Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखामध्ये उभे राहून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघितले होते. आता या लेखात बसून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघूया. पद्मासन पद्म म्हणजे कमळ. हे आसन करणार्या व्यक्तीच्या शरीराचा आकार कमळासारखा भासतो म्हणून या आसनाला पद्मासन किंवा कमलासन हे नाव दिले आहे. जमिनीवर पाय सरळ समोर ठेवून ताठ बसावे. उजवा पाय जवळ घेऊन त्याचे पाऊल पकडून ते किंचित वर उचलावे आणि डाव्या मांडीवर पोटाजवळ ठेवावे. डावा पाय वाकवून त्याचे पाऊल थोडे वर उचलून, उजव्या पायावरून ओढून उजव्या मांडीवर पोटाजवळ ठेवावे. तळहात गुडघ्यांवर पालथे किंवा ज्ञानमुद्रेत ठेवावेत. पाठीचा कणा ताठ ठेवून दृष्टी नासाग्री (नाकाच्या शेंड्याकडे)…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा अन्तवन्व इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः । अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद् युध्यस्व भारत ॥18॥ आणि शरीरजात हे आघवें । हें नाशवंत स्वभावें । म्हणोनि तुवा झुंजावें । पंडुकुमरा ॥136॥ य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् । उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥19॥ तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि या शरीरातें । मी मारिता हे मरते । म्हणत आहासी ॥137॥ तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी । तरी…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 27 ऑगस्ट 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 05 भाद्रपद शके 1947; तिथि : चतुर्थी 15:43; नक्षत्र : चित्रा अहोरात्र योग : शुभ 12:33; करण : बव 28:48 सूर्य : सिंह; चंद्र : कन्या 19:20; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:57 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 श्रीगणेश चतुर्थी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – सर्जनशीलता आणि भविष्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी उत्तम दिवस आहे. वैयक्तिक ध्येयासाठी काम करत असाल किंवा करिअरमध्ये प्रगती करत असाल, तर…
अस्मिता हवालदार व्यंकटेश माडगूळकर यांची अनेक पुस्तके, कथासंग्रह, ललितलेखन, कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. ‘करुणाष्टक’ हे त्यांच्या आईचं चरित्र आहे. त्यांच्या कुटुंबाची कथा यात असली तरी सहा मुलगे आणि दोन मुलींच्या आईभोवतीच कथानक गुंफले आहे. आठ मुलांना वाढवणाऱ्या आईची ही कथा वाचताना अनेकदा डोळे पाणावतात. समर्थ रामदासांनी ‘करुणाष्टका’तून श्रीरामांची आर्त आळवणी केली आहे. ‘तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता’ असे म्हणून रामाची प्रार्थना केली आहे. असाच धावा आईने मुले वाढवताना अनेकदा केला आहे. या पुस्तकात आलेला काळ दुसऱ्या महायुद्धानंतरचा आहे. भारताचे स्वातंत्र्य, गांधीहत्या हे प्रसंग यात येतात. पुस्तकातली रेखाटणे स्वतः लेखकाने केली आहेत. अत्यल्प रेषांतून काढलेल्या अर्थगर्भ आकृती, आपल्या मनात व्यक्तिरेखा…
सतीश बर्वे गेल्या आठवड्यातली गोष्ट. अचानक डोंबिवलीला जायचा मणिकांचन योग जुळून आला. ओला कॅब बुक केली. कॅबमध्ये बसल्यावर मी ड्रायव्हरला ओटीपी नंबर दिला आणि प्रवास सुरू झाला. साधारणपणे अशा प्रवासात मी ड्रायव्हरबरोबर थोड्याफार गप्पा मारतो. माझ्या ड्रायव्हरचे नाव होते रमेश यादव. नवी मुंबईचा रहिवासी होता तो. इकडच्या तिकडच्या जुजबी गप्पा झाल्यावर तो स्वतःच बोलायला लागला आणि त्याने त्याची कहाणी मला ऐकवली… त्याचे वडील माझगाव डॉकमध्ये 42 वर्षे नोकरी करून निवृत्त झालेले. त्याचे बालपण धारावीत गेले होते. तिथल्या वातावरणात हा शिक्षणात मागे पडला आणि व्यसनांच्या आहारी गेला, तब्येत नकळत खराब होत गेली. वडिलांनीच ओळखीने मग त्याला नोकरीला लावले. कालांतराने लग्न करून…
यशःश्री जोशी खिरापतीसाठीचे साहित्य किसलेलं सुकं खोबरं – 1 वाटी पिठी साखर – अर्धी वाटी काजू आणि बदाम – 1 ते 2 टेबलस्पून पुरवठा संख्या : 5 ते 7 जणांसाठी तयारीस लागणारा वेळ : खोबरं किसायला – 10 मिनिटे पिठीसाखर करायला 2 मिनिटे वेलची पूड करायला – 1 मिनिट शिजवण्याचा वेळ : खोबरं भाजून घ्यायला 5 ते 6 मिनिटे भाजलेले खोबरे गार करायला – 7 ते 8 मिनिटे एकूण वेळ : 25 मिनिटे कृती सुकं खोबरं जाडसर किसून घ्या. जाड बुडाच्या कढईत किसलेले खोबरे घालून मंद आचेवर पाच मिनिटे भाजून घ्या. खोबऱ्याचा रंग बदलणार नाही, याची काळजी घ्या. (कढईचे बूड…
चंद्रकांत पाटील आमचं घर म्हणजे बाबांच्या घामाचं आणि आईच्या ममतेचं कोंदण होतं. मी उषा आणि माझी धाकटी बहीण निशा, आम्ही दोघीही आई-वडिलांच्या लाडक्या लेकी. आमचं बालपण पलूसजवळच्या एका चिमुकल्या खेडेगावात गेलं. बाबा, किर्लोस्करवाडीच्या कारखान्यात एक निष्ठावान कामगार म्हणून राबायचे. सकाळी सात वाजता कामावर जाणारे बाबा, संध्याकाळी सातला थकून, भागून परत यायचे. कधी कधी तर रात्रपाळी असायची आणि रात्रीच्या दोन-दोन वाजता त्यांची चाहूल लागायची. त्यांच्या मेहनतीवरच आमच्या घराचा डोलारा उभा होता. आम्ही दोघीही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होतो. मी दिसायला खूप सुंदर आणि देखणी होते, पण मी शापित होते. माझ्या पायावर एक डिस्टॉर्शन होतं. माझा उजवा चंपा पूर्ण पांढरा दिसत होता…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा हे विषय जयाते नाकळिती । तया सुखदुःखें दोन्ही न पवती । आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥123॥ तो नित्यरूपु पार्था । वोळखावा सर्वथा । जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥124॥ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः । उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः ॥16॥ आतां अर्जुना आणिक कांही एक । सांगेन मी आइक । जें विचारें परलोक । वोळखिती ॥125॥ या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगत । तें तत्वज्ञ संत । स्वीकारिती ॥126॥ सलिलीं…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 ऑगस्ट 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 04 भाद्रपद शके 1947; तिथि : तृतीया 13:54; नक्षत्र : हस्त 30:03 योग : साध्य 12:07; करण : वणिज 26:45 सूर्य : सिंह; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:58 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 हरतालिका तृतीया स्वर्णगौरी व्रत सामश्रावणी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आयुष्यात काही मोठे सकारात्मक बदल घडवून आणेल. सर्जनशीलतेने भरलेला दिवस असेल. पैशाच्या बाबी हुशारीने हाताळा. वैयक्तिक…
प्रदीप केळूस्कर दारावर खटखट झाली म्हणून श्रद्धाने दार उघडले… बाहेर दत्तूकाका होते… “काय हो काका? आज सकाळीच…” “मास्तर आसत..?” “अजून झोपलाय तो… काल रात्री गेटमीटिंग करून आलाय… उठवू का?” तेवढ्यात दत्तूकाकांच्या आवाजाने जागा झालेला विश्वास बाहेर आला. “काय हो दत्तूकाका.. आज सकाळीच?” “मास्तर.. कालच्या मीटिंगमध्ये काय ठरला संपाचा?” “नाही हो… मालक मागण्या मान्य करत नाही आणि मागण्या मान्य केल्याशिवाय आत जायचे नाही, असे साहेबांचे म्हणणे…” “मास्तर.. यात आमी उपाशी रवलव… दोन वरसा झाली.. संप आज मिटात, उद्या मिटात म्हणून… खायचा काय?” “होय हो काका, मला का समजतं नाही! एवढा दीर्घ संप चालेल याची कल्पना नव्हती…” “मग पुढे काय? सारंगअण्णा काय…

