दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 03 जुलै 2025, वार : गुरुवार
भारतीय सौर : 12 आषाढ शके 1947, तिथि : अष्टमी 14:06, नक्षत्र : हस्त 13:49
योग : परीघ 18:34, करण : बालव 27:17
सूर्य : मिथुन, चंद्र : कन्या 27:18, सूर्योदय : 06:04, सूर्यास्त : 19:20
पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कामाचा ताण थोडासा थकवा आणू शकतो. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला असेल. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. व्यवसाय नवीन उंची गाठू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा, जोडीदाराचा पाठिंबा मिळेल.
वृषभ – एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. आर्थिक समस्यांमुळे मानसिक तणाव निर्माण होईल, पण कालांतराने परिस्थिती सुधारेल. व्यवसायासाठी दिवस फायदेशीर ठरेल. ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो, असे वाटते त्याच्याकडूनच निराशा पदरी पडेल.
मिथुन – आर्थिकदृष्ट्या चढ-उतार राहील. कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. विश्रांती घेणे खूप महत्त्वाचे असेल. प्रवास फायदेशीर ठरेल. कला आणि नाट्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि आपली कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल.
कर्क – एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाचा भाग बनू शकता. कोणतीही दीर्घकालीन गुंतवणूक टाळा. बाहेर जाऊन मित्रांसोबत आनंदाचे काही क्षण घालवण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांसाठी अतिशय उत्तम दिवस असेल, कारण अचानक अनपेक्षित लाभ दिसू शकतात.
सिंह – कामाच्या ठिकाणी कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करा. पैशांची गरज भासू शकते, त्यामुळे आर्थिक बाबींचे नियोजन करा, शक्य तितकी बचत करायला सुरूवात करा. बऱ्याच काळापासून काम करत असलेल्या एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाला विलंब होऊ शकतो.
कन्या – दिवसाची सुरुवात व्यायामाने करा. पैशांचे आगमन अनेक आर्थिक समस्यांपासून मुक्त करू शकते. एखाद्या विशेष व्यक्तीकडून सुखद बातमी मिळाल्याने मन आनंदी होईल. जोडीदारासोबत थोडासा वेळ घालवा. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला असेल.
हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
तुळ – आत्मविश्वास आणि ऊर्जा उच्च असेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल, मात्र, निरुपयोगी गोष्टींवर गरजेपेक्षा जास्त खर्च होणार नाही, याची काळजी घ्या. जोडीदाराचे आरोग्य तणाव आणि चिंता निर्माण करू शकते. अचानक धनलाभ होऊ शकतो.
वृश्चिक – कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवाल. पैसे वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी होऊ शकतात. तरीही, आर्थिक स्थिती सुधारेल. प्रवास फायदेशीर ठरेल. नोकरदार जातकांनी कार्यालयात गप्पाटप्पा करणे टाळावे.
धनु – आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. एखाद्या खास व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला असेल. व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
मकर – धाडसी निर्णय घेऊ शकता, मात्र भावनिक होऊन निर्णय घेणे टाळा. आर्थिकदृष्ट्या दिवस प्रतिकूल असेल. मात्र, संध्याकाळपर्यंत ही परिस्थिती सुधारेल. मुलांकडून अपेक्षा पूर्ण न झाल्याने निराश वाटेल. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखला जाईल.
कुंभ – दिवसभरात उरकायच्या कामांची यादी बनवून त्यानुसार कामे हातावेगळी करा, ज्यामुळे यश मिळवणे सोपे होईल. वेळेची आणि पैशाची कदर करा, अन्यथा येणारा काळ समस्या आणि आव्हानांनी भरलेला असू शकतो. कामाच्या ठिकाणी कोणाची तरी मदत मिळू शकते.
मीन – आरोग्यात सुधारणा होईल. आर्थिक स्थिती चांगली राखण्यासाठी, खर्चावर नियंत्रण ठेवा. बचत करणे फायदेशीर ठरेल. आर्थिक फायदा होऊ शकतो. व्यावसायिकांना विस्ताराच्या संधी मिळतील. कुटुंबासह सहलीला जाऊ शकता.
दिनविशेष
लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे
लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या सुनीता पुरुषोत्तम देशपांडे यांचा आज जन्मदिवस. प्रसिद्ध लेखक पु.ल. देशपांडे यांच्या पत्नी या नात्याने जरी सुनीताबाई ओळखल्या जात असल्या तरी, त्यांची स्वतःची स्वतंत्र ओळख त्यांनी मराठी साहित्य विश्वात नक्कीच तयार केली होती. 3 जुलै 1926 रोजी रत्नागिरी येथे त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन विविध कामगिऱ्या सुनीताबाईंनी पार पाडल्या होत्या. पुढे पुलंशी त्यांचा झालेला परिचय ते त्यांच्याबरोबर झालेले लग्न, लग्नानंतरचे सहजीवन, त्यात आलेले अनुभव यावर आधारित सुनीताबाईंचे ‘आहे मनोहर तरी’ हे आत्मचरित्र मराठी साहित्य विश्वात खळबळ उडवून गेले..याशिवाय सोयरे सकळ, प्रिय जीए, मण्यांची माळ, मनातलं अवकाश अशी साहित्यसंपदाही सुनीताबाईंच्या नावे आहे. याशिवाय, मराठी नाटक, चित्रपट यातही सुनीताबाईंनी आपली छाप उमटवली होती. 7 नोव्हेंबर 2009 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – Skin Care : त्वचा आणि तिचे प्रकार