Author: Team Avaantar

शैलेश विजया सोमनाथ महाजन देश घडविताना, समाज घडविताना आपण नेहमी तरुणांच्या कार्यशक्तीचा विचार करत असतो. तरुणशक्ती ही देशाची खरी शक्ती आहे. यावर देशाची सक्षमता अवलंबून असते, असे म्हणतात. पण, देशातील किती तरुणवर्ग, आपल्या कार्यशक्तीचा वापर, समाजासाठी, देशासाठी करतात? तथापि, आज मी इथे एक वेगळ्या कार्यशक्तीचा वापर, देशासाठी समाजासाठी कसा करून घेता येईल? या बाबतचे मत मांडत आहे. ही सक्षम पण दुर्लक्षित कार्यशक्ती म्हणजे साधारण 60 ते 70 वयोगटातील व्यक्तींची! आपण म्हणाल, हे म्हातारे? परंतु, शांतपणे विचार करा आणि उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला या वयोगटातील माणसांचे अवलोकन करा. काय आपण यांना म्हातारे किंवा वयोवृद्ध म्हणू शकतो? नाही. खरे पाहिले तर, या वयोगटातील…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 05 जुलै 2025, वार : शनिवार भारतीय सौर : 14 आषाढ शके 1947, तिथि : दशमी 18:58, नक्षत्र : स्वाती 19:50 योग : सिद्ध 20:34, करण : वणिज अहोरात्र सूर्य : मिथुन, चंद्र : तुला, सूर्योदय : 06:05, सूर्यास्त : 19:20 पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा. जवळच्या लोकांनाच तुम्ही पुढे जावे, तुमची प्रगती व्हावी, असे वाटत असावे, त्यामुळे सावध रहा. आपले काम प्रामाणिकपणे…

Read More

लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण त्वचा आणि तिचे प्रकार पाहिले. यावेळी आपण, त्वचेवर कुठल्या गोष्टी परिणाम करतात, ते पाहू. आपल्या त्वचेवर अंतर्गत आणि बाह्य गोष्टींचे परिणाम होत असतात. यातील अंतर्गत बदल हे मुख्यत्वे करून Hormones च्या बदलामुळे होत असतात, या बदलांमुळे तुमची त्वचा अतितेलकट होऊन त्यावर मुरुमे येऊ शकतात किंवा त्वचा अतिकोरडी होऊन Hyperpigmentation सारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागू शकते. Hormones मध्ये होणाऱ्या बदलाला Puberty, गरोदरपणा, menstrual cycle (मासिक पाळी), menopause इत्यादी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. अपुरी झोप, चुकीची जीवन शैली, सतत बाहेरचे खाणे, आजारपण या आणि अशा विविध गोष्टी त्वचेवर विपरित परिणाम करतात. बाह्य गोष्टींमध्ये ऋतू बदल,…

Read More

गायत्री वैशंपायन स्वयंपाकघर ही प्रयोगशाळा… आणि स्वयंपाक करणे ही रोजची साधी गोष्ट वाटली तरी, ते एक शास्त्र आहे. अनेक प्रसिद्ध आहारतज्ज्ञांनी त्यावर अनेकदा लिहिले आहे. आपला आजचा विषय तो नाही. अर्थशास्त्र, समाजशास्त्र यांचेही अनेक नियम स्वयंपाकघराला लागू पडतात. आज आपण त्याचा अभ्यास करू. Product Life Cycle कोणतेही नवीन product बाजारात आले की, साधारण त्याच्या salesचा जो ग्राफ असतो, तो साधारण डोंगरासारखा असतो. म्हणजे, सेल हळूहळू वाढत जातो, peak येतो, काही काळ स्थिरावतो आणि मग तो खाली येतो. आपल्या मार्केटमध्ये परिस्थिती त्याच्याबरोबर उलट आहे. लाडू, चिवडा, चकली हे पदार्थ ताजे बनवले गेल्यावर त्याला सुरुवातीला प्रचंड खप असतो. दोनच्या वर चकल्या खायच्या…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 04 जुलै 2025, वार : शुक्रवार भारतीय सौर : 13 आषाढ शके 1947, तिथि : नवमी 16:31, नक्षत्र : चित्रा 16:49 योग : शिव 19:35, करण : तैतील 29:45 सूर्य : मिथुन, चंद्र : तुला, सूर्योदय : 06:05, सूर्यास्त : 19:20 पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आरोग्यामध्ये सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल ठरेल. कामात यश मिळवण्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहेत. नातेसंबंध सुधारतील आणि त्यामागे उत्तम…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! आयुष्यात कितीतरी घटना घडतात, आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे गुरू भेटतात. एक खूप जुन्या अभिनेत्री माझ्या आयुष्यात आल्या. उत्तम कलावंत असण्याबरोबरच उत्तम स्वयंपाक बनवणे, खाणे अन् खाऊ घालणे याची त्यांना खूप आवड होती. आणखी एका कलेत त्यांची मास्टरी होती, ते म्हणजे वीणकाम! त्यांचं नाव सुहासिनी आडारकर. मी त्यांना ‘ललू मावशी’ म्हणायची. तुम्हाला ती सीरियल आठवते का? ‘मालगुडी डेज’!… ‘ता ना ना ता ना ना ना…’ हा म्युझिक ट्रॅक त्यावेळी सर्वांच्याच मुखी होता. तुम्ही सुद्धा या तालावर गायलात ना? त्या सीरियलमधला गोड, छोटासा स्वामी आठवतो? आणि त्याला ‘छ्वामी’ म्हणणारी ती गोड आजी… म्हणजे…

Read More

यश:श्री यंदा एप्रिल-मे महिन्यांत लग्नकार्य अन् रिसेप्शन यांचा धडाकाच होता. ऑफिसमध्येच एका पाठोपाठ सलग चार लग्नं होती. सर्व सहकारी आपलेच… तसं पाहिलं तर, संपूर्ण जगच आपलं म्हटल्यावर डिपार्टमेन्टच्या भिंती राहात नाहीत… प्रत्येकाच्या लग्नाला जायचंच, असं ठरवलं होतं. यापैकी दोन विवाह सोहळे असे होते की, सर्व मंगलविधी हॉलवर झाली आणि त्यानंतर रिसेप्शन! तर, उर्वरित दोनपैकी एक लग्न रजिस्टर आणि दुसरं गावी झालं होतं, पण रिसेप्शन मुंबई अन् ठाण्यात होतं. आजकाल रिसेप्शन हा प्रकार मंगलविधींच्या धावपळीत लपून जातो. त्याला ना मुलाकडची मंडळी काही करू शकत ना मुलीकडची… सध्या सर्व गोष्टींचे व्यावसायिकीकरण झालंय तर, मंगलकार्यालय भाड्याने देणारे कसे मागे राहणार? सकाळी 5-6 वाजता…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 03 जुलै 2025, वार : गुरुवार भारतीय सौर : 12 आषाढ शके 1947, तिथि : अष्टमी 14:06, नक्षत्र : हस्त 13:49 योग : परीघ 18:34, करण : बालव 27:17 सूर्य : मिथुन, चंद्र : कन्या 27:18, सूर्योदय : 06:04, सूर्यास्त : 19:20 पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाचा ताण थोडासा थकवा आणू शकतो. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला असेल. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. व्यवसाय नवीन उंची गाठू शकतो.…

Read More

अजित गोगटे प्रसार माध्यमांना लोकशाहीतील ‘चौथा स्तंभ’ म्हटले जाते. याचे कारण असे की, या माध्यमांच्या अस्तित्वालाच मुळात सामाजिक बांधिलकी आणि उत्तरदायित्वाचे पायाभूत अधिष्ठान असते. हल्लीच्या काळी व्यापारीकरण तसेच सातत्याने उन्नत होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे या माध्यमांची व्याप्ती खूप वाढली असली आणि त्यांचे स्वरूप आमूलाग्र बदललेले असले तरी त्यांच्या अस्तित्वाची मूळ तात्विक बैठक पूर्वीचीच आहे. माहिती आणि विचारांचे सशुल्क वितरण-प्रसारण करणे, असे या व्यवसायाचे स्वरूप असते. माहितीचा स्रोत आणि माहितीचा उपभोक्ता यांच्यामधील दुवा म्हणजे ही माध्यमे. या व्यवसायाचे वेगळेपण असे की, या दोन्ही टोकांशी माध्यमाचे नाते केवळ पुरवठादार आणि ग्राहक / उपभोक्ता एवढेच नसते. ही माध्यमे या दोहोंचे प्रतिनिधित्वही करतात. स्रोतांकडून माहिती घेताना…

Read More

आराधना जोशी सध्या प्रसिद्ध होण्यासाठी काय काय फंडे अवलंबले जातात. खरंतर, प्रसिद्धी या शब्दामागे चांगल्या अर्थाने समाजात नाव होणं, हा अर्थ अभिप्रेत असतो. मात्र, ‘निगेटिव्ह पब्लिसिटी इज ऑल्सो पब्लिसिटी’ असंच चित्र आजकाल दिसत आहे. 12 वर्षं एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना बीएमएम अर्थात पत्रकारिता शिकवत होते. दोन वर्षांपूर्वी तो पेशा मी सोडला. पण त्यावेळी एक लक्षात आलं की, पत्रकारितेचं प्रशिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 90 टक्के विद्यार्थ्यांना झटपट प्रसिद्धीसाठी इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करायचं असतं. वृत्तवाहिनीत काम करताना आपल्याला ‘कॅमेरासमोर काम करायची इच्छा असल्याचं’ हे विद्यार्थी सतत बोलून दाखवायचे. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला आपण चारचौघांमध्ये उठून दिसावं, समाजात आपली वेगळी ओळख असावी, असं वाटत…

Read More