ्यात आनंदच झाला. लेकीची पाठवणी केल्यावर तिकडे तिच्या गुणांची कदर होतेय आणि तिची इच्छा पूर्ण होतेय, हे ऐकून बरं वाटलं. मला तरी काय हवं होतं? तिचा आनंदच ना? त्याकाळी आजकालच्या प्रमाणे मुली खूप शिकत नसत त्यामुळे हिला जास्त शिक्षणामुळे कुणी नाकारायला नको इतकीच इच्छा होती. फक्त त्यासाठी मी आजन्माचा कडूपणा घेतला इतकंच.

    असो. चला मुलीचं आणि यांचं स्वप्न आणि आपलं सुप्त स्वप्न आज पूर्ण होतंय. संकटं आली तरी ती डगमगली नाही. नेटाने अभ्यास पूर्ण केला, अगदी गर्भारशी असताना सुद्धा! मग तिच्या लाडक्या पेशात ती जी एकदाची शिरली की, आज त्याचं फळ म्हणून तिला शासनाचा ‘आदर्श शिक्षिके’चा पुरस्कार मिळतोय. अजून काय हवं! चला सुहासिनीबाई, आपण आता तयार होऊयात. मनस्वी येईलच इतक्यात आणि मी तयार नसेन तर ओरडतील बाई! असं मनातल्या मनात हसत सुहासिनीबाई छान तयार व्हायला गेल्या. साडी नेसून वेणीफणी करून तयार झाल्या आणि काहीतरी कमी आहे, असं आरशात न्याहाळत असतानाच मनस्वी दारातून म्हणाली, “आई, तू जे शोधतेयस ते मी आणलं आहे.” असं म्हणताच तिने आणलेल्या अबोलीच्या गजऱ्याचा गंध त्यांना गोविंदरावांची आठवण देऊन गेला. अबोलीचा गजरा मनस्वीने आईला माळला आणि डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाली, “आई, बाबा असताना असाच छान गजरा आणायचे नं, तुम्ही कुठे समारंभाला निघालात की? म्हणून मी आणला आज खास तुझ्यासाठी. म्हणजे मला बाबा आसपासच आहेत तुझ्याबरोबर असा कायम दिलासा राहील समारंभात. त्यांचं स्वप्न आज पूर्ण होतंय नाही का?” सुहासिनीबाई हलकेच हसल्या. “हो ग हो. मी तर शेवटी विरोधीपक्षच होते ना? असो, चल निघूयात. मानस तयार झाला का?” असं म्हणत त्या टुकूटुकू निघाल्या आणि मनस्वी हलकेच हसली.

    तिकडे पोहोचल्यावर मनस्वीचं खूप छान स्वागत झालं. बाकीच्या घरच्यांना पण मानाचं असं पहिल्या रांगेत बसवण्यात आलं. सुहासिनीबाई भारावून गेल्या. नंतर आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार घेताना तर सुहासिनीबाईंनी मनस्वीची डोळ्यांनीच दृष्ट काढली आणि मग स्टेजवरती मनस्वीला बोलायला सांगितलं गेलं. मनस्वी बोलताना अगदी लाघवी बोलते हे तर साऱ्यांनाच माहीत होतं, पण आज त्याचं आई म्हणून सुहासिनीबाईंना खूप कौतुक वाटत होतं.

    मनस्वी बोलत होती,

    “नमस्कार, सर्वप्रथम मला या बक्षिसाची मानकरी केल्याबद्दल शासनाची मी खूप आभारी आहे. पण यात माझा एकटीचा वाटा नाही. सर्वप्रथम मी माझ्या हयात नसलेल्या वडिलांना हा पुरस्कार देऊ इच्छिते आणि तद्नंतर माझी इथे उपस्थित असलेली आई.” सुहासिनीबाई एकदम दचकल्याच तिच्या या वाक्याने! मनस्वी पुढे बोलू लागली… “मी आईचं नाव यासाठी घेतलं की, तिने पहिल्यापासूनच माझ्या शिक्षणाला विरोध केला. पण त्यामुळेच कदाचित माझ्यात ती उर्मी निर्माण झाली की, मी अभ्यास करूनच दाखवेन आणि कुणीतरी होऊनच दाखवेन. आईने नेहमी गोड गोड होऊन कसं चालेल… तिने प्रसंगी कठोर पण असलंच पाहिजे, हे मी तेव्हा तिच्याकडूनच शिकले आणि तेच तर तिने केलं. माझ्या चांगल्यासाठी ती विरोधात जाऊन बसली. पण माझ्या दृष्टीने तीच माझी खरी आदर्श शिक्षिका आहे. जिने मला लढण्याचं बळ दिलं. तेव्हा आईला मी एकच सांगू इच्छिते की, तू मुळीच माझी विरोधक नाहीस. तू तर माझी ताकद आहेस. खरा सत्ताधारी पक्ष तूच आहेस आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आई… आणि हो तिच्यानंतर मी अजून एक महत्त्वाचं नाव घेईन, ते माझ्या अहोंचं. त्यांच्या परवानगी आणि पाठिंब्याशिवाय हे स्वप्न अशक्यच होतं. 26व्या वर्षी मी बी.एड. झाले, मग शिक्षिका म्हणून काम करता करता मराठी विषय घेऊन स्पेशलायझेशन केलं. त्याचं सारं श्रेय मी माझ्या माणसांना देते. बाबा, आई, सासूबाई, सासरेबुवा, माझे हे आणि last but not the least माझा लेक मानस. शिवाय माझे विद्यार्थी आणि सगळे सहशिक्षक यांचाही वाटा आहेच.”

    हेही वाचा – आईचं वाण…

    पुढेही मनस्वी बरंच काही बोलत होती पण सुहासिनीबाई मात्र आतून खूप रडत होत्या. मुलीने आपल्याला श्रेय दिलं यातच सारं जग सामावलं आहे. अजून काय हवं मला म्हातारीला. त्यांचा ऊर अभिमानाने भरून गेला होता आणि डोक्यावरचं विरोधक असण्याचं मणामणाचं ओझं उतरून हलकं झाल्यासारखं त्यांना वाटत होतं. त्यांनी देवाला म्हटलं, “बाबा आता उचललंस मला तरी चालेल. मन आनंदाने काठोकाठ भरलं आहे रे! माझ्या पदरात अशी समजूतदार मुलगी घातलीस त्याबद्दल तुझी ऋणी आहे मी.” असं म्हणून त्यांनी आनंदानेच डोळे टिपले.

    Avatar photo
    अतुला प्रणव मेहेंदळे

    अतुला प्रणव मेहेंदळे या ठाणे स्थित प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहेत. त्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात आहेत. शिवाय, त्या LLB शिकलेल्या आहेत. मराठी लेखनही गेली काही वर्ष करत आहेत. वाचन, जुनी गाणी ऐकणे, फिरणे असे इतर छंदही जोपासले आहेत. त्यांना लिखाणाची आवड आहे. त्यांच्या बऱ्याच कथांचं अभिवाचन वेगवेगळ्या ठिकाणी, Social media, You Tube इत्यादींवर केलं जातं. तसेच, दिवाळी अंक, वर्तमानपत्रात विविध कथा छापून येतात. त्यांना राज्यस्तरीय कथा स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे. काही ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही बोलावले जाते. जे त्यांचा अनुभव अजूनच संपन्न करून जाते. आतापर्यंत 60हून अधिक कथा लिहून आणि प्रसिद्ध करून झाल्या आहेत. व्यावसायिक कथालेखन न करता समाजाला आवडेल, रुचेल आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, या हेतूने लघुकथा लिहिल्या आहेत. वय कमी असूनही लिखाणाचा सुरू झालेला हा प्रवास असाच पुढेही सुरू राहो.

    Related Posts

    कलियुगातील श्रावणबाळ

    September 7, 2026 ललित

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026 ललित

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कलियुगातील श्रावणबाळ

    By सतीश बर्वेSeptember 7, 2026

    मला तो पहिल्यांदा भेटला मोरगावला. आलिशान मोटारीतून आला होता… बहुतेक आपल्या आजीला घेऊन. मला का…

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026

    मैत्रीण

    September 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आदर्श शिक्षिका

    September 7, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – वक्तृत्व, नेटवर्किंग, स्वयंरोजगार

    September 7, 2026

    कलियुगातील श्रावणबाळ

    September 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरसागरींची गोडी, माजीं बहु थडिये थोडी

    September 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 424
    • अवांतर 206
    • आरोग्य 144
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 570
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 254
    • मैत्रीण 28
    • ललित 903
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आदर्श शिक्षिका

    September 7, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – वक्तृत्व, नेटवर्किंग, स्वयंरोजगार

    September 7, 2026

    कलियुगातील श्रावणबाळ

    September 7, 2026
    Most Popular

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.