Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, September 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अट
    ललित

    अट

    अतुला प्रणव मेहेंदळेBy अतुला प्रणव मेहेंदळेAugust 31, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मी मराठी, अभिजात मराठी, अतुला प्रणव मेहेंदळे, अतुला मेहेंदळे, लेखिका अतुला प्रणव मेहेंदळे, श्रावणीचे लग्न, श्रावणीच्या अटी, श्रावणीला आईची चिंता, शशांक श्रावणी लग्न, शशांकला अटी मान्य, शशांककडून सासूची जबाबदारी, एकत्र कुटुंब पद्धती
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “श्रावणी अगं झालीस का तयार? चल बाई, येतीलच आता मुलाकडचे इतक्यात.”

    श्रावणीची आई वसुधाताई हाका मारून दमल्या होत्या… आणि खरं सांगायचं तर, त्या कंटाळल्याही होत्या. श्रावणीच्या लग्नासाठी खूपच जोडे झिजवावे लागत होते त्यांना. श्रावणी जगताप आता जवळजवळ 32 वर्षांची झाली आहे. तिला प्रेमविवाह करायचा नाहीये आणि ठरवून केलेल्या लग्नासाठी पण तिच्या दोनच अटी आहेत. मुलगा तिच्या स्वभावाला साजेसा असावा आणि दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तिच्या आईला सांभाळणारा असावा. या अटीमुळे तिचं लग्न काही जुळता जुळत नाहीये.

    यावेळी मात्र वसुधाताईंनी दोन दिवस आधी तिला जवळ बसवून सांगितलं, “अगं श्रानू अशी अट घालशील तर, कायमच माझ्यासोबत रहायला लागेल बिनालग्नाचं! अगं, लोकं मला बोलतात सगळ्या बाजूंनी. मुलगी जास्तीच अपेक्षा ठेवून आहे, असं म्हणतात. किती जणांना आणि कसं तोंड दाखवायचं मी. तुला त्याचं काहीच नाही. अगं, अशी मुलीची आई येऊन रहाते का तिच्या घरी? रीतीला धरून नाहीच आहे हे… आणि मलाही अजिबात मान्य नाही, हे मी किती वेळा सांगितलं आहे तुला. पण तुला त्याचं काहीही नाही.”

    श्रावणी नुसतीच हसली आणि म्हणाली, “आई, मी बाबांना जाताना वचन दिलं आहे आईचा तिच्या शेवटपर्यंत कायम सांभाळ करेन. शिवाय, मलाही काळजी वाटते गं तुझी. यात काय चूक आहे? आणि नाहीच झालं लग्न तर राहू की, मग आपण दोघी. काय हरकत आहे. हे बघ मी लग्नाला नाही म्हणतच नाहीये. फक्त माझी अट बदलायला मला लावू नकोस. अगं, मी कुठे म्हणतेय आपण एका घरात रहायचं. पण निदान माझ्या घराजवळ तरी रहावं माझ्या आईने, ही एवढीच अट आहे. मला जर दोन्ही घरं सांभाळायची असतील, तर काय वाईट आहे त्यात?”

    हेही वाचा – कौटुंबिक कथा… ‘सुखस्वप्न’

    श्रावणी साधासा पण तिच्यावर खुलून दिसणारा आंबा रंगाचा ड्रेस, त्यावर साधंच गळ्यातलं आणि साजेशी केशरचना करून समोर आली आणि वसुधाताईंची तंद्री भंगली. तिच्याकडे बघत मनातल्या मनात वसुधाताई म्हणाल्या, “सावळी असली तरी किती देखणी आहे माझी लेक. अगदी साधी, सरळ आणि मनमिळावू. नोकरी करत असली तरीही कसलाच बडेजाव नाही, की मी किती कमावते, हा माज नाही. नाहीतर आजकालच्या मुली म्हणजे कमवायचं किती आणि दाखवायचं किती… काही हिशोबच नाही. शिवाय, माझ्यासाठी पण किती करते! स्वयंपाक तर अगदी उत्तम करते. तिच्याच नशिबात का, असं आहे कोण जाणे? यावेळी तर येणारा मुलगा जास्त शिकलेला आहे. जर्मनीवरून पीएचडी करून आला आहे म्हणे. जरा शिक्षणाचा अंकुश जास्तच असेल. म्हणजे तर काय बघायलाच नको! अशी जगावेगळी अट कशी मान्य करतील ते.” पण तरीही वसुधाताई नेहमीप्रमाणेच अगत्य करायला तयार होत्या. थोडावेळ गेल्यावर शशांक पोवारकडची मंडळी आली. मुलगा, आणि त्याचे आईवडील होते.

    इकडच्या तिकडच्या गप्पा, खाणं-पिणं झाल्यावर जरासा मोकळेपणा पाहून श्रावणीने तिच्या दोन्ही अटी अगदी हळुवारपणे मुलाकडच्यांना सांगितल्या आणि मुलाकडचे एकमेकांकडे बघतच बसले. त्यावर वसुधाताई मात्र लेकीची बाजू सावरून घेत म्हणाल्या, “माझी श्रावणी ना माझ्यासाठी खूप हळवी आहे म्हणून असं म्हणतेय. संसारात रुळली ना, की हे खूळ जाईल अहो निघून तिचं… आणि ती कितीही म्हणाली तरी मी नाही अहो अशी येऊन राहणार. शेवटी जावयाकडे मी तरी कशी राहीन. तुम्ही नका काळजी करू मी समजावेन तिला. पण फक्त या कारणासाठी तिला नकार देऊ नका.”

    आता मात्र शशांक शांत बसला नाही. शशांक तसा बोलका, सावळ्याहून सावळा पण नाकीडोळी उत्तम, स्मार्ट आणि मुख्यतः माणसांमध्ये रमणारा! तो कायमच जिथे जाईल तिथे माणसांच्या घोळक्यात असायचा. इतका की, त्याची आई हसत म्हणायची ही, “शशू तुला शक्य असतं ना, तर तू अख्खं जगच आपल्या घरात आणून ठेवलं असतंस.” या त्याच्या स्वभावामुळे तर त्याचं लग्न पण जमत नव्हतं. कारण, आजकाल मुलींना मुलाचे आईवडील सुद्धा नकोसे असतात तर बाकीची माणसं तर दूरच…! पण आत्ता तर शशांकला श्रावणीचा फोटो बघताक्षणी आवडला होता. त्यामुळे त्याने लगेचच श्रावणीकडे बघून सांगितलं, “मला तुझ्या अटी मान्य आहेत. मी लग्नाला तयार आहे.”

    वसुधाताई अवाकच झाल्या. अटी मान्य आहेत असं म्हणणारा मुलगा त्यांच्या मते या जगात नाहीच आहे. त्यावर सगळेच शांत आहेत बघून पुन्हा शशांकच म्हणाला, “श्रावणीची आई, अहो तुम्ही तिची आई असलात तरी माझ्यासाठी पण लग्नानंतर आईच आहात ना? मुलगी मोठी झाली, तिचं वय वाढलं आणि जगाचे अनुभव घेतले की, आयुष्याच्या एका वळणावर तिला आईचा हात सोडून जायची भीती वाटते. त्यात ती तुमची एकुलती एक आहे. त्यामुळे तुमची सगळी जबाबदारी तिच्यावर आणि थोडक्यात लग्न झाल्यावर माझ्यावर आहे. मी माझ्या आई-वडिलांना तिच्यावर थोपवायचं आणि तिच्या आईवडिलांची जबाबदारी झटकायची यात कसला आला पुरुषार्थ? आणि त्याने आमच्यामधलं प्रेम वाढेल का? मी तिच्या भावनांचा आदर नाही केला तर, ती माझ्या आई-वडिलांना मान देईलच हे कशावरून… त्यामुळे मी तयार आहे या अटींना. तुम्हाला एका घरात रहायचं नसेल, तर आपण जवळच घर घेऊ, पण एकत्र गुण्यागोविंदाने राहू.”

    हेही वाचा – गुलकंद

    त्यावर शशांकची आई पण स्मित करत म्हणाली, “हो, आम्हालाही हे मान्य आहे वसुधाताई. अहो, शिक्षणाने माणूस शिकला नाही, तर काय उपयोग. आम्ही सगळे एकत्र कुटुंब पद्धतीत राहिलेलो आहोत. त्यामुळे या जुन्या खुळचट कल्पना आता विसरून पुढे जाऊयात… आणि अहो, अजून एक गंमत म्हणजे मी माझ्या सुनेच्या कागाळ्या तुम्हाला करेन तशा तुम्ही तुमच्या जावयाच्या कागाळ्या मला करा. म्हणजे आपला वेळ पण छान जाईल…” असं त्या म्हणताच सगळे हसायला लागले.

    वसुधाताई तर आनंदाने रडायलाच लागल्या. त्यांनी एकवार श्रावणीकडे बघितलं आणि म्हणाल्या, ” आज माझा विश्वास दृढ झाला. जगात प्रत्येकासाठी कुणी ना कुणी जोडीदार देवाने बनवलेला असतोच. फक्त तो समोर येण्यासाठी वाट पहायला लागते. शिक्षण माणसाला हुशार करते तसं सारासार विवेकबुद्धी पण देते. तुझी इच्छा पूर्ण झाली श्रावू… चला आता लग्नाच्या तयारीला लागते मी…” हे ऐकून श्रावणी लाजली. आणि मनोमन म्हणाली, “आज खऱ्या अर्थाने बाबांच्या आत्म्याला शांती मिळेल.” श्रावणीने वडिलांच्या फोटोकडे पाहिलं. तो संध्याकाळच्या वेळी सुद्धा उजळून निघालाय असा भास तिला झाला.

    Avatar photo
    अतुला प्रणव मेहेंदळे

    अतुला प्रणव मेहेंदळे या ठाणे स्थित प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहेत. त्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात आहेत. शिवाय, त्या LLB शिकलेल्या आहेत. मराठी लेखनही गेली काही वर्ष करत आहेत. वाचन, जुनी गाणी ऐकणे, फिरणे असे इतर छंदही जोपासले आहेत. त्यांना लिखाणाची आवड आहे. त्यांच्या बऱ्याच कथांचं अभिवाचन वेगवेगळ्या ठिकाणी, Social media, You Tube इत्यादींवर केलं जातं. तसेच, दिवाळी अंक, वर्तमानपत्रात विविध कथा छापून येतात. त्यांना राज्यस्तरीय कथा स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे. काही ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही बोलावले जाते. जे त्यांचा अनुभव अजूनच संपन्न करून जाते. आतापर्यंत 60हून अधिक कथा लिहून आणि प्रसिद्ध करून झाल्या आहेत. व्यावसायिक कथालेखन न करता समाजाला आवडेल, रुचेल आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, या हेतूने लघुकथा लिहिल्या आहेत. वय कमी असूनही लिखाणाचा सुरू झालेला हा प्रवास असाच पुढेही सुरू राहो.

    Related Posts

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026 ललित

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026 ललित

    मैत्रीण

    September 5, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    By डॉ. अस्मिता हवालदारSeptember 6, 2026

    ‘नॉट विदाऊट माय डॉटर’ हे पुस्तक म्हणजे इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन स्त्रीची कहाणी आहे. बेट्टी महमूदी…

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026

    मैत्रीण

    September 5, 2026

    नातवाचा ‘ध चा मा’ अन् आबा!

    September 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026

    मन आनंद आनंद छायो… आत्मशोधाची संगीतमय अनुभूती

    September 6, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 423
    • अवांतर 206
    • आरोग्य 144
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 569
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 254
    • मैत्रीण 28
    • ललित 901
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026
    Most Popular

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.