Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 जुलै 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 08 श्रावण शके 1947; तिथि : षष्ठी 26:41; नक्षत्र : हस्त 21:51 योग : सिद्ध 27:39; करण : कौलव 13:39 सूर्य : कर्क; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:14; सूर्यास्त : 19:15 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 श्रीयाळ षष्ठी कल्की जयंती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन पद्धतीने काम सुरू करावे लागेल. काही मेष जातकांसाठी आजचा दिवस अस्वस्थेचा असू शकतो, यामागचे नेमके…
चंद्रशेखर माधव भिडे काका म्हणजे माझ्या वहिनीचे वडील. आमच्या दोघांच्या वयामध्ये अंदाजे 30 ते 33 वर्षांचा तरी फरक असावा. कसं कोणास ठाऊक, पण सुरुवातीपासूनच माझी अन् त्यांची मैत्री जमली. मैत्रीच म्हणायला हवं. कारण तसं बघायला गेलं तर सांगण्यासारखं असं नातं आमच्यामध्ये नव्हतं. कधीही काही कार्यक्रमानिमित्त किंवा इतर वेळप्रसंगी भेटले की, भरपूर गप्पा मारत असत. त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप होतं आणि माझ्याकडे घेण्यासारखं! माणूस खूप बुद्धिमान आणि उच्चशिक्षित होता. यापलीकडे म्हणजे, आयुष्यात कमावलेला अनुभव. त्यामुळे एकूणच ते जेव्हा बोलायचे तेव्हा ऐकायला एकदम मजा यायची. खूप शिकायला मिळायचं. सुमारे दोन-तीन वर्षांनंतर अचानक एक दिवस माझ्या वडिलांचा अपघात झाला. त्यात मेंदूला इजा झाल्यामुळे सुमारे…
सीए रसिका महाबळ प्राप्तिकर (Income Tax) भरणे हे प्रत्येक करदात्याचे कर्तव्य असून त्यात योग्य नियोजन केल्यास कायदेशीररीत्या कर सवलत घेता येते. भारत सरकारने करदात्यांना काही विशिष्ट खर्च आणि गुंतवणूक यावर वजावट (Deduction) देण्याची तरतूद केली आहे, जी जुन्या कर प्रणालीमध्ये उपलब्ध आहे. जुन्या कर प्रणालीमध्ये वजावट आणि सूट यांच्या आधारे कर आकारणी केली जाते. या प्रणालीत विविध प्रकारच्या सवलतींचा समावेश आहे, जसे की जीवन विमा हप्ता, भविष्य निर्वाह निधी (PPF), शिक्षण कर्ज व्याज, आरोग्य विमा हप्ता इत्यादी. आपण जुनी कर प्रणाली निवडल्यास कोणकोणत्या सवलती उपलब्ध आहेत, त्या कोणत्या कलमांअंतर्गत येतात आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी कोणते नियम आहेत याची सविस्तर माहिती…
शैलजा भा. गोखले सुवासिनी नवविवाहित स्त्रियांनी श्रावणातील मंगळवारी आचरावयाचे सौभाग्यदायी मंगळागौरी या देवतेचे एक व्रत. या व्रतात शिव आणि गणपतीसह गौरीची पूजा करतात. लग्नानंतर पहिली पाच वर्षे किंवा सात वर्षे हे व्रत पाळल्यानंतर या व्रताचे उद्यापन केले जाते. मंगळागौरीच्या जेवणाचा बेतही एकदम खास असतो. यात भाजणीचे वडे, मटकीची उसळ, मूगडाळ खिचडी किंवा साधं वरण भात आणि नंतर मसालेभात, गाजराची कोशिंबीर, दही, हिरवी चटणी असा सर्वसाधारण मेन्यू असतो. त्यापैकी भाजणीच्या वड्यांची पाककृती आपण बघणार आहोत. साहित्य तांदूळ – 1 किलो (जाडा, रेशनचा तांदूळही चालेल) ज्वारी – पाव किलो अख्खे काळे उडीद – पाव किलो अख्खे चणे – पाव किलो गहू -…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला भानुचेनि तेजें धवळलें । जैसें त्रैलोक्य दिसे उजळलें । तैसें व्यासमती कवळलें । मिरवे विश्व ॥39॥ कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें । तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ।।40।। ना तरी नगरांतरीं वासिजे । तरी नागराचि होईजे…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 जुलै 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 07 श्रावण शके 1947; तिथि : पंचमी 24:45; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 19:26 योग : शिव 27:03; करण : बव 12:00 सूर्य : कर्क; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:14; सूर्यास्त : 19:15 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 नागपंचमी मंगळागौरी पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यावसायिक जीवनात भावनांचा खूप जास्त प्रभाव पडू देऊ नका. दिलेली कामगिरी पूर्ण समर्पणाने पार पाडण्याकडे लक्ष द्या. त्यासाठी आपल्या…
सुहास गोखले सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या 88 मांडण्यांना आता जागतिक स्तरावर ‘तारकासमूह’ (Constellations) म्हणून ओळखले जाते. याआधी ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हणण्याची रूढी होती. नक्षत्र ही संकल्पना प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्रातून आलेली आहे. एकूण 27 नक्षत्रे असून अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती अशी त्यांची नावे आहेत. या विषयीच्या लेखमालेत आतापर्यंत आपण 21 नक्षत्रांची माहिती घेतली. या लेखात आपण श्रवण, धनिष्ठा आणि शततारका या नक्षत्रांबाबत जाणून घेऊ. श्रवण : हे नक्षत्र देखील ओळखणे तसे…
रश्मी परांजपे आजकाल आपण ठिकठिकाणी पूर्व-प्राथमिक शाळा म्हणजे खेळगट (Playgroup), शिशुवर्ग (Junior) आणि बालवर्ग (Senior) बघतो. बर्याच वर्षांपासून ही शैक्षणिक पद्धत सुरू आहे. पूर्वीच्या काळात असं काही नव्हतं, मग हल्ली अशा शाळांची काय गरज आहे, असा प्रश्न आत्ताच्या ज्येष्ठ नागरिकांना साहजिकच पडतो. वास्तविक, या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नातच दडलेलं आहे, ते म्हणजे काळाची गरज. या मुद्द्याचा आपण सविस्तर विचार करूया. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. घरात सर्व वयोगटातील पुष्कळ मुलं असायची. लहान मुलांना सांभाळायला घरी अनेक जण उपलब्ध असायचे. मुलांच्या आईला कामं करताना मुलांची चिंता नसायची. मुलं ही बरोबरच्या तसेच मोठ्या भावंडांबरोबर मिळून मिसळून खेळायची. मुलं म्हटलं की, भांडण आणि…
पराग गोडबोले भाग – 2 जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने 1977-78 साली नव्यानेच सॅनिटरी पॅड्स भारतात आणले होते आणि त्याच्या विपणनाची म्हणजे मार्केटिंगची जबाबदारी तिथं नुकत्याच रुजू झालेल्या ‘इंद्रा नूयी’ यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे सर्व सहकारी पुरूष होते. अमेरिकेत स्थिर झालेलं हे उत्पादन भारतात आणून स्त्रियांना त्याचं महत्त्व पटवून द्यायचं, हे खूप कठीण काम होतं. पण त्यांनी अत्यंत जबाबदारीने हे आव्हान पेललं आणि हे उत्पादन भारतात रुजवलं, वाढवलं आणि लोकप्रिय केलं. ‘My life in full’ या आत्मचरित्रात त्यांनी त्यावेळची परिस्थिती चपखल शब्दांत मांडली आहे. एक लक्षात येतंय की, हल्ली या उत्पादनांच्या जाहिराती खूप थेट झाल्यात. काही तर अतिशय किळसवाण्या…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान । कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचें ॥28॥ ना तरी सर्व सुखांची आदि । जे प्रमेयमहानिधि | नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ।।29।। कीं परमधाम प्रकट | सर्व विद्यांचें मूळपीठ ।…

